सह्याद्रीचे वारे : दर्डाच्या साम्राज्याला ग्रासणारे वाद
मुखपृष्ठ >> सह्याद्रिचे वारे >> सह्याद्रीचे वारे : दर्डाच्या साम्राज्याला ग्रासणारे वाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सह्याद्रीचे वारे : दर्डाच्या साम्राज्याला ग्रासणारे वाद Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२
हे वाद स्थानिक स्वरूपाचेच राहिले, मोठे झाले नाहीत. दर्डा कुटुंबाचा वावर सर्वपक्षीय नेत्यांत आहे. किरीट सोमय्यांना आता दर्डानी खुले आव्हान दिले असताना, हे विस्मृतीत गेलेले जुने वाद नक्कीच आठवण्याजोगे..
कोळसा खाण वाटप घोटाळ्यात नाव आल्याने अडचणीत सापडलेल्या दर्डा बंधूंचे विदर्भात यवतमाळ आणि नागपुरातील शैक्षणिक आणि व्यापारी साम्राज्य चांगलेच विस्तारलेले असले तरी दर्डा कुटुंबीयांच्या मालकीहक्काच्या अचल संपत्तीबाबत तसेच काही संस्थांना दर्डा कुटुंबातील सदस्यांची नावे देण्यावरून वर्षांनुवर्षांपासून वाद उद्भवले आहेत. दर्डा आणि वादाची परंपरा फार जुनी असली तरी काँग्रेसच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेला वावर आणि गांधी घराण्याशी असलेली जवळीक यामुळे कारवाईचे फासे लांबणीवर पडत गेले.
आज जवळजवळ दोन हजार कोटींच्या उलाढालीचे साम्राज्य असलेल्या दर्डा परिवाराचे आधारवड जवाहरलाल दर्डा साठच्या दशकात यवतमाळात कपडय़ांचे विक्रेते होते. स्वातंत्र्यसैनिक म्हणून निर्माण केलेली प्रतिमा आणि काँग्रेसचे काम करताना त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी अत्यंत घनिष्ठता निर्माण झाली. सत्तरच्या दशकात दर्डाचा राजकीय उदय झाला आणि १९७२ साली विधान परिषदेवर जवाहरलाल दर्डाची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा राजकीय आलेख चढतच गेला. १९९६ पर्यंत राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती त्यांच्या वाटय़ाला आली. दर्डा कुटुंबीयांचे आजमितीस मुंबईला कार्पोरेट ऑफिस, यवतमाळात १०-१२ एकर परिसरात आलिशान दर्डा उद्यान, प्रेरणा हे समाधी स्थळ, हनुमान शाळा व्यायाम क्रीडा मंडळ, प्रियदर्शनी सूतगिरणी, दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (लोहारा), हिंदी हायस्कूल, अमोलकचंद विधि महाविद्यालय, बीपीएड कॉलेज, दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल आणि नागपुरातील जनता चौकात तेरा मजली शानदार इमारत तसेच रहाटे कॉलनीत आलिशान बंगला असे साम्राज्य आहे. यवतमाळात दर्डा परिवाराची ‘पृथ्वीवंदन’ गांधी चौकात दिमाखात उभारण्यात आली असून याच इमारतीत जवाहरलाल दर्डा अर्थात जेएलडी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कागदोपत्री कार्यालय होते. याच जेएलडी कंपनीला कोळसा खाणीचे वाटप झाले आणि दर्डा बंधू एकाएकी अडचणीत आले. सध्या या इमारतीनजीक हे कार्यालय नागपूरला स्थानांतरित करण्यात आल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे.
जागांचे अनेक वाद दर्डा परिवाराला चिकटलेले आहेत. यवतमाळातील आझाद मैदानाजवळ ‘गांधी भवन’ हे काँग्रेस पक्षाचे कार्यालय म्हणून वापरात होते. याच ठिकाणी दर्डा परिवाराने प्रियदर्शनी सूतगिरणीचे कार्यालय सुरू केले आहे. ही मालकी वादाच्या भोवऱ्यात आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या विजय दर्डा यांनी खासदार निधीचा वापर स्वत:च्या संस्था वाढविण्यासाठी केल्याचा आरोप करून याची चौकशी करण्याची मागणी यवतमाळातील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पजगाडे यांनी केली होती. त्यांनी दर्डाविरोधात आंदोलने, उपोषण असा दीर्घ संघर्षही केला होता. मात्र, निष्पत्ती शून्य राहिली. कारण, चौकशीचे आदेश अजूनही देण्यात आलेले नाहीत. यवतमाळातीलच इंग्लिश मीडियम स्कूलची इमारत सहकारी सोसायटीच्या खुल्या जागेवर बांधल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी पजगाडे यांनी उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, राष्ट्रपतींनाही साकडे घातले. याच्याही चौकशीचे नंतर काहीच झाले नाही.
यवतमाळ येथील विमानतळाचे नामकरण जवाहरलाल दर्डा विमानतळ करण्यात आल्यानंतर शिवसेनेने त्याला प्रचंड विरोध केला होता. नामकरण फलक उद्ध्वस्त करण्याची धमकी सेनेने दिल्याने या विमानतळाभोवती वर्षभर कडक पोलीस पहारा ठेवण्याची वेळ आली होती. नंतर शिवसेनेचे आंदोलन एकाएकी थंड पडले. यामागचे रहस्य गुलदस्त्यात आहे. विजय दर्डा यांनी शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही अत्यंत जवळिकीचे संबंध राखलेले आहेत. त्यामुळे १९९५ साली बाळासाहेब दर्डाच्या रहाटे कॉलनीतील निवासस्थानी मुक्कामास होते. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रोतृ सभागृहालाही दिवंगत जवाहरलाल दर्डा यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या नावाचे डाक तिकीटही केंद्र सरकारने नंतर जारी केले. भाजप नेते लालकृष्ण यांच्यासह दिग्गज राजकीय नेते या समारंभाला हजर होते. यवतमाळमधील या समारंभाचे फ्लेक्स फलक खासदार विजय दर्डा यांनी राज्यभर झळकवले होते. आणखी एका नामकरणावरून दर्डा कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, तेही महाविद्यालयाशी संबंधित. यवतमाळात सत्यनारायण अमोलकचंद धूत यांच्या वडिलांच्या नावाने असलेले अमोलकचंद महाविद्यालय सध्या खासदार विजय दर्डा यांच्या ताब्यात आहे. जवाहरलाल दर्डा यांच्या वडिलांचे नाव अमोलकचंद दर्डा असे आहे. या महाविद्यालयाला अमोलकचंद दर्डा विधि महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या नावाला विरोध करून सत्यनारायण अमोलकचंद धूत यांची कन्या किरण अग्रवाल यांनी  उच्च न्यायालयातून स्थगनादेश आणला होता. यवतमाळात १०-१२ एकर परिसरात दर्डा कुटुंबाचे आलिशान निवासस्थान असून याची किंमत १०० कोटींच्या आसपास आहे.
दर्डा उद्यानासमोर दिवं. जवाहरलाल दर्डा आणि दिवं. वीणा दर्डा यांची समाधीस्थळे असून त्याला ‘प्रेरणास्थळ’ असे नाव देण्यात आले आहे. या समाधीस्थळाला अनेक बडय़ा  राजकीय नेत्यांच्या भेटी सतत सुरू राहतात. स्वातंत्र्यसैनिक असल्याने जवाहरलाल दर्डा यांना गायीम्हशी पालनाचा व्यवसाय करण्यासाठी ही जागा सरकारकडून देण्यात आली होती. या जागेची आजची अंदाजित किंमत ७० कोटी रुपये आहे. या जागेवर ‘प्रेरणा स्थळ’ उभारून त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप दिगंबर पजगाडे यांनी केला होता. याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाल्याने ही जागादेखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. प्रेरणा स्थळाला अगदी लागूनच ‘दर्डा मातोश्री सभागृह’ बांधण्यात आले असून येथे विवाह सोहळे होतात. दर्डाच्या वृत्तपत्राच्या मालकीच्या, नागपुरातील तेरा मजली इमारतीचे बांधकामही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अतिक्रमण करून तीन अतिरिक्त मजले तसेच अतिरिक्त पार्किंग चढविल्याचे प्रकरणही मध्यंतरी प्रचंड गाजले होते. याविरोधात तत्कालीन एका वृत्तपत्राचे मालक व प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट नरेश गद्रे यांनी मोठी मोहीम चालविली होती. या प्रकरणाने दर्डा कुटुंबाला चांगलेच अडचणीत आणले होते. नंतर एका अपघातात नरेश गद्रे यांचा मृत्यू झाला. नागपूर महापालिकेच्या धंतोली झोन कार्यालयात याचे कागदपत्रे कारवाईसाठी प्रलंबित आहेत. अनेक नोटिशी देण्यात आल्यानंतरही राजकीय दडपणामुळे सदर प्रकरण थंड बस्त्यात आहे. या इमारतीला दोन वर्षांपूर्वी मोठी आग लागली होती. आगीचे स्वरूप भयानक होते. अग्निशमन व्यवस्था पुरेशी नसल्याने आग आटोक्यात आणताना पुरेवाट झाली होती.
‘मीडिया बॅरन’ म्हणून दबदबा निर्माण करणारे ६१ वर्षीय विजय दर्डा अत्यंत मितभाषी आणि अजातशत्रू म्हणून परिचित आहेत. गांधी घराणे, शिवसेनाप्रमुख, लालकृष्ण अडवाणी, दिवं. प्रमोद महाजन, नितीन गडकरी, डावे नेते यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांशी मधुर संबंध जपलेले आहेत. दर्डा परिवाराचे राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याचे कसब विजय दर्डामध्ये आहे. त्यातूनच १९९८ साली काँग्रेसविरोधात राज्यसभेची निवडणूक लढवून ते स्वतंत्र सदस्य म्हणून सहज निवडून आले होते. नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. बडय़ा ‘कॉन्टॅक्ट’चा वापर करून २००४ आणि २०१० साली विजय दर्डानी राज्यसभेची हॅट्ट्रिक साधली. अनेक संसदीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. वृत्तपत्रसृष्टीतील संघटनांवर विजय दर्डा यांनी असंख्य वेळा पदे भूषविली आहेत. ऑडिट ब्युरो ऑफ सक्र्युलेशन आणि इंडियन न्यूजपेपर्स सोसायटीचे अध्यक्षपद, साऊथ एशियन एडिटर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, प्रेस इन्स्टिटय़ूट ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून विजय दर्डा यांनी काम केले आहे. पंतप्रधान, राष्ट्रपतींसमवेत अनेक विदेश दौऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. विजय दर्डाच्या काळात कारगिल शहिदांसाठी निधीचे आवाहन, यवतमाळातील भागवत संध्यापर्व हे दोन मोठे वाद प्रचंड चर्चेत राहिले आहेत. त्यांचे पुत्र व लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी कोळसा घोटाळ्यापासून सर्व आरोपांचा इन्कार केला असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमच्या शेअर विक्रीचे पुरावे सादर केले तर अर्धी रक्कम सोमय्या यांना देऊ, असे प्रतिआव्हान दिले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो