गोष्टी भावभावनांच्या : हताशपण
मुखपृष्ठ >> गोष्ट भावभावनांची >> गोष्टी भावभावनांच्या : हताशपण
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गोष्टी भावभावनांच्या : हताशपण Bookmark and Share Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
नीलिमा किराणे ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एखाद्या विषयावर घरात आपापली मतं मांडून चर्चा झाल्यावर सर्वानुमते योग्य निर्णय घेतला तर मग मुलांनी हट्ट करण्याचा प्रश्न येणार नाही, आजोबांनाही उधळपट्टी वाटणार नाही आणि आईबाबांकडूनही अपराधीभावातून वस्तू आणली जाणार नाही. शिवाय मनमानी करायची नसते हा संस्कार मुलांवर होऊ शकेल. सर्वाच्या सहभागानं, लोकशाही पद्धतीनं निर्णय घेण्याचा नवा संस्कार रुजेल.
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. राजाने खांद्यावर घेताच वेताळाने गोष्टीला सुरुवात केली. अभिषेकची आई ऑफिसच्या टूरवर गेली आणि स्वयंपाकाच्या बाई रजेवर. आजोबांचा नेहमीप्रमाणे वरणभात करण्याचा प्लॅन अभिषेक-अभिजितने आज बाद केला. हॉटेलातून मागवलेल्या खाण्याचं बिल पाहिल्यावर आजोबांना ते जेवण गोड लागेना.
‘महागाई केवढी वाढलीय रे हल्ली आणि तुम्हाला सारखं बाहेरचं खायला आवडतं. मला महिना सहाशे रुपये पगार होता. त्यातूनही काटकसरीनं भागवून पाचपन्नास रुपये वाचवायचो आम्ही. आता तुमचे आईबाप भरपूर कमावतात पण बाबाला घरी यायला रात्रीचे दहा. आई ऑफिसच्या कामासाठी अधूनमधून परगावी. त्यांच्या कष्टांची तुम्हा मुलांना काही किंमत नाही. एकेका जेवणाचा एवढा खर्च, मॉलमधल्या खरेद्या- महागाई केवढी आणि तुमची उधळपट्टी.
‘‘आजोबा, काहीही झालं की तुम्ही तुमच्या सहाशे रुपयांच्या पगाराकडे जाता बरं का. आई बाहेरगावी, बाई गायब, बाबा उशिरा येणार तरी दोन दिवस वरणभात, थालिपिठावर भागवलंच की. एखाद्यावेळी बाहेरचं मागवलेलं चालतं बरं का. सहाशे रुपये जुने झाले आजोबा आता. बाबाचा एकटय़ाचा पगार आता सहाशेवर दोन शून्य झालाय,’’ अभिषेक हसत म्हणाला.  
‘‘पगारासोबत महागाई आणि गरजासुद्धा वाढल्यात बाळा. मिळतंय म्हणून तुम्हाला किंमत नाही. आजचं सोड, पण उधळपट्टीत काही चुकतंय असं पण वाटत नाही तुम्हाला. मला तर कधीतरी रिक्षानं जावं लागलं तरी पैसे उडवल्याबद्दल अपराधी वाटतं’’
आजोबा अस्वस्थपणे येरझारा घालत राहिले, मुलं गप्प झाली.
० वाढदिवसाला टचस्क्रीन मोबाइलचा अभिषेकचा हट्ट होता.
‘‘अभिषेक, भलते लाड नाहीत हं. तू मागितलेली प्रत्येक गोष्ट आम्ही आणून दिलीय. गेल्या महिन्याभरात बॅडिमटनसाठी उत्तम रॅकेट, भारीतले शूज, टी-शर्ट आणले. हटून बसलास म्हणून हॅरी पॉटरची पुस्तकं आणि सीडी आणल्या. बाबानं जुना मोबाइलही दिलाय तुला. तुझ्या मागण्या संपतच नाहीत. तुझ्या वयात आम्हाला अशी मागायची हिंमतच नव्हती. मोजके कपडे. सायकलसुद्धा दहावीत मिळाली मला मावशीची. तिचं लग्न झाल्यावर..’’
 ‘पण आई, तूच म्हणतेस ना, जे घ्यायचं ते उत्तमच घ्यायचं, काळाबरोबर राहायचं. तो छपरी मोबाइल आता आऊटडेटेड झालाय. मित्र हसतात आमचे..’’
‘‘तुमच्या एसएमएस आणि गप्पांमुळे मोबाइल प्रीपेड करून घ्यावा लागला. मोबाइल नसेल तर कॉम्प्युटरवर चॅटिंग, गेम्स. ते फार्मव्हील नवीन आलं होतं तेव्हा इंटरनेटचं बिल केवढं आलं होतं.’’
‘‘आई, तेव्हा एकदाच हं. नंतर आम्हालापण कळलं. बोअर झालं. आता आम्ही खूप थोडा वेळ गेम्स खेळतो. नेट आमच्या प्रोजेक्टसाठी वापरतो. मोबाइलवर कमी वापरतो.’’
‘‘ते म्हणण्यापुरतं. फार लाडावलायस तू अभिजित..’
आजोबा हताशपणे या वादावादीकडे पाहात असताना राजाला दृश्य दिसेनासं झालं.
० वेताळ म्हणाला, ‘‘राजा, ही मुलं स्वार्थी होतायत का? एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. नकार सहन होत नाही असं होतंय का? मुलांना आईबापांच्या कष्टांची जाणीव का नाही? काटकसर, मोठय़ांचा मान ठेवणं, हट्ट न करणं ही मूल्यं इतिहासजमा होतायत का? माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होऊन..’’
राजा म्हणाला, ‘‘वेताळा,  ‘पिढीतलं अंतर’ समजून न घेतल्यामुळे या प्रश्नांतून मार्ग काढणं कठीण होतंय. अभिषेकच्या आजोबांना आणि आईला आपल्या नेमक्या भावना मुलांपर्यंत पोहोचवता येत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या मनात एक हताशपणाची भावना आहे, जी मुलांना दोष देत व्यक्त होते. काटकसर करणं, मोठय़ांचं ऐकणं, हट्ट न करणं असे जे सद्गुण, मूल्यं आजोबांच्या पिढीनं लहानपणी अंगात बाणवून घेतली, आयुष्यभर जोपासली त्यांची मुलांना काहीच किंमत नाही असं वाटून ते हताश होतात. मुलांच्याही मनात हताशपणच आहे की, त्यांचं कुठलंच वागणं मोठय़ांना रुचत नाही. इथे जुन्या संस्कारांकडे नव्यानं पाहणं गरजेचं आहे, तसंच पालक-मुलांना परस्परांपर्यंत काय पोहोचवायचंय आणि प्रत्यक्षात काय पोहोचतंय- ते देखील पाहायला हवं वेताळा.’’
‘‘आजोबांच्या अपेक्षा त्यांच्या लहानपणातून आल्यात. त्यांचं लहानपण कष्टाचं, लहानमोठय़ा कमतरतांचं होतं, काटकसर गरजेची होती. ती इतकी रक्तात भिनली की आता गरजेचे खर्चही करवत नाहीत. आईच्या पिढीतही गरजा कमीच होत्या. घराच्या मिळकतीतून त्याही भागत नाहीयेत हे दिसत असल्यामुळे मुलांनी काही मागायचा प्रश्नच येत नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. सुबत्ता वाढल्यामुळे काटकसरीसारखे संस्कार पूर्वीएवढय़ा कडकपणे जोपासणं मुलांना कालबाह्य़ वाटू शकतं. त्यात मोठय़ांकडून चिडचिडीच्या सुरात ‘तुमचं कसं चुकतंय’ किंवा ‘आमच्यापेक्षा तुम्हाला किती जास्त मिळतंय’ हे मुलांना वारंवार सांगितलं गेलं की ‘मोठय़ांना आपलं काहीच पटत नाही’ असं मुलांना वाटतं आणि अंतर वाढतं.  
‘‘याचा अर्थ, मुलं जे म्हणतील ते त्यांच्या पिढीप्रमाणे बरोबरच आहे असं म्हणायचं?  संस्कार नकोतच का?’’
‘‘संस्कार करायचे ठरवून संस्कार होत नाहीत वेताळा. ते परिस्थितीतून आणि घरातल्यांच्या वागण्यातून येतात. ‘हे कशासाठी करायचं?’ ते सांगणारं संस्कारांतलं मर्म मोठय़ांनी लक्षात घ्यायचं आणि तेवढंच मुलांपर्यंत पोहोचवायचं. पूर्वीच्या काळातलं आता सोवळं-ओवळं कालबाह्य़ झालं, पण स्वच्छता पाळणं हे त्यातलं मर्म आहे. मर्म चिरंतनच असतं.  ते डोळसपणे शोधून आपल्या वागण्यातून नव्या पद्धतीनं संस्कार रुजवावे लागतील.’’      आजोबांचं वैफल्य खोलवर रुजलेल्या काटकसरीच्या संस्कारांतून येतं. आतादेखील खर्च करणंच त्यांना अपराधी वाटतं, मुलांच्या खर्च करण्याचा राग येतो. आजोबांच्या मनातल्या त्यांच्या काळातल्या किमतींपुढे आजच्या किमती प्रचंड वाटून रुखरुख लागते. याउलट अभिषेकच्या बाजूनं पाहिलं तर त्यानं कमतरता कधी पाहिलीच नाही. सुबत्ताच पाहिलीय. त्यामुळे पराकोटीच्या काटकसरीची गरज आणि महत्त्व त्याला कळूच शकत नाही. समजायला लागल्यापासून त्याला साधारण याच किमती माहीत आहेत. त्यामुळे तो सहज खर्च करू शकतो. त्याच्या हिशेबाप्रमाणे तो उधळपट्टी करत नाही, पण आजोबांच्या अपेक्षेतली काटकसरही करू शकत नाही.    
 जेवणासारख्या आवश्यक गोष्टीवर खर्च करतानाही मुलांना ‘तुम्ही उधळे, आईबापांच्या कष्टांची पर्वा नसलेले आहात,’ असा संदेश नकळत जातोय. ‘काटकसरीनंच राहावं’ या कठोर तत्त्वाला, ‘अनावश्यक उधळपट्टी करू नये’ अशी थोडी कालसापेक्ष मुरड आजोबा घालू शकले तर त्यांची हताश चिडचिड कमी होईल. मग त्यांना जाणवेल, की आई-बाबा घरात नाहीत, जेवणाची अडचण आहे तरीही तक्रार न करता मुलं समजूतदारपणे जुळवून घेतात, एखाद्याच दिवशी बाहेरचं मागवतात हे कौतुकास्पद आहे. आजोबांकडून त्याबद्दल कौतुकाची थाप मिळाली तर पिढीतलं अंतर सांधायला मदत होईल.
आईवरही काटकसरीचेच संस्कार आहेत. मात्र आता आर्थिक सुबत्तेत मुलांना आपल्यासारखं कमतरतेत, तडजोडी करत राहावं लागू नये असं आई-बाबांना वाटतं. त्यामुळे ते मुलांना उत्तमोत्तम गोष्टी आणून देतात. आपण दोघंही मुलांना कमी वेळ देतो या अपराधी भावनेतून गरजेपेक्षा थोडं जास्तही देत असतील. आपण घरात नसण्याची भरपाई वस्तुरूपानं करत असतील. कधीकधी आईबाबांच्या सॉफ्ट कॉर्नरचा मुलं फायदाही घेऊ शकतात. त्यात इलेक्ट्रॉनिक गोष्टींचं मायाजाल आणि त्यातच रमणारं मित्रमंडळ याची भर पडते. यातून मुलांनाही मागितलं की मिळण्याची सवय होते.
 ‘‘पण यावर उपाय काय, राजा?’’
मोठय़ांनी आपल्या अपेक्षांमागची कारणं तपासून टोकाच्या अपेक्षा कमी करणं आणि मुलांशी नेमका संवाद साधणं हाच उपाय. आजोबांनी आपल्या काटकसरीतला अतिरेकीपणा थोडा कमी करायला हवा तसंच आईबाबांनीही अपराधीभावातून आपण मुलांचे अनावश्यक लाड पुरवत नाही ना, ते अधूनमधून तपासायला हवं. अपराधीभाव वाटला की वस्तू द्यायची आणि काटकसरीच्या संस्कारानं डोकं वर काढलं की मुलांना रागवायचं, असं घडू नये हे पाहायला हवं.
नव्या मोबाइलसारख्या वस्तूची खरेदी सर्वाशी चर्चा करून होईल अशी पद्धत पाडणं उपयोगी ठरेल. एखादी वस्तू का घ्यायची किंवा का नाही घ्यायची याबाबत आपापली मतं मांडून चर्चा झाल्यावर सर्वानुमते योग्य निर्णय होईल. मुलांनीही हट्ट करण्याचा प्रश्न येणार नाही, आजोबांनाही उधळेपणा वाटणार नाही आणि आईबाबांकडूनही अपराधीभावातून वस्तू आणली जाणार नाही. शिवाय मनमानी करायची नसते हा संस्कार मुलांवर होऊ शकेल. सर्वाच्या सहभागानं, लोकशाही पद्धतीनं निर्णय घेण्याचा नवा संस्कार रुजेल.
 ‘‘ हं, हे छान सुचवलंस राजा,’’ असं म्हणत वेताळ अदृश्य झाला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो