एक उलट..एक सुलट : रंगमगन
मुखपृष्ठ >> लेख >> एक उलट..एक सुलट : रंगमगन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

एक उलट..एक सुलट : रंगमगन Bookmark and Share Print E-mail

अमृता सुभाष , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

चित्रकला या विषयात शून्य गती असणारी मी कायम त्याला टाळतच आले, पण आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर त्याची सतत भेट होत गेली. रंगाची भाषा कळायला लागली नि लक्षात आलं, चित्रं काढता आली नाहीत तरी ती बघता येणं आणि बघताना त्या शांततेच्या अवकाशात जाणं.. हा अनुभवही विलक्षणच..तो अनुभव मला दिला रंगांशी बोलणाऱ्या अनेक माणसांनी आणि अर्थातच रंगमगन पॉल क्लीनं ..
मला लहानपणी ‘चित्रकला’ विषयात शून्य गती होती. माझ्यात, माझ्या हातात ही कला नाही हे दारुण सत्य लहानपणी चित्रकलेच्या पेपरात नाइलाजाने काढाव्या लागलेल्या काही चित्रांमुळे स्पष्ट समोर येत होतं. आपल्या मनात असलेलं चित्रं आणि हातातून कागदावर उमटणारं चित्रं यातला फरक विदारक होता. तो त्या लहान वयातही मला फार क्लेश देऊन जाई. चित्रांचं राहूच देत, जीवशास्त्राच्या पेपरात बाईंनी माझ्या आकृतीला सहापैकी एकच गुण दिला होता. न राहवून मी ‘‘का बाई, मी आकृतीला नावं बरोबर दिलीत ना..’’ असं आशाळभूतासारखं विचारून गुण वाढवून घ्यावा म्हणून गेले तर बाईंनी ‘‘नावांचं ठीक आहे, पण आकृतीचं काय?’’ असं म्हणून भिरकवून दिलेली उत्तरपत्रिका जमिनीवरून विषण्ण मनानं उचलताना मनभर जो काळाभोर रंग पसरला होता तो मी विसरूच शकत नाही. त्यामुळे एकूणच चित्रं, आकृत्या, रेषा, पेन्सिल, शुभ्र कागद, रंग, ब्रश यांच्याविषयी आणि चित्रं काढता येणाऱ्यांविषयी राग आणि असूयाच वाटायची. शाळेत असेपर्यंत धुसफुसत, खोडरबरने हजारदा खोडत, पांढऱ्या कागदावर खोडून खोडून त्याला काळसर करत काढलेल्या काही दिनवाण्या चित्रांच्या पाश्र्वभूमीवर त्या रंगांधळ्या, रंगबहिऱ्या वातावरणात मला चित्रं पाहावीशीसुद्धा कधीही, मुळीच वाटली नाहीत. चित्रं पाहणाऱ्यांचासुद्धा राग यायचा. नुसते रंग बघून त्यातून हजार अर्थ काढणारे लोक खोटे वाटायचे, पण त्याचबरोबर आत आत आपल्याला चित्रं काढणं राहू देत, बघताही येत नाहीत.. ही रंगभाषा लिहिता राहू देत, ऐकताही येत नाही म्हणून खूप छोटं छोटं वाटत राहायचं.
शाळा संपली आणि आयुष्यातला ‘चित्रकला’ विषय संपला एकदाचा म्हणून नि:श्वास सोडला. कॉलेज संपवून राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात गेले आणि तिथे पहिल्याच वर्षांला ‘चित्रकला’ हा विषय! बघून रागच आला. हा विषय माझा पिच्छा का सोडत नाही! अभिनय शिकायला कशाला लागते आहे चित्रकला? नाटय़ विद्यालय आहे हे. असला कसला हा अभ्यासक्रम! आणि अखेर पुन्हा एकदा तो चित्रकलेचा तास आला. मला शिक्षक आठवत नाहीत, पण आमच्या आयुष्यात आलेल्या कुठल्याही एका चेहऱ्याचं चित्र काढायला त्यांनी सांगितलं हे आठवतं आहे. हे सांगून ते निघून गेले आणि मी नुसतीच हातात पेन्सिल घेऊन समोरच्या पांढऱ्या शुभ्र कागदाकडे पाहात राहिले. चेहरा?.. माणसाचा चेहरा?.. मला साधा देखावासुद्धा नीट काढता येत नाही आणि चेहरा? वर्गातले बरेचजण मन लावून ‘चेहरा’ काढण्यात गुंतले होते. काही ‘नग’ एकमेकांच्या चेहऱ्यांची विडंबन चितारत खिदळण्यात गुंतले होते. मी नुसतीच बसले होते. तेवढय़ात राजीव वेलाचेही नावाचा वरच्या वर्गात असणारा मुलगा आला. वर्गावर कुणी नाही बघून आत शिरला. तोपर्यंत त्याच्याशी दोस्ती झालेली होती. तो आंध्र प्रदेशातून आला होता, त्यामुळे हिंदी अगाध, पण उत्तम वाचन. खूप हुशार. मला नुसतीच बसलेली बघून म्हणाला, ‘‘सिर्फ बैठे क्यूं हो?’’ मी तणतणून म्हटलं, ‘‘राजीव, ये क्या है! मुझे नहीं आता यार! मैं क्यूं ड्रॉइंग करूं?’’ तो म्हणाला, ‘‘किसने कहा ड्रॉइंग करना है?’’ ‘म्हणजे काय?’ असं माझ्या चेहऱ्यावर चितारलेलं पाहून तो म्हणाला, ‘‘चेहरा निकालने को बोला है, तुम कागज पे क्या निकालते हो वो छोडो.. उस बहाने तुम किसी के चेहरे को डीटेल याद करोगे.. उसका आंख कइसा है, आंख में क्या एक्स्प्रेशन है, नाक बडा है या छोटा.. चेहरा गोल है या ओवल, कागज पे ना सही, मन में तो इसी बहाने देखोगे.. खुद का चेहरा भी देखोगे! फिर कबी कोई कैरेक्टर करने के लिए किसी और के चेहरे का आंख का एक्स्प्रेशन याद आएगा। या फिर किसी के होठ ऐसे नीचे झुके हुए होते हैं। किसी का कौनसा एक्स्प्रेशन तुम्हारे कौनसे कैरेक्टर में यूज होएगा क्या मालूम! उसके लिए देखना चाहिए ना.. खुद का चेहरा, दूसरों का चेहरा!’’
मी कागदाकडे पाहिले. पहिल्यांदाच मला भीती नाही वाटली. माझ्या मित्राचा संदेशचा चेहरा काढायला घेतला. चित्राची सुरुवात डोळ्यांपासून केली. एकदम लक्षात आलं, आपल्यापासून दूर असलेल्या, प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणाऱ्या एखाद्या माणसाचा चेहरा जेव्हा आपण मनात आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पूर्ण चेहरा आठवत असला तरी त्यातला कुठला तरी अवयव ठळक आठवतो. बाकीचा चेहरा साध्या पेन्सिलीने काढला आणि तो विशिष्ट अवयवच ठळक पेन्सिलीने काढला तर कसं दिसेल तसं.. तेव्हा संदेशला मिशी होती. त्यामुळे त्याचे डोळे अधिक ठळक दिसायचे, म्हणून डोळे आठवले आधी ठळकपणे. तसंच माझ्या स्वत:च्या चेहऱ्याबाबतीत लक्षात आलं की, माझा वरचा ओठ एका बाजूने आत गेलेला आहे किंचित त्यामुळे तिरका वाटतो. मेकअप करताना, ओठांना आकार देताना मी त्या एका बाजूने पेन्सिलीने ओठ वाढवते आणि त्यांचा आकार सुधरवते. पण काही भूमिकांसाठी त्या तिरक्या ओठांनी वाटणारा करुण चेहराच आवश्यक असतो. तेव्हा मी ते तसेच ठेवते. हा सगळा अभ्यास त्या नाटय़शाळेतल्या चित्रकलेच्या तासापासून सुरू झाला.
काही वर्षांपूर्वी पंढरीदादा जुकरांकडे मेकअप शिकायला गेले तेव्हा त्यांनी एक अभ्यासपुस्तिका दिली. त्यात विविध आकारांचे चेहरे होते, डोळे होते.. कुणाचे डोळे आत खोबणीत असतात, ते मेकअपच्या रंगखेळांनी बाहेर आल्यासारखे कसे दाखवायचे; कुणाचे डोळे छोटे असतात, त्यांना उठाव कसा आणायचा; या सगळ्यांसाठी डोळ्याच्या कुठल्या भागाला कुठला रंग, कुठल्या रंगात मिसळून कसा लावायचा किंवा आता माझा रंग गव्हाळ आहे. सावळा पण नाही, गोरा पण नाही. मेकअप बेसमध्ये तो रंग साधण्यासाठी दोन रंग मिसळावे लागतात. योग्य प्रमाणात, प्रमाण चुकलं की रंगछटा बदलते. बेस चुकला तर सुंदरातला सुंदर चेहरा पडद्यावर सपाट आणि वाईट दिसतो. आपल्या चेहऱ्यानुसार कुठल्या अवयवाला कुठला रंग वापरून उठाव द्यायचा, खाली बसवायचा या सगळ्या मजेच्या अभ्यासाची सुरुवात त्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातल्या चित्रकलेच्या तासात झाली.
नाटय़ विद्यालयात ‘त्या’ चित्रकलेच्या तासाबरोबरच निभा मॅडम पण आयुष्यात आल्या. त्या आम्हाला ‘सौंदर्यशास्त्र’ हा विषय शिकवायच्या. माझी आई ज्योती सुभाष पण याच नाटय़शाळेची विद्यार्थिनी. निभा मॅडम तिलापण शिकवायला होत्या. मी नाटय़शाळेत शिकायला गेले तेव्हा त्या ऐंशी वर्षांच्या असाव्यात. त्यांनी पहिल्यांदा ‘लिओनार्दो दा विन्ची’ दाखविला. छोटय़ाशा चार फुटी निभा मॅडम अंगात गोड फ्रॉक घालून हातात मोठाली चित्रांची पुस्तके घेऊन यायच्या. त्यांनी मॉने, रोनेकर पहिल्यांदा दाखवला. आम्ही लायब्ररीत काही तरी वाचत बसलेले असू तर निभा मॅडम हळूच कधी यायच्या कळायचं पण नाही. आमच्या पुस्तकाशेजारी मॅडम त्यांच्या हातातलं पुस्तक हळूच आपटल्यासारखं करायच्या आणि म्हणायच्या, ‘‘क्या रबीश पढ रहे हो, ये पढो।’’ मग त्यांच्या हातातल्या पुस्तकातल्या एखाद्या चित्रावर बोट ठेवून म्हणायच्या, ‘‘लूक बेटा.. धीस इज टय़ूनिक.. लूक अ‍ॅट धीस ब्यूटीफूल ब्लू.. लूक अ‍ॅट द लाइन.. हाऊ ग्रेसफूल! व्हाय डोंट यू वेअर समथिंग लाइक धीस? वही रबीश पहेनते रहते हो!’’ एके दिवशी आमच्या नाटय़शाळेतल्या चहाच्या टपरीसमोरच्या संगमरवरी बाकावर मॅडम एका निवांत दुपारी, एक भुवई वर करून निवांत सिगरेट पीत होत्या. मी तिथून जात असताना एकदम तंद्री मोडून म्हणाल्या, ‘‘बेटा, कम हीअर!’’ त्यांच्या शेजारी एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवलेली होती. त्यातून त्यांनी एक गोड फ्रॉक बाहेर काढला. म्हणाल्या, ‘‘बेटा रिमेंबर? आय वॉज टेलिंग यू अबाऊट दॅट रस्ट कलर विच विल गो विथ युअर विटीश कॉम्बिनेशन? सी, धीस इज द कलर। धीस इज माय फ्रॉक बेटा, कीप इट फॉर यू!’’ त्या फ्रॉकला निभा मॅडमच्या सिगरेटचा प्रेमळ वास होता. नाटय़शाळेतून मुंबईत आल्यावर मी फोटोसेशनसाठी गौतम राजाध्यक्षांकडे गेले तेव्हा मला बघताक्षणी ते म्हणाले, ‘‘तुला ‘रस्ट’ रंग सगळ्यात जास्त खुलून दिसेल’’ असं म्हणून वळले. त्यांच्या हॉलमध्ये त्या रंगाची साडी नेसलेल्या बाईचं चित्र होतं. ‘‘सी- नॉट ऑरेंज.. रस्ट कलर! धीस इज रस्ट!’’ तेव्हा निभा मॅडमचा फ्रॉक आठवला!
नाटय़शाळेतच असताना मी ‘द कीस’ नावाचं एक पेन्सिल चित्र पाहिलं होतं. मला थांबवून माझ्याशी बोललेलं ते पहिलं चित्र. त्याने माझा ठावच घेतला. इतका की मी जुनी दुश्मनी विसरून चक्क कागद-पेन्सिल घेऊन ते काढायलाच बसले. एक स्त्री आणि पुरुष. एकमेकांमधून निघाल्यासारखे आणि एकमेकातच विलीन झाल्यासारखे एका दैवी चुंबनात! माझं चित्र काही फार बरं आलं नसेल, पण ते काढून बघण्याने मला माझ्या पद्धतीने त्या चित्राच्या जवळ जाता आलं. पण तरीही मी लगेच भारंभार चित्रं बघायलाच लागले असं नाही झालं. मुंबईत मला चित्रप्रदर्शनाला पहिल्यांदा नेलं ते माधुरी पुरंदऱ्यांनी. मुंबईत फोर्टमध्ये, वांद्रय़ात प्रदर्शनं लागली की माधुरीताई ती बघायला खास पुण्याहून येतात. मला, संदेशला, आमचा दिग्दर्शक मित्र सचिन कुंडलकर याला ती बघायला घेऊन जात. माधुरीताईंनी पिकासो, व्हॅनगॉगसारख्या चित्रकारांवर लिहिलेली मनस्वी पुस्तकं. त्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थिनी. चित्रातल्या सारख्या सुंदर रंगाची साडी नेसून कुठल्याशा चित्रासमोर त्या शांत उभ्या असतात.. हाताची घडी घालून तेव्हा चित्र पाहायचं सोडून मी त्यांच्याकडेच पाहात राहते.. तेव्हा त्यांच्या डोळ्यांना हे चित्रं कसं दिसत असेल, त्यांना या रंगांमधून काय ऐकू येत असेल हे बघण्यासाठी त्यांच्या आत क्षणभर का होईना जाता यावं असं वाटत राहातं..
चित्रं पाहायला त्यांच्यापाशी थांबावं लागतं. मनाचा अवकाश घेऊन. तो अवकाश  संपूर्ण असण्यातच आहे. हा अवकाश मला सुरुवातीला संपूर्ण अनभिज्ञ होता. चित्रं त्यांची शांतता घेऊन फ्रेममध्ये उभी असतात. त्या शांततेची भीती वाटली तर चित्रांचीही वाटते. मग त्यांच्यापाशी कसं थांबावं कळत नाही. सुरुवातीला किती तरी वेळा मी कित्येक चित्रदालनात चित्रांसमोर उभं राहून नुसत्याच जांभया दिल्यात. भीतीच्या जांभया, पण जात राहिले. हळूहळू त्या शांततेतला अवकाश मनाला सवयीचा व्हायला लागला. अनेक चित्रकारांची अनेक चित्रं पाहिली.. नवी.. जुनी.. हळूहळू लक्षात यायला लागलं. मी दुसऱ्या कुणाच्या डोळ्यांनी चित्रं पाहायची गरज नाही. मला चित्रं काढण्यातली गती नसेल, पण चित्रं बघताना भ्यायचं काय कारण? त्यात ‘येणं’ आणि ‘न येणं’ असं काय असणार आहे? मग धीर करून त्या शांत चित्रांसमोर शांतपणे थांबायला शिकले. कुठलीही कला खूप दयाळू असते. मग ते शास्त्रीय संगीत असेल नाहीतर चित्रं.. तुम्ही शरण येऊन तिच्यापाशी थांबलात की ती तुम्हाला तुमच्या कुवतीनुसार आपलंसं करायला लागते. ती कला कधीच तुम्हाला जोखत नाही. अशा वेळी आपणही मोकळेपणाने तिच्यासमोर उभं राहावं. आता हळूहळू चित्रांसमोर मी त्या मोकळेपणाने येऊ लागले आहे. त्यांनीही मला भरभरून द्यायला सुरुवात केलेली आहे.
नुकतंच स्वित्र्झलडमधलं ‘रोझनगार्ट’ म्युझियम पाहायचा योग आला. आत शिरल्या शिरल्या समोरच एक चित्रं लावलेलं होतं. एका पांढऱ्याशुभ्र कागदावर काळ्या रंगाचं ब्रशने केलेलं रेखाचित्रं. कुणी तरी लहान मुलाने काढल्यासारखं. एक फ्रॉक घातलेली मुलगी. दोन काळे ठिपके.. तिचे डोळे, तोंडाच्या जागी फक्त छोटी आडवी रेघ. सगळं मिळून ते मध्येच बापूडवाणं, मध्येच फार गोड दिसत होतं. शेजारीच मोठय़ा चित्रांच्या छोटय़ा प्रतिकृती विकायला ठेवलेल्या होत्या. मी घाईने या चित्राची प्रतिकृती शोधली, हातात घेतली आणि बरोबर असलेल्या मैत्रिणीला म्हटलं, ‘‘ही बघ मी, लहानपणची!’’ चित्रं उलटून मागे पाहिलं तर चित्रकाराचं नाव होतं, ‘पॉल क्ली’.
‘पॉल क्ली’चं दालन शोधून काढलं. दारातच त्याचा फोटो. त्याच्या डोळ्यांत अडकले.. प्रेमात पडले.. आपसूकच दालनात शिरले. पांढऱ्या कागदावर काळ्या बारीक पेनने काढलेली काही रेखाचित्रं.. पाहात राहिले.. त्या नाजूक हलक्या रेषा- पॉल क्ली पेनही किती हलक्या हातानं धरत असेल हे मला सांगणाऱ्या.. काही ठिकाणी अध्र्याच सोडलेल्या त्या हलक्या रेषा. एका चांगल्या लेखकानं अध्र्यामुध्र्या सोडलेल्या वाक्यांसारख्या.. सांगायचं ते झालं की सांगून.. पोचलं.. मग पूर्ण करण्याचा अट्टहास कशाला!
मग रंग आले.. एकमेकांशेजारी.. नुसते रंग. एक निळीशार आडवी रेषा.. त्यावर काळपट निळी थंड आडवी रेषा.. त्यावर मंद राखाडी.. आडव्या रेषा.. वेगवेगळे रंग.. एकमेकांबरोबर.. रंगांच्या पातळ रेषा.. वेगवेगळे रंगीत आकार. यातही ते सगळे रंग त्यांचे त्यांचे, आपसूक तिथे असल्यासारखे. त्यांच्यामागचा पॉलचा हात इतका हलका की नाहीच जणू.
मागे एकदा मी माधुरी पुरंदऱ्यांना त्यांचं गाणं ऐकून म्हटलं होतं, ‘‘तुम्ही गायला लागता तेव्हा हळूहळू शब्द, सूर याच्या आपण वर निघून जातो आणि मग फक्त गाणंच उरतं. निव्वळ बोलीव गाणं.’’  एकदा नसीरुद्दीन शाह रघुवीर यादवांविषयी बोलताना म्हणाले होते की, कुठल्याशा नाटकात रघुवीर यादवांना नसीर सरांनी पहिली दहा मिनिटं ओळखलंच नव्हतं इतके ते त्या ‘भूमिके’त एकरूप झाले होते.
 किती तरी मोठे लेखक लिहिताना शब्दांविषयी इतका आदर आणि आब राखून असतात की, त्यांची शब्दांनी बनलेली वाक्यंच शब्दातीत होऊन जातात. हे कशानं होतं? कसं साधतं? हे शोधणाऱ्यांची जी वाट आहे, त्या वाटेनं जायचं आहे मला. पॉल क्लीची वाट.. पॉल क्ली रेषाचित्रांमध्ये रेषा होऊन गेलेला.. रंगचित्रं काढता काढता रंगच होऊन गेलेला. त्याच्या चित्रात त्या चित्रांविषयीचा हळुवार आदर आहे. त्या चित्रांना लागणार नाही, इतक्या हळुवारपणे ती काढली आहेत असं वाटतं. चित्रं मुकी असली तरी पॉलनी त्यांना गृहीत धरलेलं नाही..
पॉलचे आई-वडील संगीत क्षेत्रातले. पॉलनेही गाण्यातच राहावं असं त्यांना वाटत होतं. तो उत्तम व्हायोलिन वाजवायचा, पण त्याला कागद, रेषा, रंग बोलावत होते. शेवटी तो त्यांच्याकडेच गेला. कलांना ‘अहं’ नसतो. त्यामुळे दोन कला एकत्र आल्या की भांडत नाहीत तर एकमेकींना खूप काही देत राहतात. रंग आणि सूर दोघंही पॉलचे मित्र होते. कधी एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा तो शेजारी आणतो किंवा पूर्ण विभिन्न रंगांना एकमेकांशेजारी बसवतो तेव्हा एखाद्या रागातले एकमेकांबरोबर जाणारे सूर गाता गाता मध्येच रागाबाहेरचा सूर लावून त्या रागाचं सौंदर्य अनवट वाटेनं वाढवणाऱ्या मोठय़ा गायकाची शांत आत्मविश्वासी मातब्बरी पॉलच्या चित्रात दिसते. त्याच्या डायरीत तो लिहितो : ‘‘कलर हॅज टेकन पझेशन ऑफ मी. नो लाँगर आय हॅव टू चेस आफ्टर इट. आय नो इट होल्ड ऑफ मी फॉरेव्हर. कलर अ‍ॅण्ड आय आर वन. आय अ‍ॅम अ पेन्टर!’’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो