काचेच्या इमारतींमागचं ‘दाहक’ वास्तव
मुखपृष्ठ >> लेख >> काचेच्या इमारतींमागचं ‘दाहक’ वास्तव
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

काचेच्या इमारतींमागचं ‘दाहक’ वास्तव Bookmark and Share Print E-mail

मनोज अणावकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काचेच्या इमारतींमुळे वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेतल्यास काचेच्या इमारतींमधला फोलपणा लक्षात येतो. एखादी दुर्घटना झाल्यास अशा प्रकारच्या इमारतींमुळे माणसाच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, याची प्रचीतीच वांद्रे-कुर्ला संकुलात सिटी बँकेच्या इमारतीला लागलेल्या आगीने आली आहे. अलीकडेच मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात सिटी बँकेच्या इमारतीला आग लागल्यानंतर काचेच्या इमारतींची सुरक्षितता आणि या इमारतींचे पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबतचा विषय चच्रेत आला. कुठलीही गोष्ट करण्याआधी त्यावर सखोल विचार करावा, हे आता केवळ सुवचन म्हणूनच उरते आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. म्हणूनच कुठलीही दुर्घटना होऊन त्यावर साधकबाधक चर्चा झाल्याशिवाय त्या विषयाचा सखोल अभ्यास करायचाच नाही, हा पायंडाच पडतो आहे. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या मुळाशी खरं तर अशा सखोल अभ्यासाचा व विचारमंथनाचा परिपाक असायला हवा, मात्र सध्याच्या कथित प्रगतीमागे केवळ पाश्चात्यांचं आकर्षण, अंधानुकरण आणि शोभेची हाव याच गोष्टी अधोरेखित होताना दिसतात आणि त्याचा परिणाम म्हणजे अशा दुर्घटना होतात.
आपण जर काचेचा इतिहास बघितला, तर मूलत: ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाला जर थंड होण्यासाठी गरजेपेक्षा कमी वेळ मिळाला, तर दगड तयार होण्यासाठी आवश्यक स्फटिकीकरणाची प्रक्रिया होत नसल्यामुळे, एकसंध असा काचेसारखा दिसणारा दगड तयार होत असल्याचं मानवाला आढळून आलं. त्याचा वापर अश्मयुगात धारदार हत्यारं तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. पण प्राचीन इजिप्तमधल्या किनारपट्टीच्या भागातल्या उत्तर सीरियात प्रथम काच तयार झाल्याचं पुरातत्त्व अवशेषांवरून आढळून आलं आहे. त्यानंतर मूर्ती, भांडी, दिव्यांची कोंदणं, म्हणजेच लॅम्पशेड्स तयार करण्यासाठी काचेचा वापर होऊ लागला. ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये छताला रंगीबेरंगी काचा बसवलेल्या आढळून येतात. हे सगळं इतकं मन मोहून टाकणारं होतं की याची भुरळ पडली नसती तरच नवल. जसजसा काळ बदलत गेला, तसा इमारतींमध्ये होणारा काचेचा वापरही बदलत गेला. झडपा असलेल्या लाकडी खिडक्यांची जागा काचा लावलेल्या उघडझाप करता येण्याजोग्या खिडक्यांनी घेतली. मग सरकवता येणाऱ्या आणि काचेची तावदानं असलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या खिडक्या आणि मग विशेषत: आरशासारख्या दिसणाऱ्या आणि संपूर्णपणे काचेनं ल्यायलेल्या कार्यालयीन इमारती! असा हा इतिहास घडला.
युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर तिथं वैज्ञानिक सुधारणांचं वारं वाहू लागलं. १८५७ साली एलिशा ओटीस यांनी जेव्हा पहिली माणसं वाहून नेणारी लिफ्ट म्हणजे उद्वाहन तयार केलं. भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी  तार, दूरध्वनी, रेल्वे अशा विविध दूरसंवाद आणि दळणवळणाच्या तसंच इतर तांत्रिक सोयीसुविधा आणल्या. त्याचं आम्हा भारतीयांना फार मोठं अप्रूप वाटलं आणि मग त्यातूनच जन्माला आलं, ते एकूणच पाश्चात्त्यांबद्दलचं आकर्षण! मग हे आकर्षण केवळ आकर्षण न राहता, त्यानं भारतीयांना अंधानुकरणाच्या सवयीचा गुलाम करून टाकलं. काचेनं आच्छादित केलेल्या इमारतींचं खूळ आमच्या डोक्यात कसं शिरलं, याचा हा पूर्वेतिहास होय.
काचेच्या इमारतींचा विचार करताना तो प्रामुख्याने दोन पातळ्यांवर करावा लागतो. एक म्हणजे आगीसारख्या दुर्घटनांमध्ये या इमारतीच्या वापरकर्त्यांना असलेला धोका आणि भारतासारख्या उष्ण कटिबंधातल्या हवामानात या इमारतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम!
प्रथम आपण अग्निसुरक्षेचा विचार करू. दरवाजे-खिडक्यांचं क्षेत्रफळ मजल्याच्या क्षेत्रफळाच्या २० ते ३० टक्के इतकं असल्यास, इमारतीच्या खोल्यांमध्ये पुरेशी हवा आणि उजेड खेळती राहण्यास मदत होते, असं ‘नॅशनल बििल्डग कोड- २००५’ अर्थात ‘राष्ट्रीय इमारत संहिता- २००५’ मध्ये म्हटलं आहे. इमारतीच्या खोल्यांचं क्षेत्रफळ, खिडक्या असलेल्या िभतीची दिशा आणि वाऱ्याची दिशा असे अनेक घटक आग वाढेल की शमेल, हे ठरवत असतात. जर खोलीचं क्षेत्रफळ लहान असेल (म्हणजेच िभती अधिक संख्येने आणि कमी अंतरावर असतील) आणि खिडक्यांचं क्षेत्रफळही कमी असेल, तसंच वारा वाहत असलेल्या दिशेला खिडक्या समांतर किंवा त्याच दिशेत असतील, तर खोलीत हवेचा दाब बाहेरच्या दाबाच्या तुलनेत जास्त असल्याने खोलीतली हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच आतून बाहेर जाईल. अशा इमारतींमध्ये आग लागली तर हे दरवाजे-खिडक्या महत्त्वाची भूमिका बजावतात. आत कोंडलेला धूर बाहेर पडण्यासाठी याच खिडक्यांचा उपयोग होतो. त्यामुळे अशा खिडक्यांच्या बाहेर काचांचं किंवा अ‍ॅल्युमिनियमचं किंवा धातूचं आच्छादन असेल, तर धूर बाहेर पडायला जागा उरणार नाही आणि आत अडकलेल्या लोकांचा धुरात कोंडून मृत्यू ओढवू शकतो. जर खोल्यांचं आणि खिडक्यांचं क्षेत्रफळ बऱ्यापकी मोठं असेल, म्हणजेच िभती संख्येनं खूपच कमी आणि लांब लांब अंतरावर असतील, तसंच खिडक्या असलेल्या इमारतीच्या िभतीच्या दिशेने वारा वाहत असेल, तर वाऱ्याबरोबर खिडक्यांबाहेरून खोलीच्या आत शिरणारी ताजी हवा मोठय़ा प्रमाणावर प्राणवायूचा पुरवठा करील. खोलीत अडकलेल्या आणि धुरात गुदमरणाऱ्या लोकांसाठी जरी हे चांगलं असलं, तरी भडकलेल्या आगीला, जर शुद्ध प्राणवायूचा पुरवठा झाला, तर तो इंधनासारखं काम करीत असल्यामुळे आग आणखीनच भडकू शकते. म्हणूनच मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वेळीही हे अधोरेखित झाले होते, की जिथं िभती कमी होत्या तिथं नुकसान अधिक झालं होतं, तर जिथं िभती अधिक होत्या किंवा दुहेरी होत्या, तिथं आगीने कमी नुकसान पोहोचवलं होतं. यावरून हे लक्षात येईल की, इमारतींना बाहेरच्या बाजूने बसवलेल्या काचा किंवा धातूचे पत्रे हे आग वाढवण्यात किंवा कमी करण्यात फार मोठी किंवा कोणतीही निश्चित भूमिका बजावत नाहीत. कारण ती वाढणं किंवा कमी होणं हे इतरही अनेक घटकांवर अवलंबून असतं. मात्र अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यासाठी खिडक्या बऱ्याचदा महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी जर या खिडक्यांसमोर अशा काचांची किंवा धातूची उघडता न येणारी पक्की तावदानं बसवली असतील, तर मात्र, अनेकांच्या सुटकेचा मार्ग बंद होतो, हे धोकादायक आहे. तसंच आगीच्या वेळी वाढलेल्या तापमानामुळे जर या काचा तडकल्या किंवा धातूचे पत्रे तापले, तर त्याची झळ आतल्या लोकांना तर बसेलच, पण लोकांच्या सुटकेसाठी खिडक्यांचा उपयोग करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या दृष्टीनेही ते धोकादायक आहे. तसंच या सगळ्याची काळजी घेत आग नियंत्रणात आणण्यात अडथळे आल्यामुळे जो वेळ वाया जाईल, त्यामुळे पसरणारी आग जीवित आणि मालमत्तेचं अधिकच नुकसान करू शकते.
अग्निसुरक्षेइतकाच दुसरा महत्त्वाचा ठरणारा मुद्दा आहे, तो या काचांच्या वापरामुळे वाढणाऱ्या उकाडय़ाने होणारे पर्यावरणातले बदल आणि ऊर्जा-नासाडीचा! गेल्या ३०-३५ वर्षांपासून इमारतींना काचेचं आच्छादन पुरवण्याची पद्धत प्रामुख्याने थंड प्रदेशातल्या पाश्चात्त्य देशांमध्ये अस्तित्वात आली. हे लोण भारतात साधारणपणे १७-१८ वर्षांपूर्वी आलं. त्या वेळी वांद्रे-कुर्ला संकुलात व्यावसायिक इमारती फार मोठय़ा प्रमाणावर उभारल्या जात होत्या. हॉटेलमध्ये गेल्यावर ज्याप्रमाणे शेजारच्या टेबलावरच्या माणसाच्या पुढय़ातला पदार्थ पाहून मलाही तो हवा असं वाटतं, तसंच काहीसं इथंही झालं. एका इमारतीला अशा प्रकारे काच किंवा धातूचं आच्छादन बसवलेलं पाहिल्यानंतर साथीच्या रोगाप्रमाणे या भागात अशा काचाच्छादित इमारतींची साथच पसरली. अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच अतिनील किरणांपासून हे आच्छादन इमारतीच्या आतल्या भागाला संरक्षण देतं अशा प्रकारचे फायदे सांगणारी जाहिरात याचे उत्पादक आणि विक्रेते करतात. मात्र त्यामुळे या इमारतींच्या बाहेरच्या भागात परावर्तित झालेल्या किरणांमुळे मोठय़ा प्रमाणावर उष्णता वाढून आजूबाजूच्या तापमानात बरीच वाढ होते. उत्तर युरोप आणि कॅनडा यांसारख्या थंड प्रदेशात बांधल्या गेलेल्या अशा प्रकारच्या इमारतींमुळे तिथल्या तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी सुसह्य़ होण्यास मदत झाली, पण हाँगकाँग आणि बँकॉकसारख्या उष्ण कटिबंधातल्या अथवा जपानसारख्या समशीतोष्ण कटिबंधात बांधल्या गेलेल्या काचाच्छादित इमारतींमुळे तिथल्या तापमानात वाढ झाल्याचं अभ्यासकांना आढळून आलं आहे. असाच अनुभव वांद्रे- कुर्ला संकुलातही येतो. दिवसा या परिसरातून फिरताना उकाडा आणि उन्हाचे चटके बसल्याचं जाणवतं. पण या सगळ्या गोष्टी लक्षात कोण घेतो? परदेशाचा दौरा करून आल्यावर तिथं बघितलेल्या गोष्टी आपल्याकडे लागू करण्याची वृत्ती आपल्याकडे बऱ्याचदा बघायला मिळते.
आपल्या प्रदेशाची प्रकृती बघून इमारतींचं बांधकाम साहित्य निवडण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या आपल्या भारतीय पद्धतीला आधुनिक वास्तुशास्त्रात मूठमातीच दिली जाते आहे. बांधकाम साहित्याचा इतिहास लक्षात घेतला, तर इंग्लंडमध्ये इमारतींच्या बांधकामासाठी आधी दगडांचा आणि नंतर काँक्रीटचा वापर केला जाऊ लागला. प्रत्येक पदार्थाची ‘थर्मल कण्डक्टिव्हिटी’ अर्थात ‘उष्णता साठवून ठेवायची क्षमता’ वेगवेगळी असते. दगड किंवा काँक्रीटची उष्णता साठवायची क्षमता ही माती किंवा लाकडाच्या तुलनेत खूपच जास्त असते. त्यामुळे थंड प्रदेशांमध्ये दगड आणि काँक्रीटचा वापर हा इमारतीत आल्हाददायक वातावरण राखायच्या दृष्टीने तारक ठरला. पण त्या काळात आपल्याकडे भारतात घरांच्या िभती आणि छतासाठी मातीच्या िभती, किंवा मातीच्या विटांच्या िभती तसंच लाकडाचा आणि नारळाच्या झावळ्यांचा किंवा मातीच्या कौलांचा वापर प्रामुख्याने केला जात होता. घरासमोरचं अंगण आणि िभती या बाहेरच्या बाजूने शेणाने सारवल्या जात होत्या. िभतींवर केलं जाणारं हे माती किंवा शेणाचं िलपण त्यांच्या उष्णतारोधक गुणधर्मामुळे थंडावा राखायचं काम करीत होतं. पण उष्णता शोषून न घेण्याचा गुणधर्म असलेली माती किंवा शेण या काचांप्रमाणे उष्णता परावर्तित करीत नव्हते. घराच्या आजूबाजूला असलेली झाडंपेरं वातावरणातला कार्बन डाय-ऑक्सॉइड कमी करून थंडावा राखण्यासाठीही मदत करीत होती. सध्याच्या काळात गगनचुंबी इमारती बांधल्या जात असताना त्यांच्या िभती माती किंवा शेणाने िलपाव्यात असं कोणी म्हणणार नाही. पण किमान काचा किंवा धातूसारख्या बांधकाम साहित्याचा केवळ अनुकरणासाठी किंवा सौंदर्याची विचारशून्य आवड म्हणून केला जाणारा वापर तरी थांबवणं गरजेचं आहे. नाही तर एकीकडे जागतिक तापमान वाढीवर परिसंवाद आयोजित करून भाषणं द्यायची आणि दुसरीकडे उष्णतेत भर घालणाऱ्या गोष्टी करायच्या, असा दुटप्पीपणा म्हणजे पर्यावरणाविषयीचा ढोंगी उमाळा व्यक्त करण्यासारखंच होईल. शिवाय नसíगक ऊर्जा स्रोतांमध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबर आणि शहरीकरणाबरोबर ऊर्जेची गरज वाढत जाणार असताना, जर हवाबंद इमारती निर्माण करून वातानुकूलनासाठी आणि विनाकारण दिवसरात्र दिवे जाळण्यासाठी ऊर्जेची नासाडी करणाऱ्या काचाच्छादित इमारती जर आपण बांधणार असू, तर आपण आपल्या पुढल्या पिढय़ांना केवळ अंधारातच लोटणार नाही, तर विजेचा वापर अवलंबून असलेली त्यांची सर्वच प्रकारची प्रगती आपण खुंटवणार आहोत. आणि त्यांना अधोगतीच्या मार्गावर लोटणार आहोत, याचं भान ठेवून अशा इमारती बांधणं तात्काळ बंद करायला हवं. सरकारनंही या गोष्टीची दखल घेऊन अशा इमारतींच्या बांधकामाला मनाई करायला हवी. तसं केलं तर वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या दुर्घटनांसारख्या काही घटना घडल्या, तर किमान जीवित आणि मालमत्तेचं नुकसान कमी व्हायला मदत होईल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो