करिअरिस्ट मी : वाचनानंद
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : वाचनानंद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : वाचनानंद Bookmark and Share Print E-mail

प्रियांका मोकाशी ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि याच विषयात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाच्या प्रभारी ग्रंथपाल आणि मुलांसाठी करिअरमध्ये ब्रेक घेऊन नंतर पुन्हा नव्याने करिअर उभारणाऱ्या, पुस्तकांवर प्रेम व गाढ श्रद्धा असणाऱ्या डॉ. प्रतिभा गोखले, वाचनानंद स्वत: लुटणाऱ्या व इतरांना लुटू देणाऱ्या. पुस्तकांशी नातं सांगणाऱ्या या वेगळ्या करिअरविषयी..
‘‘एखादं कोरं करकरीत पुस्तक हातात घेऊन त्याच्या कव्हरवरून हात फिरवणं, पान उलटसुलट करून त्यातील रंगीत छायाचित्रं पाहणं, हवं तेव्हा हवं ते पान उघडून मग हळूच त्यात बुकमार्क घालून मिटून ठेवणं, गाडीच्या कोलाहालात, आसपासच्या कलकलाटाकडे सहजी दुर्लक्ष करून भान हरपून एखादी कादंबरी वाचता वाचता आपले स्टेशन कधी आलं ते न कळणं, चार-पाच पुस्तके समोर ठेवून तल्लीन होऊन अभ्यासाच्या नोटस् काढणं, पुस्तकांच्या दुकानासमोर रेंगाळणं- हा सारा वाचनानंद संगणकाच्या पडद्यावर पुस्तक वाचताना मिळतो?..’’ हा प्रश्न मला विचारला, पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या आणि म्हणूनच ग्रंथालयशास्त्र हे आपले कार्यक्षेत्र निवडणाऱ्या डॉ. प्रतिभा गोखले यांनी! प्रतिभाताई मुंबई विद्यापीठातून ग्रंथालय व माहितीशास्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. सध्या त्या मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र या विभागाच्या विभागप्रमुख तसेच मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाच्या प्रभारी ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत.
प्रतिभाताई म्हणतात, ‘‘सुदैवाने मला चांगली कौटुंबिक पाश्र्वभूमी लाभली. माझी आई साहित्यात डॉक्टरेट आहे. वडिलांचा जाहिरात व्यवसाय. आमच्याकडे विविध वर्तमानपत्रे, मासिके यांचा राबता असायचा. त्यामुळे आपोआपच वाचनाची गोडी लागली. माझं शिक्षण गिरगावातील हिंद विद्यालय हायस्कूलमध्ये झालं. त्या शाळेत एस. वाय. गोडबोले सर, तांबे सर यांच्यासारखे सेवाभावी शिक्षक मला लाभले, तर माई उर्सेकरांसारख्या प्रेमळ आजी जवळच होत्या. माई सुट्टीत आमच्याकडून भगवद्गीता, संस्कृत सुभाषिते पाठ करून घेत. त्यामुळे वाणी शुद्ध झाली. त्या विविध विषयांवर निबंधही लिहून घेत. त्यामुळे भाषेचे चांगले संस्कार झाले.’’ प्रतिभाताईंचं बालपण गिरगावात गेल्यामुळे ब्राह्मणसभेत होणाऱ्या विविध व्याख्यानांना आईवडील त्यांना घेऊन जात. तेथील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्यामुळे सामाजिक, राजकीय विषयांचे वाचन करायची सवय लागली. हे सारे सहजच घडत गेले. मुद्दाम काही करावे लागले नाही. सभोवतालच्या या वातावरणामुळे विचारांची बैठक संस्कारक्षम वयातच पक्की झाली. १९६५ सालच्या पाकिस्तान व १९७१ सालच्या बांगलादेश युद्धाचं वातावरण अनुभवल्यामुळे देशभक्तीही आपोआपच रुजली. प्रतिभाताईंच्या मते संस्कार ही बारा महिने चोवीस तास घडण्याची गोष्ट आहे. पंधरा दिवसांच्या शिबिरात पैसे घेऊन विकत घेण्याची ही गोष्ट नाही.
एलफिन्स्टन कॉलेजमधून इंटर सायन्स व नंतर इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून केमिस्ट्री विषय घेऊन बी.एस्सी. झाल्यावर काही तरी वेगळं करावं या ऊर्मीतून आणि वाचनाची आत्यंतिक आवड असल्यामुळे प्रतिभाताईंनी बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स (बी.लिब्.) हा एक वर्षांचा कोर्स पूर्ण केला. त्यांच्या करिअरची सुरुवात TIFR (Tata Institute of Fundamental Research) यासारख्या नामांकित संस्थेमधून झाली. तिथे प्रोफेशनल असिस्टन्ट म्हणून काम करताना डॉ. जयंत नारळीकर, डॉ. एम.जी.के. मेनन, डॉ. दिवाकरन, नुकतेच पद्मभूषण मिळालेले डॉ. चित्रे यांसारख्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांची कार्यशैली जवळून पाहायची संधी मिळाली. प्रतिभाताई नॉस्टॅलजिक होऊन सांगतात, ‘‘त्या वेळी भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता. टी.आय.एफ.आर.मधील शास्त्रज्ञांचा त्यात सहभाग होता. या थोर शास्त्रज्ञांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, त्यांच्या वागण्यातली ऋजुता, सर्वाबद्दल असलेली आत्मीयता, समजून घेण्याची वृत्ती करिअरच्या सुरुवातीलाच मला अनुभवायला मिळाली. त्यांची आदरणीय वागणूक पाहून अक्षरश: भारावून जायला होत असे. ज्ञानलालसा म्हणजे काय हे कळले. या सर्वाचा माझ्या पुढील आयुष्यावर, करिअरवर खोलवर परिणाम झाला.’’
इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या अशोक गोखलेंशी लग्न झाल्यावर प्रतिभाताई ठाण्याला राहायला गेल्या. तेव्हा कोपरखैरणे येथे असलेल्या आय.सी.आय. या बहुराष्ट्रीय ब्रिटिश केमिकल कंपनीच्या अल्केमी रिसर्च सेंटर येथे काम करण्याची चांगली संधी चालून आली. येथे प्रमुख ग्रंथपाल म्हणून काम करताना केमिकल टेक्नॉलॉजीशी संबंधित पुस्तकांच्या एका स्पेशल लायब्ररीची मुळापासून उभारणी करण्याची जबाबदारी स्वतंत्रपणे त्यांच्यावर होती. जगभरातून येथे संशोधनासाठी शास्त्रज्ञांची नेमणूक होत असे. भारतातील शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक मिळालेले शास्त्रज्ञ किंवा परदेशातून आलेल्या, नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञांबरोबर काम केलेल्या दिग्गजांना लागणारी मायक्रो लेव्हलची माहिती काढून देण्याचे आव्हानात्मक काम करायची संधी मिळाली. त्या वेळी डीएनए फिंगर प्रिंटिंग, जेनेटिक अ‍ॅनॅलेसिस ऑफ कम्पाऊंडस ही नवी क्षेत्रे विकसित होत होती. शास्त्रज्ञांनी फाइल केलेली पेटंट, त्यामधील अचूकता या सर्वाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रचंड आत्मविश्वास मिळाला. येथे काम करतानाच प्रतिभाताईंनी मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स (एम.लिब.) ही पदवी घेतली.
मुलगा अमित व मुलगी अनुराधा शाळेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना प्रतिभाताईंनी १९९२ साली ही नोकरी सोडून करिअरमध्ये ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी तेव्हाचे मुंबई विद्यापीठाचे प्रमुख ग्रंथपाल अरविंद टिकेकर यांच्या सांगण्यावरून प्रतिभाताईंनी मुंबई विद्यापीठात लायब्ररी सायन्सच्या कोर्सला व्हिझिटिंग लेक्चरर म्हणून शिकवायला सुरुवात केली. शिकविण्याची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी पूर्णवेळ व्याख्याता म्हणून काम करायचे ठरविले व पहिल्याच प्रयत्नात त्या नेट (NET) परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर मुंबई विद्यापीठात लायब्ररी सायन्सच्या पूर्णवेळ व्याख्यात्या म्हणून त्या रुजू झाल्या. मुंबई विद्यापीठात काम करीत असल्यामुळे आपल्या विषयातील उच्चतम शिक्षण घ्यावे, असे प्रतिभाताईंना वाटले व त्यांनी पीएच.डी. करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ‘ग्रे लिटरेचर’ हा फारसा न हाताळलेला विषय निवडला व २००१ साली पीएच.डी. प्राप्त केली.
‘ग्रे लिटरेचर’ म्हणजे अपारंपरिक साहित्य जे सहजासहजी उपलब्ध नसते. यामध्ये विविध संस्थांचे अहवाल, स्मरणिका, अनेक संशोधनपर निबंध, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वाचले जाणारे अप्रकाशित पेपर्स, पेटंट्स या सर्वाचा समावेश होतो. सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांना अद्ययावत, नेमकी व अचूक माहिती मिळविणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारच्या साहित्याचा आय.सी.आय.मध्ये असताना परिचय झाला होता. त्यामुळे मूलभूत संशोधनासाठी या साहित्याची असलेली उपयुक्तता प्रतिभाताईंना माहीत होती. ग्रे लिटरेचरसाठी प्रत्येक क्षेत्रातील एक प्रातिनिधिक स्वरूपाची लायब्ररी त्यांनी निवडली. या विषयाच्या प्रबंधात ‘How to organize grey literature in liabraries’ हे एक मॉडेल त्यांनी दिले आहे. परदेशात ग्रे लिटरेचरविषयी खूपच जागरूकता आहे. त्यामुळे हे काम करत असतानाच युरोपातील लेक्झमबर्ग येथे आयोजित केलेल्या ग्रे लिटरेचरसंबंधित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्याची संधी प्रतिभाताईंना मिळाली. ही परिषद युरोपीयन इकॉनॉमिक कमिशनने प्रायोजित केली होती.
प्रतिभाताईंना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘इंडियन लायब्ररी असोसिएशन’तर्फे दरवर्षी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील परिषदा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये शोधनिबंधही मागविण्यात येतात. बंगळुरू येथे २००३ साली भरलेल्या परिषदेमध्ये उत्कृष्ट शोधनिबंध सादर केल्याबद्दल सी. डी. शर्मा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, तसेच बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या कुटुंबातील महाराणी पार्वतीदेवी भोसले यांच्या नावे ग्रंथालयशास्त्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल सावंतवाडी येथे देण्यात येणारा राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
पुस्तकप्रेमी असल्यामुळे पर्यटनाला जाताना देश-विदेशातील ग्रंथालये पाहणे हा प्रतिभाताईंचा आवडीचा कार्यक्रम. यामध्ये अमेरिकेतील लायब्ररी ऑफ काँग्रेस, मिशिगन व इतर विद्यापीठांची ग्रंथालये, लंडनमधील ब्रिटिश लायब्ररी, तसेच सिंगापूर व काही आखाती देश येथील ग्रंथालयांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रतिभाताई म्हणतात, ‘‘पर्यटक म्हणून आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा तेथील प्रमुख ग्रंथालयांना आवर्जून भेट द्यावी. तो एक प्रसन्न अनुभव असतो. तेथील ग्रंथालयात पारंपरिक व आधुनिक पद्धती (इलेक्ट्रॉनिक)चा समांतर उपयोग केला जातो. सिंगापूरला सार्वजनिक ग्रंथालयाची दहा मजली इमारत मी पाहिली आहे. येथे एखाद्या लहानशा स्थानिक ग्रंथालयातही लहान मुलांचा विभाग असतो. तिथे दीड वर्षांच्या मुलालादेखील ग्रंथालयाचे सदस्यत्व मिळते. मुले आनंदाने बागडत पुस्तके हाताळत असतात. आधुनिक जीवनपद्धतीचा विचार करताना अपरिहार्यपणे आपण पाश्चात्त्य देशांशी तुलना करतो. तेथील आधुनिक राहणी, विचारसरणी, व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक या गोष्टींचा आपल्या समाजात सहजपणे शिरकाव होतो, पण तिथे ग्रंथालयांना दिले जाणारे महत्त्व, अपार ज्ञानलालसा भागविणारी ग्रंथसंपदा, त्यासाठी असलेली सुसज्ज यंत्रणा व त्यांचा उपयोग करून घेणारा वाचकवर्ग या गोष्टींकडे आपण सोयीस्कररीत्या डोळेझाक करतो. इंटरनेटच्या युगातसुद्धा पुस्तकांवर प्रेम करणारे लाखो वाचक तेथे आहेत.’’ प्रतिभाताई सध्या १२५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी ग्रंथपाल म्हणून जबाबदारी पार पाडीत आहेत. कालिना संकुल व फोर्ट अशा दोन ठिकाणी हे ग्रंथालय विभागले आहे. विद्यापीठाच्या दोन्ही ग्रंथालयांत मिळून आठ लाखांहून अधिक विविध भाषांमधील, विविध विषयांवरील पुस्तके, दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते आहेत. लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या ‘गीता रहस्य’च्या मराठी, हिंदी, गुजराती व कन्नड भाषेतील प्रती, याशिवाय रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, गोपाळकृष्ण गोखले यांच्या हस्ताक्षरातील मूळ पत्रे येथे पाहावयास मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रे, छायाचित्रे, वह्य़ा यांच्या इंग्लंडमधील वास्तव्यातील लायब्ररीचे कार्डदेखील आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गाजलेली भाषणे उपलब्ध आहेत. या ठिकाणी भूर्जपत्रे, ताम्रपत्रांपासून ते अलीकडची ई-जर्नल्सही उपलब्ध आहेत. ग्रंथालयाची सदस्य-संख्याही १० हजारहून अधिक आहे. प्रथितयश लेखक, कवी, वयाची सत्तरी पार केलेले तरीही संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले संशोधक, तसेच परदेशातूनही अभ्यासक ग्रंथालयात नेहमी येतात. त्यांना हवे असलेले साहित्य कमी वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून आपले श्रम कारणी लागल्याचा आनंद होतो. या समृद्ध परंपरा लाभलेल्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल असणे ही तारेवरची कसरत असली तरी ते एक वेगळे आव्हान आहे. त्यामुळे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना भेटणाऱ्या मोजक्या लोकांत प्रतिभाताईंचा समावेश व्हावा ही अभिमानाची गोष्ट आहे.
या क्षेत्रातील संधींविषयी बोलताना प्रतिभाताई म्हणाल्या की, ‘‘लायब्ररी सायन्स या क्षेत्राला ग्लॅमर नसले तरी हे एक आव्हानात्मक आणि आत्यंतिक समाधान देणारे क्षेत्र आहे. माहिती युग म्हणून ओळख असलेल्या एकविसाव्या शतकात शाळा-कॉलेजेस, सरकारी कार्यालये याबरोबरच कॉर्पोरेट्स, बँकिंग, फायनान्स या क्षेत्रांतही ग्रंथालय संस्कृती विकसित होत आहे. त्यामुळे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. सध्या ग्रंथालयांची संक्रमणावस्था सुरू आहे. प्रिंटकडून डिजिटलकडे वाटचाल सुरू आहे. इंटरनेटमधून सर्व माहिती मिळते हे एक मिथक आहे. इंटरनेट हे प्रवाही व तरल माध्यम आहे. त्यातून मिळणारी माहिती शाश्वत असेलच असे नाही. त्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहावी लागते. सखोल संशोधनाला पुस्तकांशिवाय पर्याय नाही. ग्रंथालयांचे व्यवस्थापन हे स्वतंत्र परिपूर्ण शास्त्र आहे. आपल्या देशात पारंपरिक ज्ञान, ग्रंथ, हस्तलिखितांच्या रूपात प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचे डिजिटलायझेशन करणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी हा ठेवा जपून ठेवला पाहिजे. त्यासाठी सूत्रबद्ध योजना आखण्याची गरज आहे.’’
पाश्चात्त्य देशात हॅरी पॉटरच्या पुस्तकाच्या लाखो प्रती एका दिवसात हातोहात का संपतात? पुस्तक मेळाव्यांना अजूनही अलोट गर्दी का लोटते? विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जानिर्मिती, पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील त्यांनी घेतलेली झेप विलक्षण आहे. याचे एक महत्त्वाचे कारण तेथील समाजजीवनाचे महत्त्वाचे अंग असलेले समृद्ध ग्रंथालयविश्व तर नसेल? त्यांची मॉल संस्कृती जर आपण स्वीकारीत असू तर जागोजागी उभ्या राहणाऱ्या मॉलना परवानगी देताना प्रत्येक मॉलमधला एखादा छोटासा कोपरा ग्रंथालयासाठी राखून ठेवायला काय हरकत आहे?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो