नवनिर्माणचे शिलेदार : गोदाकाठचा निसर्गयात्री
मुखपृष्ठ >> लेख >> नवनिर्माणचे शिलेदार : गोदाकाठचा निसर्गयात्री
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनिर्माणचे शिलेदार : गोदाकाठचा निसर्गयात्री Bookmark and Share Print E-mail

राजू दीक्षित ,सोमवार,१७ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(समन्वयक : हेमंत लागवणकर)
alt

नाशिक जिल्ह्य़ातल्या ओझरमिग या खेडय़ात वाढलेला अनिल माळी हा एक निसर्गवेडा शिक्षक. लहानपणापासूनच रानावनात भटकंती करायला त्याला आवडायचे. शाळेत शिकताना आदिवासी मित्रांच्या दप्तरात गिलोरीने मारलेले रंगीबेरंगी पक्षी अनेक वेळा पाहिलेले. हे पक्षी पाहून अनिलचा जीव कळवळायचा. संवेदनशील मन असलेल्या अनिलमध्ये तितकाच कलात्मक छायाचित्रकार दडलेला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अनिल नाशिक शहरात आला. फावल्या वेळेत तो आपल्या मित्राच्या फोटो स्टुडिओमध्ये गप्पा मारत बसायचा. तिथेच त्याची ‘कॅमेरा’ या अद्भुत यंत्राशी ओळख झाली. हळूहळू अनिल मित्राचा कॅमेरा हाताळू लागला. स्टुडिओमध्ये आलेल्यांचे फोटो काढू लागला. त्यातच एके दिवशी चक्क कुसुमाग्रजांचे फोटो काढायची संधी मिळाली. अनिल तात्यासाहेबांचे वेगवेगळे भाव कॅमेऱ्यात बंदिस्त करत होता. हळूहळू गप्पा सुरू झाल्या. पदवीचं शिक्षण घेता घेता अनिल फोटोग्राफी करतोय, हे पाहून तात्यासाहेब खूश झाले. ते म्हणाले, ‘बाळा, छंद म्हणून तू फोटोग्राफी करतो आहेस, हे छान. पण छंद असा असावा की, त्यात आपल्याला अढळपद मिळावे.’
कुसुमाग्रजांच्या बोलण्याचा खोल परिणाम अनिलच्या मनावर झाला. पण फोटोग्राफीचा छंद जोपासायचा तर स्वत:कडे चांगला कॅमेरा हवा. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे कॅमेरा विकत घेणे परवडण्यासारखे नव्हते. तरीसुद्धा अर्ज काढून अनिलने चांगला कॅमेरा विकत घेतला.
स्वत:चा कॅमेरा आणि जात्याच असलेले निसर्गवेड यामुळे अनिल वेगवेगळ्या झाडांचे, पक्ष्यांचे, फुलपाखरांचे फोटो काढायला लागला. त्यातले काही फोटो वृत्तपत्रांमधून प्रसिद्धही झाले. कुसुमाग्रजांनी दिलेली प्रेरणा त्याला गप्प बसू देत नव्हती. तो त्रंबकेश्वराच्या डोंगररांगांमधून झपाटल्यासारखा हिंडू लागला. निसर्गाच्या आल्हाददायक आविष्कारांना आणि अफलातून घटनांना कॅमेराबद्ध करू लागला. आता गळ्यात कॅमेऱ्याच्या जोडीला दुर्बीणही आली. पक्ष्यांची जीवनपद्धती, रानफुलांचा अभ्यास, वन्यजीव छायाचित्रण असा चौफेर प्रवास सुरू झाला. दरम्यान शिक्षण पूर्ण करून अनिल मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सिडको इथल्या माध्यमिक विद्यालयात विज्ञान आणि गणित विषयांचा शिक्षक म्हणून रुजू झाला.
स्वत:च्या पगारातून पहिली खरेदी अर्थातच अद्ययावत कॅमेऱ्याची आणि वन्यजीव छायाचित्रणासाठी लागणाऱ्या खास लेन्सेसची झाली. नाशिक परिसरातल्या डोंगररांगांमधून सुरू झालेल्या भटकंतीला आता अभ्यासाचं स्वरूप येऊ लागलं. मग हा अभ्यास केवळ नाशिक परिसरातच का मर्यादित ठेवायचा? केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या अनेक अभयारण्यांमधून वन्यजीवांचा अभ्यास सुरू झाला. या अभ्यासात जे जे विलक्षण दिसेल ते ते कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होत गेलं. वर्गातल्या मुलांशी शब्दांच्या माध्यमातून संवाद साधणारा हा शिक्षक कॅमेऱ्याच्या माध्यमातून निसर्गाशी संवाद साधत होता.
काही वर्षांपूर्वी नाशिक शहरात बिबटय़ा शिरल्याची घटना घडली आणि वन्यजीवांविषयी लोकांमध्ये असलेल्या संवेदनाहीनतेमुळे त्याचा बळी गेला. या प्रसंगाने माळीसर हेलावून गेले. लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण काढलेल्या वन्यजीवांच्या छायाचित्रांची ठिकठिकाणी प्रदर्शने भरविण्याला सुरुवात केली. त्यासाठी शेकडो छायाचित्रे पदरचे पैसे खर्च करून मोठय़ा आकारात करून घेतली. नाशिक, संगमनेर, सटाणा, औरंगाबाद, जळगाव, बारामती अशा अनेक शहरांमधील वेगवेगळ्या ठिकाणी ही प्रदर्शने झाली.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमामध्ये जेव्हा पर्यावरण विषयाचा समावेश करण्यात आला तेव्हा माळीसरांचा शिक्षकी पेशा खऱ्या अर्थाने बहरू लागला. आपल्या शाळेतील अध्यापन कार्य सांभाळून त्यांनी इतर शाळा, महाविद्यालयांमधून पर्यावरणविषयक कार्यशाळा घेण्यास, स्लाईड शो करण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी निसर्गमंडळे स्थापन करण्यास मदत केली.
विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षण व निसर्गअभ्यासाची सवय लागावी, या उद्देशाने त्यांना नेचर क्लब स्थापन केला. माळी सरांनी वन्यजीवन, वन्यजीव संरक्षण, पक्षी जीवन, छायाचित्रण या विषयांवरील ग्रंथालय तयार केले असून आज या ग्रंथालयात एक हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचा समावेश आहे. जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी एका केंद्राची स्थापनाही त्यांनी केली आहे. पक्ष्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी कृत्रिम घरटी तयार करून त्यांचे मोफत वाटप या वेगवेगळ्या केंद्रांच्या माध्यमातून माळी सरांनी केले. आपल्याला आलेले अनुभव आणि आपला अभ्यास सगळ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी ‘जैवविविधतेतील नवलाई’ आणि ‘महाराष्ट्रातील अभयारण्ये’ या दोन पुस्तकांचे लेखन केले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना, डब्लू.डब्लू.एफ. अशा संघटनांच्या व्याघ्रगणना, पक्षीगणना अशा वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये माळी सर सहभागी होतात. महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेतर्फे नांदूरमधमेश्वर अभयारण्यात आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या राज्यस्तरीय संमेलनाचे ते निमंत्रक होते. माळी सर सध्या नाशिक जिल्ह्य़ात आढळणाऱ्या पक्ष्यांची चेकलिस्ट तयार करत आहेत. त्याचबरोबर या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काय करता येईल, त्यावर एक फिल्म तयार करण्याचेही काम सुरू आहे.
आज पश्चिम घाटातली निसर्गसंपदा धोक्यात असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. नव्या पिढीमध्ये या निसर्गसंपदेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी माळीसरांसारख्या हजारो शिक्षकांची अक्षरश: फौज उभी करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी उद्याच्या या हाका सावधपणे ऐकल्या आणि माळी सरांप्रमाणे सजगपणा दाखवला तर आपल्या देशातल्या जैवविविधतेचं संवर्धन करणे अवघड नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो