‘लेटरबॉम्ब’चे दाहक वास्तव..
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> ‘लेटरबॉम्ब’चे दाहक वास्तव..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘लेटरबॉम्ब’चे दाहक वास्तव.. Bookmark and Share Print E-mail

देवेंद्र गावंडे, रविवार, २ सप्टेंबर २०१२

छत्तीसगड, ओडिशा व महाराष्ट्रातील गडचिरोलीचा भाग नक्षलवाद्यांसाठी नंदनवन म्हणून ओळखला जातो. या नंदनवनातच आता बंडाची फुले उगवू लागल्याने चळवळीचे नेतृत्व चिंताक्रान्त झाले आहे. तीस वर्षांपूर्वी आखलेली चाकोरी मोडायची नाही, समाज बदलत चालला तरी चळवळीची ध्येय, धोरणे मागासलेली कशी राहील यातच मग्न राहायचे ही वृत्तीच या चळवळीला फुटीरतेच्या उंबरठय़ावर उभी करून गेली आहे..


कोणतीही चळवळ वा संघटना असो, जसजसे तिचे वय वाढत जाते तसतसे त्या चळवळीने हाती घेतलेले प्रश्न प्रभावहीन ठरत जातात. काळ जसा बदलत जातो त्यानुसार चळवळीच्या मुख्य उद्दिष्टाला तडा न जाऊ देता ध्येय व धोरणात बदल करत नेणे चळवळीसाठी नेहमी पोषक ठरत असते. कारण अशा चळवळीच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या सामान्य जनतेच्या आशा, आकांक्षा व ध्येय, धोरणेसुद्धा काळाच्या ओघात बदलत जात असतात. त्याला सुसंगत अशी भूमिका घेतली की चळवळीचा प्रभाव व लोकप्रियता कायम टिकवता येते. कडवे डावे अशी ओळख करून देणारे नक्षलवादी मात्र काळानुसार त्यांच्या चळवळीच्या ध्येयधोरणात कोणताही बदल करायला तयार नाहीत, हे याच चळवळीचा एक प्रमुख नेता सव्यसाची पांडाच्या बंडानंतर घडलेल्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. तीस वर्षांपूर्वी या देशात सुरू झालेल्या व आता वृद्धत्वाकडे झुकलेल्या या चळवळीची नवा विचार स्वीकारण्याची मानसिकता नाही हे पांडाच्या बंडानंतर या चळवळीने घेतलेल्या भूमिकेतून दिसून आले आहे. पांडाचे बंड, त्याची झालेली हकालपट्टी, नंतर त्याने स्थापन केलेला नवा माओवादी पक्ष व त्यातून सुरू झालेले विचारमंथन यामुळे या चळवळीच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
भाकप (माओवादी) हा नवा  पक्ष स्थापन करतानाच या देशाची सत्ता मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या या चळवळीला ज्या जनतेच्या बळावर क्रांती यशस्वी करून दाखवायची आहे, त्याच जनतेशी काही देणेघेणे नसल्याचे या घटनाक्रमातून पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा साकल्याने विचार करण्याआधी पांडाने केलेले आरोप व नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने त्याला दिलेले उत्तर यावर दृष्टिक्षेप टाकणे गरजेचे ठरेल. गेल्या २२ वर्षांपासून ओदिशात सक्रिय असलेल्या पांडाने गेल्या जूनमध्ये चळवळीचा प्रमुख गणपतीला १६ पानी पत्र लिहून अनेक आरोप केले. ‘वारंवार हिंसा करणे आणि निरपराधांना ठार करणे एवढेच चळवळीचे उद्दिष्ट राहिले आहे. आदिवासींच्या हितासाठी सुरू झालेली ही चळवळ प्रत्यक्षात आदिवासींचे शोषण करीत आहे. आदिवासींचा उपयोग केवळ स्वयंपाक करून घेण्यासाठी व सामान वाहून नेण्यासाठी केला जात आहे. चळवळीत असलेल्या आदिवासी सहकाऱ्यांना त्यांच्या पारंपरिक सणांपासून वंचित ठेवले जाते. चळवळीत मोठय़ा संख्येने असलेल्या आदिवासी तरुणींचे लैंगिक शोषण केले जात आहे. चळवळीचा प्रमुख गणपतीला क्रांती नाही तर केवळ दहशत व भीतीच्या बळावर हुकूमशाही निर्माण करायची आहे’ पांडाच्या पत्रातील प्रमुख आरोप हे आहेत. या पत्राला प्रारंभी गणपतीने वा पक्षाच्या केंद्रीय समितीने उत्तरच दिले नाही. मात्र, पांडाने पत्र प्रसिद्धीला देताच तातडीने उत्तर देण्यात आले. या उत्तराच्या व पांडाच्या हकालपट्टीच्या पत्रात गणपतीने चळवळीची केवळ वैचारिक बाजू मांडण्याचा व त्यातून पांडाला निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला आहे. पांडाने केलेले आरोप ठोस आहेत, पण त्याचे नेमके उत्तर देण्याचे गणपतीने टाळले आहे. उलट पांडा हा सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनला असून तो त्यांच्या इशाऱ्यावर चळवळीत फूट पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. पांडाने आदिवासींच्या शोषणासंबंधी केलेला आरोप जनतेला मूर्ख बनवण्याचा एक प्रयत्न आहे. पांडा हा आजवर पक्षाचा नेता होता हे कबूल करतानाच नेत्याने पक्षमूल्यांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, पांडा मात्र रणांगण सोडून पळणारा नेता ठरला आहे. आदिवासी हेच या क्रांतीकारी चळवळीचे महत्त्वाचे घटक आहेत. गणपतीवर करण्यात आलेला हुकूमशाहीचा आरोप आश्चर्यकारक आहे, असेही या चार पानी उत्तराच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पांडाचे आरोप, चळवळीने त्याला दिलेले उत्तर आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यावर सखोलपणे विचार केला तर या चळवळीला जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसून केवळ हिंसाचार करण्यातच रस आहे हेच दिसून येते. पांडाने केलेले आरोप एखाद्या राजकीय पक्षाने, पोलिसांनी अथवा गृहमंत्र्यांनी केले असते तर नक्षलवादी प्रतिवाद करण्याच्या भानगडीतसुद्धा पडले नसते. चळवळीला बदनाम करण्याचा एक प्रयत्न एवढाच शेरा नक्षलवाद्यांनी मारला असता. मात्र, पांडाने आपल्या जीवनाची २२ वष्रे या चळवळीसाठी दिलेली आहेत. त्याला चळवळीतील प्रत्येक बारीकसारीक तपशील ठाऊक आहेत. त्यामुळे त्याच्या बंडाने या चळवळीच्या उद्दिष्टावरच भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. या चळवळीचा तीस वर्षांपासूनचा इतिहास लक्षात घेतला तर नक्षलवाद्यांनी आदिवासींचे हित हा मुद्दा सोडला तर अनेकदा स्वत:च आखलेल्या धोरणांना बगल दिली आहे. प्रारंभी भूमिहीन आदिवासींना शेती मिळवून देण्यापासून सुरू झालेला या चळवळीचा प्रवास आता जंगल व खनिज आदिवासींचेच. ते भांडवलदारांच्या हाती जाता कामा नये या मुद्दय़ावर येऊन थांबला आहे. पांडाने आरोप करताना नेमका हाच धागा पकडला आहे. आता काळ बदलत चालला आहे, तरीही आदिवासींची शेती व त्यांचेच जंगल या मुद्दय़ाभोवती आपण कितीकाळ घुटमळणार हा पांडाने केलेला सवाल रास्त आहे.
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर केवळ कृषी नाही तर उद्योग, आरोग्य, शिक्षणाच्या बाबतीत चळवळ कधी भूमिका घेणार हा पांडाला आजवरच्या अनुभवातून पडलेला प्रश्न आहे व दुर्दैवाने त्याचे उत्तर या चळवळीकडे नाही. आदिवासी मुलांनी शिक्षण घ्यावे असे ही चळवळ वरकरणी सांगत असली तरी प्रत्यक्षात स्फोटात शाळा उडवणे, शिकलेल्या तरुणांना शासकीय नोकरी न करू देणे असे उद्योग या चळवळीकडून सातत्याने होत राहिले आहेत. आरोग्य व उद्योगाच्या बाबतीत या चळवळीने आजवर स्वत:चे कोणतेही धोरण तयार केले नाही. तरीही जनतेचा सहभाग असलेली चळवळ हा प्रचार नक्षलवादी कशाच्या बळावर करतात हे कळायला मार्ग नाही. आज संपूर्ण देशात मोबाइल फोनचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी मोबाइल ही गरज बनली आहे. अशा स्थितीत मोबाइलचे टॉवर उडवून आपण कोणते जनहित साधतो हा पांडाने नेतृत्वाला केलेला प्रश्न या चळवळीच्या प्रभावक्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनातला आहे. त्यावर उत्तर न देता पांडाला ‘वसाहतवादी’ ठरवून नक्षलवादी मोकळे झाले आहेत. नक्षलवाद्यांनी गेल्या वर्षी ओडिशातील बीजेडीचे आमदार जगबंधू मांझी यांची हत्या केली. मांझी अपंग होते. व्हिलचेअरवर बसून ते काम करायचे. केवळ आमदार आहेत व आपले ऐकत नाही यावरून त्यांची हत्या करण्यात आली. अनेक निरपराधांना सातत्याने खबरे म्हणून ठार करण्यात येते. असा हिंसाचार क्रांतीसाठी योग्य का या प्रश्नावर सुद्धा नक्षलवाद्यांनी मौन बाळगले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आभास निर्माण करायचा, प्रत्यक्षात हिंसा करून जनतेला दहशतीत ठेवायचे व त्या बळावर सत्तेची स्वप्नं बघायची हाच नक्षलवाद्यांचा मुख्य अजेंडा झाला आहे, हे पांडाने केलेल्या आरोपांमुळे अधोरेखित झाले आहे. या चळवळीचा व्याप बघता त्याकडून कोणत्याही एखाद्या समस्येची तड लागणे शक्य नाही. तेव्हा स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र संघटना स्थापन कराव्यात. हा प्रयोग याआधी बिहार व बंगालमध्ये यशस्वी झाला आहे ही मागणी पांडाने अनेकवेळा केंद्रीय नेतृत्वाकडे केली; पण त्याला दाद देण्यात आली नाही. यामागील नक्षलवाद्यांचा हेतू स्पष्ट व उघड आहे. या चळवळीवर सध्या पूर्णपणे तेलुगू भाषिकांचे नियंत्रण आहे. हे नियंत्रण चळवळीच्या नेत्यांना गमवायचे नाही. त्यामुळेच या चळवळीने आजवर झालेले प्रयत्न यशस्वी होऊन सुद्धा विकेंद्रीकरणाची वाट चोखाळली नाही. सध्या देशातील आदिवासींभोवती ख्रिस्ती धर्मप्रसाराचा विळखा पडला आहे. अनेक आदिवासींनी शिक्षण, रोजगार व आरोग्याच्या सोयी उपलब्ध होतात म्हणून धर्मातर केले आहे. या मुद्दय़ावर नक्षलवाद्यांना गेल्या तीस वर्षांत कधीच ठोस भूमिका घेता आली नाही. माओचा विचार कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणारा नाही, असे सांगत या धर्मातराच्या मुद्दय़ाला आजवर या चळवळीचे बगल दिली. तत्त्वत: ही भूमिका बरोबर असली तरी याच चळवळीत आजवर निष्ठेने काम करणाऱ्या आदिवासी तरुणांना हे धर्मातर मान्य नाही. यामुळे आदिवासी समाज चळवळीपासून दुरावला जाईल अशी भीती या तरुणांच्या मनात आहे. त्यामुळे चळवळीने निश्चित भूमिका घ्यावी असे या तरुणांना वाटते, पण चळवळीचे नेतृत्व काहीच करायला तयार नाही. चळवळीच्या आता सुरू असलेल्या या वैचारिक असंतोषाला पांडाने आपल्या पत्रातून मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे या चळवळीत सारे काही आलबेल आहे व संघटनात्मक दृष्टिकोनातून ही चळवळ अधिकाधिक मजबूत होत आहे, ही शंका फोल ठरली आहे.
आदिवासींना हमाली करायला लावणे व या जमातीतील मुलींचे लैंगिक शोषण करणे, या मुद्दय़ावर ही चळवळ आता पुरती बदनाम झाली आहे. पांडाच्या आरोपाने त्याला पुष्टीच मिळाली आहे. चळवळीत वरच्या पदावर नेमताना कायम तेलुगू भाषिकाचाच विचार केला जातो. महाराष्ट्राचा सचिव मिलिंद तेलतुंबडेचा (हा सुद्धा आदिवासी नाही)अपवाद सोडला तर या दर्जाच्या पदावर आजवर बोटावर मोजण्याइतक्या आदिवासी सहकाऱ्यांची नियुक्ती झालेली आढळते. आदिवासींच्या हितासाठी असलेल्या या चळवळीच्या केंद्रीय समितीत एकही आदिवासी नाही. केवळ लढण्यासाठी आदिवासी हवेत, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नको हेच नक्षलवाद्यांचे आजवर धोरण राहिले आहे. माओचा विचार स्त्री-पुरुष असा भेद मानत नाही, असे तत्त्व समोर करून या चळवळीत आजवर स्त्रियांचे भरपूर लैंगिक शोषण झाले. यावरून पांडाने केलेल्या आरोपावर चकार शब्द न काढणाऱ्या या चळवळीत नेमके काय सुरू आहे यासाठी पांडाने दिलेले उदाहरण पुरेसे बोलके आहे. स्त्री-पुरुषांमधले आकर्षण संपावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीत जंगलात राहणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्रितपणे नग्न होऊन आंघोळ करायची असा नियम करण्यात आला आहे. अशा पद्धतीने नग्न होऊन आंघोळ केल्याने नेमकी कोणती क्रांती साधली जाणार हा पांडाने केलेला सवाल नक्षलवादी नेत्यांना निरुत्तर करणारा ठरला आहे. पांडाचे आरोप म्हणजे त्याने वास्तवाकडे वेधलेले लक्ष आहे. मुळात पांडा गेल्या दोन दशकांपासून या चळवळीत सक्रिय असला आणि एका राज्याचा प्रमुख असला तरी आजवर अनेकदा त्याचे नेतृत्वासोबत खटके उडाले आहेत. कंधमालच्या हिंसाचारात सक्रिय भूमिका बजावली म्हणून त्याच्यावर पदावनतीची कारवाई सुद्धा झाली होती. पांडाने आता केलेल्या आरोपांमुळे या चळवळीत राहून घुसमट सहन कराव्या लागणाऱ्या अनेकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. चळवळीचे विचार पटत नसतील तर बाहेर जाण्यासाठी मोकळे आहात असे नेतृत्वाकडून अनेकदा सांगितले जाते. प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे.
अशी बंडाची भाषा करणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कितीही मोठा असो, नक्षलवाद्यांनी आजवर ठार मारून संपवले आहे. गडचिरोली जिल्हय़ात वीस वर्षांपासून सक्रिय असलेल्या विभागीय कमांडर दिवाकरला याच मुद्दय़ावरून ठार करण्यात आले. पांडाच्या बाबतीत मात्र ही चळवळ शेवटपर्यंत द्विधा मनस्थितीत राहिली. पांडा बंड करू शकतो हे लक्षात आले होते, पण त्याला ठार केले तर ओडिशातील मोठे कॅडर बंड करून उठेल अशी भीती चळवळीच्या नेतृत्वाला वाटत होती, अशी माहिती आता समोर येत आहे. पांडाच्या या बंडामुळे या चळवळीच्या विस्ताराच्या मनसुब्याला सुद्धा लगाम बसला आहे. आसाम राज्यात एकीकडे चळवळ विस्तारली जात असताना सर्वाधिक प्रभावक्षेत्र असलेल्या ओडिशामध्येच चळवळीला झटका बसणे नक्षलवाद्यांना हादरा देणारे आहे. पांडाच्या ‘लेटरबॉम्ब’ मुळे या चळवळीच्या वैचारिक भूमिकेवर गहन चर्चा करणाऱ्या देशातील तथाकथित बुद्धिवंतांना सुद्धा मोठा झटका बसला आहे. छत्तीसगड, ओडिशा व महाराष्ट्रातील गडचिरोलीचा भाग नक्षलवाद्यांसाठी नंदनवन म्हणून ओळखला जातो. या नंदनवनातच आता बंडाची फुले उगवू लागल्याने चळवळीचे नेतृत्व चिंताक्रान्त झाले आहे. तीस वर्षांपूर्वी आखलेली चाकोरी मोडायची नाही, समाज बदलत चालला तरी चळवळीची ध्येयधोरणे मागासलेली कशी राहील यातच मग्न राहायचे, ही वृत्तीच या चळवळीला फुटीरतेच्या उंबरठय़ावर उभी करून गेली आहे. हिंसाचाराचा अपवाद वगळला तर या चळवळीचे भवितव्य अंध:का देणारे आहे. पांडाच्या ‘लेटरबॉम्ब’ मुळे या चळवळीच्या वैचारिक भूमिकेवर गहन चर्चा करणाऱ्या देशातील तथाकथित बुद्धिवंतांना सुद्धा मोठा झटका बसला आहे. छत्तीसगड, ओदिशा व महाराष्ट्रातील गडचिरोलीचा भाग नक्षलवाद्यांसाठी नंदनवन म्हणून ओळखला जातो. या नंदनवनातच आता बंडाची फुले उगवू लागल्याने चळवळीचे नेतृत्व चिंताक्रान्त झाले आहे. तीस वर्षांपूर्वी आखलेली चाकोरी मोडायची नाही,  समाज बदलत चालला तरी चळवळीची ध्येयधोरणे मागासलेली कशी राहील यातच मग्न राहायचे, ही वृत्तीच या चळवळीला फुटीरतेच्या उंबरठय़ावर उभी करून गेली आहे. हिंसाचाराचा अपवाद वगळला तर या चळवळीचे भवितव्य अंध:कारमय आहे हे या बंडाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

सव्यसाची पांडाचा ‘लेटरबॉम्ब’ म्हणतो..
वारंवार हिंसा करणे आणि निरपराधांना ठार करणे एवढेच चळवळीचे उद्दिष्ट राहिले आहे. आदिवासींच्या हितासाठी सुरू झालेली ही चळवळ प्रत्यक्षात आदिवासींचे शोषण करीत आहे. आदिवासींचा उपयोग केवळ स्वयंपाक करून घेण्यासाठी व सामान वाहून नेण्यासाठी केला जात आहे. चळवळीत असलेल्या आदिवासी सहकाऱ्यांना त्यांच्या पारंपरिक सणांपासून वंचित ठेवले जाते. चळवळीत मोठय़ा संख्येने असलेल्या आदिवासी तरुणींचे लैंगिक शोषण केले जात आहे. चळवळीचा प्रमुख गणपतीला क्रांती नाही तर केवळ दहशत व भीतीच्या बळावर हुकूमशाही निर्माण करायची आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो