भवताल : पीक-क्रांतीसाठी मधमाश्या
मुखपृष्ठ >> भवताल >> भवताल : पीक-क्रांतीसाठी मधमाश्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

भवताल : पीक-क्रांतीसाठी मधमाश्या Bookmark and Share Print E-mail

 

डॉ. र. पु. फडके - गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२

मधमाशीपालनाची कल्पना आजही अनेकांना दूरची वाटते, पण या व्यवसायात मधापेक्षा आणखीही अधिक शक्ती आहे..  अन्य पिकांचे उत्पादन वाढवण्याची शक्ती!  
आजमितीला भारताची लोकसंख्या ११० कोटीवर पोहोचली असून, येत्या दोन दशकांत ती १४० कोटीपर्यंत पोहोचून नंतर स्थिर राहील असा संख्याशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नियोजनतज्ज्ञांपुढे दोन मोठी आव्हाने असतील.


१) सर्व लोकांसाठी पोटभर आणि सकस असे अन्नधान्याचे उत्पादन आणि (२) २० ते ४० वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणे.
भारत हा कृषिप्रधान देश असून, देशातील सुमारे ७० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यातील बहुसंख्य लोक कृषी आणि कृषी आधारित पारंपरिक ग्रामोद्योगांवर अवलंबून आहेत. अन्नधान्याच्या उत्पन्नवाढीतून अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णता आणि कृषी आधारित उद्योगातून स्वयंरोजगार या गोष्टीतून वरील दोन आव्हानांना कृषी व्यवसायच यशस्वीपणे सामोरा जाऊ शकतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अन्नधान्याच्या तुटवडय़ामुळे सुरू झालेली रेशनिंगची पद्धत, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अनेक वर्षे चालू होती. अमेरिकेहून रोज गव्हाने भरलेली जहाजे भारताकडे ढछ 480 योजनेअंतर्गत यायची. १९६५मधील भारत-पाक युद्धामुळे लालबहादूर शास्त्री यांनी अन्नधान्याबाबतचे परावलंबित्वाचे गांभीर्य जाणून ‘जय जवान जय किसान’ हा नारा दिला. १९७१च्या बांगला देशनिर्मितीच्या युद्धात अन्नधान्याचे बाबतीत स्वावलंबी होण्याची जाणीव प्रकर्षांने निर्माण झाली. तत्कालीन प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांनी याबाबत खास प्रयत्न केले.
पहिली हरित क्रांती
वरील परिस्थितीमुळे पंचवार्षिक योजनांतून कृषी विभागासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली. भारतभर सुमारे ५० कृषी विद्यापीठ, ५०० कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्यात आली आणि अनेक विस्तार, संशोधन, प्रशिक्षणाच्या योजना हाती घेण्यात आल्या. १९७०च्या दशकांत गहू, ज्वारी, भात, मका यांच्या संकरित जाती निर्माण करून भारत या तृणधान्यांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण तर झालाच आणि जगातील अन्नधान्याचे उत्पादनात अग्रेसर असलेल्या पाच देशांत भारताने स्थान मिळविले.
भारतातील पहिल्या हरित क्रांतीमुळे  तृणधान्यांच्या  बाबतीत भारत स्वावलंबी तर झालाच आणि काही प्रमाणात तृणधान्ये निर्यातही करू लागला. परंतु ही हरित क्रांती फक्त गहू, भात, ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांतच झाली. तेलबिया, डाळी, कडधान्ये, फलोत्पादन इ. इतर पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढत नव्हते आणि खाद्यतेल, डाळी यांची आयात करावी लागत होती. या परिस्थितीची दखल घेऊन केंद्र शासनाने १९८६ मध्ये ‘तेलबिया अभियान’, १९९० मध्ये ‘डाळी-कडधान्ये अभियान’ आणि १९९२ मध्ये ‘फलोत्पादन अभियान’ सुरू केले. गेली २०-२५ वर्षे ही मिशन्स अस्तित्वात आहेत. परंतु या पिकांच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होत नाहीये. या पिकांच्या जागतिक हेक्टरी उत्पादनाच्या केवळ ४० ते ५० टक्केच हेक्टरी उत्पादन भारतात मिळत आहे, आणि हजारो-करोडो रुपये खाद्यतेल आणि डाळी यांच्या आयातीवर खर्च होत आहेत. तृणधान्ये सोडून इतर पिकांमध्ये हेक्टरी उत्पादनात वाढ होत नाहीये. काही पिकांच्या बाबतीत हेक्टरी उत्पादन घटत आहे असे का?
फुलणाऱ्या वनस्पती आणि मधमाश्या
पृथ्वीवरील वनस्पतींच्या उत्क्रांती प्रक्रियेत सुमारे ८ ते १० कोटी वर्षांपूर्वी फुलणाऱ्या वनस्पती निर्माण झाल्या. वनस्पतीशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार फुलणाऱ्या वनस्पतीबरोबरच किंवा त्यांच्या पाठोपाठ, गांधीलमाश्यांसारख्या आपल्या पूर्वजांपासून मधमाश्या उत्क्रांत झाल्या. याचे कारण म्हणजे फुलणाऱ्या वनस्पती आणि मधमाश्या आपल्या जीवनक्रमासाठी आणि अस्तित्वासाठी संपूर्णपणे एकमेकांवर अवलंबून असतात. फुलणाऱ्या वनस्पतींपासून मधमाश्यांना त्यांचे खाद्य मिळते. मधमाश्या अनेक फुलांवरून त्यांचे खाद्य गोळा करताना एका फुलातील पराग (पुंकेसर) त्याच जातीच्या दुसऱ्या फुलातील मादी अवयवावर सहजच पोहोचविण्याचे काम करतात. फुलांमध्ये असे पर-परागसिंचन (ू१२२ स्र्’’्रल्लॠ३्रल्ल) झाल्यामुळे फुलांचे रूपांतर जनुकिय विविधता असलेल्या उच्च दर्जाच्या भरपूर बियाणांत/फळांत होते. मधमाश्या आणि फुलणाऱ्या वनस्पती यांचे हे परस्परावलंबित्व गेली अनेक दशलक्ष वर्षे अव्याहत चालू आहे आणि त्यांच्यातील उत्क्रांती एकमेकांच्या हातात-हात घालून एकमेकांना पूरक अशी होत आहे. जगात मानवास उपयुक्त अशा घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी ७० ते ८० टक्के पिके स्वपरागसिंचित अफल (२ी’ऋ २३ी१्र’ी) किंवा पर-परागसिंचन सफल (ू१२२ ऋी१३्र’ी) असून बीज/फलधारणेसाठी मधमाश्या किंवा तत्सम कीटकांवर पूर्णपणे अवलंबून असतात.
दुसरी हरित क्रांती
गहू, ज्वारी, भात, बाजरी ही पिके स्वपरागसिंचित फलित (२ी’ऋ ऋी१३्र’ी) किंवा वाऱ्यामार्फत पर-परागसिंचित आहेत. त्याच्या बीज धारणेसाठी कीटकांची गरज नसते. परंतु इतर बहुतेक पिके ही संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात पर-परागसिंचनासाठी मधमाश्या किंवा तत्सम कीटकांवर अवलंबून असतात. अशा पिकांमध्ये उत्तम संकरित बियाणे, खता-पाण्याच्या योग्य मात्रा आणि पिकसंरक्षण या चार पारंपरिक निविष्ठा (कल्लस्र्४३२) वापरून जेव्हा ही पिके फुलांत येतांत तेव्हा फुलांच्या संख्येनुसार शेतात पुरेशा संख्येने मधमाश्या किंवा उपयुक्त कीटक नसतील तर पिकाच्या सर्वच्या सर्व फुलांतील स्त्रीबीजाचे फलन न झाल्याने अपेक्षित कमाल पीक उत्पादन मिळत नाही. त्यातच पीक संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या कीटक नाशकांमुळे उपद्रवी कीटकांबरोबर उपयुक्त कीटकांचाही नाश होत आहे. काही उपयुक्त कीटकांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत दुसरी हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी पिके फुलात आली असता परागसिंचनासाठी मधमाश्या या पाचव्या निविष्ठेस पर्याय नाही. निसर्गात मधमाश्या हे काम शांतपणे करीत असतातच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत असे आयुष्यभर अथक परिश्रम करून त्या मध तयार करतातच, पण त्याचबरोबर परागसिंचन करून वनसंपदा समृद्ध करतात. शेतीपिकांमध्ये उत्पादक आणि गुणवत्ता वाढवून देशाच्या आर्थिक व्यवस्थेत मोलाची भर घालतात, पण याची दखल लाभार्थीकडून घेतली जात नाही. २०व्या शतकात शास्त्रज्ञ म्हणून ज्यांचा गौरव केला गेला आहे त्या प्रो. आईन्स्टाइन यांनी नोंद करून ठेवली आहे की जर काही कारणाने पृथ्वीवरील मधमाश्यांचा नाश झाला तर ४-५ वर्षांत पृथ्वीवरील मानववंशाचा नाश होईल.
अमेरिकेतील बागाईतदार आणि शेतकरी आपल्या पिकांचे हेक्टरी कमाल उत्पादन मिळावे म्हणून मधमाश्या पालकांकडून ‘परागसिंचन सेवा’ घेतात आणि त्यांना एका मधमाश्याच्या वसाहतीसाठी महिन्याला १०० ते १५० डॉलर्स भाडे देतात. कॅलिफोर्नियातील बदामाच्या बागाईतदारांकडून फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यात मधमाश्यापालक परागसिंचनाची सेवा देऊन १५ कोटी डॉलर्सची कमाई करतात. अमेरिकेत शेतीतज्ज्ञांच्या अहवालानुसार मधमाश्यांमुळे अमेरिकेतील कृषी उत्पादनांत होणारी वाढ ही मधमाश्यांनी तयार केलेल्या मधाच्या किंमतीपेक्षा १५-२० पटीने अधिक असते.
मधमाश्यापालनाचे अल्पभूधारक, आदिवासी यांना स्वयंरोजगार, लाखो किलो मध-मेणाचे उत्पादन, मध-मेण इ. पदार्थाचे संकलन, प्रक्रिया विक्री असा ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार आणि अनेक शेती-पिकांचे हेक्टरी उत्पादनात वाढ असे चतुर्विध फायदे आहेत.
आपण पहिली हरित क्रांती केली. आता दुसरी हरित क्रांती आणि सुवर्ण क्रांती (मध उत्पादन) करण्यासाठी मधमाश्यापालन व्यवसायाची वृद्धी करू या!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो