निसर्ग चमत्कार अन् मानवी कलाकारी
मुखपृष्ठ >> लेख >> निसर्ग चमत्कार अन् मानवी कलाकारी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

निसर्ग चमत्कार अन् मानवी कलाकारी Bookmark and Share Print E-mail

मीना देशपांडे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी अलिबाबाचा खजिना आहे जिब्राल्टर! खरं तर ‘जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागराला जोडते,’ हे भूगोलाच्या पुस्तकातील पाठ केलेलं वाक्य! प्रत्यक्षात तिथे गेल्यावर समजलं की, यापेक्षाही अधिक भौगोलिक, ऐतिहासिक आणि पुरातत्त्वदृष्टय़ा महत्त्वाचे ठरणारे निसर्गाचे चमत्कार आणि मानवी कलाकारी जिब्राल्टरला बघायला मिळते.
विमानातून जिब्राल्टर म्हणून जो काही दिसतो तो समुद्राने वेढलेला एक भलामोठा उंचच उंच सुळक्यासारखा डोंगर. एका बाजूला पांढराशुभ्र, तर दुसऱ्या बाजूला घनदाट वनराजीने झाकलेला. हिरव्या इमारती, घरं आणि रस्ते.. बस्स. एवढंच जिब्राल्टर. पाण्यात असंख्य छोटय़ा बोटी. तो डोंगर ज्याला रॉक म्हणून संबोधतात- तो म्हणजे सर्व काही. जिब्राल्टरचा इतिहास तर त्याच्यावर लिहिला आहेच, त्याशिवाय मानवी व निसर्गाची अप्रतिम कलाकारीसुद्धा रेखाटली आहे. जिब्राल्टर शब्दाचा अर्थच- जिब्र म्हणजे खडक, इल्टर म्हणजे पवित्र खांब-वेदी. हक्र्युलसच्या पवित्र खांबापैकी हा एक मानला जातो.
भौगोलिकदृष्टय़ा हा भाग म्हणजे युरोप व आफ्रिका खंडाला जोडणारा जमिनीचा अगदी छोटा पट्टा आहे. भूमध्य सागर, अटलांटिक महासागराला जोडणारा पाण्याचा पट्टा-,असा एकमेव सुंदर चौरस्ता. जिब्राल्टर म्हणजे आयबेरिअन पेनिनसुलाचे दक्षिण टोक. उत्तरेला-स्पेनला एका छोटय़ा पट्टय़ाने जोडले आहे तर दक्षिणेला अरुंद चिंचोळी सामुद्रधुनी आहे. सामुद्रधुनीच्या पलीकडे आफ्रिका खंडाचे उत्तर टोक-मोरोक्को-अगदी दृष्टीच्या टप्प्यात असते.(बहुधा पूर्वी येथे दोन्ही खंडे जोडलेली असावीत. कारण भौगोलिक व जैविकदृष्टय़ा सारखेपणा दिसून येतो.) या भौगोलिक परिस्थितीमुळे गेल्या अनेक शतकांपासून ही जागा सर्व प्रकारच्या पाहुण्यांचे आकर्षण ठरली आहे. अर्थात, यातील प्रत्येकाचा हेतू निराळा होता. कोणासाठी ही युद्धाची मोक्याची जागा होती, तर कोणासाठी व्यापाराची, तर कोणी संशोधनासाठी ही जागा निवडली!
तसं पाहिलं तर, जिब्राल्टर म्हणजे फार तर सहा चौ. किलोमीटरची जागा. त्यातही मध्यभागी उंचच उंच सुळक्यासारखा रॉक. रॉक म्हणजे येथील प्रमुख आकर्षण. अंदाजे साडेतीन कि.मी. लांब आणि दोन कि.मी. रूंद. म्हणजे लोकवस्तीला तशी जागा कमीच. त्यातही हा सुळका आहे अगदी जख्ख म्हातारा! वय सुमारे २० कोटी वर्षे. या म्हातारबाबाची उंची आहे ४२६ मी. याच्याच उत्तरेच्या पायापाशी निअँडर्थल मॅनची कवटी १९४८ मध्ये सापडली. त्याअर्थी आदिमानवाने ख्रिस्तपूर्व ४० हजार वर्षांपूर्वी येथील गुंफात वास्तव्य केले असावे. ही कवटी एका स्त्रीची आहे. ही सापडल्यानंतर सुमारे आठ वर्षांनी अगदी तशीच पण पुरुषाची कवटी निअँडर्थल खोऱ्यात सापडली. त्यावर संशोधन झालं आणि ती Neanderhal man म्हणून संबोधली गेली. खरं तर तिला  Gibralter man/ woman म्हणून ओळखली जायला पाहिजे होती, असं येथील संशोधन कार्यालयातील संशोधकांचं म्हणणं आहे!
हा रॉक म्हणजे चुनखडीचा डोंगर असल्याने इथे पाण्याचा मुबलक साठा आहे. त्यामुळेच वृक्षराजीही कायम हिरवीगार असते. पशु-पक्षी-फुलपाखरांची संख्या भरपूर आहे. मात्र सर्वजण उत्तर आफ्रिकेशी नातं सांगतात. या खडय़ा उभ्या रॉकवर नेण्यासाठी टुरिस्ट टॅक्सीज आहेतच. तसंच केबल कारचीही सोय आहे. उंचावरून अटलांटिक भूमध्य सागर-मोरोक्कोचे विहंगम दृष्य दिसते. शिखरावर एक अत्याधुनिक  Mons calpe suit या नावाने ओळखले जाणारे सभागृह आहे. हा लग्न व इतर खास कार्यक्रमांसाठी वापरला जातो.
भौगोलिक परिस्थितीमुळे जिब्राल्टरला ऐतिहासिक  खूप महत्त्व आहे. पूर्वी  अटलांटिकमध्ये बोट ढकलण्याआधी येथे येऊन देवाला भेट अर्पण व्हायची. ज्युलिअस सीझरने पाम्पईच्या मुलांना इथेच लढाईत हरवलं होतं. मुस्लिमांनी युरोपात पाऊल टाकलं तेही जिब्राल्टरच्या मार्गाने. आठव्या ते चौदाव्या शतकापर्यंत येथे मूरिश राजवट होती. त्यानंतर १७व्या शतकापर्यंत यावर स्पेनने राज्य केले. १७०४ मध्ये अँग्लोडच फौजांनी हे ताब्यात घेतले व ब्रिटिश राजवटीखाली तेव्हापासून आले. अर्थात- तरीही हे मोक्याचे ठिकाण ताब्यात घेण्यासाठी स्पेनने सारखे हल्ले होत. मूरिश राजवटीत जिब्राल्टरभोवती मोठी तटबंदी केली होती, मुख्यत: तुर्की चाच्यांपासून बचाव करण्यासाठी ही तजवीज करण्यात आली होती. पण पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाला ही तटबंदी पुरेशी नव्हती व सैन्याच्या रक्षणासाठी रॉक खोदून बोगदे खोदणं गरजेचं झालं. व त्यात पहिल्या महायुद्धाच्या काळात The Greal-siege tunnel तयार झाला तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बोगद्यांचं जाळंच खोदलं गेलं आणि नौदलातीलForce 'H'  चं ते घर झालं. आयसेन हॉवरना उंचावरून स्पेन-आफ्रिकेवर हल्ला करणं सोपं झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जिब्राल्टर म्हणजे पूर्ण लष्करी छावणीचं झालं होतं. इथल्या नागरिकांना मोरोक्को, मॅंडेरा, जमैका, इंग्लंड इ. ठिकाणी हलवण्यात आलं होतं. या शहराभोवती पुन्हा भक्कम तटबंदी उभी केली होती. (जी अजूनही व्यवस्थित आहे.) युद्ध समाप्तीनंतर नागरिक पुन्हा इथे परतले व त्यांच्या या त्यागाची दखल Evacuees Memorial statue ने केली आहे.
जिब्राल्टरला बघण्यासारखे बरेच काही आहे. त्यातील प्रमुख म्हणजे रॉक व त्यामध्ये असलेल्या गुंफा. रॉकमध्ये १५० पेक्षा जास्त गुंफा आहेत. समुद्रसपाटीवर ३०० मी.वर. त्या अगदी पुरातन काळातील असल्याचे वर्णन आहे. त्यांचे पहिले वर्णन रोमन भूगोलतज्ज्ञ ‘पोम्पोनिअस मेला’ ने केले आहे. निअँडर्थल माणसाचे येथील वास्तव्य त्यांच्या वयाची पुष्टी देते.
अनेक गुंफांपैकी ‘सेंट मायकेल’ ही सर्वात मोठी गुंफा आहे. तिचे ऊध्र्व आणि निम्न असे दोन भाग आहेत. दोन्ही भाग नैसर्गिक अवस्थेत ठेवून त्यांची शोभा व उपयोग साध्या साधनांनी वाढवले आहेत. गुहेत दाट अंधार असतो आणि त्यात सतत स्वच्छ असे भरपूर पाणी ठिबकत असते! काही ठिकाणी दोर धरून, किंवा दोराच्या पुलावरून जावे लागते. वळणा-वळणाचे वर-खाली जाणारे खूप बोगदे आहेत. वरची व खालची गुंफा या बोगद्यांनीच जोडली आहे. वरच्या भागात २०-२० जणांच्या गटाने आत सोडले जाते. आत आल्याबरोबर अलिबाबाच्या गुहेत आल्यासारखे वाटते. असंख्य Stalaetites (गुहेच्या छपरापासून खाली लोंबकळणारे-त्रिकोणी-निमुळते होत जाणारे टोकेरी खांब) व Stalagmites  (खालून वर झेप घेणारे) कधी काटय़ासारखे, कधी त्रिशंकू-कधी परत्याप्रमाणे असलेले खांब आहेत. कधी वरचा व खालचा खांब एकमेकांना भेटतात व खूप रुंद-मोठा खांब तयार करतात. निसर्गत:च त्यांच्यावर रंगीत डिझाइन तयार झालंय. त्याशिवाय जागोजाग स्फटिकासारखं पाणी ठिबकून छोटी छोटी स्वच्छ तळी तयार झालीत. या निसर्ग कलाकारीला मानवाच्या कल्पकतेने रंग भरलाय. संपूर्ण गुंफेत अप्रतिम रंगीबेरंगी प्रकाश योजना केलीय. अंधार कायम ठेवून हे Stalactites आणि Stalagmites चमकवलेत. बल्ब कुठेही दिसत नाही. उजेड नाही, पण अनेक दिशांनी प्रकाश झोत येतात. त्यात भर म्हणून अति मधूर पण हळुवार स्वरसंगीत चालू असते. या स्वर्गीय सौंदर्यातून आपण उतरतो- एका मोठय़ा प्रशस्त गुंफेत. तिचं रूपांतर जगातील एकमेव जमिनीखालील (गुंफेमधील) प्रेक्षागृहामध्ये केले आहे. येथे दगडी चौथरा आहे. समोर उंच चढत जाणारे प्रेक्षागृह आहे. तिथे सुमारे ७०० खुच्र्याची सोय आहे. येथे संगीत, नृत्य, नाटक, फॅशन-शोचे आणि इतर कार्यक्रम होतात. तिथे उभं राहिल्यावर जाणवत होतं- इथे कार्यक्रम करणारे व बघणारे दोघंही खरे भाग्यवान!
खालची गुंफा फारच सुंदर- पण धोकादायक आहे. येथे १० वर्षांंखालील मुलांना प्रवेश नाही. पर्यटकांना पाच-पाचजणांच्या गटाने वाटाडय़ासोबतच पाठवण्यात येते. तेथील जमिनीच्या पोटातील मोठा तलाव आहे. त्याचे सौंदर्य वर्णनातीत आहे. गुंफेतून बाहेर आल्यावर ताजेतवाने होण्यासाठी (वर्तमानकाळात येण्यासाठी) छान रेस्तराँ आहे.
जिब्राल्टरचं दुसरं प्रमुख आकर्षण म्हणजे बारबरी एप्स. झुऑलॉजिकल नांव Macaca sylvanus..  खरं तर हे एप्स नसून शेपूट नसलेली माकडंच आहेत. हे मूळचे उ. आफ्रिकेचे रहिवासी. त्यावरून पूर्वी युरोप-आफ्रिका खंड एकमेकाला जोडलेली असावीत- या तर्काला पुष्टी मिळते. आणखी एका कल्पनेनुसार एखाद्या सैनिकाने दोन-चार पाळायला म्हणून आणली असावीत आणि कळप तयार होऊन तो रॉकचा रहिवासी झाला असावा. आणखी एक कल्पना म्हणजे मोरोक्कोपासून समुद्राखालील बोगद्यामधून हे गुंफांत आले असावेत आणि इथे वातावरणात रमले असावेत. काहीही असलं तरी एक मात्र खरं की युद्ध काळात ब्रिटिश सैनिकांना असं वाटत होतं की ही ‘एप्स’ जर जिब्राल्टर सोडून गेली तर आपण नक्की हरणार आणि मग शेवट विन्स्टन चर्चिल यांनी त्यांची खास देखरेख करून सैनिकांचं मनोधैर्य टिकवलं. बंधमुक्त अवस्थेत राहणारी युरोपमधील एवढीच माकडांची जात आहे, हे मात्र खरं!
ही माकडं कळपाने राहतात. त्यांचे फोटो तुम्ही काढू शकता, पण त्यांना खाद्य देण्यास पूर्ण बंदी आहे. दिल्यास ५०० पाऊंड दंड भरावा लागतो! रॉकवरील निसर्गसौंदर्याला तोडीस तोड ठरेल, अशी मानवी कलाकुसर इथे बघायला मिळते. जिब्राल्टरला पडलेला १४ वा वेढा- ग्रेट सिएज म्हणून ओळखला जातो. त्या काळात पहिल्या महायुद्धाच्या लष्करी अभियंत्यार्ंनी केलेली ही बचावाची उत्कृष्ट रचना आहे. त्यावेळी त्यांनी साधी हत्यारे व गन पावडरचा उपयोग करून रॉक खोदला होता. वरच्या रॉकचा मोठा भाग या बोगद्यांनी व्यापलाय. ३० मैल लांबीचा हा बोगदा वर-खाली वळणं घेत जातो. बाहेर गोळीबार करण्यासाठी ठिकठिकाणी झरोके केले आहेत. अजूनही तिथे मोठय़ा तोफा ठेवलेल्या आहेत. त्यासाठी बोगदा भरपूर रुंद आणि उंच आहे. जागोजाग या युद्धाची तसेच तेव्हाच्या रणनीतीची माहिती सांगणारे फलक आहेत. ही सफर अजिबात कंटाळवाणी होत नाही. कारण ठिकठिकाणी चित्रे, पुतळे, हलते देखावे आहेत. प्रत्येक ठिकाणी माहिती सांगणाऱ्या युद्धातले आवाज काढणाऱ्या टेप्स आहेत तर काही ठिकाणी मधुर संगीत आहे. दमल्यास आत बसायला जागा आहे. एकूण काय पहिलं महायुद्ध जिंकून आपण बाहेर येतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जिब्राल्टरसारख्या मोक्याच्या ठिकाणी हल्ले जोरदारच होणार, हे आधीच जाणून विन्स्टन चर्चिल यांनी बोगद्याचं भलं मोठं जाळंच या रॉकमध्ये खोदलं. त्यावेळी अद्ययावत युद्धसामग्री उपलब्ध होती. १९४० साली याचं खोदकाम केलं गेलं. त्यावेळी सर्वसामान्य जनतेला इतरत्र हलविल्यामुळे संपूर्ण जिब्राल्टरला युद्धाच्या छावणीचे रूप आले होते. या बोगद्यांच्या आत प्रशस्त लांबी-रुंदी-उंचीच्या जाळ्यात मोठय़ा जीप्स, रणगाडे, तोफा ठेवण्याच्या जागा बंदुका- दारूगोळा साठवण्याच्या जागा, हजारो सैनिकांसाठी सामायिक बराकी, स्वयंपाकघर, अन्न कोठी, सांडपाणी व्यवस्था, शौचालये, रूग्णालय आदी जरुरीच्या सर्व गोष्टी आहेत. रस्त्यांना (बोगद्यांना) नाव देऊन आत गावासारखीच रचना केलीय. यावरून त्या काळात खोदकाम किती व कसं केलं असेल, याची कल्पना येते. तिथेच जगप्रसिद्ध o'hara बॅटरी, ९.२ गन बघायला मिळते.
अनेक देशांमध्ये पर्यटकांना डॉल्फीन शोज बघायला मिळतात, मात्र जिब्राल्टरला डॉल्फिनच्या नैसर्गिक अवस्थेत झुंडीच्या झुंडी बघायला मिळतात. या दाखविण्यासाठी समुद्रातील त्या खास जागेवर नेण्यासाठी डॉल्फीन टुर्स आहेत आणि तुम्ही सुदैवी असाल तर तुम्हांला ब्लू व्हेलही दिसतो.
जिब्राल्टरला जाताना मला सगळ्यात आकर्षण होतं ते इथल्या रन-वेचं. हा जगातला सगळ्यात छोटा रन-वे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इमर्जन्सी लॅण्डिंगसाठी केलेला. नंतर बोगदे खोदतानाचे दगड वापरून दोन्ही बाजूंनी लांबी वाढवली गेली. मात्र त्यासाठी त्यांना समुद्रात अतिक्रमण करावे लागले. म्हणजेच या रन-वेची दोन्ही टोके समुद्रात घुसलेली आहेत. त्यामुळे विमान अरुंद धावपट्टीवर- समुद्रात उतरवणे हे कौशल्याचे व प्रवाशांना अनोखा अनुभव देणारे आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हा रन-वे चक्क गावातून जातो. रन-वेच्या दोन्ही बाजूला रेल्वे फाटकासारखी दोन गेट्स आहेत. विमान उतरताना किंवा जाताना ही गेट्स बंद होतात. दोन्हीकडे मोटारी, दुचाकी वाहने पादचारी गेटला चिकटून उभे असतात. विमानातल्या लोकांना हाय नाहीतर बाय करीत असतात. विमान गेल्यावर परत गेट्स उघडतात व रन-वेवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू होते. ‘विमान-विमान’ नाटक खतम् आणि हा रन-वेवरचा रस्ता सरळ फक्त १५ मीटर ओलांडल्यावर चक्क स्पेनमध्ये शिरतो. तिथे तपासणी नाका आहे. दररोज ये-जा करणाऱ्यांकडे पास असतो. स्पेनचा व्हिसा असेल तर आपणही चालत आत जाऊ शकतो. आहे की नाही गंमत? पण लवकरच ही गंमत संपणार आहे. कारण रन-वेच्या खालून अंडरग्राऊंड रस्ता काढण्याचे काम चालू आहे. म्हणजे विमान चढता-उतरताना वाहतूक थांबणार नाही.
असं हे ब्रिटिश अधिपत्याखालील जिब्राल्टर आज अनेक देशांतील लोकांचं व्यापार केंद्र बनलंय. ब्रिटिश, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी अनेक देशांचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहताना दिसतात. चर्च-मॉस्क-देऊळ, ज्यू लोकांचं सिनेगॉग एकत्र बघायला मिळतात. येथील भारतीयांची संख्या सुमारे ६०० असून त्यातही शीख व गुजराती अधिक आहेत.
शॉपिंग व खाण्यासाठी तर येथे चंगळच. सर्व वस्तू स्वस्त आणि तरीही किमतीत भरपूर घासाघीस करून खरेदी करता येतात! अगदी ८०० पाऊण्ड किंमत सांगितलेला कोट ७५ पाऊण्ड्सना मिळविता येतो. अर्थात ही घासाघीस करताना तुमचं वाक् कौशल्य आणि तुमच्यात किती सहनशीलता आहे, यावर अवलंबून आहे.
खवय्यांना तर हा स्वर्गच वाटेल! जगातल्या सर्व देशांची ‘फुटपाथ-हॉटेल्स’ इथे शेजारी शेजारी आहेत. हवे ते हव्या त्या देशाचे खा. मंद संगीत, समोर समुद्र, त्यात हलत्या पांढऱ्या- छोटय़ा छोटय़ा बोटी आहेत, उबदार हवा असते.. आणखी काय हवे? अगदी कोल्हापुरी मटण, पराठे ,मेथीची भाजी व कढीही तुमच्यासमोर हजर असते. सोबत वाइन आहेच.
गावात हिंडायला स्थानिक बसेस भरपूर. कुठेही बसा- कुठेही उतरा- तिकीट नाही. स्वच्छ सुंदर वृक्षराजींसह रस्ते. बसण्याची, खाण्यापिण्याची सगळीकडे सोय. त्यामुळे बघण्यासाठी स्थळे अनेक आहेत. करण्यासारखं मात्र आणखी एक छान गोष्ट आहे- लग्न! लग्नासाठी कसलाही कायदा, अटी, साक्षी काहीही लागत नाही. बाहेरचे कोणत्याही देशा-धर्माचे विवाहोत्सुक तिथे जाऊन लग्न करू शकतात. त्याची नोंदणीही तात्काळ होते आणि महत्त्वाचं म्हणजे ही नोंदणी जगन्मान्य आहे. त्यामुळे शेकडो जोडपी जिब्राल्टरला येतात व लग्न करून जातात. इव्हेण्ट मॅनेजर सर्व काही ठरवून देतो. अनेक हॉटेल्समध्ये याबाबतच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात. त्यातसुद्धा सर्वाचं आवडतं ठिकाण म्हणजे रॉकचा हॉप अर्थात Mons calpe suit गर्दीमुळे इथे आरक्षण लवकर करायला लागतं. रॉकवर झालेले प्रसिद्ध विवाह म्हणजे जेम्स बॉण्ड सीन कॉनेरीचा. त्याचं पहिलं लग्न डीआनो सिलेंटोशी येथेच झालं. मागून बिनसलं, पण पठ्ठय़ा दुसरं लग्न ‘मिचेलाइन’शी करायला येथेच आला. हॉलीवूडचा दुसरा प्रसिद्ध नट- लॉरेन्स हॉर्वे व मार्गारेट लेटान यांचं शुभमंगलही येथेच झालं. आपल्याला कोणी लग्नाला बोलावलं (आहेर आणू नये- असेल तरच) तर ठीकच, नाहीतर नुसतं हिंडून यायलाच पाहिजे अशी ही जागा! जिब्राल्टर!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो