एक उलट..एक सुलट : पहिलं प्रेम
मुखपृष्ठ >> लेख >> एक उलट..एक सुलट : पहिलं प्रेम
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

एक उलट..एक सुलट : पहिलं प्रेम Bookmark and Share Print E-mail

अमृता सुभाष - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

दुसरीत असताना श्री तू मला भेटलास.. तुझ्याशी लग्न करायचं होतं मला त्या वेळी.. पण ते राहूनच गेलं. अचानक तुझी ‘भेट’ झाली अलीकडेच.. केवढा मोठा, अनोळखी ‘दिसत’ होतास तू..
तुझा चेहरा नीट आठवत नाही मला श्री.. डोळे आठवतात.. मोठे आणि लांबट.. पानासारखे.. पिंगे होते का रे? होते. तू गोरापान होतास मात्र. हे पक्कं आठवतंय. तेजस्वी होतास तू. हे मात्र नीट आठवतंय. खूप वर्षे झाली रे आता.. दुसरीत होते मी तेव्हा.. आता इतक्या वर्षांनंतर तुझ्या ज्या गोष्टी ठळकपणे कोरल्यासारख्या आठवतायेत त्यावरून वाटतं की, तुझ्या या आठवणाऱ्या गोष्टींमुळेच म्हणजे तुझे डोळे, रंग.. आणि हो, तुझं तिसरीच्या वर्गात मॉनिटर असणं.. ही तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट.. मला वाटतं या तिन्हीमुळेच मला ‘तसं’ वाटत असणार तुझ्याविषयी!
मला बाकी काहीच आठवत नाही. त्या दिवशीचा तो प्रसंग सोडून.. तुला आठवला का रे तो प्रसंग नंतर कधी आयुष्यात? आणि आठवल्यावर परत तुला रागच यायचा माझा की हसू यायचं? तेव्हासुद्धा तुला खरंच राग आला की तू दाखवलंस तसं?
अरे, त्या दिवशीच काय, ‘ती’ गोष्ट तुला कधीही सांगण्याचा माझा काहीही इरादा नव्हता. खरंच. पण त्या कल्पना अग्रवालमुळे.. आठवतीये ना आमच्या वर्गातली कल्पना? अगदी छोटीशी होती बाहुलीसारखी. केस मात्र लांबसडक. मारवाडी होती. नाजूक होती छान. तिची आई तिला न्यायला यायची आणि कल्पना म्हणजे तिच्या आईची झेरॉक्स कॉपीच होती. तर त्या कल्पनाने गोंधळ घातला! म्हंजे.. तुला आमचा दुसरी ‘अ’चा वर्ग आठवतोय? तुझ्या तिसरी ‘अ’च्या वर्गाच्या बरोब्बर शेजारी.. मध्ये एक भिंत फक्त. त्या दिवशी आमच्या वर्गावरच्या अष्टेकरबाई मुख्याध्यापिकांना कोणाला तरी भेटायला गेल्या होत्या; आमच्या मॉनिटरला वर्गावर लक्ष ठेवायला सांगून. गंमत बघ- आमच्या वर्गाचा मॉनिटर मुलगा का मुलगी होती हेसुद्धा आठवत नाहीये मला आणि दुसऱ्या वर्गाचा मॉनिटर तू तेवढा लक्षात माझ्या! तर, तर बाई गेल्या आणि मलाच काय, आमच्या सगळ्या वर्गालाच हाश्श! हुश्श! झालं. आणि आयुष्यात कधीच ओरडायला न मिळाल्यासारखा आमचा अख्खा वर्ग बोंबाबोंब, दंगा करायला लागला. इतका दंगा की, त्या मॉनिटरला कुणाचं नाव फळ्यावर लिहावं, हेच सुचेना. पुढे जे काही घडलं ते आत्ता, या क्षणी मला इतकं विचित्र वाटतंय, पण तेव्हा घडलं खरं!
त्या दंग्यात दुसरीत असलेल्या मला दुसरीतच असलेल्या त्या शेजारच्या कल्पनाने विचारले, ‘तू कुणाशी लग्न करणार आहेस?’ आता वाटतं की त्या इवल्या जिवाने माझ्या इवल्या जिवाला त्या दंग्यात हा प्रश्न का बरं विचारला असेल? मग मीही तिला विचारलं, ‘तू कुणाशी करणार आहेस?’ ती म्हणाली, ‘आधी तू सांग, मग मी!’ मी म्हटलं, ‘नक्की? तू पण सांगशील? बघ हं?’ तिचे डोळे एकदम लकाकले.. ती म्हणाली, ‘हो! नक्की! नक्की!’ मी एकदम म्हटलं, ‘कुणाशीच नाही!’ ती मागे लागली, ‘ए नाही गं, खरं सांग, खरं सांग!’
मला कधीच नीट खोटं बोलता येत नाही रे, त्यामुळे बऱ्याचदा मी पकडली जाते, हे आत कुठेतरी कळत असूनही अजूनही मी खरं सांगून स्वत:ला संकटात टाकत असते. ती पुन्हा मागे लागली, ‘ए सांग ना गं, सांऽऽग!’ तर मला खुदुखुदु हसायलाच यायला लागलं. मी वेडय़ासारखी हसत सुटले. ती पण हसायला लागली. ती हसता हसता ओरडत होती, ‘सांग, सांग!’ शेवटी दोघींच्याही पोटात दुखायला लागलं हसून. ती कनपटीलाच बसली रे माझ्या! आणि मी सांगून टाकलं.. ती परत हसायला  लागली. मी म्हटलं, ‘कुणाला सांगू नकोस, फक्त तुलाच सांगतीये.’ तिने मला वचन दिलं हातावर हात ठेवून ‘नाही सांगणार’ म्हणून.
मी म्हणाले, ‘हं, आता तुझं सांग!’ ती चिडवत म्हणाली, ‘कुणीच नाही! कुणीच नाही! मी लग्नच नाही करणारे!’ मी म्हटलं, ‘का, असं नाही गं, तू पण सांगायचंस!’ तेवढय़ात समोरच्या बाकावरची शीतल वळली. आठवतीये शीतल? कमरेपर्यंत दाट केस, मोठ्ठे मोठ्ठे डोळे.. डबलवेण्या घालायची. काळ्या रिबिनींची मोठ्ठी फुलं दोन कानांवर. बऱ्यापैकी गुटगुटीत आणि भोचक. ‘ए काय झालं? काय झालं?’ लगेच कल्पना म्हणाली, ‘आपण फक्त शीतलला सांगू या.’ मी म्हटलं, ‘ए नाही, नाही, नाही, तू वचन दिलंवतंस ना कल्पना!’ आता शीतल अडून बसली, ‘सांग, सांग, सांग.. काय सांग.. मी कुणाला नाही सांगत.’ आता तिला न सांगणं म्हणजे तिच्यावर विश्वास न दाखविल्यासारखं होतं ना रे! तिला काय वाटेल ना..
मग मी तिलाही दम भरला, ‘कुणाला सांगणार नाहीस? बघ हं? नक्की? नाहीतर बघ..’ वगैरे वगैरे. कल्पनाने हळूच तिच्या कानात सांगितलं मात्र.. ती ‘औव्वा, औव्वा’ ओरडत खदाखदा खिदळायलाच लागली! दुसऱ्या क्षणी मला काही कळायच्या आत ती बाकावर उभी होती. तिने तिचे दोन्ही तळहात आपण आरोळी मारताना धरतो तसे तोंडाभोवती माईकसारखे धरले आणि ती चक्क अनाऊन्स करायला लागली, ‘ऐका हो ऐका, आपल्या वर्गतल्या कु. अमृता हिने तिसरी ‘अ’चा मॉनिटर श्री याच्याशी..’ यापुढे मी काय केलं हे माझं मलाच कळलं नाही. शीतलने केलेला विश्वासघात पचवता पचवताच मला ताडकन् लक्षात आलं की, ती जे बोलते आहे ते तुलाही ऐकू येऊ शकतं! शेजारीच आहे की तुझा वर्ग! मग अचानक वाटलं, ‘तुला हे असं बाहेरून नाही कळता कामा. तुला वाटेल, हिने आधी मला का नाही सांगितलं?’ एकदम वाटलं, मी तुझा विश्वासघात करते आहे! मला काही कळायच्या आत मी भिंत ओलांडून तुझ्या वर्गात पोहोचलेले होते!
तुझा वर्ग शांत होता. तुझ्याही वर्गावर बाई नव्हत्या, पण तू मॉनिटर असताना कुणाची बोलायची हिंमत होती? तुझ्या सुवाच्च अक्षरात तू फळ्यावर (तुझी नजर चुकवून त्यातल्या त्यात) बोलणाऱ्या मुलांची नावं लिहीत होतास. मी ताडताड चालत तुझ्याजवळ पोहोचले आणि म्हणाले, ‘हो, हो श्री.. मी तुझ्याशी लग्न करणारे.. मी तुलाच सांगणार होते आधी..  मी कल्पना आणि शीतलला सांगितलं होतं कुणाला सांगू नका म्हणून. पण त्यांनी ऐकलं नाही..’ तू तुझ्या पानांसारख्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलंस. त्या लहान वयातही किती धीरोदात्त वाटले मला तुझे डोळे. शांत..निश्चल..  तू म्हणालास, ‘काय बोलतीयेस?’ मी विचारलं, ‘तुला शीतलचं बोलणं ऐकू नाही आलं?’ तू म्हणालास, ‘नाही.’ मी एकदम नि:शब्दच झाले.. ‘नाही, पण मग.. तरीही.. मी तुला सांगतीये.. की मी तुझ्याशी लग्न करणारे..’ आजूबाजूच्या मुलांनी काय केलं मला काहीच आठवत नाही. पण तुला राग का आला?  तू म्हणालास, ‘लहान मुली असं बोलत नाहीत..’ मी म्हटलं, ‘का?’ तुझ्या रागाचं मला खूप आश्चर्य वाटलं. तू म्हणालास, ‘ताबडतोब तुझ्या वर्गात स्वत:च्या जागेवर जाऊन बस.’ माझे कान एकदम गरम्म झाले आणि मी हसले.. ‘का?’ आठवत नाही..
वर्गात परत आले तर वर्गात मगाचसारखाच बोंबाबोंब दंगा चालू होता. मला वाटलं होतं, सगळे माझ्याकडे बघत असतील. आपल्यातलं बोलणं सगळ्यांनी ऐकलं असणार. पण कुणीही काहीच ऐकलं नव्हतं. कल्पना आणि शीतलसुद्धा वेगळं काहीतरी बडबडत होत्या. मला हायसं वाटलं.. पण वाईटही वाटलं. घडलेलं सगळं सगळेच इतक्यात विसरूनही गेले होते.. मग बाबांची बदली झाली दुसऱ्या गावी आणि मीही विसरून गेले.. सगळं.. पण परवाच्या त्या दिवशी सगळं लख्खं आठवलं. इतक्या वर्षांनी..
परवाच्या त्या दिवशी चुलत बहिणीकडे गेले होते. ही माझी बहीण तुझ्याच गावी शिकायला होती. तिच्या घरी टेबलावर एक मासिक पडलं होतं. तिच्या कॉलेजचं मासिक. तिच्याशी बोलता बोलता सहज त्याच्यावर नजर गेली. त्यावर एका मुलाचा फोटो होता. तो मी पाहिलान् पाहिला आणि परत तिच्याशी बोलायला लागले. का कुणास ठाऊक पुन:पुन्हा त्या फोटोकडे नजर जायला लागली. तिच्यशी बोलता बोलता सहजच ते मासिक उचललं. त्या मुलाच्या कपाळावर टिळा लावलेला होता. फोटोला हार घातलेला होता.. भराभरा पानं उलटली मासिकाची.. आतही तोच फोटो होता परत, त्या फोटोशेजारी एक लेख होता. तुझ्या बहिणींनी लिहिलेला, ‘माझा भाऊ श्री खूप हुशार होता. सगळ्यांचा लाडका होता..’ श्री.. होता..? माझी बहीण म्हणाली, ‘अगं अमृत, हा श्री आठवतो का? तुझ्या शाळेत होता ना? त्याला ब्लड कॅन्सर झाला गं.. नववीत असतानाच गेला.’
त्या दिवशी मी सारखी तुझ्या त्या ‘मोठय़ा झालेल्या’, ‘अनोळखी’ फोटोकडे बघत होते. तुझे डोळे बघून मला ‘लहानपणी’चा ‘ओळखी’चा तू आठवत होतास. संध्याकाळी माझ्या बहिणीकडे तिचा एक मित्र आला होता. तो तुझ्या ओळखीतला निघाला, तुझ्या बहिणीच्या वर्गातला. त्याला मी विचारत सुटले.. काय काय.. आणि तो सांगत गेला.. ‘मी आणि श्री कॅरम खेळायचो एकत्र. मग नंतर तो शाळेत येईनासा झाला. त्याचे आई-वडील दोघंही डॉक्टर ना.. त्यांना कधीच कळलं होतं त्याच्या आजाराविषयी.. त्याची बहीण नुकतीच डॉक्टर झाली. श्री जाईपर्यंत नेहमी वर्गात पहिलाच यायचा..’
श्री, तुझी-माझी ओळख नसेल, नाहीच.. पण तुझ्या जाण्यामुळे ‘त्या’ दिवशी आपल्यात जे घडलं ती माझ्या आयुष्यातली कधीही न विसरता येणारी आठवण बनून राहिली आहे.. फक्त आपल्या दोघांमधलीच ती गोष्ट.. तू गेला.. आता ती गोष्ट फक्त माझीच. त्या गोष्टीतला ‘तू’ माझ्या मनात सतत जिवंत असशील. तेजस्वी असशील. गेलेलं माणूस कुठे कुठे उरतं बघ श्री.. त्या एका दिवसाने तुझ्याशी ओळखही नसलेल्या माझ्या मनात तू आता उरला आहेस.. कायमचा! आपली प्रेमकहाणी तुझ्या जाण्याने संपत नाही.. आपल्या आजाराशी झगडत तरीही ‘पहिलं’ येत राहण्याच्या तुझ्या ‘स्पिरिट’च्या मी पुन्हा एकदा प्रेमात पडले आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो