विशेष लेख : मनाच्या मदानातले युद्ध
मुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख : मनाच्या मदानातले युद्ध
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विशेष लेख : मनाच्या मदानातले युद्ध Bookmark and Share Print E-mail

 

रवी आमले, बुधवार, २९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्या सहा दशकांत पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये एक युद्ध अविरत सुरू आहे. त्यात कधी पारंपरिक लढाया झाल्या, तर कधी शांततेचे विराम येऊन गेले. छुपे युद्ध मात्र अखंड सुरू आहे. दहशतवादी कारवाया हा त्याचाच एक भाग. आता त्या जोडीलाच पाकिस्तानने भारताविरोधात मनोवैज्ञानिक युद्ध सुरू केले आहे. आणि या युद्धासाठी पाकिस्तानला नाटोची अजाणता मदत झाली आहे. त्याविषयी..


मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना रसद पुरवणारे पाकिस्तानी सरकार, आसामातील हिंसाचाराची बनावट छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती प्रसृत करणाऱ्या संकेतस्थळांवर काही ठोस कारवाई करील का- किंवा करू शकेल का, हा प्रश्नच आहे. तरीही भारत सरकारने पाकिस्तानकडे आपली तक्रार नोंदवली आहे. अशा सुमारे अडीचशे संकेतस्थळांची यादीही पाठवली आहे. पाकिस्तानी सरकारला त्याचे पुरावे हवे आहेत. तर ते पुरावे जमा करण्याचे कामही सुरू आहे. पुढच्या महिन्यात ७ तारखेला परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खारबाईंना भेटणार आहेत. त्यावेळी त्यांच्या द्विपक्षीय चच्रेत हाही एक प्रश्न असेल. राजनतिक पातळीवर या अशा कसरती कराव्याच लागतात. तेव्हा त्याकडे कोणी फार िनदक नजरेने पाहण्याची आवश्यकता नाही. मात्र या अशा गोष्टींबाबत राजनतिक पातळीवर थांबायचे काय, हा खरा सवाल आहे.
 जुलच्या दुसऱ्या पंधरवडय़ात आसाममध्ये बोडो आदिवासी आणि मुस्लिम स्थलांतरित यांच्यातल्या ताज्या संघर्षांला सुरुवात झाली. त्यानंतर दहा-बारा दिवसांत त्याची धग दक्षिणेकडील राज्यांत पसरली. ११ ऑगस्टला मुंबईत दंगा झाला. आणि त्यानंतर तर भारताच्या इतिहासातील फाळणीनंतरच्या सर्वात मोठय़ा स्थलांतरास सुरुवात झाली. इंडियन मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांसाठी ज्ञात असलेल्या प्रदेशांतच प्रामुख्याने ईशान्य भारतीयांना लक्ष्य करण्यात आले होते हा काही योगायोग नाही. हे आपापतही घडलेले नाही. पाकिस्तानात उगम असलेल्या संकेतस्थळांवरून, जनमाध्यमस्थळांवरून, दूरध्वनी लघुसंदेशांतून ईशान्य भारतीयांविरुद्ध गरळ ओकणारा, त्यांच्या मनात भय निर्माण करणारा मजकूर प्रसृत करण्यात आला होता. फक्त हे सरकारला समजेपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ते समजण्यासाठी मुंबईत दंगा व्हावा लागला. त्यानंतर संबंधित सुमारे अडीचशे संकेतस्थळे बंद करण्याची कारवाई करण्यात आली. १७ ऑगस्टपासून १५ दिवसांसाठी एका दिवशी पाचहून अधिक एसएमएस पाठविण्यावर बंदीच घालण्यात आली. पुढे ती शिथिल झाली, परंतु हे म्हणजे बल गेला झोपा केला असे झाले. कारण तोवर पाकिस्तानने एक लढाई जिंकली होती. ही मनोवैज्ञानिक लढाई होती.
गेल्या सहा दशकांत पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये एक युद्ध अविरत सुरू आहे. त्यात कधी पारंपरिक लढाया झाल्या, तर कधी शांततेचे विराम येऊन गेले. छुपे युद्ध मात्र अखंड सुरू आहे. दहशतवादी कारवाया हा त्याचाच एक भाग. आता त्या जोडीलाच पाकिस्तानने भारताविरोधात मनोवैज्ञानिक युद्ध जोमाने सुरू केले आहे. आणि या युद्धासाठी पाकिस्तानला नाटोची अजाणता मदत झाली आहे. मनोवैज्ञानिक युद्ध हा काही नवा प्रकार नाही. शत्रूराष्ट्राचा तेजोभंग करण्यासाठी, तेथील नागरिकांच्या मनात आपल्याच राज्ययंत्रणेबद्दल अविश्वासाची भावना निर्माण करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर हे त्याचे वैशिष्टय़. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील प्रमुख शहरांमध्ये विमानांतून नाझीविरोधी पत्रकांचा पाऊस पाडला होता. क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो, त्याच प्रमाणे इराकमध्ये सद्दाम हुसेन यांच्या विरोधात त्या-त्या देशातील जनतेला भडकविण्यासाठी अमेरिकेने खास रेडिओ केंद्रे सुरू केली होती. ही त्याची काही सर्वज्ञात उदाहरणे.
‘नाटो’चे तंत्र..
अलीकडे अरब देशांमध्ये झालेल्या क्रांतीच्या वेळीही अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो फौजांनी याच तंत्राचा वापर केला. मणिपाल विद्यापीठातील युनेस्कोच्या शांतता अध्यासनाचे सदस्य-प्राध्यापक, ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी व सुरक्षा या विषयांतील तज्ज्ञ एम. डी. नलपत यांच्या हवाल्याने ‘रीडिफ’ दिलेल्या वृत्तानुसार, लिबियातील क्रांतीच्या वेळी तेथील लोकांना भडकविण्यासाठी नाटोने अनेकांना मनोवैज्ञानिक युद्धाचे, बेमालूम बनावट छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. वस्तुत अशा प्रकारची बनावट छायाचित्रे वा ध्वनिचित्रफिती तयार करणे हे काही फार अवघड काम नाही. फोटोशॉप, मुव्हीमेकर यांसारखे संगणकीय प्रोग्राम हाताळू शकणारे कोणीही ते करू शकते. मात्र समाजमनावर कोणत्या गोष्टी परिणाम करू शकतात याचे मानसशास्त्र मात्र सगळ्यांनाच अवगत असू शकत नाही. नाटोने मुख्यत त्याचेच प्रशिक्षण दिले असावे.
लिबियानंतर आता सीरियामध्ये नाटोच्या त्या गटाचा वापर करण्यात येत आहे. त्यातल्याच काहींना आपल्याकडे वळविण्यात पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था यशस्वी ठरली आहे. मनोवैज्ञानिक युद्धाच्या प्रशिक्षणासाठी भरती करताना नाटोने त्या व्यक्ती दहशतवादी गटांशी संबंधित आहेत की नाही, हे तपासून पाहण्याची तसदी न घेतल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल. पाश्चिमात्य देशांच्या आणि त्यातही प्रामुख्याने अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचे हे आता एक वैशिष्टय़च बनून गेले आहे. म्हणजे आधी आपल्या फायद्यासाठी अतिरेकी शक्तींना बळ द्यायचे, प्रसंगी तशी शक्ती निर्माण करायच्या आणि मग कालांतराने त्या भस्मासुरासारख्या उलटल्या, की त्यांच्याविरोधात युद्ध छेडायचे. सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन, तालिबान यांच्याबाबतीत हेच घडले होते. नाटोचा हा मनोवैज्ञानिक सैनिकांच्या निर्मितीचा उपद्व्याप हा तसाच, पण जरा छोटासा प्रकार आहे.   
पाकिस्तानने या नाटो-प्रशिक्षित तज्ज्ञांच्या साह्याने भारतावर ही एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरची पहिली मनोवैज्ञानिक चढाई केली. तिला स्थानिकांनी बळ दिले. तिचे ‘यश’ आपण पाहिलेच आहे. एरवी ईशान्य भारतात काय चालते, याच्याशी उर्वरित भारताचा जणू संबंधच नसतो. मानसिक पातळीवर ईशान्य भारताशी आपले जणू काही देणे-घेणेच नसते. त्याचेच प्रतििबब प्रसारमाध्यमांत दिसते. पण पाकिस्तानने हे युद्ध छेडले आणि दूर दक्षिणेकडील राज्यांतून ईशान्य भारतीयांचे पलायनसत्र सुरू झाले. २६/११ने जे साधले नाही, त्यानंतरच्या झवेरी बाजारातील बॉम्बस्फोटाने जे होऊ शकले नाही, ते यातून उद्भवलेल्या मुंबई दंग्याने केले. गेल्या दशकभरात पहिल्यांदाच मुंबईमध्ये धार्मिक विद्वेषाचे कडसर वातावरण निर्माण झाले.
 यातील सगळ्यात भयंकर बाब म्हणजे अशा प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी आपली फारशी तयारीच नाही. २००८ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणब मुखर्जी यांनी, नवी दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमधील भाषणात चीन खेळत असलेले मनोवैज्ञानिक युद्ध आणि तेथील ‘सायबर राष्ट्रवाद’ याबाबतचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही आपण त्याकडे फारसे लक्ष दिले नसल्याचेच दिसते. ही गोष्ट खरी आहे की, मनोवैज्ञानिक युद्धाचा मुकाबला करणे ही सोपी बाब नाही. मुळात ते युद्ध कधी सुरू होते, हे समजणे कठीण. पण ते अशक्य नाही, हेही खरे.
भारताची सज्जता
भारतात कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम- इंडिया (सर्ट-इंडिया), इंटलिजन्स ब्युरो (आयबी), रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस िवग (रॉ) या संस्था सायबरविश्वावर नजर ठेवून असतात. आता उजेडात येत असलेल्या माहितीनुसार, भारतात जातीय तणाव पसरविणारा मजकूर संकेतस्थळे आणि जनमाध्यमस्थळांतून पसरविला जात आहे, हे जुलच्या शेवटच्या आठवडय़ात इंटेलिजन्स ब्युरोच्या ‘सायबर मॉनिटिरग सेक्शन’च्या लक्षात आले होते. पण त्यांनी ही माहिती अन्य कोणत्याही यंत्रणेला दिली नाही. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (एनटीआरओ) या संस्थेकडे ‘विश्वरूप’ हे माहितीच्या महाजालावर बारीक नजर ठेवणारे सॉफ्टवेअर आहे. त्याचीही वेळीच मदत घेण्यात आली नाही. तसे झाले असते, तर पाकिस्तानी कारस्थान एवढे यशस्वी ठरू शकले नसते. आता सर्ट-इनने संबंधित संकेतस्थळे, ब्लॉग, ट्विटर हँडल (ट्विटर वापरकर्त्यांचे नाव-पत्ता) ब्लॉक करण्याचे काम चालवले आहे. पण तो कारभारही असा अजागळ आहे की, त्यातून लोकांना सेन्सॉरशिपचा वास येऊ लागला आहे. म्हणजे त्यातही पुन्हा सरकारविरोधात अविश्वासाची भावनाच जन्मली. मनोवैज्ञानिक युद्धातून आणखी वेगळे काय साधायचे असते?
 समाजात फट असली की ती रुंदावण्याचे काम या अशा कारस्थानांतून केले जाते. तेव्हा त्यांचा मुकाबला करायचा असेल, तर अशी फट राहू नये आणि जी आहे ती रुंदावण्याचे प्रयत्न झालेच, तर ते वेळीच हाणून पाडले पाहिजेत. हे काम जितके सरकारचे, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचे आहे, तितकेच ते समाजाचेही आहे. खेदाची बाब हीच की, आसामप्रकरणी हे दोघेही अयशस्वी ठरले आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो