संजय उवाच : समजावताना..
मुखपृष्ठ >> संजय उवाच >> संजय उवाच : समजावताना..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संजय उवाच : समजावताना.. Bookmark and Share Print E-mail

डॉ.संजय ओक,- १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रेव्ह पार्टी.. थर्टी फर्स्टची रात्र..गटारीचे सेलिब्रेशन..अशा बातम्या आता आपल्याला नवीन राहिलेल्या नाहीत, पण गेल्या काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलेल्या लहान मुलांच्या ‘चिल्लर पार्टीने’ मात्र माझ्या पायाखालची जमीन हादरली. पार्टी..मद्भरी आणि तीही थोडय़ाथोडक्या नाही तर सहाशे-सातशे शाळकरी वयांच्या मुलांची..ज्या वयात मदानात हुंदडायचे..ज्या वयात थोरामोठय़ांची चरित्रे वाचायची.. ज्या वयात सद्गुणांचा वारसा स्वीकारायचा त्या वयात मद्याची आणि नशेची चव..आणि तीही समूहाने? नशाच हवीय नं मग ती चांगल्या कामाची का नको? माझ्या मते, सत्कर्माइतके धुंदी आणणारे दुसरे काही नाही. एक केल्यावर दुसऱ्याची आस लागते अन् दुसऱ्याची पूर्तता होण्यापूर्वीच तिसऱ्याचा प्रयास सुरू होतो. असे पंख फडफडवणारे पक्षी एकत्र जमून जो थवा तयार होतो त्यालाच तर आपण सत्संग किंवा सत्कर्मी पंथ म्हणतो. मुलांना याची चव का कळली नाही?
या साऱ्या घटनेचे चक्र पाहिले की दुख होते. सहाशे-सातशे मुले एकत्र जमतात.. पार्टीचा ड्रेसकोड ठरतो. तोकडे कपडे प्रमाण ठरतात.. अंग झाकणे हे बुरसटपणा ठरते.. मोकळे सुटलेले केस; झिपऱ्या हे चढणाऱ्या िझगेचे निर्देशक ठरतात.. कानठळ्या बसविणारा डी.जे. हा पार्टीचा प्राण ठरतो.. चकणा चरख्यासारखा फिरतो.. वारुणी फेसाळते.. गोळीचाही वापर होतो अन् संगीताच्या तालावर पावले थिरकतात.. अनेकांना झेपत नाही..पचत नाही, पण झुंडशाहीचा प्रभाव पार्टीला गती देत राहतो. हे सारं पूर्वनियोजनाशिवाय; अचूक आयोजनाशिवाय होऊ शकत नाही आणि इथंच भयानक वास्तव समोर येतं की, पुढच्या पिढीच्या चिल्लरांना एकत्र करून पार्टी करण्याचं आयोजन मात्र मागच्या पिढीतले जाणते प्रौढ करत आहेत. काय विचार केलाय त्यांनी ? मुले अजाण आहेत; पण तुम्हाला तरी अक्कल आहे ना ? आपण तळीराम तयार करत आहोत? हा पहिलाच प्याला पुढच्या बरबादीचा मार्ग आखत आहे आणि पर्यायाने आपण एक पिढी पांगळी करत आहोत, याचे भान क्षुल्लक आíथक लाभासाठी विसरणे, हे महापाप आहे.
माझ्या मते, या सामाजिक विषारी बांडगुळावर पोलिसी प्रहार हे उत्तरच होऊ शकत नाही. ते एखाद्या प्रसंगापुरते ठीक आहे. पण शेवटी प्रसंगापेक्षा प्रवृत्ती महत्त्वाची आहे आणि तेथे फरक होण्याची गरज आहे.
घराघरातले संस्कार; पूजा-पाठ; संध्याकाळची रामरक्षा; जेवणाचा घास घेण्यापूर्वीचे ‘वदनी कवळ घेता..’, शाळा भरण्यापूर्वीचे ‘या कुन्देन्दुतुषारहारधवला..’ या साऱ्या साऱ्या गोष्टी पुन्हा प्रयत्न आणि गांभीर्यपूर्वक करायला हव्यात. संस्कारांच्या बाळमुठीएवढय़ा भक्कम व्हाव्यात की, यांना पुढच्या आयुष्यात कधी संमोहनाची गरजच लागू नये. शाळेत वर्गात बसून संपूर्ण वर्गाकडून सातपुते सर अथर्वशीर्ष म्हणून घ्यावयाचे ते मॉडर्नचे दिवस आठवले आणि अंगावर काटा आला. ‘एक सूर..एक साथ’- असल्या घोषणांची तेव्हा गरजच पडत नसे. उच्चार आणि आचार बोलत अन् विचार प्रभावी होत असे. शेवटचा तास झाल्यावर आम्ही शाळेच्या खडकाजवळच्या मदानात जमत असू. कोपऱ्यात तालीमही होती. कुंपणालगतच्या छोटय़ा मदानात शाळेतल्या मुलांची एन.सी.सी.ची परेड सुरू असे. निळा युनिफॉर्म आणि टोपी घातलेल्या मुलांचे आम्हाला भारी अप्रूप वाटे. शाळेच्या भांडारात गोळ्या मिळत, पण त्या लिमलेटच्या असत. भांडाराची मुख्य खरेदी वह्य़ा-जर्नल्स यांची असे. शाळेचे दिवस सभा-स्पर्धा-वक्तृत्व यांनी भारलेले असत.. गॅदिरगला एकांकिका होत .. रेकॉर्ड डान्स; फॅन्सी ड्रेस आणि बाष्कळ विनोद किंवा िहदी गाण्यांच्या अंताक्षरी यांनी बाजी मारलेली नव्हती. आज वेळीच सावरायला हवे. पुढच्यांना वाढविताना प्रौढांनीच मन आवरायला हवे. घरात मुलांसमोर ‘िड्रक’ न घेणे; ‘स्मोकिंग’ म्हणजे मर्दानगी हा संदेश न देणे हे महत्त्वाचे. गणपतीच्या सार्वजनिक उत्सवात मिरवणुकांत नाचणे आणि अंगविक्षेप यांची जागा शिस्तबद्ध लेझीम आणि दांडपट्टय़ाने घेणे. मूर्तीसमोर आयोजलेल्या प्रत्येक कार्यक्रमाचा आधी आयोजक बठकीत सांगोपांग विचार होणे, माहितीपर व्याख्याने, विचारप्रवर्तक चर्चा आणि संस्कारक्षम निरूपणे यांचा समावेश करणे. एकत्र येण्यासाठी केवळ उत्सवच कशाला; रविवारची सकाळही खर्ची घालणे या साऱ्या गोष्टींची गरज आहे. संस्कार सांगून-बोलून जेवढे होत नाहीत, त्याहून जास्त कळत-नकळत प्रौढांच्या आचरणातून होतात. कोणत्या गोष्टींचे उदात्तीकरण; प्रकटीकरण करायचे याचाही क्षणभर विचार व्हायला हवा. प्रसारमाध्यमे, मालिका आणि वाहिन्या यांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
टी.आर.पी. म्हणजे आयुष्य नव्हे. क्षणक फायदा आणि आयुष्यभराची उपलब्धी यांचा विचार करायलाच हवा. तारतम्यच हरवले आहे. हा जाळ जोपर्यंत शेजाऱ्यांच्या घरापुरताच मर्यादित असतो, तोपर्यंत आपण बघे बनतो, पण आपल्याच उंबरठय़ावर त्याचे चटके बसू लागल्यावर आपण खडबडून जागे होतो. समाजव्यवस्थेला दोष देऊ लागतो आणि यात आपले काही राहून गेले आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.
.. काळ बदलणारच आहे; मोहाची साधने वाढणार आहेत.. प्रश्न शाश्वत आणि क्षणक यातील फरक समजून घेण्याचा आणि समजावण्याचा आहे.
ई-मेल उघडले. पुण्याच्या देवधर क्लासेसच्या देवधर सरांचे पत्र होते.
महिन्यापूर्वी मी त्यांच्या वार्षकि बक्षीस समारंभात नशाच्या ‘अर्था’बद्दल विचार व्यक्त केले होते. देवधर सरांनी फोटो पाठविले होते. त्यातला एक फोटो माझी नजर खिळवून गेला. संपूर्ण बालगंधर्व रंगमंदिर १५-१७ वयोगटाच्या अभ्यासू मुला-मुलींनी फुलून गेले होते. ६००-८०० मुले होती. वातावरणात तरुणाई, उमेद, उत्साह आणि उद्याच्या आशा भरून राहिल्या होत्या आणि जिवाचे कान करून ती मुले माझे म्हणणे ऐकत होती. समजून घ्यायला पुढची पिढी तयारच होती; समजाविण्यात आम्ही कमी पडत होतो; हेच खरे..   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो