अनघड अवघड : ‘पार्किंग लॉट’
मुखपृष्ठ >> अनघड.. अवघड >> अनघड अवघड : ‘पार्किंग लॉट’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अनघड अवघड : ‘पार्किंग लॉट’ Bookmark and Share Print E-mail

alt

मिथिला दळवी , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई - बाबा तुमच्यासाठीपालक-मुलांमधील अप्रिय संवाद टाळण्यासाठी काही विषय ‘पार्किंग लॉट’मध्ये ठेवून द्यावे लागतात. योग्य वेळ बघूून ते ते विषय पार्किंग लॉटमधून काढले तर त्या अप्रिय विषयांमधूनही चर्चा घडू शकते..
टी नएजर्स मंडळींच्या आई-बाबांना त्यांच्याशी अवघड वाटणाऱ्या एखाद्या विषयावर बोलणं, हे बऱ्याचदा तारेवरची कसरत वाटू शकतं. मुलांचा प्रतिसाद कधी अतिशय थंड तर कधी आक्रस्ताळाही असू शकतो. काही वेळा सुरुवात नीट होते, पण मध्येच गाडं रुळावरून घसरतं आणि ताणाताणी सुरू होते. दोन पक्षांपैकी कुणालातरी दुखावल्याची भावना येते आणि मग सगळ्याचा ‘डॉमिनो’ होऊन जातो.

एकामागोमाग एक गोष्टी ढासळत जातात. वादावादी होते, आरोप-प्रत्यारोप होतात आणि प्रकरण बिनसतं ते बिनसतंच. अशा प्रकारचा अनुभव प्रत्येक घराने कधीना कधीतरी घेतलेला असतो; मग तो अभ्यास, मित्र-मैत्रिणी, पॉकेट मनी, एण्टरटेन्मेंट, अशा कशाहीबाबत असू शकतो. बऱ्याचदा अशा विषयांच्या अपरिहार्यतेमुळे ते काही ना काही कारणाने, कोणत्याना कोणत्या स्वरूपात पुन्हा उघडले जातातही. पण लैंगिकतेच्या संबंधातल्या अनेक पैलूंबाबत सहसा बोलणंच होत नाही. काही वेळा बोलणं गरजेचं असतं म्हणून आई-बाबा विषय सुरु करतातही, पण जर त्यातून तणतण झाली, तर तो विषय तिथेच आणि तसाच राहतो. त्यावर आई-बाबांना पुन्हा बोलावंसं वाटत नाही आणि मुलांना अप्रिय विषय समोर आलेला तर नकोच असतो. लैंगिकतेशी संबंधित अनेक संवाद असे खुंटून जातात.
लैंगिकतेच्या बाबतीत काही बाबी योग्य वयात योग्य स्वरूपात मुलांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित विषय असे कायमचे विरून- संपून जाऊ नयेत म्हणून त्यांचा नंतर पुढे कधीतरी पुन्हा उच्चार व्हायला हवा असतो, अशा वेळी थांबणं म्हणजे माघार घेणं नाही किंवा ते आपलं अपयशही नाही. थोडक्यात आजच्या दिवसासाठी हा विषय ‘पार्क’ करायचा. पुन्हा जेव्हा योग्य संधी मिळेल तेव्हा तो पार्किंग लॉटमधून बाहेर काढायचा.
संवादाचा अगदी त्रोटक प्रयत्न हाही एक प्रकारचा संवादच असतो. त्यातूनच पुढच्या संवादाचा पाया बनतो आणि संवाद सुरू करण्याइतकंच त्याबाबत तारतम्याने थांबता येणं महत्त्वाचं, हे आपण मागच्या काही लेखांमधून पाहतो आहोतच. विषय ‘पार्किंग लॉट’मध्ये ठेवणं, हे तारतम्य राखण्याचाच एक भाग आहे.
या सगळ्यांत एक गंमत असते. जे विषय आपल्याला बोलायला कठीण वाटतात, ते मुलांसाठीही बऱ्याचदा अवघडलेपण घेऊन येणारे असतात. त्यामुळे हे विषय टाळण्यासाठी मुलं अनेक मार्ग शोधून काढतात. टाळाटाळ करणं, दुसरंच काहीतरी सुरू करणं, उलट बोलणं वगैरे. यातून अनेक आई-बाबांना फार खट्टू वाटतं, नाउमेद झाल्यासारखं वाटतं. अशा वेळी विषय ‘पार्किंग लॉट’मध्ये ठेवला तर विचार करायला, काही आणखी संबंधित माहिती शोधायला आधीच्या बोलण्यात राहून गेलेल्या उणिवा भरून काढायला सगळ्यांनाच एक संधी मिळते.
केवळ लैंगिकतेविषयकच नाही तर इतर रोजच्या जगण्यातल्या अनेक बाबींमध्ये हा ‘पार्किंग लॉट’ फार उपयोगी पडतो. अनेकदा वेळेचं नियोजन, शिस्त, अभ्यास अशा बाबतीत काही गोष्टी मुलांनी (खास करून टीनएजर्सनी) स्वत: ठरविल्या तर त्या अमलात येण्याची शक्यता खूपच वाढते. अशा वेळी त्यांना वाव आणि वेळ देणं, फार महत्त्वाचं असतं. नाहीतर त्यांना खिंडीत गाठल्यासारखं वाटतं. या संदर्भात काही विषय ‘पार्किंग लॉट’मध्ये ठेवले तर मुलं आपणहून येऊन पुन्हा विषय उघडतात, असा माझा अनुभव आहे. काहीजणांना एखाद दोन वेळेला आठवण करून द्यावीशी लागते, पण एकंदर मुलांकडून त्याला चांगला प्रतिसाद येतो.
विषय पुन्हा उघडताना काळावेळाचं भान राखणं हा त्यातला महत्त्वाचा भाग. मुलांना दुसरं काही व्यवधान नाही ना, ती बोलण्याच्या मन:स्थितीत आहेत ना याचा अदमास घेणं जरुरीचं ठरतं. प्रवास करताना, सहलीला जाताना अशा संधी मिळू शकतात.
विषय ‘पार्क’ कसा करता येईल याचं एक उदाहरण पाहूया. शाळेच्या बाथरूममध्ये काही अचकट-विचकट लिहिलेलं आढळलं, म्हणून शिक्षकांनी मुलांना फैलावर घेतलं. हे कोणी केलं म्हणून विचारलं, तेव्हा कोणीच मान्य केलं नाही, त्यामुळे सगळ्यांनाच ओरडा बसला. मुलगा घरी आला तो घुश्शातच.
मुलगा : उगाचंच ओरडतात आम्हाला! काही झालं की आमच्या नववीच्या वर्गाला पकडतात. कशावरून दहावीतल्या मुलांनी किंवा आठवीतल्या मुलांनी हे लिहिलं नाही?
आई-बाबा : खरं आहे. कुणीही ते लिहिलेलं असू शकतं. तुला राग येणं स्वाभाविक आहे.
इथेच थांबून काही दिवसांनी हा विषय पुन्हा उघडता येईल.
आई-बाबा : पुन्हा नाही ना कोणाला ओरडा बसला टॉयलेटमध्ये लिहिण्याबद्दल? का लिहीत असतील काही मुलं टॉयलेटमध्ये असं सगळं?
मुलगा : काय माहीत! त्यांना गंमत वाटत असेल!
आई-बाबा : असं लिहून गंमत वाटू शकते?
मुलगा : काही मुले आमच्या वर्गातले असं बरंच काय काय बोलत असतात. मग खिदळतात. कधी कधी सॉलिड जोक्स असतात त्यांचे. आम्हीपण हसतो कधी कधी त्यांच्या जोक्सना!
आई-बाबा : हं!
आई-बाबा : मला वाटतं, या विषयावर त्यांना बाकी कोणाशीच बोलता येत नाही आणि बोलावंसं तर वाटत असणार, पण मग काय करावं हे कळत नसेल. त्यातून असं सगळं लिहिलं जात असणार. थोडी बंडखोरी केल्यासारखंही वाटत असेल त्यातून.
मुलगा : हां. तसंपण असेल. काही मुलं तर सगळा वेळ हेच बोलत असतात. त्यांच्या डोक्यात दुसरं काही नसतं की काय असंच वाटतं.
इथे मुळात पहिल्या प्रसंगात मुलगा चिडलेला असल्यामुळे बोलणं फार पुढे सरकू शकलं नसतं. त्यामुळे तिथे फार न वाढवणं श्रेयस्कर आणि पुढच्या वेळच्या बोलण्यातली ‘हं’ ही तटस्थ प्रतिक्रिया फार महत्त्वाची. तिथे जर काहीही शेरेबाजी झाली असती (उदा. ‘तू पण असतोस त्या मुलांमध्ये?’ किंवा ‘शी! काय हे!’) तर पुढचं मुलगा बोलणार नाही.
अशा तटस्थ प्रतिक्रियांमधून आपण असल्या गोष्टींना उत्तेजन देत तर नाही ना, असा प्रश्न अनेक आई-बाबांना पडतो. अनेकदा संवाद पुढे सुरू राहायला अशा तटस्थ उद्गारांची मदत होते आणि कोणत्याही क्षणी एखादी गोष्ट आपल्याला खटकली तर हे सांगण्याचा पर्याय पालक म्हणून आपल्याकडे नेहमीच असतो. फक्त ते स्पष्ट शब्दांत (शेरेबाजी, सल्ले किंवा उपदेश न करता) असावं. ‘मला हे योग्य वाटत नाही’ किंवा ‘मला हे खटकलं आहे/ आवडलेलं नाही’ अशा प्रकारचं- थोडक्या आणि नेमक्या शब्दात त्याने परिणामकारकता खूप वाढते. इमर्जन्सी कॉण्ट्रासेप्टिव पिल्स पहिल्यांदा बाजारात आल्या तेव्हा आई-बाबांच्या पिढीतल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. हे तर मुलांना मैदानच मोकळं करून दिल्यासारखं झालं, असं अनेकांच्या मनात येऊन गेलं. एक पालक आणि मुलगी (किंवा मुलगा) यांच्यातला संवाद कशा प्रकारे होऊ शकतो याबाबतच्या काही शक्यता :
आई-बाबा : इमर्जन्सी कॉण्ट्रासेप्टिव पिल्सची जाहिरात पाहिली. अशी खुलेआम सरसकट जाहिरात जरा खटकली मला.
मुलगी : ठीक आहे ना! ती जाहिरात आहे. तुम्ही नुसत्या जाहिरातीनेही अपसेट होता!
आई-बाबा : हो. थोडी काळजी वाटते! ही निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ वाटते. त्याचे काही साइड इफेक्ट्स असतील का, असं मनात येतं.
मुलगी यावर काहीच बोलत नाही. विषय तिथेच थांबतो, पण काही काळाने आई, बाबा हे साइड इफेक्ट्स शोधून काढतात, किंवा ते त्यांच्या वाचनात येतात. विषय पुन्हा उघडला जातो.
आई-बाबा : अगं या लेखात इमर्जन्सी कॉण्ट्रासेप्टिव्ह पिल्सच्या परिणामांबद्दल आलं आहे. अगदी जाहिरातीत दाखवतात तितकं सरळसोट नाही ते. अशा जाहिरातींमधून दिशाभूल होते की काय असं वाटतं. त्यातून तरुण पिढीला स्वैराचाराचं लायसन्स दिल्यासारखंही वाटतं.
मुलगी : आई किती वेळा तोच विषय गं!
आई-बाबा : हं, जात नाहीत हे विषय सहजासहजी डोक्यातून!
मुलीला कदाचित हा विषय नकोसा वाटणारा आहे, त्यामुळे तिला तो फार वाढायला नको आहे. हे समजून थांबणं फार महत्त्वाचं. इथे मुलीपर्यंत ज्या गोष्टी जायला हव्यात त्या गेलेल्या आहेत.
कित्येकदा असा विषय पुन्हा उघडला की तो कोणत्या दिशेने जाईल याचा अंदाज नसतो, तो हाताळता येईल की नाही याची शाश्वती वाटत नाही. त्यामुळे पालकांना त्याचा ताण येऊ शकतो. अशा वेळी, ‘राहू दे ना गाडं पार्किंग लॉटमध्ये!’ असंही वाटू शकतं.
मध्ये एका कार्यशाळेत एक आई म्हणाली, ‘माझ्या पार्किंग लॉटमध्ये सध्या इतके विषय ‘पार्क’ केलेले आहेत ना, की आता नव्यांसाठी जागाच नाही!’
त्यावर दुसरी एक आई म्हणाली, ‘चला! म्हणजे पार्किंग लॉटमधल्या काही गाडय़ा आता बाहेर निघायलाच हव्यात, अशी वेळ आली आहे!’
‘पार्किंग लॉट’ आपल्याला हेही सांगतो.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो