रुजुवात : शेगडी ते गॅस
मुखपृष्ठ >> रुजुवात >> रुजुवात : शेगडी ते गॅस
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रुजुवात : शेगडी ते गॅस Bookmark and Share Print E-mail

 

मुकुंद संगोराम - शनिवार, १५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गॅस जेव्हा बाजारात आला, तेव्हाच्या मध्यमवर्गीय जाणिवा त्याला स्वीकारायला तयार नव्हत्या. गॅस हळूहळू रुळला आणि नागरीकरणाचं महत्त्वाचं चिन्ह ठरला. शेगडीवरल्या स्वैपाकाची चव वेगळीच, ही आठवण मात्र राहिली. त्या शेंगडीऐवजी आता मायक्रोवेव्ह शेगडय़ा आल्या.. ‘किचन’ संस्कृतीनंही चवी जपल्याच!


शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं होतं, की ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात आपली वखार सुरू केली आणि त्या माध्यमातून या देशावर राज्य मिळवलं. गल्लीतल्या ‘जळाऊ लाकडाची आणि कोळशाची जंगी वखार’ अशी पाटी पाहिली की त्या ईस्ट इंडियाची आठवण येऊन धडकी भरायची. कोळशाच्या वखारीत दोन मजले उंचीचे कोळशाचे ढीग असत. त्यात लाकडी, कांडी, दगडी असे विविध प्रकारचे कोळसे असायचे. रंग सगळय़ांचाच काळाकुट्ट असे, पण त्यांची प्रतवारी वेगवेगळी असे. त्यांचे भावही वेगळे असत. त्या उंच ढिगाऱ्यावर लीलया चढून किलो-दोन किलो किंवा पोतंभर कोळसा काढणारा तो कामगार नखशिखान्त काळा झालेला असे. हा माणूस कोळसा विकतो की दूध, असा प्रश्न पडावा, असा शुभ्र कपडय़ातला मालक मात्र बाहेर गल्ल्यावर नाणी खुळखुळवत बसलेला असे. घरात कोळसा आणला की तो शेगडीत ठेवावा लागे आणि त्यावर रॉकेल शिंपडावं लागे आणि मग काडय़ापेटीनं तो पेटवावा लागे. मग त्याला वारं घालावं लागे. खूप धूर होत होत एकदाचा तो काही वेळानं प्रज्वलित व्हायचा. मग त्यावर स्वयंपाक सुरू व्हायचा. तो करताना सतत कोळशामध्ये धुगधुगी जिवंत ठेवण्यासाठी एका हातानं पंख्यानं वारं घालण्याचा कार्यक्रम सुरू ठेवावा लागे. डोळय़ांत सतत पाणी, आजूबाजूला धूर आणि शेगडीवरच्या भांडय़ातल्या अन्नावर लक्ष, अशी त्रिस्थळी यात्रा करणाऱ्या त्या माउलींना आताच्या पिढीनं वंदनच करायला हवं! हे काही फार पूर्वीचं चित्र नाही. अगदी तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील घराघरांत हे चित्र अगदी कॉमन असायचं. कोळशाच्या वखारी तर गल्लोगल्ली असायच्या. तो सहज आणि मुबलकही मिळायचा. मोठय़ा घरांत राहणारी माणसं मोठय़ा बॅरलमध्ये महिन्याच्या कोळशाची साठवणही करीत असत. छोटय़ा घरातले मध्यमवर्गीय किलो-दोन किलो कोळसा आणत असत. स्वयंपाक झाला, की शेगडीच्या परिसरात प्रचंड राख साठलेली असायची. ती गोळा करणं हे एक मोठं कामच असे. आधीच अंधारलेली ती खोली धुरानं आणि राखेनं अधिकच काळवंडून जायची. सतत चुलीसमोर बसणाऱ्या तेव्हाच्या महिलांना आतासारखा पटदिशी एक कप चहा बनवायचा, म्हणजे केवढं तरी संकट वाटत असे.
स्टोव्ह नावाची वस्तू निवडक श्रीमंतांकडे असायची. रॉकेलवर चालणारा हा स्टोव्ह असणाऱ्या घरातली स्वयंपाकघरं चकचकीत दिसत असत. तेव्हाच्या प्रत्येक स्त्रीचं ते एक स्वप्नच होतं. आकाशातून विमानं उडत होती, पण घरात मात्र धुराचे लोट उसळत होते अशी तेव्हाची स्थिती! मातीच्या चुलींच्या जागी लोखंडी चुली आल्या, तेवढाच काय तो बदल! अंघोळीसाठी पाणी तापवायच्या बंबातही लाकडाचं सरपण घालावं लागे आणि तिथंही धूर आणि राखेचंच साम्राज्य असे. अशा काळात बाजारपेठेत अवतरला रॉकेलवरचा स्टोव्ह. ही वस्तू म्हणजे वरदान होतं. बर्नर असलेल्या या यंत्रात रॉकेल साठवणारी टाकी असे आणि त्यातून ते बर्नरमध्ये पंप करावं लागे. भुर्र र्र र्र असा आवाज करणारा हा बर्नर रॉकेलमधल्या धुळीनं बंद पडला की मग एका अगदी न दिसणाऱ्या तारेच्या पिननं तो साफ करावा लागे. हा उद्योग करणं, शेगडीतला निखारा तेवत ठेवण्यापेक्षा कितीतरी सुखकारक वाटत होतं. रस्त्यांवरच्या टपऱ्यांमध्ये मग हे स्टोव्ह दुरुस्त करणारे ‘दवाखाने’ आले. नंतर आला वातीचा स्टोव्ह. रॉकेलच्या टाकीत बुडवून ठेवलेल्या वाती वर-खाली करण्याचा खटका असलेल्या या यंत्रावर तेव्हा झटकन चहासुद्धा करता येत असे. मग आठवडय़ाच्या आठवडय़ाला त्या वातींची साफसफाई करावी लागे आणि आपण अगदी सुखात आहोत, असं वाटून घ्यायला लागे. धूर आणि राख यापासून बाईची झालेली मुक्ती हा विज्ञानाचा चमत्कार होता. ‘चूल आणि मूल’ करणारी बाई याच काळात घराबाहेर पडायला लागली. शिकायला लागली. नोकरी करू लागली आणि उद्योगातही प्रवेश करू लागली. आपल्या स्वत्वावर फुंकर घालण्यासाठी तिला स्वयंपाकघराच्या बाहेर पडणं आवश्यकच होतं. त्यासाठी तिला चुलीपासून मुक्ती मिळणं अत्यावश्यक होतं. स्टोव्हच्या आगमनाचं हे सामाजिक महत्त्व भारतात खरं तर अधोरेखित व्हायला हवं. तेव्हा रॉकेलचं रेशनिंग नव्हतं. सहजपणे वाण्याच्या दुकानातही ते मिळायचं. मोठय़ा चौकोनी टिनच्या डब्यातलं रॉकेल काढण्यासाठी खास पंप मिळत असे. घरात भरपूर रॉकेल असणं, ही घर भरलेलं असण्याची खूण होती. घरातली ही वस्तू मध्यमवर्गाची दैनंदिन गरज झाली आणि तेव्हा कुठे गॅस नावाची गोष्ट कानावर पडायला लागली.
एका लोखंडी सिलिंडरमध्ये ठासून भरलेल्या या गॅसनं सगळय़ांचं आयुष्य पार बदलून गेलं. पण गॅस जेव्हा बाजारात आला, तेव्हाच्या मध्यमवर्गीय जाणिवा त्याला स्वीकारायला तयार नव्हत्या. बाजारपेठीय तंत्रंही तेव्हा फार विकसित झाली नव्हती. त्यामुळे गॅस कंपन्यांनी हातगाडीवर गॅसची प्रात्यक्षिकं दाखवायला सुरुवात केली. तो कसा सुरक्षित आहे, कसा बहुपयोगी आहे. धूळ आणि धूर यांपासून तो कसा मुक्ती देतो वगैरे अनेक गोष्टी ओरडून सांगणाऱ्या हातगाडय़ा तेव्हा रस्तोरस्ती दिसायच्या. घरोघरी खास महिलांशी संपर्क साधण्यासाठी तेव्हा ‘डोअर टू डोअर मार्केटिंग’ सुरू केलं होतं. गॅस विकत घेण्यासाठी तेव्हा कंपन्या आर्जवं करायच्या. गॅससाठी आवश्यक असणारी शेगडी फुकट देण्याचं आमिषही दाखवायच्या. गॅस सिलिंडर घरपोच देण्याची हमी द्यायच्या. दुरुस्तीची आणि देखभालीचीही व्यवस्था करायची जबाबदारीही घ्यायच्या. एवढी आश्वासनं दिल्यानंतरही गॅस धोकादायक असल्याची आवई उठली की तो खरेदी करण्यासाठी जमवलेल्या पैशांना वाटा फुटायच्या. घरातल्या खरेदीच्या क्रमात गॅसचा क्रमांक कधीच वर जायचा नाही. शेजारच्या घरात गॅस आला की मगच सगळी चक्रं  फिरायची आणि एके दिवशी मोठय़ा दिमाखात चकचकीत प्लेटिंग केलेली गॅसची शेगडी आणि त्यासोबतचं सिलिंडर अवतीर्ण व्हायचा. त्याची यथासांग पूजा वगैरे व्हायची आणि मग त्या घरातल्या स्त्रीचा चेहरा उजळून निघायचा. तोपर्यंत जमिनीवर बसून स्वयंपाक करणाऱ्या बाईला गॅस ठेवण्यासाठी टेबलची गरज भासू लागली. स्वयंपाकघरात फर्निचर असं म्हणाल तर ते पहिलंच. स्वयंपाकाचा ओटा ही कल्पना तर अगदीच अलीकडची, म्हणजे फ्लॅट संस्कृती फोफावल्यानंतरची. तोवर उभ्यानं, टेबलवर स्वयंपाक करण्यातली मजा बाई अनुभवायला लागली होती. नागरीकरणातील गॅस हे एक फार मोठ्ठं प्रतीक म्हणायला हवं!
गॅसमुळे जगणं फारच सुकर झालं. ‘किचन’ हे एक संस्कृतीचिन्ह झालं. त्यातल्या प्रत्येक गोष्टीबाबत जागरूकता आली. कपबशांपासून ते ग्लासापर्यंत आणि भांडय़ांपासून ते चमच्यांपर्यंत सगळय़ा गोष्टींची एक भलीमोठी बाजारपेठ आकाराला येऊ लागली. अंघोळीसाठीच्या बंबाची जागा तोवर गिझरनामक विजेवर चालणाऱ्या यंत्रानं घेतली होती. वीज महाग होताच त्याही प्रांतात गॅसनं प्रवेश केला आणि गॅस गिझर मिळायला लागले. विजेपेक्षा स्वस्तात पाणी गरम करण्याची ही सोय घरोघरी व्हायला लागली. गॅस सहज मिळत होता, तोवर या साऱ्या गोष्टी आपसूक घडत होत्या. गॅसवरच्या अन्नाला शेगडीवरच्या अन्नाची चव येत नाही, अशी तक्रार सुरू झाली आणि ‘बार्बेक्यू’, ‘शिगरी’ या नावांची हॉटेलं सुरू झाली. ‘येथे अगदी घरच्यासारखे जेवण मिळेल’ या पाटय़ांच्या जागी ‘चुलीवरची भाकरी’ अशा पाटय़ा झळकू लागल्या. हॉटेलातल्या टेबलवर मध्यभागी कोळशाची शेगडी ठेवून त्यावर बटाटा भाजून खाण्याची सोय स्वर्गीय वाटू लागली. भाकरीला कोळशाचा गंध असतो, अशी जाणीव नव्यानं व्हायला लागली. (‘कविराज चंद्रशेखर’ रात्रभर तेलाच्या मिणमिणत्या दिव्याच्या साक्षीनं कविता करीत असत. ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांनी आपल्या या कविराज वडिलांबद्दल लिहिताना म्हटलं आहे, की ‘चंद्रशेखरांच्या कवितांना तेलाचा वास असे!’) आता वीकएण्ड पाटर्य़ामध्ये शेगडी पेटवून त्यावर स्वयंपाक करणं ही एक आधुनिकतेला साजेशी गोष्ट बनली आहे. गाडीवरच्या शेगडीवर भाजून मिळणाऱ्या कणसांचं मार्केटही आता वधारलं आहे. कणसं भाजणाऱ्याचे जे हाल होतात, त्याकडे दुर्लक्ष करीत ती कोळशाच्या चवीची कणसं खाणं ही आता फॅशन झाली आहे. नव्या तंत्रज्ञानानं हीच चव मिळावी, यासाठी ‘स्लो कुकिंग कुकर’ असं विजेवरचं यंत्रही आणलं. पण घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करणाऱ्या बाईला त्यापेक्षा मायक्रोवेव्ह ओव्हन ही जरा आधुनिकता परिधान करणारी विजेची शेगडीच अधिक सोयीची वाटली. नव्या पिढीला शेगडीमधली मजा जाणवते आणि घरातल्या बाईला तिच्यापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद वाटतो. दोन्ही गोष्टी सुखाच्याच, पण वेगवेगळी अनुभूती देणाऱ्या!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो