संजय उवाच : गरज बरस..
मुखपृष्ठ >> संजय उवाच >> संजय उवाच : गरज बरस..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संजय उवाच : गरज बरस.. Bookmark and Share Print E-mail

२६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नांदेड शाखेने आयोजिलेला कार्यक्रम आटोपून मी मुंबईला परतत होतो. सकाळची दहाची वेळ. मुंबईत पाऊस असल्याची वार्ता नांदेड विमानतळावरच मिळाली होती. मुंबईजवळ आल्यावर विमान ३२ हजार फुटांवरून खाली खाली उतरू लागले आणि एक अतिशय विलोभनीय दृश्य मला पाहायला मिळाले. खिडकीच्या बाहेर नजर टाकली तर स्वच्छ; मोकळे आकाश होते. अंधाराचा लवलेशही नव्हता. सूर्यप्रकाशाने आसमंत उजळून टाकला होता. खाली पाहावे तर कापूस िपजून त्याचे ढीग लावावेत तसे पांढरेशुभ्र ढग. कुठे विरळ, तर कुठे अगदी घनदाट. पांढऱ्या ढगांच्या गालिचावरून जणू विमान चालले होते आणि हा गालिचा डागाळू नये म्हणून त्याने आपले पाय पोटात ओढून घेतले होते. उंची जसजशी कमी होई, तसतसे ही पांढऱ्या ढगांची दुलई विमानाच्या जवळ येई. आणि एका क्षणात विमान ढगांत शिरले. जणू त्याने दुलई अंगावर ओढून घेतली. हवेच्या थराच्या घनतेच्या बदलामुळे विमान थरारले. ती कंपने विमानातल्या सर्वानाच जाणवली. जणू दुलई पांघरल्यावर विमान कूस बदलत होते. असा काही काळ अस्वस्थतेचा होता. ढग खिडकीत दाटले होते. आत डोकावून पाहात होते. प्रवाशांशी गुजगोष्टी करूइच्छित होते. पुढचे अन् पलीकडचे काहीही दिसत नव्हते. धुरात, धुक्यात सापडल्यावर व्हावी तशी स्थिती होती. फरक एवढाच होता की, हा अनुभव सुखद होता. उंची कमी होत असल्याचे जाणवत होते अन् एका क्षणात या पांढऱ्या पडद्यातून विमान बाहेर आले. यापुढचा नजारा अतिशय विलक्षण होता. खालची जमीन थोडी थोडी अंधुकशी दिसू लागली होती. पाणी आणि जमीन एकमेकांशी छप्पा-पाण्याचा खेळ खेळत होते. अजूनही ढगांची साथ होतीच. पण आता हा थर काळपटलेला होता. काळ्या ढगांची गर्दी होती आणि त्यातून पाण्याचे हजारो- लाखो थेंब बरसत होते. जमिनीकडे धाव घेत होते. विमानाच्या पत्र्यावर, काचांवर त्यांचा ताशा वाजत होता. ढगांतून पडणाऱ्या पावसाचे चित्र मी आजवर बालवाडीपासून अनेकदा पाहिले होते. त्या प्रत्येक चित्रात ढग आणि पाऊस माझ्या डोक्यावर होता. आज मात्र मी ढगांना आणि पावसाला त्यांच्या डोक्यावर जाऊन पाहत होतो. मला अचानक निदा फाजलींची जगजीतजींनी गायलेली गझल आठवली...
 ‘‘गरज बरस प्यासे धरतीको फिर पानी दे मौला
चिडियोंको दाने, बच्चोंको गुडधानी दे मौला..’’
विमान आता आणखी खाली आले. खालची जमीन दिसू लागली होती. कोसळत होता पाऊस आणि त्याने खाली हिरवा गालिचा अंथरला होता.. हिरव्या पायवाटा; हिरवी शाल पांघरलेले मुंबईच्या परिघातले डोंगर; अन् हिरवा शालू नेसलेल्या टेकडय़ा; भिजलेल्या मृद्गंधाने न्हाऊन निघालेल्या पायवाटा; अंगावरून पाण्याच्या थेंबांचे निथळते ओहोळ वाहू देणारा ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे.. विमानतळाला खेटून उभे राहिलेल्या अगणित झोपडय़ांनी आपापल्या डोक्यावरून निळ्या प्लॅस्टिकचे रेनकोट ओढून घेतले होते. काही मिनिटांपासून बघितलेल्या या अद्भुत नजाऱ्यातून मी बाहेर आलो, कारण चाके जमिनीला टेकल्याचा धक्का बसला होता. विमान पाìकग लॉटकडे रांगू लागले.
..हे दृश्य आपल्यापकी अनेकांनी आणि खरेतर मी स्वत:ही अनेकदा पाहिले होते, पण का कोण जाणे या निसर्गाने आज दाखविलेल्या चमत्काराने माझ्या मनात विचारांची आवर्तने उठली. मी परमेश्वराचे अस्तित्व मानतो; आणि आज या पांढऱ्या-काळ्या ढगांच्या विविध प्रस्तरांमधून तो माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता, असा मला भास झाला. निदाजींच्या त्या गझलच्या पुढच्या एका कडव्यात..
‘‘फिर मूरतसे बाहर आकर चारों ओर बीखर जा
फिर मंदिरको कोई मीरा दीवानी दे मौला.’’
अशा ओळीत परमेश्वर चारी दिशांना विखुरला जाणे म्हणजे काय, हे आज काळ्या ढगांतून सर्वत्र पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी मला दाखवून दिले. कळत-नकळत मला माझ्या रुग्णालयातल्या वैद्यकीय जीवनाची आठवण झाली. आज अनुभवलेले हे विविध घनतेचे काळे-पांढरे थर सुखदु:खांच्या रूपाने आम्हाला रुग्णालयात ठायी ठायी अनुभवाला येतात. कुठे नव्या बाळाचा जन्म; तर कुठे अकल्पित, अघटित अपघाती मृत्यू.. कुठे शस्त्रक्रियेची चिंता, तर कुठे तुटपुंज्या पशामुळे होणारी तगमग.. कुठे वेदनाशमनाची तृषार्तता.. तर कुठे क्लेशहारक तंत्र-पद्धतींचा वर्षांव.. दुथडी भरून वाहणारी ज्ञानगंगा.. तिच्यात अभ्यंगस्नान करून शुचिर्भूत होऊ इच्छिणारे आमचे विद्यार्थी.. पण या साऱ्या पलीकडे निसर्गाने आज मला एक धडा शिकविला होता अन् तो म्हणजे पांढऱ्या-काळ्या स्तरांसारखे अडचणी-आनंदाचे स्तर वेगवेगळ्या उंचीवर असतात. आज आनंद आहे म्हणजे उद्या थोडय़ाफार अडचणी या येणारच. त्यांचा बाऊ न करता पुढे जात राहायचे आणि आपले अस्तित्व अंतर्धान पावेपर्यंत बरसत राहायचे.. फक्त बरसत राहायचे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो