स्त्री समर्थ : आखाती देशात मराठी उद्योगिनी
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : आखाती देशात मराठी उद्योगिनी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : आखाती देशात मराठी उद्योगिनी Bookmark and Share Print E-mail

प्रवीण  प्रधान ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वस्त्रोद्योगाशी संबंधित काम करताना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. मराठी बाणा परदेशातही दाखवला व आखाती देशात ‘दुपट्टा क्वीन ’अशी ओळख मिळवली. आज त्यांच्याकडे सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशाचा बिझनेस व्हिसा आहे. व्यवसायाची उलाढाल काही कोटीं रुपयांवर गेली आहे. अशा अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या यशस्वी उद्योजिका
रेखा कारखानीस यांच्याविषयी..
‘‘भारतीय स्त्री, ती पण मराठी ? .. आयात-निर्यातीचा व्यवसाय करते. करेल ५-६ वर्ष व्यवसाय आणि मग करेल बंद तो व्यवसाय’’ अशी टीपण्णी काही पुरुष व्यावसायिकांकडून मिळालेल्या रेखा कारखानीस यांनी अशा टीकांकडे नेहमीच दुर्लक्ष करत आपल्या कामावरची निष्ठा जोपासली. ग्राहकांना काहीतरी नवीन द्यायचं, त्यासाठी ग्राहकांच्या पसंतीची नाडी अचूक ओळखण्यात त्या यशस्वी ठरल्या. बहुदा म्हणूनच त्यांना आखाती देशांत वस्त्रोद्योग करणारी एकमेव महिला व्यावसायिक हा बहुमान मिळालाय. यांच्याकडे आज सौदी अरेबियासारख्या श्रीमंत पण कट्टर पुरुषप्रधान देशातील ‘बिझनेस व्हिसा’ आहे. विशेष म्हणजे असा व्हिसा मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.
 रेखा यांनी १९९४ साली ‘विजयश्री एंटरप्रायझेस’ या कंपनीची स्थापना केली. या मार्फत त्यांनी आखाती व इस्लामी देशात कॉटन, रेयॉन, सिल्क, सिथेंटिक या मटेरियलचे आकर्षक डिझाइन्सचे दुपट्टे निर्यात करायला सुरूवात केली. जिद्द, मेहनत व ग्राहकसंपर्क यांमुळे  ‘विजयश्री एंटरप्रायझेस’चा व्यवसाय वाढू लागला. म्हणूनच आज रेखा कारखानीस तेथील व्यावसायिक क्षेत्रात आज ‘दुपट्टा क्वीन’ म्हणून ओळखल्या जातात!
विशेष म्हणजे केवळ अनुभव व ग्राहकांच्या आवडीनिवडीची उत्तम पारख ,फॅशन व्यवसायातील नवनवे डिझाइन्स व तंत्रज्ञान या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करत त्यांनी व्यवस्थापनाचा आदर्श वस्तुपाठच घालत जागतिक स्तरावर झेप घेतली.
रेखा यांचे बालपण व शिक्षण दादरमधे झाले. त्या पक्क्य़ा मुंबईकर. कोणतीही व्यावसायिक कौटुंबिक पाश्र्वभूमी नसलेल्या घरातल्या. ‘विजयश्री’ची स्थापना करण्यापूर्वी रेखा एका कपडे आयात-निर्यात करणाऱ्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या. ही कंपनी कापडाच्या कच्च्या मालापासून पॅकिंगपर्यंत सारे एकाच छताखाली तयार करून निर्यात करत असे. त्यामुळे पूर्व व पश्चिम आफ्रिकन देशांतील ग्राहकांशी रेखा यांचे १९८३ पासून अतिशय चांगले संबंध जुळले.
याच ठिकाणी फातिमा नावाची एक आफ्रिकन महिला भेटली. तिला भारतातल्या एका पार्टनरची गरज होती. त्यांनी रेखा यांना विचारले. एक वेगळा अनुभव म्हणून रेखा यांनी फातिमाची ऑर्डर पूर्ण करून दिली आणि त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास आला. त्यांची व्यावसायिक बांधीलकी अशी की ही नोकरी व स्वतंत्र व्यवसाय एकत्र सांभाळत असतानाच त्यांनी आपल्या कंपनीला सलग ९ वर्ष ‘मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स’चा पुरस्कार मिळवून दिला होता.
त्या सांगतात, ‘‘२००४ मध्ये मी नोकरी सोडली. पण २००० सालापासूनच चीनने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील जवळपास सर्वच उत्पादनांवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे व्यावसायिक समीकरणे बदलली. अखेरीस मी दुबई, सौदी अरेबिया, इराण तसेच मोरोक्को या देशांमधील क्लायंटना संपर्क साधत स्वतच या व्यवसायात उतरणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर पुढे जाऊन आमचे दुपट्टा, स्कार्फ्स, ड्रेस मटेरियल्स त्या देशात जाऊन विकले. त्यामुळे आमच्याबद्दलची विश्वासार्हता वाढली.’
नवनवीन पोशाखांची, पेहेरावांची रचना (डिझाइन) करताना रेखा यांनी जागतिक स्तरावरील  ट्रेंडस् लक्षात घेऊन भारतीय कापडाचे आकर्षक दुपट्टे व साडय़ा बनविल्या. यासाठी रेखा व्यवसायाच्या निमित्ताने सौदी अरेबिया, दुबई, इथिओपिया, घाना, आयव्हरी कोस्ट, नैरोबी, लागोस आदी देशांच्या दौऱ्यावर असतात, तिथल्या महिलांच्या आवडीचा तसेच पेहेरावाचा अभ्यास करतात आणि दुपट्टे व साडय़ांचे डिझाइन करतात. या कामामध्ये त्यांचा मुलगा शशिकांत आता त्यांच्या मदतीला असतो.
आपला व्यवसाय वाढावा यासाठी रेखा व शशिकांत तिथल्या लोकांच्या रुचीप्रमाणे रंगसंगती व डिझाइन निवडतात. तिथल्या ग्राहकांना पसंत पडतील असे विविध प्रकारचे दुपट्टे, गाऊन, स्कार्फ, आफ्रिकन साडय़ा डिझाइन व पॅटर्न लक्षपूर्वक तयार केले आहेत. साहजिकच त्यांच्या उत्पादनांना सतत मागणी असते.  आफ्रिकन स्त्रियांनाही साडय़ा आवडतात पण त्यांच्या धिप्पाड शरीरयष्टीला लागणाऱ्या जास्त रुंदीच्या साडय़ा त्यांनी तयार केल्या असून त्या त्यांचं वैशिष्टय़ ठरले आहे. आज आफ्रिकन साडय़ांना जवळजवळ २५ हून अधिक आफ्रिकन देशातून प्रचंड मागणी आहे. या वैशिष्टय़पूर्ण साडय़ा भारतातून सौदी अरेबिया व तेथून घाऊक व किरकोळ पद्धतीने आफ्रिकेत पाठवणारी ‘विजयश्री एंटरप्रायझेस’ ही एकमेव कंपनी आहे.
अर्थात आजवरचा हा प्रवास सहजसोपा नाहीच. या प्रवासात त्यांनाही बरेवाईट अनुभव आले. त्या सांगतात, ‘‘एकदा दुपट्टय़ांची खूप मोठी ऑर्डर शिपमेंटसाठी तयार झाली आणि आयत्यावेळी सौदीमधील त्या ग्राहकाने ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला. थातुरमातुर कारणं दिली -लेट झाली ऑर्डर, पॅकींग नीट नसतं वगैरे.. मी शांत राहिले आणि शोधाशोध करुन त्याच बाजारपेठेतील दुसरा ग्राहक शोधून त्याला माल विकला. हे त्यावेळी जमले नसते तर मोठे नुकसान झाले  असते. यातून एक मोठा धडा शिकले अगदी काही हजार रुपयांची ऑर्डरसुद्धा अ‍ॅडव्हान्स न घेता स्वीकारायची नाही.’’ रेखा सांगतात.
सौदीमध्ये सर्व वस्तू जगभरातून आयात होतात. कापडाचे उत्पादन तर तिथे आजिबात होत नाही. त्यामुळे तेथे बाहेरच्या कापडाची खासकरून भारतीय कापडाची फार क्रेझ आहे. त्यामुळे रेखा यांना  ग्राहकांना माल विकताना फार अडचणी येत नाहीत. फक्त नव्या डिझाईन्स व ट्रेन्ड यांकडे फार लक्ष ठेवावे लागते, असे त्या सांगतात. भारतीय खासकरून मुंबईतील लोकांना तिथे अतिशय मान आहे. कारण भारतीय फार प्रामाणिक असतात. जे सॅम्पल पाठवतो तसाच मालही असतो, याची त्यांना खात्री असते. त्याचा फायदा रेखा यांना झाला आहेच. परंतु त्यांनीही आपल्या  व्यवसायाला आधुनिकतेचा स्पर्श दिला आहे. फॅशन डिझाइनिंग (उदा. स्टायलिंग, ग्राफिक डिझाइन), फॅशन कम्युनिकेशन (उदा. ग्राहक संपर्क, दृश्य विक्री), अ‍ॅपरेल प्रॉडक्शन (विविध पेहेरावांचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार उत्पादन) या फॅशन टेक्नॉलॉजीतील तंत्रांचा त्या चांगला वापर करत आहेत. आता शशिकांतने सौदी अरेबियामध्ये घाऊक मालाचे दुकान सुरू केले असून ‘विजयश्री’चे स्वतंत्र कार्यालयही सुरू केले आहे. त्यामुळे क्लायंटसह थेट व्यवहार करता येतो.
मुस्लीम सणांच्या काळात मक्का व मदिना या धार्मिक स्थळांना जगभरातील मुस्लीमधर्मीय लाखोंच्या संख्येने भेट देतात. त्यामुळे ‘विजयश्री एंटरप्रायझेस’ची उत्पादने जेद्दाह येथून त्या दोन्ही ठिकाणी जातात. एकूण सर्व उत्पादनांचा दर्जा इतका उत्कृष्ट असतो की, रेखाताईंच्या  व्यवसायाबद्दल हेटाळणीपर वक्तव्ये करणारे पुरुष व्यावसायिक स्पर्धक आता त्यांच्या डिझाइनची बिनदिक्कत नक्कल करतात!
त्यांच्या या योगदानाबद्दल केंद्र व राज्य सरकारने त्यांना पुरस्काराच्या रूपाने सन्मानित केले आहे. त्यांना २००८ सालचा महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्सचा ‘कर्तबगार महिला निर्यातदार’ हा पुरस्कार मिळाला असून २०१० सालचा ‘उद्योगश्री’ पुरस्कारही मिळाला आहे. २०११ सालच्या ‘मुंबई मेयर्स अ‍ॅवॉर्ड फॉर टेक्स्टाइल एक्स्पोर्ट फिल्ड’ अर्थात राजीव गांधी सन्मान मिळण्याचे भाग्यही त्यांना लाभले आहे.
प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर रेखा कारखानीस यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे.
रेखा म्हणतात,‘‘आजच्या तरुणांनी शिक्षण घेऊन फक्त नोकरीच्या चक्रात न अडकता स्वतचा व्यवसाय करण्याची मानसिकता स्वतमध्ये घडवणे फार गरजेचे आहे.’’
भविष्यात आपल्या ब्रंॅडचे प्रशस्त शोरूम स्थापन करून त्यांच्या परदेशातील प्रसिद्ध शहरांमध्ये शाखा काढण्याचा रेखा यांचा मानस आहे.
भारतातील मराठी भाषिक व्यावसायिकांना परदेशी व्यापारपेठ मिळवून देण्यासाठी रेखा कारखानीस यांनी अलीकडेच ‘मल्हार एक्स्पोर्टस् प्रा. लि.’ या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीद्वारे भारतातून थेट अमेरिका, युरोप, पूर्व व पश्चिम आशियाई देशांमध्ये मशिनरीपासून ते खाद्यपदार्थ उत्पादने कंटनेरमधून निर्यात केली जाणार आहेत. गेले  वर्षभर या व्यवसायाचा अभ्यास करून निर्यात जाणकार व्यावसायिकांची नेमणूक करण्यात आली आहे.
रेखा याचं लक्ष्य स्पष्ट आहे आणि सावध वाटचाल हा त्यांचा फंडा आहे. म्हणूनच आकाशाच्या उंचीकडे झेपावणाऱ्या रेखा यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो