शाश्वती सहजीवनाची
मुखपृष्ठ >> लेख >> शाश्वती सहजीवनाची
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

शाश्वती सहजीवनाची Bookmark and Share Print E-mail

भारती भावसार ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२            
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. ही काळाची गरज आहे का, हा चर्चेचा विषय होईल कदाचित.. परंतु वृद्धांना समवयस्कांमध्ये रमण्यासाठी, आपलेपणाने जगण्यासाठी अशी एखादी वास्तू असायलाच हवी.. खोपोलीजवळच्या ‘चैतन्य’ सहजीवनाविषयी..
‘वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे’ हे ओळखून पुरोगामी महाराष्ट्रात वृद्धाश्रम सुरू झाले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची संख्या वाढू लागली. पूर्वी सून-मुलाशी पटेनासे झाल्याने वृद्धाश्रमात सक्तीने जावे लागणाऱ्यांची संख्या अधिक होती. आता स्वेच्छेने वृद्धाश्रमात येणारे आजी-आजोबाही दिसतात. वृद्धाश्रमाची निर्मिती हे कुटुंबव्यवस्थेचे अपयश असल्याची आवई उठवणारे आवाजही काहीसे मागे पडले. थोडक्यात, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. हळूहळू का होईना पण वृद्धाश्रम म्हणजे घरच्यांनी ‘टाकून’ दिलेली माणसे राहण्याचे ठिकाण, ही मानसिकता बदलू लागली आहे.
अशाच मानसिकतेचे ‘तरुण’ आजी-आजोबा खोपोलीनजीकच्या ‘चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास’ मध्ये भेटले. इथले प्रसन्न, शांत वातावरण पाहून हे ठिकाण पहिल्या भेटीतच भावले. विश्वस्त मंडळाने चुकूनही या ठिकाणाचा उल्लेख वृद्धाश्रम असा केलेला नाही आणि तो तसा नसावा म्हणून झटणारी किती तरी माणसे इथे मला भेटली.
मथुरा फाऊंडेशनच्या विश्वस्त लीना देवस्थळी यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणाला ‘सहनिवास’ हे नाव दिलेय. वृद्धाश्रम या नावासह येणाऱ्या नकारात्मक भावना, एकाकी वृद्धांच्या व्यथा व गतकाळातले दुखरे अनुभव सारे मागे ठेवून एक सुखदायी सहनिवास देण्याचा त्यांचा प्रांजळ प्रयत्न आहे.  या कामी त्यांचे पती यशवंत देवस्थळी यांचाही त्यांना भरीव पाठिंबा आहे. ‘चैतन्य’च्या उभारणीत, व्यवस्थापनात अगदी छोटय़ात छोटय़ा गोष्टीतही लीना देवस्थळी यांनी परफेक्शनचा ध्यास घेतल्याचे दिसते.
या सहनिवासाच्या स्थापनेविषयी लीना देवस्थळी मला म्हणाल्या, ‘‘विलेपार्ले येथील आमच्या जवळपास चाळीस घरांच्या कॉलनीतील चार-पाच कुटुंबे सोडली तर अनेक घरांत वृद्ध जोडपी एकटीच राहायची. कुणाची मुले नोकरीनिमित्त अमेरिका, आफ्रिका किंवा दुबई अशी कुठे कुठे गेलेली असायची नि तेथेच स्थायिक व्हायची, तर कुठे सून-मुलाने वेगळं बिऱ्हाड थाटल्यानं ज्येष्ठ नागरिकांचा सेकंड इनिंगमधला संसार एकाकीच सुरू असायचा. एकदा सहज हे लक्षात आलं. चाळीसपैकी फक्त पाच-सहा घरांत एकत्र कुटुंबं नांदत होती. म्हणजे जेमतेम १० टक्के असं हे प्रमाण होतं, जे मला धक्कादायक वाटलं. वृद्धाश्रम काळाची गरज का आहे हे पटलं. त्यातूनच वृद्धाश्रम काढायचं हे नक्की ठरवलं.’’
खोपोलीनजीक जांभूळपाडा या छोटय़ाशा गावात, खोपोली-पाली रस्त्यावर आणि अंबा नदीच्या काठावर ‘चैतन्य’ वसलेलं आहे. मुंबई-पुण्यापासून जवळ असूनही रोजच्या कोलाहलापासून हे ठिकाण दूर आहे.
‘चैतन्य’ सुरू होऊन अवघे काही महिने झाले असल्यानं निवासींची संख्या कमी आहे. मात्र जे आहेत ते सगळेजण एकत्र कुटुंबाप्रमाणे इथे नांदतात. इंजिनीयर मुलगा नायजेरियात स्थायिक असल्यानं सुहास झवेरी या साठीतल्या बाई ‘चैतन्य’मध्ये अवघ्या महिन्याभरापूर्वी दाखल झाल्या. प्रकृतीच्या फार तक्रारी होत्या, पण इथं आल्यापासून इन्सुलिनची पातळी कमी झालीय आणि कंटाळाही फारसा येत नाही, असं त्या आनंदानं सांगत होत्या. इतकी वर्षे बोरिवलीच्या धावपळीत काढल्यावर इथलं शांत वातावरण खूप मानवल्याचं ते आवर्जून सांगतात. इथं आल्यावर आवड आणि सवड दोन्ही मिळाल्याने त्यांनी भरतकामाला पुन्हा सुरुवात केल्याचे सांगत एक सुरेख नक्षी माझ्यापुढे धरली. त्या तिथे समाधानी असल्याची ती पावतीच होती जणू..
आमच्या गप्पा ऐकून त्रिभुवन सिरोदरीया स्वत:हून आमच्यात दाखल झाले. कांदिवलीचे त्रिभुवनजी पासष्टी गाठलेले ज्येष्ठ नागरिक. इथे येणे स्वेच्छेने ठरवल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. ‘माझ्या आजूबाजूला दोन्ही भावांची कुटुंबे राहतात, पण पत्नी गेल्यावर माझे कुणावर ओझं होऊ नये असं प्रकर्षांनं वाटलं. हळूहळू सगळे पाश कमी केले व स्वखुशीने ‘चैतन्य’मध्ये दाखल झालो. सून-मुलांना त्यांचे संसार आहेत, त्यांचे व्याप आहेत. आणि आपला आत्मसन्मान कुणाकडे गहाण का टाकायचा?’ या त्यांच्या रोखठोक प्रश्नांनी मी चमकले. स्वत:पुरते चार पैसे गाठीला असतातच आता वृद्धांकडेही. मग त्यांनी वृद्धाश्रम हा पर्याय का बरे स्वीकारू नये आणि हळूहळू बदलेल मानसिकता सगळ्यांची. यात काही शंका नाही, असा ‘आशावाद’ही त्यांनी व्यक्त केला.
पुलंच्या ‘असा मी असामी’त चपखल बसेल असं व्यक्तिमत्त्व म्हणजे ८१ वर्षीय चांदवडकर आजोबा. गप्पिष्ट आणि तितकेच आध्यात्मिक प्रवृत्तीचे. तरुणपणी गुजरातमधल्या एका स्वामींच्या पंथात सामील झाले व ब्रह्मचारीच राहिले. मध्य रेल्वेत अकाऊंटंट असणारे चांदोरकर आजोबा कुणा-कुणाचं करीत गेले, आयुष्य कंठीत गेले. पुण्याजवळ तळेगावला मोठं घर आहे, पण सोबतीला कुणी हवं म्हणून ‘चैतन्य’मध्ये दाखल झाले. ‘‘जागा फस्र्ट क्लास आहे बघा! मला सांगा, एवढय़ा माफक दरात चांगल्या सुविधा मिळतात. मग हेच आपलं घर म्हणून स्वीकारलं. आता हेच माझे कुटुंबीय आहेत आणि हो, व्यवस्थापिका आपटेबाई फार समजूतदार आहेत. कधीच आवाज चढवत नाहीत.’’  एका दमात त्यांनी सांगूनच टाकलं.
बोलण्याच्या ओघात आलं- चांदवडकर मूळचे पालीचे. पालीला चांदवडकरांचं म्हणे मोठं प्रस्थ होतं. तिथे वाडासुद्धा आहे, थोडी पडझड झालेला. एके काळी सुबत्ता व वैभव अनुभवलेले चांदवडकर यांनी थेट ‘चैतन्य’मध्ये दाखल होणं, हा मोठा बदल मला तरी भावनिक स्थित्यंतरचा भाग वाटला आणि तो लीलया पचवणारे चांदोरकर एक मोठं प्रस्थ वाटले..
त्यानंतर भेटलेले शरद चांदोरकर (७२) लक्षात राहिले ते त्यांच्या छंद-आवडी यांच्याविषयी मारलेल्या गप्पांमुळे. एके काळी हुतुतूच्या मैदानावर अधिराज्य गाजवणारे चांदोरकर, शिकारीचा शौकही बाळगून होते. ‘‘.. शिकारीवर बंदी आली ती आम्ही स्वीकारलीच की. मग कुटुंबव्यवस्थेतले बदल तितकेच सहज पचवले पाहिजेत.’’इति चांदोरकर. याठिकाणी समवयस्कांबरोबर चर्चा करत, वयोमानानुसार पाळायचे पथ्यपाणी जपत आम्ही उत्तम जगतोय. अहो, मी तर छाती ठोकून सांगेन - घरच्या सुनासुद्धा इतकी काळजी घेणार नाहीत इतकी इथली मंडळी घेतात.’’  
त्याचा प्रत्यय मलाही आलाच होता. सुरुवातीलाच व्यवस्थापिका मीना आपटे यांनी आपुलकीनं ‘चैतन्य’मध्ये माझं स्वागत केले, इथल्या विभागांची ओळख करून दिली. लोकांची प्रेमाने काळजी घेण्याबरोबरच येथली वास्तूही तुमची काळजी घेत असल्याचा भास होईल अशीच या ‘चैतन्य’ची रचना आहे. ‘चैतन्य’च्या टुमदार वास्तूची रचना इतकी सुरेख केलीय, की आपोआप पावलं प्रत्येक दालनाकडे वळतात. या वास्तूच्या मधोमध मोकळी जागा असून येथे शोभेची फुलझाडं आहेत. या भागात छप्पर नसल्याने आकाशाचे सहज दर्शन घडते व वास्तूला भव्यता मिळते. या जागेच्या सभोवती सात कौलारू बंगले दिमाखात उभारले आहेत. वीजपुरवठय़ासाठी सौरऊर्जेचा वापर केला गेलाय. अनंत, सोनचाफा, जाई, जुई अशी नावं प्रत्येक खोलीला दिली असून दोन खोल्यांमध्ये बसण्यासाठी बाके आहेत, बोलत-बोलत थोडे रेंगाळावे अशी वातावरणनिर्मिती इथे आहे. त्यामुळे अंगणात बसून गप्पा मारल्याच्या आठवणी इथं ताज्या होऊ शकतात.
खोल्यांच्या आजूबाजूला वृक्षवल्लींची साथ असल्यानं इथली हिरवीगार शांतता आपल्याला ताजंतवानं करते. शिवाय वाचनासाठी इथं सुसज्ज ग्रंथालय आहे. मनोरंजन कक्षात पत्ते, कॅरम तसेच बुद्धिबळाचा पट सज्ज असतो इच्छुकांच्या प्रतीक्षेत. शिवाय निवासींना भेटायला, फेरफटका मारायला खोल्यांच्या बाहेर मोठाले व्हरांडे आहेत. कुणी नातेवाईक वा मित्र भेटायला आले तर त्यांच्यासाठी अतिथिगृहाची व्यवस्था आहे.
इथलं वैशिष्टय़ म्हणजे ‘चैतन्य’ची उभारणी वृद्धांच्या शारीरिक मर्यादांचा सखोल विचार करून झालीय. संपूर्ण परिसरात एकही उंचवटा अथवा चढ-उताराचा भाग नाही. खोल्यांना उंबरठेसुद्धा नाहीत. शिवाय व्हरांडय़ातील इतर खोल्यांना जोडणारा मार्गही व्हीलचेअर जाऊ शकेल, चेअर मागे फिरवून घेता येईल इतका प्रशस्त आहे. स्वयंपाकगृह हायजेनिक आहे. जेवणाच्या ठिकाणी स्वच्छता व शुद्धता याकडे जातीने लक्ष दिले जाते. एका खोलीत दोघांनी राहावयाची इथं व्यवस्था असून आपलेपणाने, प्रेमाने  विचारपूस करणारे, हसतमुखाने काम करणारे तत्पर कर्मचारी आहेत. या वास्तुरचनेची संकल्पना सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार नीरा आडारकर यांची असून अरुण काळे यांचाही या कामी मोलाचा वाटा आहे. व्यवस्थापिका बाईंसह सोगम कुटुंबीय इथे चोवीस तास वास्तव्यास असते. त्यांची छोटी मुलगी कश्मिरा हिच्या लीलांमुळे ‘चैतन्य’मध्ये खरोखर चैतन्य आलंय.
‘चतन्य’च्या वास्तू जवळच गावातील मध्यवर्ती ठिकाणे, तलाठी कार्यालय आहे. तसेच सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व औषधाचे दुकानही हाकेच्या अंतरावर आहे. निवासींच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी लवकरच मोठय़ा रुग्णालयाशी करारबद्ध होण्याचा व्यवस्थापनाचा विचार आहे.  वृद्धाश्रमाच्या बोजड आणि काहीशा निराशावादी व्याख्येला छेद देणारे हे ठिकाण..सगळ्यांना आपलंसं करणारं.. प्रेमाची पखरण करणारं..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो