रुजुवात : जो जे वांछील तो ते लिहो..
मुखपृष्ठ >> रुजुवात >> रुजुवात : जो जे वांछील तो ते लिहो..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रुजुवात : जो जे वांछील तो ते लिहो.. Bookmark and Share Print E-mail

मुकुंद संगोराम ,शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

तंत्रज्ञानामुळे मिळालेलं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य देशांच्या भौतिक सीमांचं बंधन मानणारं नव्हतं, राजकीय सत्तांच्या कक्षेबाहेरचंच होतं. त्यावर र्निबध घालणं, हा त्याच्या गैरवापरावरचा उपाय असू शकत नाही. अभिव्यक्ती ज्या समाजात केली जाते, तो समाज अधिक समंजस असायला हवा..  
जो जे वांछील तो ते लिहो, असं सांगणाऱ्या पु. ल. देशपांडय़ांना ट्विटर, फेसबुक, ईमेल आणि एसएमएस माहीत नव्हते.

कागदाची भेंडोळीच्या भेंडोळी लिहिणाऱ्या प्रत्येकालाच आपण काही तरी अतिशय अमर साहित्य निर्माण करतो आहोत, याची खात्री असणारा काळ होता तो. वाचकांकडून मोठय़ा प्रेमानं येणाऱ्या खुशीपत्रांना स्वत:च्या हस्ताक्षरात उत्तरं लिहिणाऱ्या सगळ्या साहित्यिकांनी निर्माण केलेली विश्रब्ध शारदा ग्रंथबद्ध झाली, तेव्हा कुठे या पत्रापत्रीचं मोल समजून आलं. तो संवाद ख्यालीखुशालीचा नव्हता. त्यात एकमेकांना समजावून घेण्याचा आणि समजून देण्याचा एक समंजस प्रयत्न होता. त्यात व्यक्तिमत्त्वाचं जसं दर्शन होतं, तसंच आयुष्यभर केलेल्या चिंतनाचं सार होतं. हे पत्र कुठे प्रसिद्ध होणार की नाही, याची चिंता नव्हती. त्यामुळेच हा पत्रव्यवहार आरस्पानी होता. त्यात नितळपणा होता आणि माणसांच्या मनाचा थांग शोधण्याची ऊर्मी होती. ही पत्रापत्री साहित्य या दर्जाला पोहोचली, याची ही कारणं होती. राग, लोभ, द्वेष, मत्सर अशा माणसातल्या षड्रिपुंचं देखणं दर्शन हरी विनायक मोटे यांच्या विश्रब्ध शारदा या पत्रसंग्रहात घडतं. एकेका पत्राचं मोल एखाद्या कलाकृतीएवढं किंवा वैचारिक निबंधाएवढं असणारे लेखकराव आजही आहेत. म्हणजे असणारच. एकविसाव्या शतकात दारोदारी आणि हातोहाती असणाऱ्या शब्दनिर्मितीच्या विविध यंत्रस्थळांवर बंदी घालायची की नाही, या विषयाच्या पुन्हा पुन्हा होणाऱ्या चर्चेमुळे विश्रब्ध शारदेची आठवण झाली. लिहिलेला प्रत्येक शब्द टिकेल की नाही, याची चिंता वाटावी, असा आजचा काळ असताना तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून निर्माण झालेली ट्विटर किंवा फेसबुक ही माणसाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार देणारी साधनं आहेत. कारणाशिवायही एकमेकांशी संवाद साधण्याची सोय त्यामध्ये आहे. आपलं म्हणणं क्षणार्धात जगापर्यंत पोहोचवण्याची ताकद त्यात आहे. संगणकाच्या क्रांतीनंतर आलेल्या इंटरनेटच्या महाजालानं त्या संगणकाला अतिशय ताकदवान अशा इंजिनावर बसवून दिलं. संगणक त्याला दिलेल्या आज्ञांचं पालन करतो आणि इंटरनेट त्या आज्ञांना मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करतं.
या महाजालात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आपण फार मोठय़ा जनसमुदायाशी ‘कनेक्टेड’ आहोत, असा भास व्हायला लागला. समाजाशी बांधलेलं राहणं, खरंतर संगणकाच्या आणि इंटरनेटच्या मूलभूत प्रवृत्तीशी विरोधाभासात्मक आहे. कारण या माध्यमांचा मूळ स्वभाव माणसाला एकटं पाडण्याचा आहे. या माध्यमांद्वारे एकटय़ानं जगाशी आभासी पद्धतीनं जोडलं जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे माणसं आत्ममग्न व्हायला लागली आणि मनुष्य हा समूहप्रेमी प्राणी आहे, या परंपरागत म्हणण्याला छेद जाईल, असं माणसाचं वर्तन व्हायला लागलं. एकटेपणाचं वास्तव नाकारणारी कल्पनेच्या पातळीवरील सामूहिक जगण्याची ही नवी पद्धत माणसाला त्याचे जगण्याचे आडाखेही बदलायला भाग पाडत राहिली. आपल्याला जे म्हणायचं आहे, ते आपलं स्वत:चं मत आहे आणि त्याला स्वत:पुरते का होईना पण काही समर्थन आहे, याकडे कानाडोळा करून बिनधास्तपणे हवे ते व्यक्त करण्याची ही नवी माध्यमव्यवस्था जगातल्या लोकशाही नसलेल्या देशांमधील माणसांसाठी फारच मोलाची ठरली. जगणंच जिथे नियंत्रित असलेल्या परिस्थितीत आपलं म्हणणं जाहीररीत्या मांडता येण्याची शक्यताच नसते. आखाती देशातील उठाव या अशा नव्या व्यवस्थेमुळे शक्य झाला. राजकीय सत्तेनं दाबून ठेवलेला राग, चीड, संताप व्यक्त करण्याच्या या सुविधेनं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं जे अचाट सामथ्र्य दाखवलं, ते खरंतर अनपेक्षित वाटावं, असं होतं. भांडवलाच्या अफाट मदतीनं साऱ्या जगाला वेठीला धरण्यासाठी निर्माण झालेल्या माध्यमांच्या नव्या व्यवस्था जेव्हा निर्मितीच्या मूळ हेतूलाच हरताळ फासतात, तेव्हा जुलिअन असांजसारख्या युवकाला ‘विकिलीक्स’ सारखी नवी विश्रब्ध शारदा निर्माण करता येते. भांडवलवादी देशांच्या हे लक्षात यायला वेळ लागला. तोवर ईमेल्स किंवा सोशल नेटवर्किंग यंत्रणा यांची निर्मिती व्यावसायिक हेतूंपुरतीच मर्यादित होती. तंत्रज्ञानामुळे केवळ जगणं बदलत नाही तर जगण्याचं तत्त्वज्ञानही बदलतं, हे पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे पुढे आलं. म्हणजे प्रेशर कुकर, गॅस शेगडी, मिक्सर-ग्राइंडर, फ्रीज, व्हॅक्यूम क्लीनर, यांसारख्या तंत्राधारित उपकरणांमुळे जगातल्या कितीतरी स्त्रियांच्या जगण्यात आमूलाग्र बदल झाला. त्यांना श्वास घेण्याची उसंत मिळाली. जगण्यासाठीची आणखी काही कारणे शोधण्याची संधी मिळाली. स्वत:कडेच बघायला वेळ मिळाला. ही उपकरणं ही बाजारपेठीय गरजेतून निर्माण झाली, तरी त्यांना सामाजिक आशय प्राप्त झाला. तंत्राचा, विज्ञानाचा व्यवसायापलीकडे सामाजिक घडामोडींशीही संबंध असतो, याचं सोशल नेटवर्किंग हे गेल्या शतकभरातलं पहिलं प्रात्यक्षिक ठरलं.
सोशल नेटवर्किंग ही व्यावसायिक संधी असली, तरी त्यातून लोकशाहीमध्ये अंतर्भूत असलेलं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्राप्त झालं. मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली आणि त्यातून समाजरचनांचे पोतही बदलले. पृथ्वीवरच्या माणसांना या माध्यमांनी अनपेक्षितरीत्या जे स्वातंत्र्य बहाल केलं त्यानं माणसांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. एकदा हे स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर ते हिरावून घेण्यानं नवे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. अमेरिका आणि इंग्लंड यांसारखे लोकशाहीचे समर्थक देशही आता या प्रश्नानं हैराण झाले आहेत, याचं कारण या स्वातंत्र्यानं राजकीय सत्तांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली, परिणामी त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. ज्युलियन असांज या युवकाने विकिलीक्सच्या माध्यमातून या महाकाय शक्ती असलेल्या राजकीय सत्तांची पाळंमुळं खणायला सुरुवात केली, तेव्हा तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या या माध्यमांच्या पुतळ्याचा राक्षस झाल्याची जाणीव जगभर झाली. सत्तांचा विध्वंस करणाऱ्या या राक्षसाच्या नाकात दोऱ्या अडकवणं त्यामुळेच आवश्यक झालं. असांजला मिळालेला राजकीय आश्रय हा जागतिक राजकारणातील एक खेळी आहे, हे एकवेळ मान्य केलं, तरी सत्तासमतोलाचं एक नवं गणित त्यामुळे पुढे आलं. लोकशाही हे जगण्याचं मूल्य असल्याच्या बाता करणाऱ्या ज्या अमेरिकेच्या सत्तेला असांज यानं जिवंत राहणंही धोकादायक वाटतं, तीच अमेरिका भारताला ट्विटर आणि फेसबुकवर र्निबध आणण्याबाबत खडे बोल सुनावते, यातलं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. सार्वजनिक कचरापेटी आपल्या दारासमोर नको, शेजारच्या घरासमोर चालेल, अशी ही मनोवृत्ती आहे.
गेल्या काही महिन्यात भारतातील सोशल नेटवर्किंगमध्ये जो धुडगूस सुरू आहे, तो पाहून त्यावर र्निबध आणण्याची चर्चा सुरू झाली आहे. महानगरांमधून राहणाऱ्या पूर्वाचलातील भारतीयांच्या हत्येची धमकी याच माध्यमांमधून प्रसारित झाली. मुंबईतील हिंसाचारानंतर ज्या प्रकारचे चित्रण या सार्वजनिक माहितीजालांमध्ये प्रसृत करण्यात आले, त्यामुळे सामाजिक शांततेवर ओरखडा उमटला यात वाद असण्याचे कारण नाही. तंत्रज्ञानाचा जगापर्यंत पोहोचण्याचा वेग इतका अतिप्रचंड आहे, की त्याला रोखण्याचे उपाय योजेपर्यंत तो दुसऱ्या मार्गाने जगात पोहोचलेला असेल. अभिव्यक्तीचं हे स्वातंत्र्य हिरावून घेणं एकवेळ सोपं, पण ते पुन्हा बहाल होणं फारच दुरापास्त. कारण तंत्रज्ञानामुळे मिळालेलं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य राजकीय सत्तांच्या कक्षेबाहेरचं होतं. ते विज्ञानाच्या प्रगतीतून आपल्यापर्यंत आलेलं असल्यानं, त्याला देशांच्या भौतिक सीमांचं बंधन नव्हतं. ते अशा सीमांनी बांधून टाकणं, हा त्याच्या गैरवापरावरचा उपाय असू शकत नाही. समाज अधिकाधिक समंजस होणं, त्याला जबाबदारीची जाणीव होणं आणि त्यातून या तंत्रज्ञानाचा विधायक उपयोग होणं ही त्यावरील योजना असू शकते. ती अमलात आणण्यासाठी बरंच काही करावं लागणार आहे. अनेक पातळ्यांवर कायदेशीर गाळणी बसवून हा प्रश्न सुटणार नाही. सव्वाशे कोटींच्या, बहुसांस्कृतिक, बहुराजकीय प्रणाल्या असणाऱ्या या देशावर आता असे र्निबध घालणे हीच अवघड गोष्ट ठरली आहे. माणसांमध्ये तीव्र स्वरूपाचा द्वेष परसवणे ही एक राजकीय खेळी असू शकते. असा द्वेष तेथील माणसांना सैरभैर व्हायला पूरक ठरतो आणि अशी स्थिती अनामिक भीती तयार करायला फारच उपयोगी ठरते. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या जागतिक राजकारणात या तंत्राचा उपयोग अनेकवेळा करण्यात आला आहे. विज्ञानाने त्यात काही प्रमाणात सुकरता आणली आहे, एवढंच. माणसामाणसांमध्ये एकमेकांबद्दल असलेला विश्वास संपतो आहे, या गंभीर गोष्टीकडे सामाजिक संस्थांनी आता अधिक लक्ष देणे आवश्यक असताना केवळ दुसऱ्यावर दोष ढकलून मोकळे होण्याने प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा होणार आहे. तीन दशकांच्या काळात निर्माण झालेल्या या अमानवी शक्तीला कायद्याची चौकट रोखू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुलंनी ‘जो जे वांछील तो ते लिहो’ असा जो संदेश दिला, त्यामागचं तत्त्व समजणं अधिक अगत्याचं आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो