पसाय-धन : सारासार विचार करा उठाउठी..
मुखपृष्ठ >> पसायधन >> पसाय-धन : सारासार विचार करा उठाउठी..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पसाय-धन : सारासार विचार करा उठाउठी.. Bookmark and Share Print E-mail

 

अभय टिळक - शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विचार, सारासार विचार करण्याची संस्कृती समाजात रुजावी याचसाठी संतांचा खटाटोप आहे.. पण  विवेकाचा दीप प्रकाशमान होऊन सतेज तेवत राहावा यासाठी आपण आपापल्या जागी डोळसपणे प्रयत्नशील असतो का?
काही काही विपरीत समजुती आपला पिच्छा पिढय़ान्पिढय़ा पुरवत असतात. भक्ती म्हणा वा अध्यात्म म्हणा वा परमार्थ हा केवळ मनाचा अथवा श्रद्धेचा प्रांत आहे, ही अशीच एक (गैर)समजूत. परमार्थात बुद्धीचे कामच नाही, हा या समजुतीचा इत्यर्थ.

किंबहुना, परमार्थाच्या प्रांतात बुद्धी चालवणे, तर्क करणे, प्रश्न उपस्थित करणे म्हणजे जणू मोठा गुन्हाच, अशीही एक भावना सर्वदूर दिसते. सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत या धर्तीवर बुद्धीची धाव फक्त वस्तुज्ञानाच्या कुंपणापर्यंत आणि ही धाव जिथे खुंटते तिथून पुढे परावस्तूचा प्रांत सुरू होतो, अशा प्रकारची टाळय़ाखाऊ वाक्ये मानमरातब मिळवलेले वैज्ञानिकही जेव्हा दाटलेल्या कंठाने करतात तेव्हा हतबुद्ध व्हायला होते. परमार्थाच्या प्रांतात बुद्धी गुंडाळून ठेवायची, हे संतविचाराला खरोखरच अभिप्रेत आहे का?
समाज विवेकशील बनावा याचसाठी संतविचाराचा सारा आटापिटा आहे. आपण मात्र ही गोष्ट लक्षातच घेत नाही. त्यालाही एक कारण आहे. ‘विवेक’ ही बाब फक्त आध्यात्मिक आहे, असा आपण शिक्का मारून टाकलेला आहे. ‘विवेक’ या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे ‘सारासार विचार’. आता, सारासार विचार, सुज्ञपणे वागणे, तारतम्याने जगणे याची आपल्याला रोजच्या जीवनात गरज नसतेच, अशी टोकाची भूमिका एखाद्याने घेतली तर मग बोलणेच खुंटते. प्रत्येक मनुष्याने प्रत्येक कृती सारासार विचाराने, डोळसपणे करावी हाच संतविचाराचा सांगावा आहे. ज्ञान हे कर्माचे डोळे असावेत, असे ज्ञानदेव म्हणतात ते याच अर्थाने. ‘ज्ञानेश्वरी’सारखा भाष्यग्रंथ निर्माण करण्यामागची ज्ञानदेवांची प्रेरणा काय होती, याचा आपण तरी कधी संवेदनशीलतेने विचार करतो का? संदर्भ वेगळा असला तरी, ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात एके ठिकाणी ज्ञानदेवांनी त्याचा खुलासा श्रीकृष्णमुखातून केलेला दिसतो. ‘‘मी अविवेकाची काजळीं। फेडुनिं विवेकदीप उजळीं,’’ ही ती प्रेरणा! संतकार्याची मुख्य ऊर्मी ही आहे. विवेक, बुद्धी, शुद्ध बुद्धी यांचा महिमा आमच्या सगळय़ाच संतांनी वेळोवेळी गायलेला आहे. त्याच्याकडे तितक्याच संवेदनशीलतेने आपण बघत नाही, कारण बहुतेक वेळा आपला संपूर्ण भर असतो तो पारायण आणि पाठांतर यांवरच.
ज्ञानेश्वरीची सुरुवात, या दृष्टीने, अतिशय वैशिष्टय़पूर्ण आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात गजाननाला वंदन करून करायची या संकेताला अनुसरून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ गणेशवंदनाने केलेला आहे. परंतु, ज्ञानदेवांनी दंडवत घातलेला गणेश असाधारण आहे. तो आहे शब्दगणेश. त्या शब्दगणेशाचे ज्ञानदेवांनी केलेले रूपगुणवर्णनही आगळे आणि मार्मिक आहे. त्याचा संपूर्ण परामर्श इथे आपल्याला घ्यायचा नाही. परंतु, समाजमनावर विवेकाचे संस्कार घडविण्याची जी प्रतिज्ञा ज्ञानदेव प्रातिनिधिक स्वरूपात घेतात तिच्याशी सुसंवादी जी दोन रूपके त्यांनी गणेशवर्णनात वापरलेली आहेत, ती अभ्यसनीयच आहेत.
मुळात गीता आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी हे दोन्ही अध्यात्मशास्त्राचे ग्रंथ होत, याबाबत ज्ञानदेव नि:शंक आहेत. ‘‘तैसें अध्यात्मशास्त्री इये। अंतरंग चि अधिकारियें।’’ अशा नेमक्या शब्दांत अध्यात्मशास्त्राचा तो ग्रंथ वाचून आणि समजून घेण्यासाठी त्या ग्रंथाच्या वाचकांनी आणि श्रोत्यांनी कोणती पूर्वतयारी करणे आवश्यक आहे, हे ज्ञानदेव सांगतात. ‘अंतरंग-अधिकारी’ म्हणजे ज्याचे मन अंतर्मुख झालेले आहे, असा माणूस. म्हणजे, अध्यात्मशास्त्राचा ग्रंथ वाचण्याऐकण्यासाठी मन प्रथम अंतर्मुख बनवणे आवश्यक आहे, असा संत इशारा देतात. इथे विवेकाचा संबंध येतो. ‘तुका म्हणें मना पाहिजें अंकुश’ या शब्दांत तुकोबा तो संबंध स्पष्ट करतात. ज्या मनावर विवेकाचा अंकुश रोखलेला आहे असे मन हे अंतर्मुख बनते, हा तुकोबांच्या स्पष्टीकरणाचा गाभा. आता, मन अंतर्मुखच का करायचे, असा प्रश्न कोणी उपस्थित करतील.
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ज्ञानदेवांनी, शब्दगणेशाचा दात आणि सोंड यांवर मोठी अन्वर्थक रूपके योजलेली आहेत. शब्दगणेशाच्या दाताचा निर्देश ज्ञानदेव ‘‘तरि संवादु तो चि दशनु। समता शुभ्रवर्णु’’ अशा शब्दांनी करतात. या ठिकाणी, ‘संवाद’ या शब्दाचा अर्थ आहे ‘चर्चापद्धती.’ संशोधनाची भाषा वापरायची तर ‘संवाद’ म्हणजे ‘मेथडॉलॉजी.’ अध्यात्मशास्त्राचा हा ग्रंथ जो मी तयार करतो आहे त्यासाठी वापरलेली तत्त्वज्ञानाची चर्चापद्धत त्या शब्दगणेशाच्या दाताच्या शुभ्रवर्णासारखी पूर्ण निर्दोष, बिनचूक आहे, असा हवाला ज्ञानदेव भावार्थदीपिकेच्या वाचक-श्रोत्यांना सुरुवातीलाच देऊन टाकतात. तत्त्वचर्चेची निर्दोष ‘मेथडॉलॉजी’ वापरून निर्माण केलेल्या या ग्रंथाचा आस्वाद घ्यायचा, आनंद लुटायचा, तर श्रोते अथवा वाचकांची स्थिती कशी असली पाहिजे, याचा निर्देश ज्ञानदेव शब्दगणेशाच्या सोंडेकडे लक्ष वेधून करतात. शब्दगणेशाच्या सोंडेचे वर्णन, ज्ञानदेव, ‘देखा विवेकवंतु विमळु। तो चि शुंडादंडु सरळु।’’ असे करतात. हत्तीची सोंड हे जगातील एक आश्चर्यच आहे. महाप्रचंड झाडांच्या फांद्यापासून ते अणकुचीदार सुईपर्यंत हत्ती काहीही उचलू शकतो ते त्या सोंडेच्या बळावरच. आजची परिभाषा पुन्हा वापरायची तर, कोणत्याही ‘मॅक्रो’ अथवा ‘मायक्रो’ विषयाचा वेध घेणारा सारासार विचार म्हणजे ज्ञानदेवांच्या शब्दगणेशाची सोंड. बिनचूक तत्त्वचर्चा मांडलेल्या या ग्रंथाचा आस्वाद घ्यायचा तर त्याचे वाचक अथवा श्रोते शब्दगणेशाच्या विवेकरूपी सोंडेसारखे विवेकवंत असावेत, ही ज्ञानदेवांची अपेक्षा आहे.
संतविचाराचा आणि विवेकाचा संबंध इतका घनिष्ठ आणि जैविक आहे, हे दाखविणारे हे केवळ एक उदाहरण वानगीदाखल. प्रपंच काय वा परमार्थ काय, सूक्ष्म विचार सगळीकडे, सतत करावाच लागतो. परमार्थाला विचाराचे, चिकित्सेचे वावडे नाही. वैचारिकबाबतीत आपले दुधाचे दात पाडायला आपणच तयार नसल्याने आपल्याला सोयीचे (गैर)समज आपणच तयार करतो आणि ते जन्मभर कुरवाळत बसतो. परमार्थ हा मुख्यत: भावाचा, मनाचा प्रांत होय, तिथे बुद्धीला मुरडच घालीव लागते, हा आपण जोपासलेला असाच एक सज्जड भ्रम. त्यालाही कारण आहे. आपल्याला मुळात बुद्धीला ताणच द्यायचा नसतो. त्यापेक्षा पाठांतर सोपे आणि बरे! फटाफट संतवचने समोरच्याच्या तोंडावर फेकली, की ‘इंप्रेशन’ झकास पडते. त्या शब्दांच्या अर्थाकडे पाहून त्याबाबत विचार करतो कोण? शब्दांच्या अर्थाचा विचार न करता भारंभार पाठांतर करणाऱ्यांची कडक हजेरी तुकोबांनी, ‘‘घोडें काय थोडें वागवितें ओझें। भावेंविण तैसें पाठांतर।।’’ अशा शेलक्या शब्दांत घेतलेली आहे. ‘भाव’ या शब्दाच्या अर्थाला खूप छटा आहेत. ‘भाव’ म्हणजे ‘अर्थ’, ही त्यांपैकीच एक. अर्थ न कळता केलेले पाठांतर घोडय़ाच्या पाठीवर लादलेल्या बोजासारखे आहे, असा तडाखा तुकोबा मारतात.
विचार, सारासार विचार करण्याची संस्कृती समाजात रुजावी याचसाठी संतांचा खटाटोप आहे. विवेकशील माणसे केव्हाही, कोठेही दुर्मिळच असतात. त्यामुळे, बुद्धिपुरस्सर नामचिंतन करणारे साधक विरळच सापडतात याची कबुली, ‘हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ।’ अशा शब्दांत ज्ञानदेवांनी ‘हरिपाठां’त दिलेलीच आहे. तर, ‘सारासार विचार करा उठाउठी।’ असा हाकारा तुकोबा दोन्ही बाहय़ा उभारून केव्हाचा देत आहेत. ‘उठाउठी’ म्हणजे ‘लवकर’, ‘तत्काळ’ वा ‘झटपट’. हा हाकारा तुकोबांनी घालून आता ३६० वर्षे उलटून गेली. मात्र, विवेकाचा दीप प्रकाशमान होऊन सतेज तेवत राहावा यासाठी आपण आपापल्या जागी डोळसपणे प्रयत्नशील असल्याचा घाऊक प्रत्यय काही अजूनही येत नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो