आरोग्यम् : दूध वाढते वाढते...
मुखपृष्ठ >> आरोग्यम् >> आरोग्यम् : दूध वाढते वाढते...
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आरोग्यम् : दूध वाढते वाढते... Bookmark and Share Print E-mail

alt

डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बाळ दूध प्यायले नाही व आईचे स्तन मोकळे झाले नाहीत तर दूध बनण्याच्या प्रक्रियेत अडचण येते व दूध कमी बनते. त्यामुळे दूध जेवढं जास्त वापरले जाईल तितके जास्त दूध बनेल. म्हणूनच बाळाच्या गरजेसाठी ‘ह्य़ुमन मिल्क बॅंक’ स्थापन करण्यात आली आहे. आईच्या दुधाचं महत्त्व सांगणारा हा तिसरा व अंतिम लेख.
ज सजसा दिवस वर येतो, तान्हुल्याच्या कामकाजी मातेचा जीव मागे घोटाळतो. ही कामकाजी माता खेडय़ातली असेल किंवा शहरातली- बिगी बिगी शेताला जाणारी असेल, धावत पळत लोकल गाठणारी, आपल्या बाळाला सोडून जाणारी असेल, पुढचे सात-आठ तास त्याला आपले दूध पाजता येणार नाही म्हणून व्याकूळते.
आपण  जेव्हा तिला सांगतो, ‘पहिले सहा महिने बाळाला केवळ आपलेच दूध द्या, ते बाळासाठी अमृत आहे. बाळाचे रोगराईपासून रक्षण करते, बाळाला आवश्यक ती सर्व पोषकतत्त्वे दुधात असतात आणि बाळ आणि आई यांच्यात भावनिक बंध तयार होतो. तेव्हा कामकाजी माता ही सर्व माहिती असूनही, इच्छा असूनही, भरपूर दूध येत असूनही बाळाला त्यापासून वंचित ठेवावे लागेल म्हणून खंतावते.
तुम्हाला माहीत असेलच की माता आपले दूध बाळासाठी वाटीत काढून ठेवू शकते! असे काढून ठेवलेले दूध, पुढे सहा तास बाहेरच्या तापमानात चांगले राहते. आणि फ्रिजमध्ये चोवीस तासही राहू शकते. प्रत्येक गर्भवती मातेला ‘मदर क्राफ्ट’मध्ये बालसंगोपनाच्या धडय़ात आपल्या बाळासाठी स्तनातून दूध कसे काढायचे, कुठे साठवायचे हे सांगितले पाहिजे. म्हणजे गरज असेल तेव्हा व तसे ते काढून ठेवता यावे व आवश्यकतेप्रमाणे वापरता यावे. हे दूध काढण्याचे तंत्र इतके आवश्यक आहे की प्रत्येक मातेने ते शिकून घेतले पाहिजे.
इतर आणखी कोणत्या परिस्थिती आहेत जेव्हा मातेला आपले दूध काढून ठेवावे लागते?
सर्वसामान्य परिस्थिती व विशेष परिस्थिती जेव्हा मातेला दूध काढून ठेवण्याची गरज असते.
सामान्य परिस्थिती : पहिले तीन दिवस नवजात बाळाला पुन्हा पुन्हा छातीला लावून चीक-दूध पाजल्याने तिसऱ्या दिवशी भरपूर दूध उतरते. बाळ अजून खूप लहान असल्याने इतके दूध बाळ ओढू शकत नाही. त्यामुळे दूध छातीत साठून राहते. (ावछछ इफएअरळ) या स्थितीत स्तन खूप जडावल्याने मातेला अवघडल्यासारखे होते. परंतु मातेला स्तनातून दूध काढण्याचे तंत्र अवगत असेल तर ती आपले दूध काढून छाती मोकळी करू शकते. तसे केले नाही तर स्तन कडक होतात. (एल्लॠ१ॠी१ेील्ल३) ही स्थिती अतिशय दुखरी असते. कधी तापही येतो. कडक छातीतून बाळ दूध ओढू शकत नाही. दूध तसेच साठू न देण्यासाठी हळूहळू  मालीश करून (दूध काढण्याचे तंत्र खाली सांगितल्याप्रमाणे) दूध काढून स्तन मोकळा करावा नाहीतर स्तनात दुधाच्या गाठी होतात. ही स्थिती जास्तच दुखरी असते. या दुधाच्या गाठींना जंतुसंसर्ग होऊन गळू होऊ शकतो. दुधाच्या गाठींचा गळू झाल्यावर मात्र गळू शस्त्रक्रियेने काढावा लागतो. ही स्थिती कोणत्याही मातेला येऊ शकते. म्हणजे दुधाची गाठ बनेपर्यंत हाताने दूध काढून स्थितीत सुधारणा आणता येते. पण जंतुसंसर्गाने गळू झाल्यावर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही.
बाळाच्या विशेष परिस्थितीत म्हणजे- जेव्हा कमी वजनाचे बाळ जन्माला येते किंवा नवजात बालक आजारी असते तेव्हा त्याला अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. बाळाला माता स्तनावर पाजू शकत नसली तरी तिचे दूध बाळाला मिळण्यासाठी माता स्वत:चे दूध वाटीत काढून अतिदक्षता विभागात पोचविते. बाळ अशक्त असेल तर ते जास्त दूध पिऊ शकत नसले तरी मातेने मात्र आपले दूध काढून ठेवावे म्हणजे स्तनात जास्त दूध बनायला मदत मिळेल.
जेव्हा बाळाला जन्मत:च तोंडाचे काही व्यंग असते, जसे की फाटलेला ओठ किंवा फाटलेला टाळू असे नवजात बाळ आईच्या स्तनातून पिऊ शकत नाही अशा वेळी मातेला स्वत:चे दूध वाटीत काढून चमच्याने भरवावे लागते. ही गोष्ट मातेला बरेच आठवडे म्हणजे बाळ स्तनावर ओढायला शिकेपर्यंत किंवा बरेच महिने म्हणजे ऑपरेशनने बाळाचे व्यंग सुधारेपर्यंत करावी लागते.
स्तनातून दूध काढण्याची पद्धत-
१) स्तनात दूध साठून गाठी झाल्या असतील तर ते किंचित दुखरे असतात. आईने गरम पाण्याने आंघोळ करावी म्हणजे थोडा आराम वाटेल. किंवा गरम पाण्यात भिजविलेल्या टर्किश टॉवेलने स्तन हलके शेकावेत.
२) मातेने हात वर-खाली, मागे-पुढे करावेत. खांद्यातून एक-दोन वेळा गोलाकार फिरवावेत.
३) हाताच्या पंजाने बोटांनी किंचित दाब देत स्तनांना सर्व बाजूंनी गोलाकार मालीश करावी. हे करीत असताना काखेतही मालीश करायला विसरू नये. कारण स्तनांचा थोडा भाग काखेतही असतो, त्याला मोकळं केलं नाही तर तिथे गाठ बांधू शकते.
४) हाताच्या बोटांनी स्तनांवर किंचित दाब देत हात स्तनमंडलाकडे न्यावेत म्हणजे सुटे झालेले दूध दुग्धग्रंथीतून आणि नलिकेतून दुग्धविवरात (निप्पलभोवतीच्या काळ्या भागाखाली) येईल. हे करीत असताना मातेच्या स्तनाच्या त्वचेला इजा होऊ नये.
५) बोटे व अंगठा यांच्या साहाय्याने स्तनमंडलावर दाब देऊन पुढे ढकलत बोटे सरकविली तर स्तनाग्रातून दूध बाहेर पडते.
६) स्तनाग्रातून बाहेर पडणारे दूध स्टीलच्या किंवा काचेच्या रुंद तोंडाच्या बाटलीत साठवावे. हे दूध सहा तास बाहेरच्या तापमानात राहू शकते व चमच्याने बाळाला भरविता येते.
आधुनिक हिरकणी आणि हिरकणी कक्ष :
हिरकणी कोण हा प्रश्न महाराष्ट्रातील व्यक्तीला विचारणे बरोबर नव्हे. हिरकणी गवळण ही शिवाजी राजांच्या काळातली कामकाजी महिला होती. ती आपलं तान्हुलं घरात सोडून गवळणीचं काम करायची. आणि एक दिवस रायगडावर दिंडी दरवाजा बंद झाल्याने गडावरच अडकली. तिच्या बाळाच्या आठवणीने व ओढीने उभा गड उतरून गेली, अशी कथा प्रचलित आहे. आधुनिक काळातल्या शेकडो हिरकण्या बाळाला मागे टाकून कामावर जातात. रायगड जिल्ह्य़ात ‘ब्रेस्ट फीडिंग’ ट्रेनिंग घेताना तिथल्या कलेक्टरांसमोर महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आपले दूध काढून ठेवण्यासाठी कक्ष हवा, म्हणजे तिला ते दूध परत घरी आणून बाळाला पाजता येईल. स्तन जितक्या वेळा मोकळा होईल तितक्या वेळा तो दुधाने भरतो व जास्त जास्त दूध तयार होते.) या कक्षाची मागणी त्यांनी लगेच मान्य केली. पण त्याला अट एकच होती - या कक्षाचे नाव हिरकणी कक्ष ठेवावे!! अर्थात यासारखं सार्थ नाव नाही.
हिरकणी कक्षात काय हवे? महिलेला स्वत:चे दूध काढून ठेवण्यासाठी एकांत हवा व काढलेले दूध साठविण्यासाठी फ्रिजची सोय हवी. मातेने रुंद तोंडाची उकळून स्वच्छ केलेली काचेची बाटली बरोबर आणावी. (एक किंवा दोन) काढून ठेवलेले दूध फ्रिजमध्ये ठेवावे व घरी जाताना घेऊन जावे.
ह्य़ुमन मिल्क बँक म्हणजे काय?
याला बँक असे नाव असले तरी तिथून दूध आणता येत नाही. रुग्णालयात दाखल केलेल्या अतिदक्षता विभागातील बाळाला माता जवळ नसेल तर जे दूध द्यावे लागते ते या बँकमधून मिळते. ज्या बाईचे बाळ अतिशय लहान असेल, जास्त दुधाची गरज नसेल- ती महिला आपले दूध या बँकमध्ये देते व दूध बनण्याची प्रक्रिया चालू ठेवते. ज्या महिलेला एन्गोरजमेंट आहे तिला आपले दूध पुन्हा पुन्हा काढून टाकावे लागते व ती मिल्क बँकेत देते. अशा तऱ्हेने हा व्यवहार तान्हुल्याच्या गरजेसाठी चालतो. कुठेतरी महिलांना बँकेत दूध देताना खंत वाटत असते. आपल्या बाळासाठी दूध ‘साठवून’ ठेवण्याचा विचार मनात येतो. परंतु बाळ दूध प्यायले नाही व स्तन मोकळे झाले नाहीत तर दूध बनण्याच्या प्रक्रियेत अडचण येते व दूध कमी बनते. त्यामुळे ही दैवी देणगी आहे, जितकी जास्त वापरली जाईल तितकी जास्त बनेल!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो