सौंदर्यासक्त, चिंतनशील भटकंती
मुखपृष्ठ >> लेख >> सौंदर्यासक्त, चिंतनशील भटकंती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सौंदर्यासक्त, चिंतनशील भटकंती Bookmark and Share Print E-mail

रवींद्र पाथरे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
alt

मराठीत प्रवासवर्णनांची प्रदीर्घ परंपरा आहे. १८५७ च्या उठावाच्या ऐन धामधुमीत केलेल्या उत्तर भारताच्या प्रवासात गोडसे भटजींनी त्यांना आलेले अनुभव कथन करण्यापासून मराठीतील अर्वाचीन प्रवासवर्णनांचा आरंभ झाल्याचे मानले तर त्यानंतरच्या काळात केवळ लेखनक्षेत्रातील व्यक्तींनीच नव्हे, तर विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींनीही आपल्या देशविदेशातील भटकंतीचा लेखाजोखा पुस्तकरूपात मांडलेला आढळून येतो. अनंत काणेकर, रा. भि. जोशी, गंगाधर गाडगीळ, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे यांच्यापासून ते अलीकडे प्रवासवर्णनाला साहित्यात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देणाऱ्या मीना प्रभूंपर्यंत अनेकांचा उल्लेख यासंदर्भात करावा लागेल. आजही कुणी फिरायला गेलं की भ्रमंतीवर आधारित आपला लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध व्हावा म्हणून धडपडत असतात. ‘स्वान्त सुखाय’ प्रवास करताना आलेले चित्रविचित्र अनुभव, पाहिलेले प्रदेश आणि त्यांची वैशिष्टय़ं, तिथली माणसं, त्यांची वृत्ती-प्रवृत्ती, तिथली वेगळी संस्कृती, चालीरीती यांबद्दलची आपली विचक्षण निरीक्षणे बहुतेक लेखकांनी आपल्या लिखाणातून नोंदवलेली दिसतात. त्या- त्या ठिकाणच्या वैशिष्टय़पूर्ण वास्तू, म्युझियम्स, कलादालने, नैसर्गिक तसेच मानवी आश्चर्ये यांबद्दल अनेकांनी भरभरून लिहिलेलं आहे. पुलंसारख्या जीवनातील विसंगती टिपणाऱ्या लेखकाला वास्तूंपेक्षा स्थानिक ‘माणसां’मध्येच जास्त रस असल्याने त्यांनी त्यांच्यावर खुसखुशीत विनोदी अंगाने लिहिलेलं आहे.
आज मराठीत प्रवासवर्णनांचा इतका सुकाळू झालेला आहे, की त्याबद्दल आता वाचकांना फारसं अप्रुप उरलेलं नाही. त्यातच माहिती-तंत्रज्ञानाचा विस्फोट आणि जागतिकीकरणाच्या परिणामी उंचावलेल्या आर्थिक स्तरामुळे सर्वसामान्य माणसंही आता सहजगत्या लांबलांबचे प्रवास करू लागल्याने आणि जगभरातील विविध प्रदेशांची ताजी माहिती इंटरनेट व टीव्हीच्या माध्यमामुळे घरबसल्या मिळू लागल्याने तर लोकांची प्रवासवर्णनांबद्दलची उत्सुकता पूर्वीइतकी तीव्र राहिलेली नाही. तरीही सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘बंद खिडकीबाहेर’ हे मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं प्रवासवर्णन वाचताना आपण त्यात गुंगून जातो, याचं कारण रूढार्थाने जरी हे प्रवासवर्णन असलं तरी ती एका डोळस, संवेदनशील व्यक्तीची तरल, रसिली चिंतनिका आहे. आपण पाहिलेल्या प्रदेशांबद्दल, निसर्गाबद्दल, तिथल्या माणसांबद्दल, वास्तूंबद्दल, कलाविष्कारांबद्दल लिहिता लिहिता लेखिका अंतर्मुख होते आणि हे सारं अनुभवताना मनात उमटलेल्या अनेकविध तरंगांचा वेध घेऊ लागते. अनेकदा प्रवासात आलेल्या प्रशांत अनुभवांमुळे लेखिकेला एकूणच मानवी अस्तित्वाच्या प्रयोजनाबद्दल प्रश्न पडतात अन् त्यांची उत्तरं शोधण्याचा ती आपल्यापरीनं प्रयत्न करते. त्यासाठीचा प्रगाढ निवांतपणा, शांती, तरल झपूर्झा अवस्था हिमालयातील भटकंतीत लेखिकेला लाभते. शुभ्रधवल हिमालयातल्या प्रवासात दूरदूरवर एकाकी, एकटी घरं पाहून लेखिकेला प्रश्न पडतो की- ‘कसं असेल अशा ठिकाणी राहणाऱ्या माणसांचं आयुष्य? रोजची दगदग, धावपळ, ताण यांना स्पर्शसुद्धा करत नसतील. शारीरिक श्रम भरपूर असतीलही; पण गर्दी, स्पर्धा, वेग त्यांना थकवून टाकत नसतील. साऱ्या बाजूंनी येणारे आवाज, घणघणणारे फोन, कर्कश्य टीव्ही त्यांचे कान बधीर करीत नसतील. या नि:शब्द शांततेत मग त्यांना आपला आतला आवाज सहज ऐकू येत असेल. मन शांत शांत राहत असेल.. निसर्गाचाच एक भाग बनून! थोडे दिवस तरी अशा घरात आपल्याला राहायला मिळावं असं वाटून गेलं.’
अशा क्षणांच्या शोधात असणाऱ्या लेखिकेला लेह-लडाखच्या खडतर प्रवासात, तिथल्या वास्तव्यात अवचितपणे असे निवांत क्षण वाटय़ाला येतात. आणखीही एका प्रवासात अशा सुशेगात जगण्याच्या ओढीनं त्यांनी नॉर्वेतल्या गायऱ्यांगर या टुमदार गावात मुक्काम केला. फ्युअर्डकाठचा स्वत:च्या मस्तीत जगणारा, स्वयंभू, रसरशीत निसर्ग आणि या निसर्गात सामावून गेलेलं हे गाव त्यांनी ‘स्व’शी संवादू व्हायला निवडलं. सुंदर ‘जगणं’ म्हणजे काय, याचा साक्षात् प्रत्यय देणारा हा मुक्काम! पण अशाच प्रकारचं अंडाल्सनेस हे दुसरं परिपूर्ण गाव पाहताना, अनुभवताना लेखिकेच्या मनात अगदी याच्या विपरीत विचार पिंगा घालत होते. हे गाव इतकं सुंदर, आदर्शवत होतं, की आता या गावात ‘आणखी काही’ करण्यासारखं राहिलं आहे असं त्यांना वाटेना. ‘पण मग इथल्या तरुणांची स्वप्नं काय असतील? त्यांच्यासमोर कोणतं ध्येय असेल? सगळंच छान छान आणि परिपूर्ण असेल तर आयुष्याला एक गोठलेपण येणार नाही का?’ असे विचार लेखिकेच्या डोक्यात घुमू लागतात आणि ‘सौंदर्याचासुद्धा कधी कधी कंटाळा येतो का?’ असा प्रश्न तिला पडला. अन् मग खूप काही करण्यास वाव असलेल्या, सुसंगती आणि विसंगती, कुरूपता आणि सौंदर्य हातात हात घालून राहत असलेल्या, माणसांनी सतत गजबजलेल्या आपल्या मायभूमीची अनपेक्षित ओढ लेखिकेला वाटू लागते. मानवी मनाची अशी परस्परविरोधी, अनोळखी आंदोलनं लेखिकेनं निरनिराळ्या प्रवासांत नोंदविली आहेत. त्यातून या लेखनाला तत्त्वचिंतनाचंही परिमाण लाभलं आहे.
‘बंद खिडकीबाहेर’ हे पुस्तकाचं नावही असंच अन्वर्थक आहे. बहुतेक वेळा माणसं प्रवासी कंपन्यांबरोबर देश-विदेश फिरणं पसंत करतात. त्यांना प्रवासात कसली झिगझिग नको असते, जबाबदारी नको असते. प्रवास कसा आखीवरेखीव व्हायला हवा! असा प्रवास पर्यटन कंपन्या घडवीत असल्या तरी तो ‘बंद खिडकीआड’चा प्रवास असतो. ते दाखवतील ते आणि तेच पाहायचं. अशानं ना तिथल्या प्रदेशाची जानपहेचान होत, ना तिथली माणसं कळत. ‘केल्याने देशाटन..’ या उक्तीचा प्रत्यय तर दूरच! आम्ही ‘हे पाहिलं, ते पाहिलं’ असे टिकमार्क फक्त पर्यटनस्थळांच्या यादीवर होतात. असाच एक पर्यटन कंपनीच्या सहलीचा अनुभव घेतल्यावर ‘यापुढे आपले आपणच प्रवास करायचा!’ असं ठरवून केलेली ही मुक्त भटकंती असल्यानं ‘बंद खिडकीबाहेर’च्या जगाचा लेखिकेला निकट अनुभव घेता आला. त्यातून कधी अनपेक्षित लाभाचे विलक्षण मोहरवणारे क्षण जसे सामोरे आले, तसेच अपेक्षाभंग अन् निराशेचे क्षणही! परंतु ‘इट्स अ पार्ट ऑफ गेम’ म्हणत त्यांनी ते खिलाडूवृत्तीनं स्वीकारले. प्रत्येक बाबीकडे सकारात्मकतेनं पाहण्याच्या या दृष्टिकोनामुळेच त्यांची दरएक भ्रमंती ही जाणिवा, संवेदना समृद्ध करणारी ठरली.
यातले पाचपैकी चार लेख ‘मौज’ दिवाळी अंकांमध्ये, तर एक ‘पद्मगंधा’ दिवाळी अंकात पूर्वप्रसिद्ध झालेले असल्यानं दर्जाचा शिक्का तर त्यावर आधीच उमटलेला आहे. ‘सर्वदूर बर्फ शुभ्र..’ या लेखात ऑली या हिमालयातील एका दुर्गम गावात मऊशार, वस्त्रगाळ पावडरसारख्या बर्फात स्कीइंग अनुभवण्यासाठी गेले असतानाचा अनोखा अनुभव लेखिकेनं रेखाटला आहे. या पहिल्या लेखापासूनच लेखिकेची लेखनशैली मनावर ठसत जाते. सहज, ओघवती भाषा, तरल मनानं टिपलेले तपशील, आलेले वेगळे अनुभव.. मग ते माणसांचे असोत, वास्तूंचे असोत, निसर्गाचे असोत की पारलौकिक असोत.. तितक्याच नितळ पारदर्शीपणे लेखिकेनं ते शब्दबद्ध केले आहेत. या साऱ्या सव्यापसव्यात लेखिकेची बालसुलभ अनावर उत्सुकता, कुतूहल, आयुष्य समरसतेनं जगण्याची आणि आपल्या जाणिवा समृद्ध करण्याची अनामिक ओढ प्रकर्षांनं जाणवते. म्हणूनच हे सर्व लेख चौकटबद्ध प्रवासवर्णनापलीकडे जात वाचकालाही समृद्ध करतात. त्यांच्या जाणिवेच्या कक्षाही रुंदावतात. याचं कारण लेखिकेचं चिंतनही समांतरपणे या लेखनात मिसळलेलं आहे. त्यामुळेच काही वेळा चाकोरीबद्ध प्रवासातसुद्धा त्यांना वेगळं, विलक्षण असं काही अकस्मात सापडून गेलेलं आहे.
बर्फाच्छादित प्रदेशातील स्कीइंगचा अनुभव हे निमित्तमात्र; परंतु त्यायोगे ‘याचि देही’ हिमालय अनुभवणं, तिथली आत्मानंदी टाळी लावणारी नि:शब्द, गूढ शांतता आणि पारलौकिक शक्ती अनुभवण्याचं आकर्षण लेखिकेला आहे. त्यांनी आपल्या चित्रदर्शी, रंग-गंध-नादमयी शैलीत हिमालयाचा हा परीसस्पर्श साऱ्या तरल संवेदनांसह ‘सर्वदूर बर्फ शुभ्र..’ या लेखात समूर्त केला आहे.
‘वर्ल्ड ऑफ यस्टरडे’चा लेखक स्टीफन झ्वाइग यानं वर्णन केलेल्या त्याच्या लाडक्या देशाला- ऑस्ट्रियाला भेट द्यायचं लेखिकेच्या मनात बराच काळ घोळत होतं. नितांतसुंदर निसर्ग, प्राचीन कलापरंपरेचा समृद्ध वारसा, त्याची आस्थेनं जपणूक करण्याची इथल्या माणसांची वृत्ती, त्यांची अगत्यशीलता याचं चित्रण झ्वाइगनं आपल्या या आत्मकथनात केलेलं आहे. ते प्रत्यक्षात अनुभवण्याच्या ओढीनं लेखिकेनं केलेला प्रवास.. ‘झ्वाइगच्या देशात!’ व्हिएन्ना, श्लाडमिंग, साल्झबर्गमध्ये फिरताना भव्य राजवाडे, प्राचीन चर्चेस, कमनीय शिल्पं यांच्याबरोबरीनंच जगप्रसिद्ध संगीतकार मोझार्टचं घर, मोझार्ट संगीत कॉन्सर्ट व त्याच्या अस्तित्वानं भारलेलं तिथलं वातावरण अनुभवण्यात लेखिकेला धन्यता वाटते. हे सारं डोळसपणे आस्वादतानाची तिची निरीक्षणं टोकदार आहेत. मोझार्टच्या संगीत मैफलीची तुलना आपल्या शास्त्रीय संगीत मैफलींशी करताना तर हे प्रकर्षांनं जाणवतं.
‘चित्र-शिल्पांची नादवीणा’मध्ये प्रवासी कंपनीसोबत ‘विंडो टुरिंग’ करत ‘पाहिलेल्या’ झगमगीत, रंगेल, नखरेल पॅरिसनं विरस झालेल्या लेखिकेनं पुन्हा आपले आपणच ‘स्वान्त सुखाय’ नजरेनं कलानगरी पॅरिस ‘अनुभवायचं’ ठरवून केलेली भ्रमंती शब्दांकित केली आहे. या सफरीत त्यांनी रोदॅं व मायकेल अंॅजेलोची शिल्पं, व्हेनिसचा पुतळा, पिकासोची चित्रं, क्लोद मोनेची जिवर्नीची बाग, इम्प्रेशनिस्ट चित्रकारांची कलाकारी यांची कलात्मक गळाभेट घेतली आहे.
‘उत्तरेकडे..’ या लेखात उत्तर ध्रुवप्रदेशातील नॉर्वे, स्वीडन-अ‍ॅमस्टरडॅमची अनोखी भटकंती चितारलेली आहे. या प्रदेशाची अनवट भौगोलिक रचना, त्याचा इतिहास, बेभरवशी हवामान, क्षणाक्षणाला बदलणारा निसर्ग, नैसर्गिक- भौगोलिक प्रतिकूलतेशी कधी टक्कर देत, तर कधी त्यांच्याशी जुळवून घेत इथल्या चिवट अन् जिवट माणसांनी उभी केलेली मानवी संस्कृती, त्यांची कलावैशिष्टय़ं, जीवनवृत्ती या सर्वाचं एकात्म चित्र लेखिकेनं रसील्या शैलीत आपल्या लेखणीच्या कुंचल्यातून साकारलं आहे. खडतर, जीवघेण्या प्रवासानंतर शांत, स्थिरचित्त झालेल्या नदीप्रमाणे इथली मानवी संस्कृती आज कशी सर्वागानं बहरली आहे हेही त्यातून प्रत्ययाला येतं. जे पाहिल्यावर मनुष्यजन्माचं सार्थक होईल असं लेखिकेला वाटत होतं, ते व्हिन्सेंट व्हॅन गॉचं म्युझियम पाहिल्यावर मनात उठलेली आवर्तनं लेखिकेनं अत्यंत भावगर्भ भाषेत रेखाटली आहेत. त्यात एक प्रकारचा भक्तिभाव, चिकित्सक वृत्ती आणि आसुसलेपण जाणवतं.
‘लडाखची पाषाणशिल्पे’मध्ये अनुभवलेली तिथली झगमगीत, नि:शब्द, ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेवरून फिरवून आणणारी रात्र हा एक आगळा अनुभव होय. लडाखची अनंत रूपं हा या लेखाचा गाभा आहे. तेव्हा तो प्रत्यक्ष वाचणंच इष्ट.
‘बंद खिडकीबाहेर’- सुलभा ब्रह्मनाळकर, मौज प्रकाशन, पृष्ठे- २००, किंमत- २२५ रुपये.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो