मोठय़ा विद्यार्थिनींच्या छोटय़ा शिक्षिका
मुखपृष्ठ >> लेख >> मोठय़ा विद्यार्थिनींच्या छोटय़ा शिक्षिका
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मोठय़ा विद्यार्थिनींच्या छोटय़ा शिक्षिका Bookmark and Share Print E-mail

alt

शब्दगंधा कुलकर्णी , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलींनी शालेय तसेच व्यावसायिक शिक्षण घ्यावे, यासाठीचे भान सर्वच स्तरांतील स्त्रियांमध्ये येत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आहे ते प्रयत्नांतील सातत्य. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रयोगांविषयी..
दहावीचा वर्ग.. शाळेच्या इमारतीतला नाही, मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या शहरातल्या, वस्तीतला.

विद्यार्थी आहेत बेबीताई चौरे (वय ४१), स्मिता पांचाळे (वय ३२), रेश्मा रोकडे (वय ३६) आणि या वर्गाच्या शिक्षिका आहेत वैशाली कापरे (वय २४), आरती चव्हाण (वय २५), मनीषा उकरंडे (वय ३३).
बेबीताई या वर्षीच दहावी पास झाल्या आहेत. त्याअगोदर २३ वष्रे त्यांचा शाळा, शिक्षक आणि परीक्षा यांच्याशी कसलाही संबंध उरलेला नव्हता. तो कधी येईल असे त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. १७ व्या वर्षी लग्न झालं. नवरा प्रॉव्हिडंट फंडाच्या ऑफिसमध्ये शिपाई. सरकारी नोकरीची सुरक्षितता. सारे काही तसं ‘व्यवस्थित’च होतं. काविळीचे निमित्त होऊन नवरा वारला आणि परिस्थिती बदलली. सासू-सासऱ्यांनी घराबाहेर काढले. शिक्षण फक्त ८वी पास. घर नाही. शिक्षण नाही. कुणाचाही आधार नाही. कुणीतरी सांगितलं की, नवऱ्याच्या जागेवर नोकरी लागेल. तिथे गेल्यावर कळले की, नोकरी मिळू शकेल पण त्यासाठी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं. जवळच्या शाळेत १७ नंबरचा फॉर्म भरायला गेल्या आणि त्या सरांनी त्यांना ‘प्रथम’च्या दहावी मार्गदर्शन वर्गाबद्दल सांगितलं. बेबीताई जिद्दीने परीक्षेला बसल्या आणि पहिल्या फटक्यात पासही झाल्या. तेही ५४ टक्के मार्क मिळवून. आज बेबीताई पुण्याच्या गोळीबार मदानाजवळ असलेल्या प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमध्ये शिपाई म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांचा आत्मविश्वास चकित करायला लावणारा आहे.
 ‘‘हे कसं घडलं? मनीषा आणि वैशाली मॅडममुळे झालं बघा सगळं..’’ बेबीताई सांगतात आणि आपलं लक्ष वैशालीकडे जातं. वैशाली कापरे, २४ वर्षांची, हसऱ्या चेहऱ्याची. बेबीताईंची ही ‘मॅॅडम’ वयाने त्यांच्यापेक्षा तिपटीने लहान. त्यांना मराठी, िहदी आणि समाजशास्त्र शिकवणारी. ‘इतक्या वर्षांनंतर शिकणाऱ्या बेबीताईंच्या वयाच्या माणसाला शिकवणं कठीण जात नाही?’ या प्रश्नाचं उत्तर वैशाली हसून ‘नाही’ असंच देते. म्हणते,‘‘आमच्या ‘प्रथम’च्या दहावी मार्गदर्शन केंद्रामध्ये अशी खूप मुलं-मुली येतात. त्यातल्या अनेकांना गणित, इंग्रजी, समाजशास्त्र अशा विषयांची भीती असते. शाळा सोडून दहा-दहा र्वष झालेली असतात. यात महत्त्वाची गोष्ट असते ती त्यांना आत्मविश्वास देण्याची. सुरुवातीला बेबीताई आल्या तेव्हा आम्हा मुलांकडून शिकायला त्यांना फारच कठीण वाटायचं. त्यात क्लासमधली इतरजणं त्यांच्यापेक्षा तुलनेने लहान. त्यांना अवघडल्यासारखं व्हायचं. पण हळूहळू त्यांना कळायला लागलं की, मार्गदर्शन वर्गामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, नागरिकशास्त्र, भूगोल असा एकही विषय अजिबात न येणाऱ्या आपण एकटय़ाच नाही आहोत. वर्गातल्या अनेकांची अवस्था थोडय़ाफार फरकाने अशीच आहे आणि आपल्यासारखंच त्या साऱ्यांनाही दहावी पास व्हायचं आहे. ‘प्रथम’चे १०वी मार्गदर्शन वर्ग हे चौथी पास झालेल्या, शाळा सुटलेल्या, नाइलाजाने शाळा सोडाव्या लागलेल्या, क्लासेसची भरमसाट फी न परवडणाऱ्या मुलांसाठी आहेत. ज्यांना १०वीला बसायचे आहे त्यांनी या दहावीच्या वर्गाना यायचे आणि अभ्यास करायचा. परीक्षेला बसायचे. बाजारातल्या क्लासेसमध्ये दिली जाते तशी तुम्हाला हमखास पास व्हायची हमी इथे दिली जात नाही. नापास झालात तर मनी बॅक गॅरंटीही दिली जात नाही. शिवाय संस्थेकडून क्लासेस आहेत म्हणून फुकटही अजिबात शिकवले जात नाही. अगदी माफक फी आकारली जाते.  मात्र, प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष दिले जाते. शून्यापासून सुरुवात करून १०वीच्या परीक्षेची आवश्यक असलेली पूर्ण तयारी खात्रीने करून घेतली जाते.
यंदाच्या वर्षी ‘प्रथम’च्या दहावी मार्गदर्शनाच्या पुण्यातल्या हडपसर केंद्रातून एकूण २० मुली दहावीला बसल्या होत्या आणि त्यातल्या १३ जणी पास झाल्या. त्यांना शिकवणाऱ्या शिक्षिका जेमतेम २५-२६ वर्षांच्याच. पुण्यातल्या आणखी एका मार्गदर्शन केंद्रातली गणिताची शिक्षिका आरती चव्हाण सांगते, ‘‘अनेक वर्षांनंतर दहावीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून  बरीच तयारी करवून घ्यावी लागते. खूप वर्षांनंतर ही मुले परीक्षेला बसत असतात. त्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो. गणितासारख्या विषयाची तर बहुतेकांना भीती असते. कितीतरी मुलांना अगदी बेसिकपासून म्हणजे बेरीज, वजाबाकीपासून शिकवावं लागतं. बेरीज, बजाबाकीपासून सुरुवात करून पाढे पाठ करून घेत मुलांना हळूहळू दहावीच्या पातळीपर्यंत आणलं जातं. त्यांचा सराव करून घ्यावा लागतो.’’ २५ वर्षांच्या आरतीची चाळिशीतली विद्याíथनी स्मिता पांचाळे सांगतात, ‘‘लग्नाच्या वेळी माझी शाळा सुटली. मागच्या वर्षीपर्यंत पुण्यात साहाय्यक अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होते. बढती मिळवायची असेल तर किमान दहावी पास असण्याची अट आहे. १६ वर्षांचा खंड पडलेला होता, पण आरती मॅडमनी समजून घेतलं. नीट शिकवलं. मला दोन मुलं आहेत. घरी मुलं अभ्यासाला बसली की, मीही थोडा वेळ त्यांच्याबरोबर अभ्यासाला बसायचे. निकाल लागला तेव्हा मला ६३ टक्के मिळालेत हे काही क्षण खरंच वाटलं नाही. अंगणवाडीतर्फे माझा सत्कारही करण्यात आला. मार्गदर्शन वर्गातले आमचे शिक्षक वयाने आमच्यापेक्षा कितीतरी लहान आहेत, पण त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलंय.’’ असाच अनुभव सोलापूरच्या वर्गातल्या २९ वर्षांच्या रेश्माही व्यक्त करतात. १९९७ साली शाळा सोडलेल्या रेश्मा यांना मॉण्टेसरी शिक्षिकेचा कोर्स करायचा होता.  १४ वर्षांनंतर त्या पुन्हा अभ्यास करणार होत्या. त्यांनी सांगितलं, ‘‘आमचे शिक्षक इतरांपेक्षा वेगळे आहेत. आम्हाला काहीच येत नव्हतं हे त्यांना माहीत होतं आणि त्याबद्दल कोणी रागावत नसे.  रेश्मा ७४ टक्के मिळवून पास झाली. आता तिने सोलापूरच्या कॉलेजमध्ये ११वी सायन्सला प्रवेश घेतलाय, नर्स होण्यासाठी. मॉण्टेसरी शिक्षिकेचा कोर्स करण्याचा बेत तिने रद्द केलाय. या मार्गदर्शन वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा दहावी होण्याचा संघर्ष मोठा आहे. धुण्याभांडय़ाची कामे करणाऱ्या स्वाती कदमला दहावी व्हायचं होतं. आई-वडील हयात नाहीत. धाकटय़ा भावाची जबाबदारी. रोजची कामे करून ती क्लासला यायची. नऊ वर्षांच्या गॅपनंतर स्वाती दहावी झाली. आता नìसगचा डिप्लोमा करण्यासाठी ती पसे जमवते आहे. केमिकल कंपनीत १८०० रुपयांवर काम करणाऱ्या गौरी चौधरीला ९ तासांची डय़ुटी असायची. त्यातूनही वेळ काढून ती क्लासला यायची. गौरीला ५३ टक्के मिळालेत. अशा एक नाही, दोन नाही तर तब्बल १३ मुली पुण्यातल्या शाखेतून यंदा पास झाल्या आहेत. फक्त पुण्यातूनच नाही तर साऱ्या महाराष्ट्रातून २०० विद्यार्थी पास झालेत.  मुंबईसह पुणे, सोलापूर, नागपूर, सातारा, अहमदनगर इथे हे मार्गदर्शन वर्ग भरवले जातात.
सोलापूरची शिक्षिका मनीषा उकरंडे सांगते, ‘‘आम्हाला ‘प्रथम’कडून हे सारे विषय कसे शिकवायचे याचे नीट प्रशिक्षण दिले गेले आहे. इथे येणारे जवळपास सर्वच विद्यार्थी अत्यंत गरीब वर्गातले आहेत पण त्यांना शिकण्याची भूक आहे. कितीतरी मुली इतरांकडे धुण्या-भांडय़ाची कामे करतात, कुणी दुसऱ्यांच्या घरी त्यांच्या मुलांना सांभाळतात, शिवणकाम, शेतमजुरी करतात त्यातूनच पसे जमवून त्या दहावीची परीक्षा देतात. मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेतला की, त्यांची पूर्वचाचणी घेतली जाते. त्यातून त्यांचा शैक्षणिक स्तर तपासला जातो. आम्ही त्यांना सातत्याने सांगतो की, जे येत नाही ते विचारा. त्यांनी कितीही वेळा विचारलं तरी कोणीही त्यांच्यावर ओरडत नाही. संयमाने त्यांना शिकवावं लागतं. अनेक वर्षांचा शिक्षणात खंड पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सुरुवातीला आपल्याला वाचता येईल की नाही याचीही खात्री वाटत नसते, घरच्या अडचणींमुळे काहीजणं मधूनच वर्ग सोडायला निघतात. त्यांच्या मागे लागावं लागतं. काहीजणींना घरी सासू त्रास देते, कुणाला नवऱ्याने सोडल्याने डिप्रेशन आलेलं असतं, कुणाचं मूल लहान असतं, मग त्यातून मार्ग काढावे लागतात. ज्यांची लहान मुले आहेत ती मुलांना घेऊन वर्गात येतात, शेतमजुरी करणाऱ्या मुली त्यांचं काम उरकून उशिरा येतात आणि त्यांच्यासाठी आम्ही उशिरापर्यंत थांबतो. कारण त्यांना मिळणारे पसेही त्यांच्यासाठी गरजेचे असतात. प्रत्येकीची अडचण वेगळी. एक नाही अनेक अडचणी, अनेक प्रश्न त्यांच्यापुढे असतात. ते समजून घ्यावे लागतात. त्यांना प्रोत्साहन द्यावं लागतं. पण आपल्याला समजून घेतलं जातंय हे कळायला लागलं की हळूहळू परिस्थिती बदलायला लागते. विद्यार्थी मनापासून प्रयत्न करायला लागतात. तेच महत्त्वाचं असतं. समजून घेऊन वाचायला लागतात, गणितं सोडवायला लागतात. त्यांना एखादी गोष्ट कळाली की, शेजारच्या विद्यार्थ्यांला समजावायला लागतात तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. त्यांना अभ्यासाची गोडी लागते. परीक्षेला बसण्याची त्यांची मानसिक तयारी व्हायला लागते. परीक्षा देतात आणि चांगल्या मार्कानी पासही होतात. त्यांच्यापेक्षा आम्ही वयाने, अनुभवाने लहान असतो. पण ही मुलंच आम्हाला मान देतात. रिझल्ट सांगताना सरांमुळे, मॅडममुळे शिकलो, पास झालो, त्यांच्याकडून शिकलो असं सांगतात. शाळेतून असं कधी शिकवलंच गेलं नाही, आता आम्हीही इतरांना मदत करू. घरातल्या, आजूबाजूच्या लहान मुलांना काही अडलं असेल तर शिकवू. आणि तुमच्यासारखं शिकवण्याचा प्रयत्न करू, असंही सांगतात. ते ऐकताना वेगळं समाधान मिळतं. पास झाल्यावरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आम्हाला खूप काही देऊन जातो. इतक्या अडचणींमधूनही हे सारेजण जिद्दीने अभ्यास करतात. मुळापासून सारे काही शिकतात, मेहनत घेतात आणि पास होतात, त्यांना शिकवताना आम्हीच कितीतरी गोष्टी शिकत असतो. खरं तर, या मुलांना शिकवणारे अनेक शिक्षक रूढार्थाने शिक्षक नाहीत. मात्र चांगल्या शिक्षकांचे सगळे गुण त्यांच्यात आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा त्यांना कळतात. परिस्थितीने गांजलेल्या पण शिक्षणाची आस असलेल्या विद्यार्थ्यांना त्या प्रेरणा देतात. सोपेपणाने कसं शिकवायचं याची नेमकी नस ‘प्रथम’ मार्गदर्शन केंद्रातल्या शिक्षकांना माहीत आहे. आपण चाकोरीतली नोकरी करत नाही; तर समाजाच्या भल्याचं काहीतरी करतो आहोत आणि ते करायला हवे याचं भान त्यांना आहे.
शिक्षक दिनाच्या नेहमीच्या समारंभात कदाचित यांच्याकडे कुणाचं लक्षही जाणार नाही, पण शिक्षण क्षेत्रातला हा एक मोलाचा प्रयोग आहे. उच्च शिक्षणाची आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी दहावीचा टप्पा किरकोळ असेल कदाचित, पण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या बेबीताई, रेश्मा, स्वाती, गौरी आणि इतर अनेकांसाठी ती आत्मसन्मानाची खूण आहे...

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो