वाचावे नेट-के : चित्रकार आणि चित्रे
मुखपृष्ठ >> वाचावे नेटके >> वाचावे नेट-के : चित्रकार आणि चित्रे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वाचावे नेट-के : चित्रकार आणि चित्रे Bookmark and Share Print E-mail

अभिनवगुप्त, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२

दिलीप चित्रे यांच्या ब्लॉगवर एकच नोंद दिसते. ती एप्रिल २००९ची आहे आणि इथं आहेत एकंदर १२१ चित्रं. होय, एकच मोठ्ठी नोंद : त्यातलं लिखाण म्हणजे फक्त चित्रांची अत्यावश्यक मानली जाणारी माहिती (म्हणजे- चित्राचं शीर्षक, त्याची लांबीरुंदी आणि कोणत्या रंगसाधनानं ते केलंय याची माहिती, चित्र कधी पूर्ण झालं याचा दिनांक वा सन). बाकी प्रतिमा. इमेजेस. अजूनही दिलीप चित्रे यांचा तो ब्लॉग आहे, ती चित्रंही आहेत.. पण चित्रे नाहीत.


ही सर्वच्या सर्व चित्रं, त्यांच्या अखेरच्या प्रदर्शनातली आहेत. मुंबईत भरलेल्या या प्रदर्शनातली चित्रे यांची भेट अखेरचीच असणार, याचा अंदाज अनेकांना होता. तसंच घडलं. प्रदर्शनानंतर चित्रे हे जग सोडून गेले.  दिलीप चित्रे यांनी चित्रांमधून विचार केला होता. दिसणं आणि त्याचं चित्र होणं यांमध्ये काय फरक असतो याचा विचार त्यांनी केला होता, असं ही जवळपास सव्वाशे चित्रं आज सांगत आहेत. शिवाय, चित्रातून काही वेळा असा आकार दिसतो की, ‘हे मलापण करता येईल’ असं अनेकांना वाटावं. पण बाकीची चित्रं पाहिल्यास तो आकार साधा वाटत नाही. चित्राला जसं व्हायचंय, तसं त्याला होऊ देणं, हे अशा चित्रांमधून दिसतं. एकंदर सगळी चित्रं पाहिल्यावर काय वाटतं चित्रकाराबद्दल?
याबद्दल आपण त्या नोंदीखाली प्रतिक्रिया लिहू शकतो. चित्रे परत येणार नाहीत, पण त्यांची ही एकमेव नोंद, आता आपल्या प्रतिक्रियांखेरीज बाकी कुठल्या मार्गानं वाढणार नाही. चित्रे यांना कर्करोगानं ग्रासलं नसतं, ते आजही आपल्यात असते, तर कदाचित नोंदींची संख्या वाढलीही असती. नवं काही लिहिलेलं, रंगवलेलं, लोकांनाही पाहायला मिळावं म्हणून चित्रे यांनी इथं अपलोड केलंही असतं.
आफ्रिकेत, पूर्व आणि पश्चिम युरोपात, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत, दक्षिण आणि पश्चिम आशियात, ऑस्ट्रेलियात.. म्हणजे पंचखंडांच्या कुठकुठल्या भागांत चित्रे यांच्या इंग्रजी कविता आणि ‘सेज तुका’सारखी त्यांची पुस्तकं वाचलेले लोक होते. चित्रे यांचे हे चाहते. जगभरचे. चित्रे यांच्या ब्लॉगशी जुळून गेले असते.
हा एक मोठा साहित्यिक, ब्लॉगविश्वाला झळाळी देऊन गेला असता.
‘चाव्या’ हे दिलीप चित्रे यांचं छोटेखानी पुस्तक ज्यांनी वाचलंय, त्यांना चित्रे हे मराठीत ब्लॉगलेखक म्हणून किती महत्त्वाचे ठरले असते याची मनोराज्यं रंगवता येतील. मराठीतून लिहिताना, स्वतंत्र नजरेनं अख्ख्या जगाकडे पाहण्याची धमक आज ज्या ब्लॉगलेखकांकडे असते, ते वाचनीय ठरतात. मग चित्रे यांच्याकडे ही वैशिष्टय़ं तीन दशकांपूर्वी होती. हिंदी सिनेमांपासून अस्तित्ववादी कादंबरीकारांपर्यंत कुठलाही विषय ‘चाव्या’ला वज्र्य नव्हता आणि मुख्य म्हणजे या ‘चाव्या’ होत्या! मांडलेल्या विषयाबद्दल आणि लिखाणातल्या ‘म्हणण्या’बद्दल चर्चा-संवाद होणं लेखकाला -चित्रे यांना- अपेक्षित होतं. चांगल्या ब्लॉगलेखक-लेखिकांची अपेक्षा तरी कुठे वेगळी असते?
चित्रे यांच्या ‘चाव्यां’कडे पुन्हा पाहता येणं कठीण आहे. कठीण म्हणजे दुष्प्राप्य, या अर्थानं. ते पुस्तक ‘प्रास’नं काढलं होतं आणि त्याच्या फार थोडय़ा प्रती ‘लोकवाङ्मय गृह’ (पीपल्स बुक हाऊस) आदी दुकानांमध्ये मिळत असणार. मग किमान ‘तिरकस आणि चौकस’ हे पुस्तक तरी मिळतं का पाहावं.
चित्रे गद्य लिखाणात थेट संवाद साधतात, पण थेटपणाची पातळी निराळी. म्हणून संवादाचीही निराळी. भाषा सोप्पीच पायजे असा बालहट्ट कायम राखूनच लेखक आपला की परका हे ठरायला लागलं, तर चित्रेसुद्धा कदाचित वाळीत टाकले जातील. पण ‘सोप्या भाषेतल्या’ तुकारामाची महती जगाला समजण्यासाठी चित्रे यांचं लिखाण (आणि तुकारामाचं भाषांतर) हल्लीच उपयोगी पडलं, हा इतिहास आहे.
चित्रे यांच्या भाषेत सरळपणा होता म्हणून ते जगाला पटले, अशी छान साधी ओळख चित्रे यांना कधीच लाभली नाही. असलेलं, मिळवलेलं ज्ञान आणि त्यापुढलं ‘म्हणणं’ यांची सांगड घालताना चित्रे यांनी नवे मार्ग शोधले. ‘ज्ञान’ म्हणजे काय याचा विचार करण्याचे त्यांचे मार्ग महाराष्ट्रातल्या अन्य लेखकांपेक्षा वेगळे होते. ‘म्हणणं मांडण्या’मागचा चित्रे यांचा विचार हा काही आताच्या आता लोकांना शहाणं करण्याचा नव्हता. आपण काही म्हणावं, त्यावर लोकांनीही विचार करावा, एवढीच फार तर अपेक्षा. एक ‘शतकांचा संधिकाल’ या सदराचा (पुस्तकाचा) अपवाद; पण चित्रे यांचं बाकीचं लिखाण -विशेषत: गद्यलिखाण- एकरेषीय नाही. ते वाचताना वाचक अडतात, अडखळतात.. हे चित्रे यांना जणू अपेक्षित होतं की काय (लोकांनीही सहविचारी व्हावं, ‘सतर्क’ राहावं, यासाठी चित्रे यांच्या गद्य परिच्छेदांमध्ये ‘संकल्पनांचे भूसुरुंग’ पेरलेले असायचे की काय) अशी शंका त्यांचं एकूण काम पाहिल्यावर येते. चित्रे यांच्या एकूण कामात त्यांच्या मराठी व इंग्रजी कवितांचा वाटा मोठा आहे. व्युत्पन्न कवीची कविता वाचकाचा कस पाहते आणि अशा कवितेबद्दल ‘मला ही कविता कळली’ असं म्हणणं वाचकाला जडच जातं; पण ‘कवितेतून’ कळणं, ‘कवितेमुळे’ कळणं.. अशा (सरळवाचन अनुभवापेक्षा निराळ्या) अनुभवांपर्यंत या कविता नेऊ शकतात.
ब्लॉगजगतात चित्रे वावरले असते, तर -त्यातही मराठी ब्लॉगवर त्यांनी काही केलं असतं तर- तरुणांचे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक ही त्यांची ओळख (जी पुण्यातल्या एका तरुण टोळक्यामुळे सिद्धच झाली होती ती) आणखी दृढ झाली असती. वाचता वाचता विचार करायला लावणारं त्यांचं लिखाण यापुढेही (कायदेशीर मार्गानं) ब्लॉग किंवा संकेतस्थळावर येणं अशक्य नाही.
‘प्लॅनेट चित्रे’ हे संकेतस्थळ, ‘ब्लॉग’ हा शब्द प्रचलित होण्याआधी ज्या ‘जिओसिटीज’ किंवा ‘ट्रायपॉड’ वगैरे फ्री वेब-स्पेस देणाऱ्या वेबसाइट होत्या, त्यापैकी ट्रायपॉडवर आहे. आजही आहे. तिथं दिलीप चित्रे यांच्यासोबत त्यांच्या दिवंगत मुलाची, आशय चित्रे यांची ओळख होते. याच स्थळावरला फोटो सोबत तुम्हाला पाहता येईल. आशयच्या स्मृतिदिनी लिहिलेली एक कविता ‘अ‍ॅनिव्हर्सरी’ या विभागात, तर ‘पोएट्री कॉर्नर’मध्ये चित्रे यांच्या अन्य इंग्रजी कविता, अशी विभागणी आहे.
यापैकी एका कवितेनंच आजचा लेखांक संपवू, म्हणजे त्या कवितेतून चित्रे यांच्या ‘कठीण सोपेपणा’बद्दल वाचकांना विचार करता येईल. पण त्याआधी, या सदरात आत्ता आजच दिलीप चित्रे आले कुठून नि कशाला, याचा खुलासा : दिलीप चित्रे आज असते, तर त्यांनी पंचाहत्तरीत पदार्पण केलं असतं. १७ सप्टेंबर १९३८, ही दि. पु. म्हणजेच दिलीप चित्रे यांची जन्मतारीख आहे. तुकाराम असणे आणि ‘नुसते असणे’ यांतला फरक चित्रे यांनीच दाखवला होता. आता ‘नुसते नसणे’ आणि ‘चित्रे नसणे’ यांतला फरक कळल्यास त्याचंही श्रेय चित्र्यांनाच.
कवितेचं नाव : ‘एन्ड नोट’ :
It feels
So easy
To be
One
In a billion.
That's just statistic
For you
And for me
Poetry
उल्लेख झालेल्या ब्लॉग/ स्थळाचा पत्ता:
http:// chitre-dilip.blogspot.in
http://planetchitre.tripod.com

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो