बुक-अप : गुगलच्या पलीकडले..
मुखपृष्ठ >> बुक-अप! >> बुक-अप : गुगलच्या पलीकडले..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बुक-अप : गुगलच्या पलीकडले.. Bookmark and Share Print E-mail

गिरीश कुबेर, शनिवार २२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

इरफान हबीब मार्क्‍सवादी. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाकडे डोळसपणे पाहणारे आणि त्या काळच्या समाजजीवनाचा, अर्थकारणाचा वेध घेणारे. त्यांनी त्यांच्या मुलासह सिद्ध केलेलं हे नकाशांचं पुस्तक..  महापुस्तकच म्हणावं, एवढा त्याचा आवाका आणि आकार. चांगलं दीड फूट उंच आणि फूटभरापेक्षाही रुंद असं पूर्ण वयात आलेलं हे पुस्तक; आपल्या इतिहासाच्या भूगोलाचं भान देतं आणि नकाशे काय शिकवू शकतात याची चुणूक दाखवतं..


शालेय काळात ज्या विषयी सपाट भावना असतात, असा विषय म्हणजे भूगोल. म्हणजे त्या विषयी नावड असते असं अजिबात नाही, पण आवडही नसते. बीजगणित, भूमिती आदींइतके आपले शिव्याशाप भूगोलाला पडत नाहीत. त्यानं आपल्याला इतकं सतावलेलं नसतं. पण त्याची गोडी लागावी असंही काही घडलेलं नसतं आणि दुसरं असं की शाळा संपली की भूगोल विषयाचा इतिहास होऊन जातो. खरं म्हणजे आर्किमिडीज सिद्धांत, पायथागोरस वगैरे मंडळीही शाळा संपली की आयुष्यातून निघून जातात. पण यांचं कसं आहे. या मंडळींना सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जबरदस्त असं उपद्रवमूल्य आहे आणि विज्ञान अभियांत्रिकी वगैरे शिकणाऱ्यांच्या नजरेतून उपयुक्तताही आहे. तेव्हा पायथागोरस वगैरे काही ना काही कारणाने लक्षात राहतात. भूगोलात पाहायचं काय? टुंड्रा, उंचसखल, दुष्काळी वगैरे प्रदेश लक्षात तरी किती ठेवायचे? आणि का? नकाशावाचनाचंही तसंच. मुळात भूगोलप्रेमाची बोंब. त्यामुळे नकाशाविषयी प्रेम निर्माण होणार कसं? त्यात आपल्याकडे आताआतापर्यंत नकाशाबरहुकूम असं फार काही नसायचं. म्हणजे नकाशात मोकळं मैदान असेल तर त्या जागी कधी इमारत होईल ते कळतही नाही आणि परत रोजचे पत्ते शोधायला आपला देशी मार्गच चालतो आपल्याकडे. म्हणजे असं.चार पावलं सरळ गेलात की.डावीकडे वळा.कोपऱ्यावरच्या हनमानाच्या मंदिरापासनं दोन मिनिटावर माझं घर.ही आपली पत्ता सांगण्याची राष्ट्रीय पद्धत. त्यामुळे नकाशावाचन असं काही आपण शिकतच नाही आणि इतर अनेक मुद्यांप्रमाणे या बाबतही नंतर लक्षात येतं की हे वाटतं तितकं कंटाळवाणं नाही. त्यात पाश्चात्त्य जगात राहायची वेळ आली की कळतं नकाशावाचनातही गंमत असते आणि त्यात दिल्याप्रमाणे आसमंत खरोखरच असू शकतो.
खरं म्हणजे इतिहास, भूगोल आणि नकाशा हे विषय हातात हात घालूनच चालतात. इतिहासावर प्रेम जडलं की त्या इतिहासाला जन्म देणारा भूगोल खुणावायला लागतो आणि त्या भूगोलाचा शोध घ्यायला सुरुवात केली की नकाशाचा आधार घ्यावा लागतो. वास्तविक भारतीय मनाला इतिहासाचं कोण आकर्षण असतं. मग तो शिवाजीचा इतिहास असू दे, पेशव्याचा किंवा आणखी कोणाचा. या सगळय़ांना सामावून घेऊनही दशांगुळे वर राहील असा आपला इतिहास आहे. ज्या भूमीत महाभारत जन्माला आलं, त्या भूमीतल्या आपल्याला अन्यत्र काही पाहायची आवश्यकताही नाही. पण तरी या इतिहासाकडे आपण कमालीचं दुर्लक्ष केलेलं आहे. जगात असे अनेक देश आहेत की त्यांचा चिंधीएवढा इतिहास ते जिवापाड जपतात आणि आपल्याकडे इतका भरजरी इतिहास आहे.तरी त्याची वर्तमानात आपल्याला किंमत नाही.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं नुकतंच काढलेलं अ‍ॅटलस ऑफ एन्शट इंडियन हिस्टरी हे महापुस्तक पाहिलं आणि इतिहासाच्या स्मृतीची पानं मनात फडफडू लागली. होमो सेपियन्सच्या.म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीपासून ते अलीकडच्या इतिहासातला भारत हा या पुस्तकाचा विषय आहे. इरफान हबीब या तगडय़ा इतिहासकारानं या पुस्तकाचं लेखन केलंय आणि फैज हबीब यांनी त्यातल्या नकाशांचं रेखांकन. हे पुस्तक इतर पुस्तकांप्रमाणे वाचायचं नाही. तर ते अनुभवायचं आहे. अनुभवून थक्क होऊन जायचं आहे. ऑक्सफर्डच्या इथल्या कार्यालयानं खास बुक अपसाठी म्हणून ते पाठवलं आणि उघडल्यानंतर त्याच्या आवाक्यानं थक्क होण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. मुळात हबीब यांचा इतिहासाच्या भौगोलिक मांडणीतला अनुभव मोठा आहे. हबीब अलिगड मुस्लीम विद्यापीठात इतिहासाचं अध्यापन करतात. इतिहास अभ्यासाची परंपरा घरातलीच. वडील महंमद हबीब हेही जाणकार इतिहासकार. धाकटय़ा हबीब यांनी हा अभ्यास आणखी पुढे नेला. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिक रिसर्च या महत्त्वाच्या संस्थेचे ते अध्यक्षही होते. ते बातमीत झळकले अटल बिहारी बाजपेयी सरकारच्या काळात. त्यावेळचे मानव संसाधन मंत्री मुरली मनोहर जोशी यांच्या इतिहास पुनर्लेखन प्रकल्पास यांनी विरोध केला तेव्हा. इतिहासाच्या भगवेकरणास हबीब यांनी कडाडून विरोध केला होता त्यावेळी. हबीब हे कडवे मार्क्‍सवादी आहेत. तेव्हा हे ओघानं आलंच. अ‍ॅग्रेरियन सिस्टीम ऑफ मुगल इंडिया हे त्यांचं पहिलं पुस्तक. मोगल साम्राज्यकालीन भारताचा नकाशा हा त्यांचा आणखी एक कौतुकास्पद असा प्रयोग. पुढे जवळपास दीड डझन पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. केंब्रिज विद्यापीठाच्या भारतविषयक इतिहासाच्या पुस्तकाचं संपादनही त्यांनी केलंय.  
हे सगळं नमूद करायचं ते लेखकाची खोली आणि उंची समजावी म्हणून. ऑक्सफर्डचं ताजं पुस्तक हे नक्कीच त्यांची उंची आणखी वाढवणारं. त्यात त्यांना मदत केली आहे त्यांचा मुलगा फैज हबीब यानं. इतिहासातील नकाशे बनवणं हे त्याचं विशेष अनुभवक्षेत्र. काय विलक्षण कुटुंब आहे. आजोबा इतिहासकार. त्यांच्या इतिहासाच्या प्रेमाला मुलानं अधिक सैद्धांतिक स्वरूप दिलं आणि मुलाच्या या प्रयत्नांना त्यांच्या मुलानं शब्दश: आकार दिला. केंब्रिज, संयुक्त राष्ट्रसंघ आदींच्या अनेक इतिहासकालीन पुस्तकासाठी फैज यांनी नकाशालेखन केलेलं आहे.
पण या दोघांची आतापर्यंतची सर्वोत्तम कलाकृती कोणती असेल तर ती म्हणजे ऑक्सफर्डचं हे पुस्तक. भारताचे वेगवेगळय़ा काळातले नकाशे पाहाणं आणि त्या अनुषंगानं त्या काळाचा इतिहास समजून घेणं, समजलेला असेल तो आठवणं हे सगळंच विलक्षण आनंददायी आहे. माकडापासून मानव झाला असं मानलं तर त्या काळातला भारत, प्रागैतिहासिक काळातला भारत, सिंधू संस्कृती उदयाला आली त्या वेळचा आपला देश, पुरातत्त्व काळातला..इसवी सन पूर्व १८०० ते ६०० या काळातला भारत, त्या काळच्या इतिहासातून दिसणारा भारत, मौर्यांच्या काळातला देश, आर्थिक नजरेतून भारताचा आकार, कौटिल्यानं अर्थशास्त्र लिहिलं त्या काळातल्या संकल्पना आणि संदर्भाच्या आधारे भारताचा नकाशा, देशाच्या आकाराचे राजकीय संदर्भ, इ. स. ५०० ते ७५० या काळातला भारत, नद्यांचा इतिहास..असा आपला देश आपल्याला विविधांगांनी या पुस्तकातून समोर येत राहतो आणि आपण अक्षरश: हरखून जातो.
आणि परत हे नकाशे काही नुसते रेषांच्या आकाराचे नाहीत. म्हणजे समजा मानवाच्या उत्क्रांतीच्या काळचा देशाकार घेतला तर माणसं कुठून कुठे स्थलांतर करत होती, त्यांचा मार्ग काय होता, कोणत्या प्रदेशात माणसाच्या कोणत्या जाती-प्रजाती alt

राहत होत्या.इतका सारा तपशील त्या नकाशांत आहे. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या काळचा देश घेतला तर कोणत्या प्रदेशात त्यावेळी काय काय पिकत होतं..तेही यावरून कळतं. ज्वारी कुठे होती. रागी कोणत्या प्रांतात पिकायची, सोन्याच्या खाणी कुठे होत्या, कोणत्या प्रांतात चांदी मोठय़ा प्रमाणावर मिळत गेली.असं अगदी सहज कळतं आणि त्या इतिहासाचे धागेदोरे इडली-सांबाराच्या वर्तमानापर्यंत आलेले पाहून समाधानाचा ढेकर येतो. पुस्तकात ऋग्वेदाच्या काळातल्या इतिहासाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय आणि त्या काळातल्या प्रांतांचं रेखांकनही करण्यात आलंय. आपल्या परमप्रिय.. आणि तरीही दुर्लक्षित आणि कुपोषित- नद्याही आपल्याला याच प्रकरणात भेटतात. आपण ज्या नदीची चर्चा करतो, ती सरस्वती एकटी नव्हती, तर त्याच नावच्या तीन नद्या होत्या. ऋग्वेदात सरस्वतीचा संदर्भ वारंवार आलेला आहे आणि कदाचित नदी देवतेलाही सरस्वती म्हटलं गेलं असावं असं नमूद करून हबीब तीन वेगवेगळय़ा सरस्वतींचे मार्ग समजावून सांगतात. या नदीचा ग्रीक संदर्भ ते उलगडून दाखवतात आणि ते वाचताना तेव्हाच्या आपल्या आकाराची कल्पना येऊ लागते. शरयू नदीचंही तसंच. ही नदी आपल्याला रामायणातही भेटलेली असते. या नदीच्या नावाचं इराणी-पर्शियन कूळ समजावून घेताना आपलाच इतिहास आपल्याला नव्यानं सापडतो. नदीस्तुती स्तोत्रात आलेला सिंधूचा संदर्भ आणि तिचे थेट वरुणाशीच असलेले लागेबांधे वाचले की इतिहासाच्या सकस प्रवाहाची खोली कळू लागते. इतकं सगळं यात आहे म्हटल्यावर गंगा-यमुना वगैरे बहुचर्चित नद्याही असणारच. त्याच्या जोडीला या नद्यांच्या काठच्या जमाती, टोळय़ा वगैरे पूरक तपशीलही आहे.
सर्वसाधारणपणे भारतीय मनाला आकर्षण असतं ते महाभारताचं. डोळय़ाला पट्टी लावून आयुष्य काढणारी गांधारी.ती खरोखरच गांधारची.म्हणजे आताच्या अफगाणिस्तानची होती का? तो कुरू नक्की कोणत्या प्रदेशातून आला? त्या प्रदेशात आता काय आहे? मगधाचा माग आता कसा काढायचा? अशा सगळय़ा छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हे पुस्तक मदत करतं.
शिवाय नकाशे संपले की प्रत्येक नकाशावर एक एक प्रकरण त्यानंतर आहे. म्हणजे नकाशा पाहायचा आणि त्या नकाशाच्या क्रमांकाच्या प्रकरणाकडे यायचं. पहिली दोन प्रकरणं फारच प्राचीन वगैरे आहेत. अभ्यासकांसाठी ती महत्त्वाची असतील. पण सर्वसामान्यांना मजा येऊ शकते ती तिसऱ्या नकाशापासून आणि त्याच क्रमांकाच्या प्रकरणापासून. हे प्रकरण सिंधू खोऱ्याला हात घालतं. पाचव्यात मौर्य वगैरे मंडळी आली की इतिहास तसा ओळखीचा वाटायला लागतो. गौतम बुद्धाचा काळदेखील यातून सुरेखपणे समोर येतो. त्या काळचा मागोवा घेताना पाली भाषेतील मूळ ग्रंथांचा संदर्भ, त्याचे आधुनिक सिंहली संस्कृतीशी असलेले संबंध, मौर्य काल आणि अंगुत्तरात उल्लेखलेले १६ महाजनपद या सगळय़ाचं सविस्तर विवेचन यात आहे. याच नकाशात पाणिनीचाही कालखंड आहे. त्याच्या अष्टाध्यायीत त्या काळच्या अनेक प्रांतांची आणि जातीजमातींची नावं आहेत. आपल्याला पाणिनीचं व्याकरणापलीकडे फारसं काही माहीत नसतं आणि व्याकरणात त्यानं नेमकं केलं काय.याचाही अंदाजा नसतो. तो या पुस्तकातून येऊ शकेल. मौर्य काल, अशोकाचं साम्राज्य, ब्राह्मी भाषा, नंतर प्राकृत भाषेचा उगम हे सगळं नकाशात पाहून थक्क व्हावंच लागतं.
 मला स्वत:ला जास्त मजा आली ती कौटिल्याच्या काळातील भारत समजावून घेण्यात. मुळात या आर्य चाणक्याने बरेच उद्योग केले. तक्षशिला विद्यापीठात शिकवण्याचं काम करता करता नंद साम्राज्याला गाडून चंद्रगुप्ताला गादीवर बसवलं आणि वर पुन्हा राज्य कसं करायचं याचेही धडे दिले. अर्थशास्त्र लिहिलं ते वेगळंच. आधुनिक अर्थशास्त्राचा पाया त्यानंच घातला असंही मानलं जातं. तेव्हा त्याचा काळ या पुस्तकातून समजावून घेणं.त्या काळात कोणत्या प्रदेशातून कसला व्यापार होत होता.हे सगळंच जाणून घेणं विलक्षण समाधान देणारं आहे.
या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय़ हे की ते इतिहासाच्या गंभीर अभ्यासकांना जितकं महत्त्वाचं वाटेल तितकंच महत्त्वाचं ते साध्यासोप्या इतिहासप्रेमींनाही वाटेल. हे असं सोपं नसतं. हबीब पितापुत्रांनी हे काम सहज केलंय. सुरुवातीला या पुस्तकाचा उल्लेख महापुस्तक असा केला. त्याचं कारण त्याचा आवाका आणि आकार. चांगलं दीड फूट उंच आणि फूटभरापेक्षाही रुंद असं पूर्ण वयात आलेलं हे पुस्तक आहे. एका हातानं कदाचित उचलताही येणार नाही. त्यामुळे ते असं पडून वगैरे वाचता येणार नाही अशीच व्यवस्था आहे. टेबलावर ते पसरावं लागतं आणि उभं राहून अदबीनं पानं ओलांडावी लागतात. पुस्तकाची किंमतही आकाराप्रमाणेच तगडी आहे. पण इतिहासावर प्रेम करणाऱ्यांना ती काही फार वाटणार नाही.
आणि दुसरं म्हणजे ही नकाशा रेखांकन कला आपल्याकडे अद्याप विकसित व्हायची आहे. यात मापानुसार रेषा वळावी लागते. अक्षांश-रेखांशदेखील जपावे लागतात. त्यामुळे त्या अर्थानंही हे पुस्तक अत्यंत मूल्यवान आहे. आणि हल्ली तर काय नकाशा म्हटलं की गुगलच माहिती असतं सर्वाना. गुगल मॅप्समुळे वरवरचं वर्तमान कळू शकतं. पण इतिहासातली आपली पाळंमुळं खणून काढायची असतील तर हे अशा प्रकारचं काम करावं लागतं.
त्या गुगलच्या पलीकडल्याचं आकर्षण रुजावं यासाठीच..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो