आनंदकंद श्री गणेश!
मुखपृष्ठ >> लेख >> आनंदकंद श्री गणेश!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आनंदकंद श्री गणेश! Bookmark and Share Print E-mail

माधवी कुंटे , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपले वय वाढत जाते तसतसा गणपतीबद्दलचा सख्यभाव वाढत जातो. गणेश आपला आत्मसखा वाटू लागतो. त्याला पाहिल्यावर मन प्रसन्न झाले नाही, आनंद उद्भवला नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. त्याला बघून मन आनंदाने उचंबळून येते. कारण तो खऱ्या अर्थी आनंदकंद आहे..
सरत्या पाऊसकाळातील ही सुरेख संध्याकाळ! ..
मेघपटल विरल, पारदर्शी झाले होते. सूर्याच्या तेजावर झिरझिरीत आवरण पडले होते. त्यातून संध्याकाळचा लालसर सोनेरी तलम प्रकाश सगळीकडे झरत होता. विलक्षण उल्हसित करणारा आणि सर्वत्र सौंदर्याचा हात फिरवणारा हा प्रकाश मला नेहमी श्रीगणेशाचे स्मरण करून देतो. मन आनंदाने भरून येते. या अशा वेळेला मी माझ्यापुरते नाव देऊन टाकले आहे.. गणेशवेळ! ती हटकून गणेशाच्या आगमनाच्या आगेमागे येते. अशा वेळी बाहेर पडून त्या सुंदर प्रकाशात नहावेसे वाटते. तशी या गणेशवेळी बाहेर पडले. गणेशाच्या आगमनाआधीचे हे दिवस चैतन्याने, उत्सुकतेने रसरसलेले होते. वेगवेगळ्या दुकानांमधून प्रसन्नवदन गणेशमूर्तीचे दर्शन होत होते. सजावटीच्या, अलंकारांच्या वस्तूंनी, फुलाफळांनी, मिठायांनी बाजारहाट ओसंडून गेले होते. लोकांची लगबग चालू होती. आपला लाडका श्रीगणेश घरी येणार म्हणून सारेजण उत्सुक झालेले दिसत होते. एका ठिकाणी फुले घ्यायला थांबले. दोन गृहिणी गप्पा मारीत होत्या. त्यांच्या दोन लहान मुलीही आपसात बोलत होत्या.
‘‘काय मस्त वाटतंय! आमच्याकडे गणपती बाप्पा येणार!  तुमच्याकडेपण येणार नं?’’
‘‘हो! आजपासूनच आम्ही डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत. खूप मज्जा येईल!’’
त्यांचे ते, ‘मस्त वाटतंय, मज्जा वाटतेय’ मला पार आपल्या लहानपणात घेऊन गेले. आमचीही गणपतीच्या सजावटीसाठी मोठय़ांमध्ये लुडबुड चालायची. आम्हाला लिंबूटिंबू कामे दिली जायची. आम्हाला तेवढय़ानेच महत्त्व मिळाल्यासारखे वाटायचे. संध्याकाळी श्लोक, पाढे म्हणून झाले, रात्रीची जेवणे झाली की आजीच्या गोधडीत शिरून गणपतीच्या गोष्टी ऐकायचो आम्ही! आम्हाला ‘गणेशा माय फ्रेंड’सारखी सी.डी. नव्हती. आजी, आजोबाच आमच्या सी.डी. होते. त्यांच्या गोष्टींमधून, त्यांनी दिलेल्या पुस्तकांमधून गणेशाची रूपे मनात आकाराला येत त्याचे गुण, त्याचे चरित्र उलगडे. बाप्पा मोरया घरी आले की लाडू, मोदक, तऱ्हेतऱ्हेचे प्रसाद मिळत असत. खूप लोक घरी येत. घर आनंदाने भरून जाई. आम्हीही आरतीसाठी कुठे कुठे जायचो. आरती, प्रसाद, भेटीगाठी, गप्पा.. नुसता जल्लोष उडून जाई!
प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाची भेट मोठी सुखद वाटे. त्याच्याभोवती उजळलेल्या समयांच्या प्रकाशात त्याचा लालसर वर्ण, पिंगट हसरे डोळे, सुंदर पितांबर, मुकुट, अलंकार सारे काही उजळून जात असे. त्या मंद प्रकाशात बाप्पाकडे पाहताना मन पार गुंतून जाई.
पुढे जसजसे वय वाढू लागले तसतसे गणपतीशी असलेले नाते अनेक तऱ्हांनी जाणवू लागले. लक्षात येऊ लागले की आपण याला जरी पाच दिवसांनी निरोप दिला तरी याच्या अस्तित्वाची मुळे आपल्या जगण्यात खोलवर रुजली आहेत. एका अर्थी हा सतत आपल्याबरोबर असतोच!
आम्ही सकाळी उठलो की तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करून, ‘वक्रतुंड महाकाय। सूर्यकोटी सम प्रभ:। निर्विघ्नम् कुरु मे देव। सर्व कार्येषु सर्वदा।’ हा श्लोक म्हणत असू. दिवसाचा आरंभ त्याच्या स्मरणाने करायचा. म्हणजे दिवसभरातील कामे नेटकेपणी पार पाडण्याचा उत्साह येई. विघ्नहर्ता गणेश आपल्यामागे आहेच. म्हणून काम उत्तम तऱ्हेने पार पडेल अशा सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामांची सुरुवात होई, एखादा श्लोकही म्हणत असू आणि झोपण्याआधी श्लोक म्हणताना. ‘गणपती तुझे नाव चांगले’ हा श्लोकही रोज म्हटला जाई. दिवसाची सुरुवात त्याच्या स्मरणाने होई आणि दिवसाची अखेरही त्याच्या स्मरणाने होई. आजतागायत हा परिपाठ कायम आहे. आम्हीच काय, आमच्या नातवंडांची पिढीही गणपतीचे श्लोक आनंदाने म्हणते.
आमच्या घरावर आणि आमच्या आजोळच्या घरावर गणपतीची मूर्ती बसवलेली होती आणि आतल्या बाजूला बाहेर पडण्याच्या दारावर घराकडे वात्सल्याने बघणाऱ्या गणपतीची फोटोफ्रेम होती. घरोघरी बाहेरच्या बाजूला गणेशपट्टी आणि आतल्या बाजूला गणपतीची फोटोफ्रेम आजही आढळते. आधुनिक फ्लॅटवरसुद्धा दारावर चौकटी फ्रेममध्ये श्रीगणेशाची टाइल बसवलेली असते. किंवा नावाच्या पाटीजवळ गणपतीची कलात्मक मूर्ती असते. त्यामुळे घरापासून विघ्ने दूर राहतील आणि ती आलीच तर त्यांच्याशी दोन हात करायला गणपती शक्ती देईल असा आत्मविश्वास मनात निर्माण होतो. बाहेर कामाला जाताना दारावर त्याच्याकडे नजर टाकून हात जोडले की मनाला आपोआप आश्वस्त वाटते. एका प्रसन्न भावावस्थेत आपण कामाला लागतो. कामासाठीची ऊर्जा आणि प्रसन्नता ही त्या गणेशदर्शनातून मिळालेली असते.
कोणत्याही कार्यारंभी त्याचे स्मरण करून आपण त्याला कार्यासाठी आमंत्रित करतो. मंगलकार्याची पहिली पत्रिका त्याच्या चरणी अर्पण करतो. एखाद्या वडिलधाऱ्यासारखे त्याला हक्काने बोलावतो. शिक्षणाचा शुभारंभदेखील, ‘श्री गणेशाय नम:’ या शब्दांनी करतो. कारण गणेश सकल विद्या, कलांचे दैवत आहे. आपल्या प्राचीन परंपरेनुसार तो सृष्टीचा सृजनकर्ता आहे. सृष्टीचा आरंभ तो करतो आणि अखेर प्रलयकाळीसुद्धा पिंपळपानावर बालगणेश विसावलेला असतो. प्रलयाचे थैमान थांबले की पुन्हा युगारंभी नवनिर्मितीची सुरुवात श्रीगणेशच करतो.
निसर्गाच्या पंचमहाभूतांमध्ये श्रीगणेश अवस्थित आहे. म्हणून सर्व सजीव निर्जीव सृष्टीत गणेशतत्त्व भरून आहे असे आपण मानतो. गणेशाच्या माध्यमातून सजीव निर्जीव सर्व वस्तुजाताच्या आत असलेल्या चैतन्यतत्त्वाला आपण नमस्कार करतो तेव्हा जाणवते की या साऱ्या सृष्टीशी आपण त्या त्या एका चैतन्यतत्त्वाने जोडलेले आहोत. तो शक्तिस्रोत सर्वत्र भरभरून वाहतो आहे. त्याचे प्रमुख प्रतीक आहे, ‘ॐ’!
श्रीगणेश हा विश्वनिर्माता! म्हणून नृत्य, गायन, साहित्य, नाटय़ यांसारखी कलानिर्मिती रसिकांसमोर सादर करताना गणेशस्तवन केले जाते. चित्रकारांवर तर गणेशाचा मंत्रपाश पडल्यासारखे झाले आहे. इतक्या तऱ्हेने त्यांनी गणेशरूप रंगविले तरी त्याचे नित्यनूतन रूप त्यांच्या कुंचल्याला आव्हान देत राहते.
गणेशाची विविध रूपे फार मोहवितात. बाल गजानन, ॐकार स्वरूप, नृत्यमुद्रेतील गणेश, परशु पारजणारा योद्धा गणेश, व्यासांसमोर बसलेला महाभारत लिहिणारा गणेश, रावणाकडून शिवाचे आत्मलिंग घेऊन ते खाली ठेवीत युक्तीने रावणाला नामोहरम करणारा गणेश, भक्तांचा वरदविनायक अशी त्याची रूपे आपल्याला प्रसन्न करतात. त्याला बघताक्षणी मनातील किल्मीष, कटुता, द्वेष, खेद सारे लयाला जाते. मन आनंदाने भरून जाते. गणेशाच्या या वैशिष्टय़ामुळे तो घरातील स्नेहशील कर्ता असल्यासारखा अनुबंध त्याच्याशी जुळतो. तो आपल्याला काम करायला उद्युक्त करतो. त्याची भीती वाटत नाही. आधार वाटतो. हळूहळू सख्यभाव निपजतो आणि मग त्याच्याकडे बघताच मनात आनंद तरंग निर्माण होतात..
अशा आनंदाचा एक विलक्षण अनुभव मला आलाय.. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आला असेल कदाचित. पूर्वी सकाळी लवकर फिरायला जाण्याचा माझा नित्यक्रम होता. परतताना मी पार्लेश्वराच्या देवळात शिरून दर्शन घेत असे. आधी शिवालयाशेजारी गजाननाचे जोडमंदिर नव्हते. गाभाऱ्याबाहेर एका मोठय़ा कोनाडय़ात गजाननाची प्रसन्न मूर्ती आहे. मी मंदिरात जात असे त्या वेळी बहुधा आरती सुरू असे. सरत्या पहाटेच्या प्रसन्न वेळी घंटानाद छान वाटे. स्त्री-पुरुष रांगा करून उभे असत आणि शिस्तबद्धपणे शिवस्तवन करून आरती म्हणत. आरत्या संपल्यावर आरतीचे तबक सर्वासमोर फिरविले जाई. त्या दीपकळ्या, फुलांचा उदबत्तीचा संमिश्र सुवास, शिवस्तवनाचा गंभीर घोष असा तो एकात्मिक अनुभव मन प्रसन्न करे. आरती संपल्यावर भाविकांना गाभारा खुला केला जाई. तिथली गर्दी ओसरण्याची वाट बघत मी कोनाडय़ातील गणेशमूर्तीसमोर हात जोडून उभी राहात असे. एकदा अशीच हात जोडून उभी राहिले आणि एक क्षण असा आला की सर्व आवाज, तेथील स्त्री-पुरुषांची अस्तित्वे, त्यांचे बोलणे सारे गोठले.. सर्वत्र नीरवता पसरली होती, मी गणेशाकडे पाहात होते.. विचार भावनांचा गलबला थांबला होता.. ‘त्याच्या’शिवाय अन्य कसली जाणीवच नव्हती.. हलके हलके मन विलक्षण आनंदाने भरून गेले.. एक क्षणभरच ही अवस्था टिकली असेल. मग सगळे पूर्ववत झाले. तो आनंद अद्भुत अलौकिक होता. तसा आनंदानुभव नंतर पुन्हा आला नाही, पण त्या वेळची केवळ आठवण झाली तरी मन आनंदित होते.
जसजसे आपले वय वाढत जाते तसतसा त्याच्याबद्दलचा सख्यभाव वाढत जातो. गणेश आपला आत्मसखा वाटू लागतो. त्याला पाहिल्यावर मन प्रसन्न झाले नाही, आनंद उद्भवला नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. लहानथोर, श्रीमंत गरीब, स्त्री-पुरुष, जाती, धर्म सारे भेदभाव त्याच्यासमोर नाहीसे होतात. त्याला बघून मन आनंदाने उचंबळून येते. कारण तो खऱ्या अर्थी आनंदकंद आहे.
हळूहळू लक्षात येऊ लागते की, त्याच्या आराधनेसाठी त्याला सोने-चांदीचे अलंकार, डामडौलाची सजावट, बृहदकार मूर्ती यांची गरज नाही. ढोलताशे, आरडाओरडी, निर्थक कार्यक्रम, लाऊडस्पीकरवर लावलेली भजने, श्रीमंती पूजा यांची गरज नाही. लहानशी मृण्मय मूर्ती, निसर्गाने उदार हस्ते दिलेली सुगंधी फुले, फळे, दुर्वा, पत्री, साधा गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य, त्याच्यासमोर तेवणारी समई किंवा निरांजन, हळुवार घंटानाद आणि सुरेल आरती इतके पुरेसे आहे. आराधनेच्या वेळी मनात दाटून येणारा भक्तिभाव महत्त्वाचा असतो. आपण त्याच्या अगदी निकट आहोत. आपले मनापासूनचे स्तवन त्याच्यापर्यंत पोहोचते आहे हे लक्षात येते आणि मनात आनंदतरंग उमटू लागतात.
त्या मृण्मय मूर्तीला आपण दीड दिवसांनी किंवा पाच दिवसांनी निरोप देताना त्याच्या हातावर दही-पोहे ठेवताना मन क्षणक व्याकुळ होते, पण लहानपणी विसर्जन करतेवेळी मन हिरमुसायचे आणि ‘लवकर परत या’, असा हट्ट त्याच्याजवळ धरावासा वाटायचा तसा आता तो वाटत नाही. कारण आपल्या नित्याच्या जगण्यात तो आपल्याबरोबर असल्याचे जाणवत राहते. कार्यारंभी त्याचे स्मरण करताच कामाची स्फूर्ती येते. त्याच्या ‘दर्शनमात्रे, स्मरणमात्रे’, मनात आनंद फुलू लागतो..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो