आरोग्यम् : धोके गर्भारपणातले
मुखपृष्ठ >> आरोग्यम् >> आरोग्यम् : धोके गर्भारपणातले
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आरोग्यम् : धोके गर्भारपणातले Bookmark and Share Print E-mail

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

बाळंतपण हे प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. बाळाच्या आणि तिच्या स्वत:च्या देखील. म्हणूनच या काळातील संभाव्य धोक्याबद्दल आणि घ्यायच्या काळजीबद्दल.
लक्ष्मीबाई आपल्या गरोदर सुनेच्या अंगावर, हाता-पायांवर आलेल्या सुजेने काळजीत होती. साधारणत: २० टक्के गर्भवती महिलांच्या हाता-पायांवर सूज येते. परंतु तीनही लक्षणे- जसे की अंगावर सूज, लघवीमध्ये अल्बुमिन नावाचे प्रथिम जाणे (जे केवळ तपासणीतून कळते) आणि  रक्तदाब वाढणे, असे दिसले तर त्याला ‘प्रिअॅकलेमसिया’ असे म्हणतात. हे सात ते दहा टक्के महिलांमध्ये दिसून येते. या विकाराचा परिणाम गर्भवती महिलेवर व होणाऱ्या बाळावरही दिसतो. आईचे यकृत, मेंदू, मूत्रपिंडे व रक्ताचे घटक यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे बाळाची वाढ खुंटू शकते.
‘प्रिअॅकलेमसिया’वर वेळेत इलाज झाला नाही तर त्या गर्भवती महिलेला आकडी येऊ शकते. त्यामुळे बाळ व माता दोघांच्याही जिवाला धोका संभवतो.
हे टाळता येईल का?
प्रत्येक तपासणीच्या वेळी मातेच्या लघवीची तपासणी (अल्बुमिनकरिता), रक्तदाब तपासणी, हाता-पायांवर अंगावर सूज आहे का पाहणे, तिचे वजन करणे, ते एकदम वाढले आहे का ते पाहणे. त्यामुळे ‘प्रिअॅकलेमसिया’ चे निदान अगदी सुरुवातीच्या पातळीवर होऊ शकते व आवश्यक उपचारही सुरू होतो.
वैद्यकीय सल्ल्यानुसार, रक्तदाबाची औषधे, वेळोवेळी ठराविक रक्त तपासण्या, गर्भातील बाळाच्या आरोग्याबद्दल माहिती देणाऱ्या एन. एस. टी.सारख्या तपासण्या, पूर्वनियोजनाने योग्य रीतीने प्रसूती हे उपाय करता येतात.
जर का आधीच्या गरोदरपणात रक्तदाब वाढला असेल, लघवीत अॅल्बुमिन जात असेल, आकडी आली असेल, मूल पोटात दगावले असेल तर त्याबद्दल माहिती- डॉक्टरांना आवर्जून द्यावी. पूर्वीची सर्व वैद्यकीय कागदपत्रे डॉक्टरांना दाखवावीत म्हणजे डॉक्टर काही चाचण्या करण्याचा सल्ला देतील व औषधे चालू करतील.
काही गर्भवती मातांना, गर्भधारणेचा मधुमेह होतो. म्हणजे आधी कधीही नसताना ही व्याधी गरोदरपणात चौथ्या-पाचव्या महिन्यात उद्भवते.
गर्भधारणेचा मधुमेह कोणता होतो? तो कोणामध्ये असण्याची शक्यता पडताळावी? कुटुंबामध्ये आई-वडील, भाऊ-बहीण यांना मधुमेह असणे,अनेकदा मूल पोटात दगावणे, मूल जन्मत:च सदोष जन्मणे, मूल खूप अधिक वजनाचे जन्मणे, गर्भजलाचे प्रमाण खूप अधिक असणे वगैरे म्हणजे आईचा मधुमेहाचा पिंड असण्याचे संकेत आहेत.
अशा महिलांचे पाचव्या-सहाव्या महिन्यात रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते. जर ती पातळी अधिक असेल तर महिलेला खास आहार सुचविला जातो. अथवा इंन्सुलिनच्या इंजेक्शनांचीही गरज भासू शकते.
इन्सुलीन घेणे हल्ली खूप सोपे झाले आहे. टी. व्ही.वर पाकिस्तानी क्रिकेटपटू वासिम अक्रमची जाहिरात पाहिलीच असेल!
‘प्री-फिल्ड’ (आधीच औषध भरलेले) पेनसारखे इंजेक्शन आणि घरच्या-घरी रक्त तपासणीचे छोटेसे मशीन यांनी मधुमेहाचे नियंत्रण सहजपणे करता येते.
जसे ‘प्रिअॅकलेमसिया असलेल्या मातेची एन. एस. टी. केली जाते तसेच मधुमेह असणाऱ्या मातेचीसुद्धा एन.एस.टी. करून बाळाच्या स्थितीचा अंदाज घेतला जातो.
एन. एस.टी. म्हणजे नेमके काय?
एन.एस.टी. म्हणजे नोन स्ट्रेस टेस्ट- जसे आपला कार्डियोग्राम (इ.सी.जी) केल्याने रुग्णाच्या हृदयाची स्थिती कळते तसे एन.एस.टी.ने गर्भातील बाळाची स्थिती समजते. म्हणजे गर्भाच्या हृदयाच्या ठोक्याची तपासणी जेव्हा बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसतो, वारेचे काही विकार उद्भवतात तेव्हा एन.एस.टी. केली जाते. गरोदरपणी उच्चरक्तदाब व मधुमेह असणाऱ्या महिलांची एन.एस.टी. बऱ्याच वेळा करावी लागते. कारण या दोन्ही रोगांमुळे बाळाला रक्तपुरवठा कमी होण्याची शक्यता जास्त असते.
आपण जसे जोरात चाललो तर आपले हृदयाचे ठोके वाढतात त्याचप्रमाणे बाळ पोटात हलले म्हणजे सुद्धा ठोके वाढतात. या तपासणीत बाळाची हालचाल आणि ठोक्यावरील परिणाम यांचे मोजमापन करून पुढची उपचार पद्धती ठरते.
ही तपासणी सर्व दवाखान्यात होतेच असे नाही. सार्वजनिक दवाखान्यात याचा खर्च जुजबी असतो. खाजगी रुग्णालयात ५००-७०० रुपयांपर्यंत खर्च येतो.
गरोदरपणी कोणते व्यायाम करावेत?
व्यायामाची गरज असते का?
ते सुरक्षित आहे का?
व्यायामाची गरज ही सर्वानाच असते. व्यायामाने आपले स्नायू व सांधे मजबूत होतात. श्वसनक्रियेची क्षमता वाढते व रक्ताभिसरण सुधारते हे सर्व गरोदरपणात आवश्यक असतेच- म्हणजे व्यायाम आवश्यक असतो.
मांडय़ांचे व पेरीनियमचे स्नायू लवचिक करणारे व्यायाम त्यापैकी सर्वात सोपा म्हणजे पायाच्या तळव्याला तळवा जोडून बसणे व तळवे स्वत:कडे ओढून घेणे. हा सोपा व्यायाम बाळंतपण सोपे करू शकतो.
श्वसनाचे व्यायाम व खोल श्वास घेतल्याने प्राणवायूचा पुरवठा सुधारतो व प्रसूतीच्या वेळी मातेची दमछाक होत नाही.  चांगल्या थेरपिस्टकडून श्वसनाचे व स्नायूंचे व्यायाम शिकणे फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपली बसण्याची, उभे राहण्याची पद्धत सुधारते (पोश्चर). कंबरदुखीही टाळता येते. चालण्याचा व्यायाम केव्हाही चांगलाच, मात्र चांगल्या चपला किंवा बूट घालून सपाट जमिनीवर चालावे.
सर्वच गर्भवती महिला व्यायाम करू शकतील असे नाही. काही महिलांना (प्रिअॅकलेमसिया) आराम करणे सुचविलेले असते. कधी रक्तदाब खूप वाढला तर बेडरेस्टची गरजही भासू शकते. म्हणून प्रसूतीतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच व्यायाम प्रकार निवडावेत व थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली करावेत.
गरोदर महिलेच्या मनात डोकावणारा प्रश्न, या अवस्थेत शरीरसंबंध ठेवता येतात का?
हा प्रश्न मनात असला तरी विचारायला भीड वाटते. भीती वाटत राहते की गर्भपात किंवा रक्तस्राव होईल!
गर्भपात शरीरसंबंधाने नाही तर (क्रोमोसोमल, जनेटीक) गर्भातील दोषांमुळे होतो. संबंध ठेवण्यामध्ये मुख्य प्रश्न महिलेच्या अवघडलेल्या शारीरिक स्थितीचा असतो. जर संबंध ठेवणे अवघड नसेल तर काहीच हरकत नाही.
परंतु जर रक्तस्राव झाला असेल, गर्भाशयाचे तोंड कमकुवत असेल, वार (प्लेसेन्टा) खाली असेल, अपूर्ण महिन्यात कधी कळा आल्या असतील तर शारीरिक संबंध टाळावेत.
गरोदरपणातील धोक्याची लक्षणे :
ही धोक्याची लक्षणे गरोदर महिलेला, तिच्या जोडादाराला, तिच्या नातेवाईकांना माहीत असणे आवश्यक आहे.
पहिले तीन महिने गर्भारोपण, अवयवांचे बनणे व वाढ, शारीरिक घडण या दृष्टीने महत्त्वाचे असतात. अशा वेळी रक्तस्राव होणे, अत्यंत मळमळ होत राहून उलटय़ा होत राहणे, वारंवार घेरी येणे- ही धोक्याची लक्षणे होत. ओटीपोटात तीव्र वेदना होणे हे गर्भनलिकेत गर्भ राहिल्याचे (एक्टोपिक प्रेगनसी) लक्षण असू शकते.
गरोदर अवस्थेतील पुढील सहा महिन्यांत धोक्याची लक्षणे :
वजन न वाढणे किंवा जास्त वजन वाढणे धोका दर्शवितात. गर्भवतीचे पहिल्या तीन महिन्यांत वजन वाढत नाही. सहा महिन्यांपर्यंत तीन ते चार किलो (प्रत्येक महिन्याला एक किलो) वाढते. सातव्या व आठव्या महिन्यात महिन्याला दोन किलो व शेवटच्या महिन्यात आठवडय़ाला एक किलो इतके वाढू शकते, म्हणजे तीन-चार किलो. गरोदरपणात एकूण आठ ते बारा किलो वजन वाढते.
अंगावर सूज आली तर वजन एकदम वाढते आणि जास्त वाढते याबरोबरच तीव्र डोकेदुखी, डोळ्यासमोर अंधारी येणे (रक्तदाब वाढल्याने) ही ‘प्रिअॅकलेमसिया’ची लक्षणे असू शकतात.
अचानक पातळ लघवीसारखे पाणी अंगावर जाणे, न दुखता अचानक खूप रक्तस्राव होणे, नऊ महिने झाले नसताना अवेळी अंगावर चिकट पाणी जाऊन पोटात दुखणे (प्रिमेच्युअर लेबर) अवेळी प्रसूतीची लक्षणे असू शकतात. यापैकी काहीही झाल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कळाविरहित बाळंतपण (पेनलेस डिलीवरी) हा काय प्रकार आहे? वेदनाविरहित प्रसूती व्हावी असे कोणत्या मातेला वाटणार नाही?
याला एपिडय़ुरल अॅनाल्जेसिया असे म्हणतात. हे वेदनाशामक औषध गोळी-इंजेक्शनने दिले जात नाही, तर पाठीच्या मणक्यांमधून एकप्रकारची पातळ नळी घालून त्यातून दिले जाते. याचा परिणाम प्रसूतीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक तास असतो. हल्ली अनेक रुग्णालयांतून ही सोय उपलब्ध असते.
तरीही हा सर्रास वापरला जात नाही; का? या पूर्ण बाळंतपणाच्या प्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ व स्त्री रोगतज्ज्ञांनी सतत तिथे असणे आवश्यक होऊन बसते. शिवाय त्या महिलेला कळा जाणवत नसल्याने ती बाळंत होण्यासाठी जोर करू शकत नाही. जर वेळीच पावले उचलली नाहीत तर बाळ पोटात गुदमरू शकते.
आधीच्या बाळंतपणात सिझेरियन शस्त्रक्रिया झाली असल्यास -
सिझेरियन शस्त्रक्रिया अनेक कारणांसाठी होतात. खासगी प्रॅक्टिसमध्ये प्रमाण ४० टक्के तर सार्वजनिक रुग्णालयात हे प्रमाण २०-२५ टक्के आहे.
एकदा सिझर झाले तर पुढच्या खेपेला पण सिझर होण्याची शक्यता खूप जास्त असते. पण ते अपरिहार्य नाही. कोणत्या कारणांसाठी पहिल्या वेळेला सिझर झाले होते. यावेळी बाळ मातेची स्थिती कशी आहे, त्यानुसार आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
बाळंतपणाची रजा :
बाळ-बाळंतीण जितका वेळ एकत्र राहतील तितके त्या दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. त्यामुळे गृहिणींनी आपल्या कामातून स्वत:ला थोडं बाहेर काढावं आणि नोकरदार स्त्रियांनी रजाच घ्यावी.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो