आली गौराई अंगणी
मुखपृष्ठ >> लेख >> आली गौराई अंगणी
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आली गौराई अंगणी Bookmark and Share Print E-mail

शुक्रवार , २१ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज गौरीचं आगमन, कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. प्रियांका पावसकर श्रावण महिना संपता संपताच वेध लागतात ते भाद्रपदमध्ये येणाऱ्या गौरींचे.

गणपतीच्या आगमनानंतर तीन दिवसांनी वाजतगाजत आगमन होतं ते म्हणजे आपल्या लाडक्या गौराईचं.. ‘रुणुझुणुत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, घाली िलबलोण सडा..’ गौरींवर रचलेल्या अशा विविध गाण्यांचा गजर करत तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी प्रत्येक स्त्री गौरीचं थाटामाटात स्वागत करते, कारण ती माहेरवाशीण असते ना! आणि अशा या माहेरवाशिणीची विविध रूपं आहेत त्यामुळे घरोघरी तिचा थाटात पाहुणचार, तिची पूजाअर्चा करण्यासाठी लगबग सुरू झालेली दिसतेय.
उत्सव असो वा सण एखाद्या व्यक्तीला किंवा वर्गालाच आवडतात असं नाही, तर सर्वाना ते आवडतात म्हणूनच संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत ते तिच्या विसर्जनापर्यंत सारं काही पाहण्याजोगं असतं. खण, वेणी, नथ,

जोडवे, ठुशी, राणीहार, देवीहार, लक्ष्मीहार, वगरे शृंगाराने सजलेली ही माहेरवाशिणी प्रत्येकाच्या घरी आणण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोणाकडे खडय़ाच्या गौरी आणतात, कोणाकडे तेरडय़ाची, कोणाच्या घरी उभ्या गौरी तर कोणाकडे बठय़ा. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात, तर काही ठिकाणी गौरी उभ्या असून बिनहाताच्या असतात. गौर काहींच्या घरी गणपतीची आई म्हणून, तर काहींच्या घरी गणपतीची बायको म्हणून आणली जाते.
गौरी-गणपतीचं हे प्रस्थ कोकणात फार मोठं आहे. खडय़ाच्या गौर मुख्यत्वेकरून कोकणस्थ लोकांकडे आणल्या जातात. एखादी सवाष्ण अगर एखादी मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. पाणवठय़ावर एखादी जागा स्वच्छ करून तिथे या गौरी ठेवून तिची पूजा व आरती करतात. त्यांना प्रसाद दाखवला जातो. यानंतर गौरी आणणारी जी माहेरवाशीण असेल तिने तोंडात पाण्याची चूळ भरून रस्ताभर ती चूळ न टाकता मुक्या तोंडाने गौरी घरात आणायच्या असतात.
खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या अगर मुलीच्या हातात ताम्हण किंवा तांब्या असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद-कुंकू लावून तिला ओवाळून मग घरात घेतात. म्हणजेच गौरीला सोनपावलांनी दारातून आत घेऊन येतात. गौरी आणणाऱ्या मुलीने याच पावलांवर पाय ठेवून आत यायचे असते. आत आणल्यानंतर प्रथम गौरीला धान्याचे कोठार, स्वयंपाकाची खोली, नंतर सारे घर दिव्याच्या प्रकाशात दाखवले जाते. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून, खडे ठेवून त्याची हळद-कुंकू, आघाडा, दुर्वा, फुलं, गेजवस्त्र यांनी पूजा करतात. दमून आलेल्या लाडक्या माहेरवाशिणीसाठी पहिल्या दिवशी शेपूची भाजी, भाकरी हा मुख्य जेवणाचा बेत केला जातो. दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. या दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवायला बोलावून तिला विडा, दक्षिणा द्यायची पद्धत आहे. बायकांना दुपारी हळदी-कुंकवास बोलावले जाते. या दिवशी गौरीला घावनघाटल्याचा नवेद्य दाखवला जातो. सोबत पुरण, तळण व खीर इ. पदार्थाचा समावेश असतो. तिसरा दिवस विसर्जनाचा. या दिवशी गौरीला नवेद्याला गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नवेद्य दिला जातो. गौरी जाताना रांगोळी म्हणजे रुपयाची पाऊले रेखाटतात. गौरीच्या बरोबर दुपारच्या नवेद्याची शिदोरी किंवा दही-पोह्यंची शिदोरी दिली जाते. जातानाही मुकेपणानेच पाणवठय़ावर जाऊन तिथे पुन्हा एकदा आरती करून हळदी-कुंकू, अक्षता वाहून वाहत्या पाण्यात गौरींचं विसर्जन केलं जातं.
देशस्थांकडे काहींच्या घरी बठय़ा अथवा उभ्या गौरी बसवतात. यांच्याकडे गौरींचे मुखवटे घरच्या घरीच सांभाळून ठेवलेले असतात. हे मुखवटे पितळी, मातीचे अथवा शाडूचे असतात. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवतात. हे मुखवटे घरच्या सुना अथवा एक सासुरवाशिणी व माहेरवाशिणी अशा दोघी दारातून बाहेर जाऊन पुन्हा दारातून घरात आणतात. त्यानंतर दोघीही गौरीला घरातील तिजोरी, अन्नधान्याचे डबे इ. दाखवून ‘उदंड’ तसेच ‘गौरी आल्या सोन्याच्या पावली, महालक्ष्मी आल्या रुप्याच्या पावली’ असं म्हणण्याची पद्धत आहे.  अन्नधान्याचे डबे, धान्याचे कोठार, दुधाचे पातेले अशा ठिकाणी एकीने ‘इथे काय आहे’ विचारल्यावर दुसरीने ‘उदंड’ असं उत्तर द्यायचं असतं. धान्याची साठवण, दूध-दुभत्याचे भांडे तेथे असलेले ‘उदंड राहो’ असं त्यामागचा दृष्टिकोन मानला जातो. हे मुखवटे पितळी किंवा लाकडी स्टॅण्डवर बसवतात किंवा कोणी कोठय़ांना साडय़ा नेसवून त्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे, काही पितळी तर काही लाकडाचे असतात आणि काही ठिकाणी तर हात नसण्याची सुद्धा पद्धत असते.
त्या दोन गौरींना जेष्ठा आणि कनिष्ठा असे संबोधले जाते. दोघींच्या मध्ये एक बाळही ठेवतात. गव्हाच्या आणि तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडून त्याच्यासमोर गव्हाचा चौक घालतात. त्यांना अलंकाराने मढवतात. त्यांना सजवण्यासाठी नवीन साडय़ा, मुकुट, गळ्यातील अलंकार, बांगडय़ा इत्यादींची जोरदार खरेदी झालेलीच असते. त्यामुळे नटल्यानंतरचा त्यांचा थाट, शृंगार पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. पहिल्या दिवशी भाजी-भाकरीच्या नवेद्याने गौराई तृप्त होते. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं. काही लोक विसर्जनाच्या दिवशी ६४ योगिनीच्या फोटोलाही पूजतात. एका घागरीत पाणी भरून ती घागर कर्दळीच्या पानावर घवाच्या राशीवर काकडीच्या फोडी ठेवून त्यावर ठेवतात. तिच्यावर गंधाने ६४ योगिनी काढून त्यावर कलश ठेवून पूजा केली जाते.
तेरडय़ाची गौर पूजनाची पद्धत ही काहीशी वेगळी आहे. कोल्हापूर, नाशिक, सातारा भागांत गौरी पूजनाची ही पद्धत बरेचदा आढळून येते. तेरडय़ाचा जुडा एकत्र बांधून पाणवठय़ाजवळ आंघोळ घालून तिची पूजा करतात. ढोल-ताशांच्या गजरात तिचं आगमन केलं जातं. घरी आणल्यावर माहेरवाशिणीने गौरी आणली म्हणून तिने गौर घातली असं म्हटलं जातं. दारातून आत प्रवेश करताना जिने गौर आणली तिच्या पायावर पाणी घालून, हळदी-कुंकू, डोळ्याला पाणी लावून तिला ओवाळून उजव्या पायांनी तिचा घरात प्रवेश होतो. पाटावर अथवा चौरंगावर देवी बसवतात, त्यानंतर साडी नेसवून दागदागिने घालून तिला शेपू व भाकरीचा नवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गौरींइतकाच शंकराचा मानही मोठा असतो. घरात शंकराचं आगमन होतं. शंकरालाही पानवठय़ाजवळ आरती करूनच वाजतगाजत घरी आणलं जात. या दिवशी पुरणपोळी आणि मिक्स भाजीचा नवेद्य दाखवला जातो. या दिवशी सुपात शंकर-गौरी दोघांनाही सजवून औसा पूजन केले जाते.  तेरडय़ाला म्हणजेच गौरीला विडय़ाच्या पानाचे डोळे, नाक, ओठ काढून त्यात सोन्याचे मणीमंगळसूत्र, चांदीची जोडवी हे महत्त्वाचे दागिने परिधान करतात. तर शंकरालासुद्धा टोपी, शर्ट, उपरणं, धोतर नेसवून सजवलं जातं. भस्माने विडय़ाच्या पानाचे कान, नाक, डोळेही काढतात. त्यानंतर गौरी-गणपतीची आरती करून गौण नवेद्य दाखवला जातो. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना गौरीला औसा पूजन करावे लागते. सुपात दोऱ्याच्या गुंडय़ा गुंडाळून सुपात खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, सुपारी, हळकुंड, आक्रोड, बदाम, खारीक, पाच तऱ्हेची फळं, पाच प्रकारच्या मिथ्या, पाच भोपळ्याची पाने इत्यादी वस्तूंनी सूप सजवून सुवासिनी ते सूप पाच वेळा गौरीभोवती ओवाळतात नंतर ते गौरीच्या पुढय़ात ठेवतात. गौरीला नमस्कार करून मनातील इच्छा बोलतात. औसायला आलेल्या त्या सुवासिनींची ज्यांचाकडे गौरी असते ते खणानारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करतात. सुवासिनींच्या सुपातही पसे ठेवण्याची प्रथा आहे. रात्री गौर जागवतात. गौरीचे खेळ खेळले जातात. त्या वेळी काही स्त्रियांच्या अंगात गौर येते. त्या वेळी तिला कुठून आलीस, काय जेवलीस, असे प्रश्न विचारले जातात. गौरी विसर्जनाच्या दिवशी तिच्या पायांवर पाणी ओतून तिची दृष्ट काढली जाते. त्यानंतर तेरडय़ाची डहाळी घरावर टाकली जाते. सोबत गौरी विसर्जनानंतर पाच खडेही घरावर टाकले जातात.
गौरी आवाहन म्हणजेचं भाद्रपद सप्तमीच्या संध्याकाळी स्त्रिया नटून-सजून जवळच्याच समुद्रकिनाऱ्यावर जातात. किनाऱ्याच्या जवळपास असणाऱ्या तेरडय़ाच्या झाडाची फांदी तोडून ती गौरी रूपात कोळी गाण्यांवर ठेका धरत ढोल-ताशांच्या गजरात मोठय़ा उत्साहात आणली जाते. घराच्या उंबरठय़ाहून घरात प्रवेश करण्याआधी तिचे पाय धुतले जातात. तिला हळदी-कुंकू वाहून तिचे औक्षण केल्यानंतर ती घरात येते. दुसऱ्या दिवशी दुपारी गौरीला मांसाहाराचा नवेद्य दाखवला जातो. यात पापलेट, हलवा, खेकडा, चिंबोरी अशा काही महत्त्वाच्या मांसाहाराचा मान असतो. आता आता नवीन पिढीत शाकाहारी पदार्थ नवेद्य म्हणून दाखवले जातात. त्यात मालपोवा, उंबर अशा काही पदार्थाचा समावेश असतो. सायंकाळी गौरीला नटवून तिची पूजा केली जाते. माहेरवाशिणी या दिवशी उपवास धरतात व तो उपवास त्यांनी केवळ आपल्या माहेरीच सोडणे महत्त्वाचे असते. कोळ्यांच्या या गौरी उत्सवात स्त्रिया संध्याकाळी गौरीच्या मांडवाभोवती एकाच प्रकारच्या साडय़ा नेसून एकत्र जमतात. फुगडय़ा घालतात, फेर धरतात, कोळी समाजाची पारंपरिक पद्धतीची गाणी म्हणतात. दरम्यान, काही स्त्रियांच्या अंगात गौरी अथवा शंकर येतो अशी समज आहे. गौरीच्या पुढय़ात रीतीनुसार दोन त्रिशूल ठेवले जातात. जिच्या अंगात शंकराचा वारा येतो ती शंकराचा त्रिशूल उचलते. अंगात आलेल्यांना इतर जण काही प्रश्न विचारतात. नवमीच्या दिवशी स्त्री व पुरुष एकसारखा पेहराव करून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढतात व गौराईचं विसर्जन करतात.
‘उत्सवप्रिय: खलु मनुष्य:’ असं कालिदासाने म्हटलंय ते अगदी योग्यच आहे, कारण उत्सव किंवा सण प्रत्येक मनुष्याला आवडतात. खरोखरच, गौरी-गणपतीचा सण दैनंदिन जीवनात निर्माण झालेल्या निरसतेला दूर सारून हृदयात नवीन उत्साह निर्माण करतोच शिवाय परंपरागत चालत आलेल्या सणांच्या पद्धतींना नव्याने उजाळा देतो. आधुनिक युगात रुजू झालेल्या तरुण-तरुणींना उत्साहाच्या पारंपरिक पाकात भिजलेल्या सणांना जवळून पाहण्याची संधी मिळते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो