नेतेपणाची शिडी
मुखपृष्ठ >> लेख >> नेतेपणाची शिडी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नेतेपणाची शिडी Bookmark and Share Print E-mail

विनायक करमरकर ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
alt

राजकीय कार्यकर्त्यांला महापालिकेच्या सभागृहात किंवा अगदी विधानसभेत पोहोचायचे असेल, तर गणेशोत्सवाच्या मांडवाखालूनच जावे लागते, असे पूर्वी म्हटले जात असे. या म्हणण्याचा अर्थ असा होता की, सार्वजनिक गणेशोत्सव ही कार्यकर्ते आणि नेतृत्व निर्मितीची कार्यशाळा होती. त्यामुळे राजकारण्यांसाठी देखील गणेश मंडळाच्या मांडवाला अनन्यसाधारण महत्त्व होते. जीवनाच्या प्रत्येक अंगाला आज राजकारणाचा स्पर्श झालेला आहे आणि गणेश मंडळेही त्याला अपवाद राहिलेली नाहीत.

त्यांचेही राजकीयीकरण झपाटय़ाने होत आहे.
पूर्वी लहान-मोठय़ा प्रत्येक मंडळाला स्वत:ची ओळख असायची. आता मंडळाच्या ओळखीची परिभाषाच बदलून गेली आहे. आता हे या दादाचे मंडळ, हे या भाऊचे मंडळ, हे त्या भाईचे मंडळ, हे त्या नेत्याचे मंडळ, हे नगरसेवकाचे मंडळ, हे आमदाराचे मंडळ.. अशी नवी ओळख मंडळांना मिळाली आहे. राजकारण्यांसाठी मंडळ हे वॉर्डामध्ये किंवा प्रभागामध्ये संपर्क ठेवण्यासाठीचे उत्तम साधनच झाले आहे. मंडळाजवळ पाच-पन्नास का होईना हुकमी तरुण कार्यकर्ते असतात. अनेक ठिकाणी ही संख्या त्याहूनही मोठी आहे. शहरी भागांत उत्साही ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळे, बचत गट हे देखील स्थानिक मंडळाशी जोडलेले असतात. तरुण-तरुणीही चांगल्या संख्येने मंडळाकडे असतात. त्यांचे एखादे पथक असते. काहीतरी करण्याची ऊर्मी त्यांच्यात असते. मंडळातल्या काहीजणांचे परिसरात चांगले वजनही असते. त्यांना तेथे स्थान असते. त्यांना मान असतो. राजकारण्यांना हेच हवे असते. अशा बहुउपयोगी मंडळावर आपला ठसा असेल, तेथे आपला संपर्क असेल, आपल्याला मानणारे काही कार्यकर्ते असतील  तर निवडणूक सोपी जाते. मंडळाचा वापर हवा तसा करून घेता येतो. निवडणुकीबरोबरच पुढची पाच वर्षेही मंडळ कामाला येते, या हिशेबाने पुढारी, नेते, नगरसेवक, आमदार वगैरे मंडळी मंडळांना धरून राहतात. आता त्याही पुढे जाऊन अनेकजण थेट मंडळांचे अध्यक्ष, सरचिटणीस वा उपाध्यक्ष वगैरे महत्त्वाच्या पदांवरच जाऊन बसतात. गेल्या काही वर्षांत मंडळे पुढाऱ्यांच्या ताब्यात जाण्याचे हे प्रमाण सर्वच शहरांमधून वाढल्याचे दिसत आहे. पुढारी मंडळात जाताना तो एकटा जात नाही. त्याचे कार्यकर्तेही त्याच्याबरोबर मंडळात शिरकाव करून घेतात. आता अनेक अहवालांमध्येही पुढाऱ्यांची आणि राजकीय नेत्यांची रंगीत छायाचित्रे असतात आणि आमचे प्रेरणास्थान, आमचे शक्तिस्थान, आमच्या मंडळाचे मुख्य आधारस्तंभ वगैरे विशेषणांनी पुढाऱ्यांना गौरवलेलेही असते. एकाच नेत्याची अशी छायाचित्र अनेक मंडळांच्या अहवालांमध्येही दिसतात. कारण त्या नेत्याने त्या प्रत्येक मंडळाला भरपूर आर्थिक मदत केलेली असते.
एक काळ असा होता की, मंडळांमध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा असायचा. उत्सवासाठी कोणतेही काम करताना त्यांना यत्किंचितही कमीपणा वाटत नसे. वर्गणीसाठी घरोघरी फिरणे हा देखील त्यांच्या आनंदाचा विषय असायचा. सव्वा रुपयाच्या पावतीसाठी देखील पाच-पाच चकरा माराव्या लागायच्या आणि निरुत्साही न होता तेवढय़ा चकरा मारल्या जायच्या. वर्गणीसाठी अहमहमिकेने भाग वाटून घेतले जायचे. नोकरी-धंदा बाजूला ठेवून रात्रंदिवस मेहनत करून देखावे उभे करणे हे तेव्हाचे भूषण होते. मंडळाच्या या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे देखील कार्यकर्ते असायचे, पुढारी-नेतेही मंडळांमध्ये असायचे. मंडळ ही आपल्या भागातील खरी ताकद आहे ही गोष्ट ते ओळखून असत आणि म्हणून आपलाही संपर्क मंडळामध्ये असावा, यासाठी राजकीय पुढारी मंडळांना धरून राहात. पण मंडळात खरा मान असायचा, तो तिथल्या कार्यकर्त्यांला आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्याला!
काळ बदलला तसे कार्यकर्तेही बदलले. श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली आणि झगमगाटाला, दिखाऊपणाला प्रतिष्ठा आली. श्रमापेक्षा पैशांची किंमत वाढली. कडक पांढरे कपडे घालून मंडपाजवळ बसणे म्हणजे उत्सव, प्रचंड मोठा मंडप म्हणजे उत्सव, भव्य देखावा म्हणजे उत्सव, कमानी उभारणे म्हणजे उत्सव, मिरवणुकीत दहा-दहा पथके म्हणजे उत्सव अशी धारणा रुजली. देखावे कार्यकर्त्यांनी तयार करण्यापेक्षाही आयते आणणे हाच मानदंड झाला. भव्यतेच्या या स्पर्धेमुळे स्वाभाविकच उत्सवाला ‘इव्हेन्ट’चे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे मंडळांचे अर्थकारणच बदलून गेले. एखाद्या गोष्टीचा एकदा का ‘इव्हेन्ट’ झाला की, मग त्याचे सारे पैलूही बदलून जातात. मंडळांचेही तसेच झाले. भव्य, भपकेबाज उत्सव साजरा करण्यासाठी मग मोठय़ा निधीची गरज भासू लागली. तेवढा निधी काही स्थानिक वर्गणीतून उभा राहू शकत नव्हता. तो बिल्डर, राजकारणी, नगरसेवक, इच्छुक उमेदवार, नवश्रीमंत, गुंठामंत्री, जमिनींची खरेदी-विक्री करणारे दलाल, उत्पादक कंपन्या, धनाढय़ मंडळी, गुंड, दादा, आयोजक-प्रायोजक यांच्या मदतीतूनच उभा करणे सुरू झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांने विनंती वा मागणी करून जो बिल्डर कमान वा जाहिरात देत नव्हता, त्याला नगरसेवकाचा फोन गेला की, कमानीचे पैसे तातडीने मिळाल्याचा अनुभव येऊ लागला. अशा पद्धतीने निधी अतिशय सुलभपणे गोळा होत आहे हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनीही घरोघरी, दुकानादुकानांमध्ये जाऊन वर्गणी गोळा करणे थांबवले. त्यांच्या वर्गणीचा मार्ग राजकारण्यांच्याच अंगणातून जाऊ लागला. थेट बडय़ांच्या माध्यमातून पैसा उभा करणे सुरू झाले. कमी श्रमात मोठी वर्गणी जमवण्याचे हे साधन फारच सोपे होते. उत्पन्नाचे हे नवे स्रोत मंडळांनी शोधून काढले आणि स्वाभाविकच मंडळे धनिकांच्या, राजकारण्यांच्या हातात गेली.
राजकारण्यांसाठी चालून आलेली ही आयतीच संधीच होती. अशी संधी ते कशी सोडतील. त्यांनी मंडळांची ही परिस्थिती नेमकी हेरली आणि स्थानिक राजकीय नेते, पुढारी थेट मंडळेच ताब्यात घेऊ लागले. ज्या ज्या कोणाला राजकीय ईर्षां असते, ज्याचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न असते, तो मंडळांचा वापर करतो. पराभूत झालेला आणि विजयी झालेला असे दोघेही मंडळांवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांचे कार्यकर्तेही त्यासाठी सक्रीय असतात. त्यासाठी मंडळे मागतील त्या गोष्टी ते मंडळाला देतात. विशेषत: निवडणुकीत तर प्रत्येक उमेदवार मंडळांवर लाखो रुपयांचा खर्च करतो. कारण स्थानिक मंडळाची मदत मिळवणे ही निवडणुकीत त्याच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट झालेली असते.
मंडळांच्या या बदलत्या अर्थकारणाचा मुख्य फटका उत्सवालाच बसतो आहे. उत्सव जनतेपासून दुरावत चालला आहे आणि तो काही मूठभरांच्या हातात गेला आहे. पूर्वी उत्सव आळीचा, गल्लीचा, पेठेचा, चाळीचा असायचा. आता तो मंडळाचा असतो. त्या उत्सवात लहानांचे विविध गुणदर्शन होत असे. महिलांच्या पाककृती स्पर्धा होत. संगीत खुर्ची, चमचा लिंबू स्पर्धा रंगण्याचा तो काळ होता. सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक नागरिकच सादर करत. छोटय़ा पडद्यावरचे चित्रपट रस्त्यावरच दाखवले जात. आता मात्र उत्सवाचेही ‘पॅकेज’ होतेय की काय अशी शंका यावी, या टप्प्यावर मंडळे आली आहेत. पूर्वी हजारो हात या उत्सवाला लागलेले असायचे. आता मात्र ती परिस्थिती नाही. लोकमान्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले त्या नव्या स्वरूपाचे, महत्त्वपूर्ण बदलाचे यंदाचे १२० वे वर्ष आहे. दहा तपांची वाटचाल केलेला हा उत्सव एका महत्त्वपूर्ण वळणावर येऊन ठेपला आहे. याची जाण असलेल्या मंडळांनीच आता आणखी सक्रिय होत इतर मंडळांपुढे काही धडा घालून देणे ही या उत्सवाची आणि काळाचीही गरज आहे. उत्सव ‘मंडळाचा’ न वाटता तो ‘सर्वाचा’ होणे हा बदल आता घडायला हवा.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो