ब्लॉग माझा : प्यासी हू मैं...
मुखपृष्ठ >> ब्लॉग माझा >> ब्लॉग माझा : प्यासी हू मैं...
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग माझा : प्यासी हू मैं... Bookmark and Share Print E-mail

alt

अनिता दिसा , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आता तो समुद्रही परका वाटू लागतो तुझ्यासारखा. भणाण वारा कानात घोंघावतो.. डोळे भरून येतात खाऱ्या पाण्याने.. त्याच्या सारख्याच.. अन् मन म्हणत राहतं, प्यासी हूँ मैं.. प्यासी रहने दो.. रहने दो.. ना
समुद्रावर जायला खूप आवडतं मला! विशेषत: संध्याकाळी.. फेसाळत्या लाटा. भणाणता वारा, सरकती वाळू आणि क्षणाक्षणाला रंग बदलणारे असीम, अफाट आकाश...
सगळ्याचीच एक न ओसरणारी जादू पसरलीय मनावर कायमसाठीच! कदाचित इतक्या जवळ समुद्र असूनदेखील, आयुष्यात फार उशिरा बघितल्यामुळे असेल...

  प्रथमच बघितला तोही तुझ्या सोबतीने, म्हणूनच कदाचित हे गारुड ओसरलं नसेल अजून.. कुणास ठाऊक?
थोडके काही दिवस गेले की मन उसळ्या मारू लागतं. अगदी लहान पोरांसारखं, ‘चला समुद्रावर..’ काही तरी अस्वस्थ वाटू लागतं. ही अस्वस्थता, ही तळमळ आता फक्त समुद्राच्या दर्शनानेच थांबेल हे पक्कं माहीत असतं.
मग सुरू होतं, ‘चल न समुद्रावर’, ‘जायचं?’, ‘आज जाऊयात न?’ जायचं, जायचं, अगदी जायच्चच. सततच्या पाठपुराव्याने तूही तयार होतोस. एखादी संध्याकाळ मग सोनेरी होऊन जाते. तू बाइक काढतोस. तू किक मारायच्याही अगोदर मी उडी मारून मागच्या सीटवर बसलेलीही असते. तू हसून मान हलवतोस. मी एक हात तुझ्या खांद्यावर ठेवते. झाडं झपाटय़ाने मागे पडू लागतात.. रस्ता पुढे पळू लागतो. वाऱ्याचा वेग कानात भरायला सुरुवात होते..
‘कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
जिन्दगी है, बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना..’
ओठावर गाणं येतंच आपसूक..
डोळे मिटू मिटू होतात. मी हट्टाने ते उघडेच ठेवते वर आकाशाकडे बघत बघत..
‘कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था
निंद में फिर तुमने जब छुआ था
गिरते गिरते बाहों में बची मैं
सपने पे पाँव पडम् गया था
सपनों में बहने दो..’
क्षितिजावर उमटणारी नखभर चंद्रकोर माझ्याकडे हसून बघते. चटोर चांदणी डोळे मिचकावून दाखवते. मीही तिला डोळा घालते. इतक्यात तुझे मऊ मऊ केस गालाला गुदगुल्या करतात. माझी बोटं तुझ्या पाठीवर आणखी रुततात. लांबवरून समुद्राची गाज ऐकू येते.. हलकंसं धुकं जाणवायला लागतं. अंगावर अलगद शिर्शिरायला लागतं.
‘हलके हलके कोहरे के धुए में
शायद आसमान तक आ गयी हूँ
तेरी दो निगाहों के सहारे
देखू तो कहाँ तक आ गयी हूँ
कोहरे में बहने दो’
..आणि तो दिसतो. अचानक समोर अख्खाचा अख्खा समुद्र. कधीपासून साद घालणारा.. खुणावणारा.. वाट पाहणारा.
आता तर पावलांना आवरणं कठीणच असतं. मी आवरतही नाही.. तू बाइक लावायच्या आत मी उतरतेही. वळून तुझ्याकडे पाहत पाहत दगडांवरून उडय़ा मारत खाली पोहोचतेही. तूही येत असतोसच. जपून. सुकी वाळू भसाभस चपलांतून पायावर येत असते. मी चपला भिरकावून देते. धावत सुटते. सागराकडे. ओल्या वाळूची पुळण लागते..
ओलसर, गार स्पर्श पायांना होतो. पावलं वाळूवर उमटत जातात आणि शेवटी त्याचा स्पर्श होतो. उबदार, सुखावणारा.. पावलं बुडून जातात. लाटांवर लता येतच राहतात. चुबुक चुबुक. चुबुक. एका लयीत. ती लय श्वासात भिनत जाते. पाणी पोटापर्यंत येतं. पावलं डगमगायला लागतात, पण मन ऐकत नाही. हळूच म्हणतं ‘आहे, आहे, अजून पावलाखाली जमीन सुटली नाहीए..’
‘तुमने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरो में जमीन है
पाके भी तुम्हारी आरजू है
शायद ऐसे जिन्दगी हसीं हैं’
.. अचानक लक्षात येतं मी खूप दूर निघून आलेय.
तू? तू कुठेस? माझी नजर भिरभिरायला लागते.. खरंच कुठेस तू? तुझं अस्तित्व जाणवत का नाहीए? अचानक एकटं का वाटतंय? तेदेखील भर समुद्रात? कुठं तू? माझा प्राण, माझा सखा?
आणि तू दिसतोस. किनाऱ्यावर. मोबाइलवर काही तरी टाइप करणारा, दूर. किती तरी दूर, किती कितीतरी दूर.. अचानक मळभ दाटून येतं मनात.. माझ्या मनापासून, माझ्या भावनांपासून, माझ्या विचारांपासून, माझ्या दु:खापासून, माझ्या अपमानापासून, माझ्या अवहेलनेपासून, माझ्या अस्वस्थतेपासून, माझ्यापासून..
खरंच किती दूर आहेस तू माझ्यापासून! मी अशीच एकटी प्रश्नांच्या आवर्तात गळ्यापर्यंत बुडालेली असते. अनेकदा एकाकीपणे नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरत असते.. माझ्या प्रश्नांशी झगडत असते.. हातपाय मारत असते आणि तू उभा असतोस दूर किनाऱ्यावर त्रयस्थपणे. स्वत:च्याच विश्वात..
आता तो समुद्रही परका वाटतो. तुझ्यासारखाच. भणाण वारा कानात घोंघावतो. गळ्याशी आवंढा दाटतो. डोळे भरून येतात खाऱ्या पाण्याने त्याच्यासारख्याच. तोंडाला कोरड पडते.. मन म्हणतं,
‘प्यासी हूँ मैं..
प्यासी रहने दो..
रहने दो ना.. ..’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो