सांस्कृतिक : सामूहिक कलाविष्काराने गुरूंचे स्मरण
मुखपृष्ठ >> विदर्भरंग >> सांस्कृतिक : सामूहिक कलाविष्काराने गुरूंचे स्मरण
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सांस्कृतिक : सामूहिक कलाविष्काराने गुरूंचे स्मरण Bookmark and Share Print E-mail

मोहन अटाळकर, रविवार, २ सप्टेंबर २०१२
९४२२१५७४७८

तबलावादनाच्या क्षेत्रात उस्ताद लड्ड मिया खाँ यांनी आपली स्वतंत्र छाप सोडली होती. ज्या कलावंतानं एक पिढी घडवली त्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं शिष्यांनी सामूहिक कलाविष्कार सादर करण्यापेक्षा कोणते मोठे अभिवादन असू शकेल! तबल्यावर उमटलेल्या बोटांच्या आवर्तनातून या शिष्यांनी आपल्या गुरूला श्रद्धांजली वाहिली. एका तालयात्रेत एका ठेक्यावरून दुसऱ्यात जाताना या कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडलं.
संस्कार भारतीच्या अमरावती शाखेच्या वतीनं प्रख्यात तबलावादक उस्ताद अहमद अली गुलाम अली उर्फ लड्ड मिया खाँ यांच्या बरसीनिमित्त हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोयिममध्ये सामूहिक तबलावादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लड्ड मिया खाँ यांच्या शिष्यांनी एकत्र येऊन आपल्या गुरूला आदरांजली वाहण्याच्या या कार्यक्रमाचे साक्षीदार अनेक जण ठरले. त्यातच लड्ड मिया खाँ साहेब यांची आवडती फरद गत वाजवून नव्या पिढीतल्या या कलाकारांनी रसिकांना रसरशीत आनंद मिळवून दिला.
अमरावती जिल्ह्य़ातील नेरपिंगळाई येथे १९१७ मध्ये जन्मलेल्या लड्ड मिया खाँ यांनी अमरावतीला आपली कर्मभूमी मानलं. तबलावादनाच्या क्षेत्रात त्यांनी आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं. त्यांच्या तालमीत अनेक तबलावादक तयार झाले. राज्यात प्रसिद्धीस आलेल्या अनेक उत्कृष्ट तबलावादकांमध्ये त्यांच्या शिष्यांचा समावेश आहे. लड्ड मिया खाँ हे प्रखर राष्ट्राभिमानी होते. आपल्या शिष्यामंध्ये राष्ट्रप्रेम जागवण्याचं काम त्यांनी अव्याहतपणे केलं. त्यांच्या श्वासात तबला होता. अशा या थोर कलावंताला श्रद्धांजली वाहण्यासाठी संस्कार भारतीच्या अमरावती शाखेनं सामूहिक तबलावादनाची संकल्पना मांडली आणि त्यांच्या शिष्यांनी त्याला लगेच मूर्तरूपही दिलं. या कार्यक्रमात १० तबलावादकांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध तबलावादक मुकुंद सराफ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात अ‍ॅड. मिलिंद वैष्णव, श्रीकांत पुंडलिक, प्रशांत दुधे, समीर जगताप, प्रसाद पांडे, सौरभ कर्डीकर, राहुल बलखंडे, अनामय पवार, स्वप्नील सरदेशमुख यांनी आपला कलाविष्कार सादर केला. उद्घाटक प्रा. गणेश रोडे, सूरमणी कमल भोंडे, अजय देशपांडे, प्रा. मोहन काटे, शिवराय कुळकर्णी यांनी कलावंतांचा उत्साह वाढवला.
१९७६ ते १९९७ पर्यंत अनेक शिष्यांना लड्ड मिया खाँ यांनी तबलावादनाचे धडे दिले. त्यातल्या अनेकांनी या क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्यांच्या शिष्यांचा गोतावळा मोठा, त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाना बरसीनिमित्त एकत्र आणण्याची संकल्पना पुढं आली. संस्कार भारतीच्या अमरावती शाखेनं यापूर्वीही अभिरुचीपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमानं एक वेगळा साज चढवला.
तालवाद्याच्या या सुरेल सफरीचा आनंद घेण्यासाठी विदर्भातून अनेक कलावंत या कार्यक्रमासाठी आले होते. हॉलमध्ये गर्दी झाल्यानं अनेकांना बाहेर ध्वनिक्षेपकाहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा लागला. रसिकांनीही नव्या पिढीतल्या या तरुण कलाकांरांना उत्स्फूर्त दाद दिली आणि त्यांचं कौतुकही केलं. पेशकर ताल, तीन ताल, रेला धा तिरिकीट, धा तिरीकट, फरद गत, अल्लारखाँ साहेबांचे चलन, गत कायदा, असे ताल वाजवत कलाकारांनी कार्यक्रम फुलवत नेला. रसिकही या तालप्रवासात मग्न होऊन गेले होते. या कार्यक्रमाला उस्ताद लड्ड मिया खाँ यांचे नातू सादिक अली आवर्जून उपस्थित होते. आजोबांची कला आपण शिकू शकलो नाही, अशी खंत सादिक अली यांनी यावेळी व्यक्त केली खरी, पण आपल्या मुलाला या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अभिवचन त्यांनी यावेळी दिलं. प्रसाद पांडे आणि सौरभ कर्डीकर या तबलावादकांना आकाशवाणीवर ‘बी हाय’श्रेणीचे कलावंत म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. एका सुरेल कार्यक्रमाचा आनंद या निमित्तानं अमरावतीकरांना घेता आला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो