गणेशोत्सव : काही घडलं, काही बिघडलं..
मुखपृष्ठ >> लेख >> गणेशोत्सव : काही घडलं, काही बिघडलं..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गणेशोत्सव : काही घडलं, काही बिघडलं.. Bookmark and Share Print E-mail

दिनेश गुणे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जीवनाच्या प्रत्येक अंगात आज राजकारणाचा शिरकाव झालेला आहे. गणेशोत्सव मंडळेही याला अपवाद नाहीत. अनेक राजकीय नेत्यांचा जन्म (आणि गुंडांना प्रतिष्ठाही!) या उत्सवातूनच झाला आहे. पूर्वी एकाच मंडळात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदत. परंतु मंडळात खरा मान असे तो हाडाच्या कार्यकर्त्यांला! आज मात्र ही परिस्थिती बदलली आहे. अनेक गणेश मंडळे हे ‘राजकारण्यांचे अड्डे’ झाले आहेत. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिले ते त्यात सर्व समाजाच्या सहभागासाठी! परंतु आता हा उत्सव काही मूठभर हितसंबंधीयांच्या हाती तर गेला नाहीये ना, याचा विचार करण्याची वेळ आली आहे..

ब्रिटिश सत्तेशी लढा देण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्याकरिता प्रथम लोकांना संघटित केले पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी निमित्त साधले पाहिजे, हे ओळखून लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा शतकानंतरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप कसे असेल, याचा त्यांनी कदाचित विचारही केला नसावा. सार्वजनिक उत्सवामागचा लोकमान्यांचा उद्देश स्वातंत्र्यपूर्व काळात बऱ्याच अंशी सफल झाला, हे उत्सव परंपरेतून उभ्या राहिलेल्या संघटनशक्तीमधून स्पष्ट होते. पुढे या उत्सव परंपरेचा अर्थच पुरता बदलून जाईल आणि केवळ भक्तिभावनेच्या लाटेवर स्वार होण्याचे स्वार्थकारण फोफावेल, हे लोकमान्यांच्या स्वप्नातही नसावे. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषत: जेव्हा भारतात जागतिकीकरणाचे आणि मुक्त व्यापाराचे वारे वाहू लागले त्या काळात गणेशोत्सवासारख्या उत्सवांचे सार्वजनिक रूपही वेगाने बदलत गेले. सूक्ष्मपणे विचार करत मागे वळून पाहिले तर लोकमान्यांच्या संकल्पनेतील सार्वजनिक गणेशोत्सव आणि एकविसाव्या शतकातील मराठमोळा सार्वजनिक गणेशोत्सव यांच्यात एक प्रचंड विस्मयकारक स्थित्यंतर सहजपणे जाणवते. विधायक कार्यासाठी जनसंघटन घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सुरू झालेले अनेक सार्वजनिक उत्सव काळाच्या ओघात बघता बघता बाजारपेठांच्या हातात गेले आणि या बदलाचा गंधदेखील न जाणवता, एखाद्या संथ विषप्रयोगासारखा हा बदल सामान्य उत्सवप्रिय जनतेच्या मना-मनात भिनत गेला. राजकारण आणि व्यापारी वृत्तीचे कॉर्पोरेट अर्थकारण यांनी हातात हात घालून अत्यंत जाणीवपूर्वक तयार केलेल्या साखळीत उत्सवप्रिय मानसिकता पुरती जखडली गेली आणि उत्सव हा राजकारण आणि कोणत्याही थराच्या अर्थकारणाचा आधार बनला. आपल्या सांस्कृतिक परंपरांच्या खतपाण्यावर जोपासल्या गेलेल्या भक्तिरसाच्या निर्मळ भावनेचा बाजार होत असल्याची साधी शंकादेखील येणार नाही इतक्या बेमालूमपणे हा उत्सवांचा बाजार सुरू झाला. आणि आता तर त्याचे बस्तानच जनमानसात बसून गेले आहे.
गणेशोत्सव, नवरात्री उत्सव असो किंवा रक्षाबंधनासारखा सण असो, त्याची चाहूल लागण्याचा पहिला संकेत म्हणजे, बाजारपेठा गर्दीने फुलू लागतात. प्रसार माध्यमांच्या दृकश्राव्य साधनांत आणि वृत्तपत्रांमध्येही वेगवेगळ्या उत्पादनांच्या आकर्षक जाहिराती दिसू लागतात, आणि मुहूर्ताची अपूर्वाई असलेली संस्कारक्षम मने त्याला हुरळून खरेदीच्या मोहाने खिशात हात घालतात. पूर्वी सणांच्या साजरेपणाला संस्कृतीचे कवच होते. प्रत्येक सणाचे एक सांस्कृतिक वेगळेपण असायचे आणि आपल्याआपल्या प्रथा परंपरेनुसार हे वेगळेपण जपत सणांच्या माध्यमातून माणसे जोडण्याचा एक सहज सोहळा पार पडायचा. आता बाजारपेठांनी सणांच्या संस्कृतीचा कब्जा घेतल्यानंतर, सण म्हणजे केवळ खिसा आणि खरेदी असे नवे समीकरण तयार झाले आणि गर्दी, झगमगाट व आर्थिक उलाढाल हेच सणाच्या उत्साही साजरेपणाचे मापदंड बनून गेले. अर्थकारणाच्या बदलत्या प्रवाहात, अर्थकारणदृष्टय़ा सणांना प्राप्त झालेले हे महत्त्व अगदीच झिडकारून टाकता येणार नाही हे खरे असले, तरी बाजारू व्यवहारांच्या अशा गळेकापू आक्रमकपणामुळे सणांचे सांस्कृतिक व पारंपरिक महत्त्व लोप पावणार हे मात्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि आजचा सार्वजनिक गणेशोत्सव यांच्यातील स्थित्यंतर जाणवण्यासाठी शंभर वर्षांचा काळ जावा लागला. आता मात्र, सार्वजनिक उत्सवांमधील स्थित्यंतराचा वेगदेखील कमालीचा वाढला आहे. जनसंघटनाचा उद्देश केव्हाच मागे पडला आहे, आणि केवळ भक्तिभावनेवर स्वार होऊन स्वार्थ साधणाऱ्यांची स्पर्धा आयोजित करणाऱ्या कार्यशाळा असे नवे स्वरूप या उत्सवांना येत आहे. आपण मात्र, याबद्दल अनभिज्ञ असल्यासारखे आपल्या-आपल्या भावनांचा साहजिक आदर करत, सार्वजनिकतेच्या नावाने सुरू होणारे उत्सव वैयक्तिकरीत्याच साजरे करत आहोत. कारण या सार्वजनिक उत्सवातदेखील सामान्य माणसे एकमेकांपासून लांबच असलेली दिसतात. कारण उत्सवांच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धाशी सामान्य माणसाला थेट असे काहीही देणेघेणे नसते. असे असले, तरी सामान्य माणसाच्या आधारानेच या स्पर्धा पार पडत आहेत. कारण, ही स्पर्धा म्हणजे, सामान्य माणसाच्या भक्तिभावनेवर स्वार होण्याचे कसब जोखणारीच स्पर्धा आहे. हे कसब ज्याला साधते, तो कुणीही सहजपणे स्वार्थाच्या शिखरावर पोहोचतो.. मग तो राजकारणी असो, वा व्यापारी किंवा आणखी कुणी!
मुंबईच्या सार्वजनिक उत्सवांमध्ये जनता भक्तिभावाने सहभागी होते, हे जाणवू लागल्यानंतर याचा फायदा घेण्याची युक्ती बहुधा राजकीय पक्षांना प्रथम सुचली. मुंबईतील सार्वजनिक उत्सव ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची राजकीय प्रयोगशाळा मानली जाऊ लागली. या उत्सवांतूनच सेनेच्या असंख्य भावी नेत्यांची राजकीय व्यक्तिमत्त्वे आकाराला आलेली दिसतात. जनतेच्या भाविकतेला भावेल अशा रीतीने उत्सवाची आखणी करून जनतेचा विश्वास संपादन केल्याने, नेतृत्वाची माळ गळ्यात पडणे सोपे होते, हे सेनेच्या राजकारणाने जाणले आणि मुंबईत राजकीय बस्तान बसविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांचा आधार घेतला. मुंबई-ठाण्यासारख्या ठिकाणी, सार्वजनिक गणेशोत्सव ही शिवसेनेचीच मक्तेदारी झाली. याचा राजकीय फायदा मिळू शकतो, हे सिद्ध होऊ लागल्यावर अन्य राजकीय पक्षांचे गल्लीबोळांतील नेतेही भक्तिभावनेवर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आणि गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत करणाऱ्या चौकाचौकातील भव्य फलकांवर त्यांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा झळकू लागल्या. गल्लीबोळांत झळकणारे हे प्रसिद्धी फलक त्याच क्षणी मनावर फारसा परिणाम घडवत नसले, तरी संथ विषप्रयोगासारखे हे प्रसिद्धी तंत्रच पुढे अनेकांना मोठेपण मिळवून देणारे ठरले, याची अमाप उदाहरणे जागोजागी दिसतात.
शिवसेनेच्या हातात गेलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आपल्यालाही लाभदायक ठरावा अशी सुप्त इच्छा असलेले अनेकजण पुढे या उत्सवाच्या आधाराने आपले-आपले बस्तान बसविण्यासाठी सरसावले. यामध्ये काँग्रेसचेही लहानमोठे अनेक पुढारी होते. भारतीय संस्कृती आणि सण हा आपलाच मक्ता आहे, अशी जन्मसिद्ध समजूत असलेल्या भारतीय जनता पार्टीलादेखील या सार्वजनिक उत्सवांचे राजकीय महत्त्व उमगले आणि शिवसेनेच्या गणेशोत्सवापाठोपाठ भाजपच्या नेत्यांनी गुजराती भाविकांचा आवडता सण असलेल्या नवरात्रोत्सवाचा कब्जा मिळविण्याचा खटाटोप सुरू केला. उत्तर मुंबईतील काही उपनगरे आणि ईशान्य मुंबईसारख्या गुजरातीबहुल भागात, गरब्याच्या मंडपांवर राजकीय पक्षांचे फलक झळकू लागले आणि गरब्याच्या स्टेजवरून नेत्यांची हजेरीही दिसू लागली. मध्यंतरी तर, भाजपच्या सध्या राष्ट्रीय पदाधिकारी असलेल्या एका नेत्याने पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील हाती टिपऱ्या घेऊन रिंगणात नाचायला लावले होते.. त्यानंतरच्या निवडणुकीपर्यंत या नेत्याचे नाव सर्वतोमुखी पोहोचले आणि त्याच्या शिरावर खासदारकीचाही ‘मुकुट’ विराजमान झाला. त्याला हेही एक निमित्त ठरले होते. सणाचा राजकीय हेतूसाठी वापर करण्याची राजकारण्यांची खुबी त्या वेळी जनतेला जाणवली. व्यक्तिगत भक्तिभावाला धक्का लागत नाही, तोवर त्याकडे कानाडोळा करण्याची व आपलाआपला भक्तिभाव जपण्याची सवय असलेल्या भाविकांनी त्या वेळी ते तितकेच साहजिक मानले असावे. मग शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेल्या संजय निरुपम यांच्यासारख्या नेत्याने तर, मुंबईच्या अनेक सार्वजनिक सणांना आपल्या ‘राजकीय इव्हेन्ट’चे महत्त्व मिळविण्याची धडपड सुरू केली.  उत्तर भारतीयांमध्ये भक्तिभावाने साजरा होणारा छट्पूजेचा सार्वजनिक सोहळा संजय निरुपम यांच्या पुढाकाराने मुंबईत आक्रमकपणे सुरू होताच त्याला राजकीय वादाचे रंग चढले आणि हा सण सर्वतोमुखीही होतानाच संजय निरुपम यांच्याभोवतीदेखील प्रसिद्धीचे वलय सहज निर्माण झाले. ठाण्याच्या टेंभी नाक्यावरचा नवरात्रौत्सव हा तर ‘आनंद दिघेंचा उत्सव’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला, तर दहिहंडीच्या उत्सवांवर आपलीआपली नावे कोरण्यासाठी ठाणे-मुंबईतील असंख्य तथाकथित नेते पैशांच्या थैल्या घेऊन उत्सवांच्या रिंगणात स्पर्धेसाठी दाखल झाले.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोलबाला होऊ लागला, त्याचा आधी राम कदम नावाच्या एका व्यक्तीविषयी मुंबईमध्ये मोठे कुतूहल व वलय तयार झाले होते. त्याचे कारण, दहिहंडी उत्सवातील बक्षिसासाठी या व्यक्तीने उघडलेली विक्रमी रकमेची थैली! मुंबईतील दहिहंडीच्या सणाने सांस्कृतिक आणि पारंपरिक सणाचे महत्त्व आणि स्वरूप केव्हाच ओलांडले आहे, आणि हा सण केवळ राजकीय व कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातात आहे, हे याच दरम्यान स्पष्ट झाले. पुढे राम कदम मनसेचे आमदार झाले, त्याला त्यांच्या दहिहंडी उत्सवातील प्रसिद्धीची झालर होती. हे लक्षात आल्यानंतर दहिहंडीच्या उत्सवात अनेक लहानमोठे नेते बक्षिसांची खैरात करण्यासाठी सरसावले. लाखो रुपयांच्या बक्षिसांनी मढलेल्या दहिहंडय़ा फोडण्यासाठी येणाऱ्या गोविदांच्या कौतुकाआधी, बक्षिसे लावणाऱ्या नेत्यांच्या जाहिरातींनी मुंबई-ठाण्याचे कानेकोपरे व्यापून जाऊ लागले आणि प्रसिद्धीच्या ‘नौबती’ झडू लागल्या. कालपरवापर्यंतचा एखादा ‘बंटी’, शहराचा ‘भाग्यविधाता’ असल्यासारखा भासविला जाऊ लागला. आणि बघताबघता त्याचे राजकीय भविष्यदेखील उजळून गेले. ‘आदर्श’ म्हणून राज्यात जे काही गाजत राहिले आणि त्या निमित्ताने जी राजकीय व्यक्तिमत्त्वे चर्चेत राहिली, त्याच रांगेत नाव घेतले जावे इतके महत्त्व काही नेत्यांनी स्वतला मिळवून घेतले. त्याचा पायादेखील उत्सवांमध्येच रचला गेला होता..
अर्थात, केवळ राजकीय नेतृत्व खुलविण्यासाठीच अशा सार्वजनिक सणांचा बेमालूम वापर करून घेतला गेला असे नाही. मुंबईवर आपले वर्चस्व असावे, अशी सुप्त इच्छा राजकारणाच्याही पलीकडच्या अनेक क्षेत्रांमध्ये दडलेली आहे. मुंबईचे गुन्हेगारी विश्व हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे मुंबईवरील वर्चस्वाच्या लढाईचे हत्यार म्हणून वापरल्या जाऊ लागलेल्या सार्वजनिक उत्सवांवर अंडरवर्ल्डचेही सावट दाटलेले दिसते. आपल्या साम्राज्याचा पाया भक्कम करण्यासाठी व हे साम्राज्य अधिकाधिक विस्तारण्यासाठी गुन्हेगारी जगतातील अनेक भाईंनी सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्रौत्सवांचाच आधार घेतला. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीच्या दशकात, माटुंग्याच्या वरदराजन नावाच्या दाक्षिणात्य ‘डॉन’चा गणेशोत्सव हे अख्ख्या मुंबईचे कुतूहल होते. या अंडरवर्ल्ड ऑपरेटरने माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेर श्रीगणेशाची स्थापना केली आणि गुन्हेगारी विश्व व पोलीस यांच्यातील संघर्षांचा वेगळा अध्याय सुरू झाला. वाय. सी. पवार या पोलीस अधिकाऱ्याने वरदराजनच्या साम्राज्यावर घाव घालण्यासाठी पहिली कारवाई त्याच्या भपकेबाज गणेशोत्सवावरच केली आणि हा उत्सवच बंद पाडला. गुन्हेगारी विश्वावर जबरदस्त वचक असलेल्या वरदाभाईच्या विरोधात एवढा आक्रमकपणा तोवर पोलीस खात्यातही कुणी दाखवला नसल्याने वाय.सी . पवारांना बाहेरून आणि खात्यातूनही बराच त्रास सहन करावा लागला. त्यांच्यावर हल्लेही झाले, अनेक  खटलेही घातले गेले. पण त्याला ते पुरून उरले आणि गुंडाला गणपती पावलाच नाही..
तरीदेखील गणेशोत्सवांचा आधार घेत आपापल्या परिसरावरील वर्चस्व आणि जनमानसातील वचक कायम ठेवण्याचा खटाटोप अनेक गुंडांनी सुरूच ठेवला होता. अश्विन नाईक, अरुण गवळी या अंडरवर्ल्डमध्ये नामचीन असलेल्यांचे गणेशोत्सव त्यांच्या भपकेबाज देखाव्यांमुळे सामान्य जनतेमध्ये चर्चेचा विषय होते. चेंबूरचा सह्य़ाद्री मंडळाचा गणेशोत्सव आजही तेथील कोटय़वधी रुपये खर्चाच्या देखाव्यामुळे मुंबईकरांचे आकर्षण आहे. या गणेशोत्सवाला छोटा राजनचा आश्रय असल्याचे सर्वानाच माहिती आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवांचे अर्थकारण हा विषय सामान्य भाविकांनी आपल्या भक्तिमार्गात कधीही येऊ दिला नाही, हे मुंबईतील सार्वजनिक     
(पान १ वरून) गणेशोत्सवाच्या नव्या परंपरेच्या यशामागील आणखी एक कारण असू शकते. राजाश्रयाबरोबरच अनेक सार्वजनिक उत्सवांना गुन्हेगारी जगताच्या डॉन मंडळींचाही सढळ आधार असतो, हे पोलीस दप्तरांतील नोदींवरून पूर्वी अनेकदा उघड झाले आहे. अशा उत्सवांच्या निमित्ताने अंडरवर्ल्डची निधी उभारणी मोहीम राबविली जाते, हे पोलिसांनी अनेकदा उजेडात आणले आहे. शहरांतील मोठे उद्योजक, जवाहिरे, व्यावसायिक आणि बिल्डर्सना उत्सवासाठी देणग्या देण्याची सक्ती करून एक प्रकारची खंडणी या निमित्ताने उकळली जात असे. गणेशोत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांच्या खंडण्या गोळा करून या व्यावसायिकांना ‘संरक्षण’ देण्याची, म्हणजे त्यांच्या त्यांच्या व्यवसायात विघ्न न आणण्याची अप्रत्यक्ष हमी अंडरवर्ल्डकडून दिली जात असे. अशा खंडणीखोरीमुळे हैराण झालेल्या मुंबईतील असंख्य व्यावसायिकांनी अखेरचा उपाय म्हणूनच पोलिसांकडे धाव घेतल्याने मध्यंतरीच्या काळात अशा खंडणीखोरीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय झाली आणि गणेशोत्सवाच्या अशा अर्थकारणाचा गळा आवळला गेला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली गुंड टोळ्यांनी कोटय़वधींच्या खंडण्या गोळा केल्याची माहिती पोलिसांकडेही आहे. काही गुन्हेगारांनी तर परदेशातूनही खंडणीखोरी केल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यामुळे अशा सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्रौत्सवांभोवती दहशतीचेही सावट काही वर्षांपूर्वी दाटलेले असायचे.
उत्सवात स्थानिक जनतेचा, म्हणजे भाविकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा असा हेतू अलीकडच्या सार्वजनिक गणेशोत्सवांतून हळूहळू लोप पावताना दिसत आहे. जाहिरातबाजीतून वाढविले गेलेले गणेशोत्सवांचे महत्त्व आणि त्यातून परिसरापलीकडच्या लोकांवर बसलेला  समजुतींचा पगडा यामुळे पैसा उभा करण्याची अनेक साधने असंख्य गणेशोत्सवांच्या हाती आहेत. अलीकडे मुंबईच्या अनेक गणेशोत्सवांना ‘राजा’चे नामाभिधान लागलेले दिसते, तर अनेक सार्वजनिक उत्सवांतील गणपती ‘नवसाला पावणारे’ असल्याची पद्धतशीर जाहिरातबाजीही होताना दिसते. अशा जाहिरातींमुळे सामान्य, श्रद्धाळू भाविकांची गर्दी साहजिकच अशा गणेशोत्सवांकडे वाढत जाते. अशा वेळी, भाविकांच्या समजुतीवर भपक्याचा अतिरिक्त पगडा म्हणून आकर्षक देखाव्यांची आतषबाजी केली जाते आणि एकेका गणेशोत्सवाचे दहा दिवसांचे अर्थकारण अक्षरश: कोटींच्या घरात जाऊन पोहोचते. नवसाला पावणाऱ्या गणपतींच्या चरणी लाखोंच्या देणग्या जमा होतात आणि गणेशोत्सवांची भरभराट होते. अर्थात, काही सार्वजनिक मंडळे या देणग्यांचा विनियोग सार्वजनिक व विधायक उपक्रमांसाठी करतात, हेही वास्तव अलीकडे जाणवण्याइतके ठळक झाले आहे, हे नमूद करणेही आवश्यक आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवांची जाहिरातबाजी हा त्या उत्सवाकडे भाविकांचा ओढा वाढविण्याचा मार्ग खुला झाल्यानंतर, कॉर्पोरेट क्षेत्रांची नजर अशा गणेशोत्सवांकडे वळणे ही साहजिकच बाब आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांची प्रवेशद्वारे आणि कमानींवर नामांकित उद्योगांच्या जाहिराती भाविकांचे स्वागत करताना दिसतात. याद्वारे गणेशोत्सव मंडळांना लाखो रुपये देण्याची या उद्योगांची तयारी असते. निखळ गणेशभक्तीबरोबरच, व्यावसायिक वृद्धी हादेखील यामागे हेतू असतोच. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या मनात या जाहिराती भराव्यात आणि सणासुदीच्या काळात अलीकडे जाणीवपूर्वक जोपासली गेलेली खरेदीची मानसिकता आणखी प्रबळ व्हावी हा उद्देश गणेशोत्सव काळात सफळ संपूर्ण झालेला दिसतो. नावाजलेल्या गणेशोत्सवांच्या परिसरातील खरेदीची धूम हा त्याचाच स्पष्ट पुरावा असतो.
सार्वजनिक गणेशोत्सवांच्या स्वरूपात काळानुरूप होणारा बदल ही यापुढील काळातही अपरिहार्य प्रक्रिया ठरणार आहे. भक्तिभावाने भारलेल्या भाविकांच्या मनात सणाची नवी व्यावसायिक संकल्पना रुजविण्यात जाहिरातींचे सध्याचे युग पुरते यशस्वी ठरल्याचे प्रत्येक सणातूनच स्पष्ट झाले आहे. पूर्वीच्या काळी, गुरुपुष्यामृत-अक्षय तृतीयेसारखे दिवस निखळ सण म्हणून साजरे व्हायचे. अशा काही सणांना समजुतीचे आधार असल्यामुळे, नाममात्र खरेदीही व्हायची. गुरुपुष्यामृताच्या दिवशी सोने खरेदी केल्यास भरभराट होते, हा समज फार पूर्वीपासूनच रूढ आहे. पण त्यामागेही, सुवर्णव्यवहाराची जाहिरातबाज मखलाशीच कारणीभूत असावी. तेव्हा केवळ सोनेखरेदीची समजूत रूढ झाली त्याचे कारणही ‘कालमान’ हेच असले पाहिजे. त्या काळी खरेदीची किंवा संपन्नतेच्या संकल्पना सोन्यापुरत्याच मर्यादित असाव्यात. दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, वातानुकूलन यंत्रे या कालमानानुसार चैनीच्या वस्तू न ठरता गरजेच्या वस्तू होत गेल्या, तसतशी खरेदीची मानसिकता केवळ सोन्याऐवजी अशा वस्तूंकडे वळत गेली. पुढे गरजेच्या वस्तूंच्या मालिकेत, गाडय़ांचीही भर पडत गेली आणि सणाच्या निमित्ताने वाहनखरेदीचा ओघ वाढत गेला. सणांची मानसिकता आणि व्यावहारिक जगाचे शहाणपण यांचा चतुराईने मेळ घालत सण आणि खरेदीचे नवे नातेही निर्माण होऊ लागले. राजकारण, अंडरवर्ल्ड, उद्योगविश्वापासून, लहानात लहान व्यापारीही सणाच्या निमित्ताने भविष्य उजळून घेण्याच्या स्पर्धेत उतरत चालला.
यामुळे एक बदल नक्की झालाय. तो म्हणजे, भारतीय सणांना आंतरराष्ट्रीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. भारतीय सणांवर जगभरातील उद्योगांची नजर लागून राहिली आहे. मात्र, हे सण साजरे करण्याची नवी प्रथा जुन्या परंपरांवर मात करू लागल्याने, नवे काही ‘घडते’ आहे, की सारेच ‘बिघडते’ आहे, असा प्रश्न आता भाविकांनी तरी स्वतला विचारला पाहिजे. तशी वेळ आली आहे, हे नक्की!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो