पॅरामेडिकल क्षेत्रातील मुबलक संधी
मुखपृष्ठ >> लेख >> पॅरामेडिकल क्षेत्रातील मुबलक संधी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पॅरामेडिकल क्षेत्रातील मुबलक संधी Bookmark and Share Print E-mail

सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
alt

अलीकडे शहरीकरणाचा वेग झपाटय़ाने वाढत आहे. परिणामी वैद्यकीय सेवांसाठी निव्वळ डॉक्टरांवर अवलंबून असणे, हा पर्याय सोयीस्कर ठरत नाही. तर या डॉक्टरांना पूरक ठरणाऱ्या सर्व सेवा आपल्या शहरात उपलब्ध असाव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी असते. मागणी तसा पुरवठा या नात्याने डॉक्टरी सेवांबरोबर पॅरामेडिकल सेवांचाही विकास झपाटय़ाने होत आहे. आपण जाणून घेऊयात, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी या पॅरामेडिकल क्षेत्रातल्या खुणाविणाऱ्या विविध क्षेत्रातील संधींविषयी.
फिजिओथेरपी :  शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला फिजिओथेरपीची गरज आहे, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. त्यामुळे फिजिओथेरपी म्हणजे रुग्णाला व्यायाम शिकविणारे डॉक्टर अशी आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. मात्र, इतकाच त्याचा मर्यादित अर्थ नसतो. फिजिओथेरपीचा नेमका अर्थ लक्षात घ्यावयाचा झाला तर असे म्हणता येईल की, शरीराला झालेला रोग लक्षात घेऊन, त्यानुसार आवश्यक त्या उपचारपद्धतीला ठराविक स्वरूपाच्या व्यायामाची जोड देणे. फिजिओथेरपी ही वैद्यक शास्त्राची एक महत्त्वाची विद्याशाखा आहे. ज्यात रोगावर किंवा शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाच्या व्यायामाचा आणि काही उपयुक्त अशा इलेक्ट्रिक स्वरूपातील उपकरणांचा वापर केला जातो. या उपकरणांमध्ये मसल स्टिम्युलेटर, एसडब्ल्यूटी, इन्फ्रा रेड किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सार निर्माण करणाऱ्या उपकरणांचा समावेश असतो. या सर्व तंत्रांचा वापर करून रुग्णाला आजारपणानंतर अथवा शस्त्रक्रियेनंतर दुर्बल झालेल्या शारीरिक अवयवांना पुन्हा एकदा बळकटी मिळवून देण्याचे काम फिजिओथेरपिस्टचे असते. त्यामुळेच विविध स्वरूपाच्या शस्त्रक्रियेनंतर, शारीरिकदृष्टय़ा विकलांग असलेल्यांना, खेळाडूंना तसेच संधिवातसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या आणि न्यूरोलॉजिकल डिस्ऑर्डर    (मेंदूविषयक समस्यांनी ग्रस्त असलेल्या )सारख्या विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची स्थिती सुधारण्यासाठी फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला वेळोवेळी दिला जातो. फिजिओथेरपी सुरू असली तरीही रुग्णाला डॉक्टरांनी ठरवून दिलेली औषधेदेखील नियमितपणे घ्यावी लागतात. या औषधांच्या जोडीने फिजिओथेरपी घेतल्यास त्याचे अपेक्षित परिणाम लवकर दिसून येतात.  
फिजिओथेरपिस्टला मानवी शरीररचनेबरोबर हाडे, स्नायू, नसा यांची हालचाल व त्याचे कार्य कसे चालते, याची उत्तम जाण असावी लागते. त्यामुळे बालशास्त्रविभाग, ऑर्थोपेडिक, न्यूरॉलॉजी, क्रीडा (स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट) आणि क्लिनिकल इलेक्ट्रो फिजिओलॉजी व काíडओप्लमनरी थेरपी यांसारख्या विविध क्षेत्रांत तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी फिजिओथेरपिस्टना मिळत असते.
फिजिओथेरपिस्टचे काम हे जितके आव्हानात्मक असते तितकेच ते मन लावून केले तर रंजकदेखील ठरते. रुग्णावर केली जाणारी उपचारपद्धती लक्षात घेऊन, त्याला झालेल्या जखमेमुळे अथवा वयामुळे किंवा आजारपणामुळे नेमक्या कोणत्या हालचाली करण्यात अडचणी येत आहेत, हे तो लक्षात घेत असतो. रुग्णाला फिजिओथेरपीच्या संदर्भात मार्गदर्शन करीत असताना, फिजिओथेरपिस्ट नेहमी प्रथम रुग्णाची केस हिस्ट्री लक्षात घेतो. त्यानंतर त्याला कोणकोणत्या स्वरूपाच्या शारीरिक हालचाली करताना त्रास होतो, याचे निरीक्षण करतो. अशा तऱ्हेने रुग्णाचा वैयक्तिक पातळीवर अभ्यास करून, त्याला नेमकी कशा स्वरूपाची फिजिओथेरपी द्यायची, याचा एक निश्चित आराखडा तयार करतो. यात तऱ्हेतऱ्हेचे व्यायाम, मसाज, वेगवेगळ्या इलेक्ट्रोथेरपी उपकरणांचा वापर उदा. अल्ट्रासाउंड, इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन, डीप हीट, इ. त्याचबरोबर हीट रेडिएशन, पाणी थेरपी, ट्रॅक्शन यांसारख्या विविध उपचारपद्धतींचा गरज पडल्यास समावेश करीत असतो. या तऱ्हेतऱ्हेच्या उपचारपद्धतींचा आधार घेऊन फिजिओथेरपिस्ट नेहमी रुग्णाच्या वेदनेच्या मूळ कारणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. जसे मेंदू, मज्जासंस्था, शरीरातील वेगवेगळ्या ऊती, सांधे, हाडे, हृदय किंवा फुप्फुसे आदी विविध अवयवांचा अभ्यास व निरीक्षण ते करीत असतात. जेव्हा रुग्णाला शारीरिक हालचाल करताना अवघडल्यासारखे होते, त्या वेळेला हटकून डॉक्टर फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला देत असतात. एरव्ही करायला सहज, सोप्या वाटणाऱ्या हालचाली व्याधीच्या काळात करायला अवघड वाटू लागल्या की, रुग्ण आपला आत्मविश्वास गमावून बसतो आणि आता आयुष्यभर आपण असेच परावलंबी जीवन जगावे लागणार, अशी भीती त्याच्या मनात निर्माण होते. अशा स्थितीत आपल्या उपचाराने आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम फिजिओथेरपिस्टचे असते.
आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी, डॉक्टरी उपचारानंतर रुग्ण हा फिजिओथेरपिस्टवर अवलंबून असतो. अशा वेळी रुग्णाची मानसिकता लक्षात घेऊन, त्याच्याकडून धीराने आवश्यक ते उपचार करवून घेणे हे फिजिओथेरपिस्टच्या दृष्टीने कौशल्याचे काम असते. त्यामुळे अशा वेळी रुग्णांशी योग्य तऱ्हेने संवाद साधत, योग्य त्या प्रमाणात सहानुभूती व्यक्त करून आवश्यक तो आत्मविश्वास निर्माण करता यायला हवा. कित्येकदा असे होते की ,उपचारपद्धती जरी तीच असली तरीही ज्याच्यावर ती करायची आहे, तो करून घेणारा रुग्ण हा नेहमीच बदलत असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने प्रत्येक रुग्णाची उपचाराला प्रतिसाद देण्याची क्षमतादेखील वेगळी असते. अशा वेळी संयम राखून फिजिओथेरपिस्टने काम करून घ्यायला हवे.  
फिजिओथेरपी हे व्यक्तिश: मार्गदर्शन असले तरीही ते एकप्रकारे टीमवर्क असते. ज्यात रुग्णासोबत त्याचे नातेवाईक, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांचादेखील सहभाग असतो. थोडक्यात काय तर रुग्णाची स्थिती लवकरात लवकर बरी होण्यासाठी फिजिओथेरपिस्टने रुग्णाबरोबर वावरताना कायम सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा.
अलीकडच्या काळात आरोग्य व फिटनेसबाबत जागरूकता निर्माण झाल्यामुळे फिजिओथेरपिस्ट तज्ज्ञांची मोठय़ा प्रमाणावर गरज भासू लागली आहे. त्यामुळे यात करिअर करणाऱ्यांना उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. जसे, शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा विकलांग असलेल्यांसाठी चालविण्यात येणारी केंद्रे, कम्युनिटी हेल्थ सेंटर, केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणारी रुग्णालये, आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालये, आरोग्यासंदर्भात चालविली जाणारी पुनर्वसन केंद्रे, क्रीडा व फिटनेसवर आधारित असणारी केंद्रे, महाविद्यालये किंवा विद्यापीठात अध्यापक म्हणून अशा हरतऱ्हेच्या क्षेत्रात या मंडळींना चांगला वाव आहे. देशाच्या संरक्षण खात्याच्या आरोग्य विभागातदेखील या तज्ज्ञांना चांगलीच मागणी असते. याव्यतिरिक्त तुमच्या स्वत:कडे पुरेसे आíथक पाठबळ असल्यास तुम्ही स्वत:चे खासगी क्लिनिक उघडून प्रॅक्टिस सुरू करू शकतात.   
ऑक्युपेशनल थेरपी
सर्वसाधारणपणे शारीरिक अथवा मानसिक दृष्टय़ा विकलांग रुग्णांसाठी या ऑक्युपेशनल थेरपीचा वापर केला जातो.
कारण सामान्य मनुष्य नेहमीच्या हालचाली सहजपणे करू शकतो, मात्र या हालचाली करताना संबंधित रुग्णांना मात्र अवघड जाते. शारीरिक उणिवेमुळे हालचाली नेमक्या कशा रीतीने कराव्यात, हेच त्यांना समजत नाही. अशा वेळी ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्यांच्या मदतीला धावून येतात. या रुग्णांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण देऊन, त्याद्वारे सामान्य स्वरूपातील हालचाली त्यांना सहजपणे करता येईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे या थेरपीमधील उपचारांचा भर हा रंजनात्मक आणि निर्मितीक्षम अशा स्वरूपांच्या उपक्रमावर आधारित असतो. विकलांग असलेल्या रुग्णांमध्ये असलेल्या विशिष्ट क्षमतेचा उपयोग करून, रोजच्या जीवनातील कामे स्वत:ची स्वत:ला करता यावी, या मंडळींना स्वत:चे जीवन अधिक समाधानकारकरीत्या जगता यावे त्याचबरोबर जीवनातील इतर गोष्टींचाही आनंद लुटता यावा, हाच ऑक्युपेशनल थेरपीमागचा उद्देश असतो. रुग्णासाठी ऑक्युपेशनल थेरपीची दिशा ठरवताना ऑक्युपेशनल थेरपिस्टला नेहमी रुग्णाबरोबर, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. रुग्णाला नेमका काय त्रास होतोय, त्याला कोणत्या गोष्टी
करताना अडचणी जाणवतात व त्याची क्षमता किती आहे, या साऱ्यांचा एक ढोबळ अंदाज डॉक्टरांबरोबर केलेल्या चच्रेतून येत असतो.
शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा विकलांग झालेल्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपिस्टची नेहमीच मदत होत असते. रुग्णाच्या स्थिती लक्षात घेऊन त्यावर कशा पद्धतीने मात करावी, याबाबत ते नेहमी मार्गदर्शन करीत असतात. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन त्याचे पूर्ण विश्लेषण करणे, त्याच्यावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना तो कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहे, याची नियमित नोंद घेणे, तेच उपक्रम तो इतर वेळी म्हणजेच थेरपिस्टबरोबर नसताना कशा रीतीने करतो, याची त्याच्या नातेवाइकांकडून नोंद घेणे, या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून त्यानुसार रुग्णासाठी आवश्यक भासल्यास व्हीलचेअर, स्पिलिण्टस् यांसारखी उपकरणे घेण्याचा सल्ला देणे,
ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून काम करताना आवश्यक असणारा गुण म्हणजे सहनशीलता. विकलांग रुग्णांची, प्रत्येकाची शिकण्याची क्षमता वेगळी असते. वरकरणी अवघड वाटणारी एखादी गोष्ट रुग्णाला पटकन जमेल, पण तीच सोपी गोष्ट करताना त्याला बराच वेळ लागू शकतो. तेव्हा अशावेळी स्वत:बरोबर रुग्णालाही निराश न होऊ देता (पान १ वरून)    युक्तीचे तंत्र वापरून काम करावे.
रुग्णाबरोबर वावरताना थेरपिस्टचे नाते मत्रीपूर्ण असावे. जेणेकरून उपचार घेत असताना रुग्णांच्या मनांवरदेखील कोणत्याही प्रकारचा तणाव असणार नाही. उत्तम संवादकौशल्याबरोबरच परिणामकारक उपचारांची जोड असल्यास ऑक्युपेशनल थेरपिस्ट आपल्या करिअरमध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. त्याचबरोबर तत्परता हादेखील गुण त्याच्याजवळ असावा. कारण एखाद्या उपक्रमाचा सराव करीत असताना रुग्ण नेमका कशा पद्धतीने वागेल, याचा नेमका अंदाज नसतो. अशा वेळी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीने दडपून न जाता ती योग्यरीत्या हाताळण्याचे कसब त्याच्याजवळ असायला हवे.
वैद्यकीय आणि फिटनेस क्षेत्रात ऑक्युपेशनल थेरपिस्टना करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध असतात. त्यांना रुग्णालये, खासगी रुग्णालये त्याचबरोबर आरोग्य केंद्रे, पॉलीक्लिनिक्स, पुनर्वसन केंद्रे, मानसोपचार सेवा देणाऱ्या संस्था, विकलांगांसाठी कार्यरत असणाऱ्या विशेष शाळा, मानसिक आरोग्य केंद्रे, विकलांग प्रौढांसाठी असलेली वसतिगृहे आणि क्वचित कधी खेळाडूंच्या संघासाठीदेखील ऑक्युपेशनल थेरपिस्टची गरज भासत असते. हल्ली अनेक स्वयंसेवी संस्थादेखील ऑक्युपेशनल थेरपिस्टची नेमणूक करीत असतात. स्वत:ची खासगी प्रॅक्टिस सुरू करण्याच्या दृष्टीनेदेखील या मंडळींना चांगला वाव असतो. रुग्णांना घरी येऊन व्यक्तिश: मार्गदर्शन करणे किंवा एखाद्या शाळेबरोबर संलग्न राहणे तसेच अनेक क्षेत्रांमध्ये त्यांना सल्लागार म्हणून किंवा आíकटेक्चरल फर्ममध्ये विकलांगाच्या क्षमतेचा कामाच्या दृष्टीने उपयोग करून घेण्यासाठीदेखील या थेरपिस्ट मंडळींची मदत घेतली जाते.
ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी :
श्रवणासंदर्भातील दोषांचा अभ्यास हा ऑडिओलॉजीमध्ये केला जातो. बहिरेपणाचा दोष असलेल्या रुग्णांवर या क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी उपचार करतात. बहिरेपणाचा दोष असणाऱ्या रुग्णांच्या सर्व आवश्यक त्या चाचण्या करून त्याद्वारे त्यांची बहिरेपणामागची लक्षणे जाणून घेणे, या लक्षणांचा इतर कोणकोणत्या अवयावांवर परिणाम झालेला आहे ते पाहणे आदी सर्व तपासणी ऑडिओलॉजिस्ट करीत असतात. ही सर्व तपासणी विशेष स्वरूपांच्या उपकरणांद्वारे होत असते. जसे, ऑडिओमीटर्स, कॉम्प्युटर, आणि इतर उपकरणे ज्याद्वारे रुग्णाच्या ऑडिटरीच्या क्षमतेचा नेमका काय परिणाम होतो, हे तपासले जाते.  
कधी कुठल्यातरी शारीरिक स्वरूपाच्या कमतरतेमुळे अथवा गुणसूत्रीय दोषामुळे व्यक्तीच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे ती व्यक्ती धडपणे बोलण्यास असमर्थ ठरत असते. अशा वेळी स्पीच थेरपिस्टच्या उपचाराने ती व्यक्ती आपल्या बोलण्याच्या क्षमतेतील उणिवा दूर करून, इतरांशी अपेक्षित संवाद साधू शकते.
तसे पाहिले तर श्रवणातील अथवा वाणीतील दोष हे योग्य उपचारांद्वारे सुधारता येण्यासारखे असतात. ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपिस्ट यासारखी तज्ज्ञ मंडळी त्यांच्या रुग्णामधील कमतरता लक्षात घेऊन, ती सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. या मंडळींच्या प्रयत्नांमुळे निव्वळ रुग्णांचे दोषच सुधारले जात नाहीत तर त्यांना नव्याने आयुष्य जगण्याची उमेद प्राप्त होत असते .
नकळत्या वयात निर्माण झालेली भावनिक घुसमट, ऑटिझम, लहान वयातच झालेला स्क्रिझोफेनिया किंवा इतर समस्या वाणीमध्ये दोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. अलीकडे, स्पीच थेरपिस्टच्या उपचारांमुळे हे दोष सुधारता येतात, याबाबत जागरूकता निर्माण झाल्यामुळे, या तज्ज्ञ मंडळींना चांगलीच मागणी येऊ लागली आहे. तर गंभीर स्वरूपाचा विषाणू संसर्ग, गुणसूत्रीय दोष, अति उच्च आवाजाचे वातावरण किंवा जन्मतेवेळी निर्माण झालेल्या समस्यांमुळे बहिरेपणाची समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी दोषाचे नेमके कारण लक्षात घेऊन ऑडिओलॉजी तज्ज्ञ रुग्णांवर उपचार करीत असतात. बऱ्याच वेळा बहिरेपणाच्या समस्येमुळेदेखील वाणीत दोष निर्माण होऊ शकतात. या दोन्ही समस्या एकमेकांशी निगडित असल्यामुळे अनेकदा रुग्णांना एका वेळी दोघांच्याही उपचारांची गरज भासू शकते.  
हा व्यवसाय शारीरिक क्षमतेपेक्षा भावनिक क्षमतेला अधिक आव्हान देणारा असतो. त्यामुळेच या तज्ज्ञ मंडळींना नेहमीच डोके शांत ठेवून व सहनशील राहून रुग्णाशी संवाद साधावा लागतो. कारण या क्षेत्रामध्ये रुग्णांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. उपचार घ्यायला सुरुवात केल्यानंतर लगेच बदल दिसून आला, असे या रुग्णांच्या बाबतीत होत नाही. शिवाय, उपचारांचे टप्पे एकाच झटक्यात शिकवता येत नाहीत. एकेक टप्पा पार केल्यानंतरच त्यापुढचा टप्पा शिकवला जातो. त्यातच रुग्णाचे सातत्याने निरीक्षण करावे लागते, त्यांच्या योग्य त्या नोंदी रेकॉर्ड करून ठेवाव्या लागतात. त्याचप्रमाणे ऑडिओलॉजी तज्ज्ञालादेखील रुग्णाच्या प्रत्येक चाचणीची नोंद करून ठेवावी लागते. त्या वेळेला रुग्णाने किती प्रगती साधली, याबाबत त्याच्या नातेवाइकांना वेळोवेळी माहिती द्यावी लागते. जेणेकरून पुढील उपचारांची दिशा ठरवणे सोपे जाते. या तज्ज्ञ मंडळींना ऑडिओलॉजिस्ट, पुनर्वसन समुपदेशक, चिन्ह भाषांचा भाषांतरकार, भाषातज्ज्ञ, स्पीच पॅथॉलॉजिस्ट आदी क्षेत्रांत करिअर करण्याची संधी उपलब्ध असते.
स्पीच थेरपिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट तज्ज्ञांना रुग्णालये, विशेष शाळा आणि आरोग्य केंद्रे आदी ठिकाणांबरोबर काही उद्योग क्षेत्रांमध्येदेखील (जिथे प्रामुख्याने आवाज प्रदूषणाचे काय परिणाम होतात, हे पाहण्यासाठी खास तज्ज्ञांची नेमणूक केली जाते.) काम करण्याची संधी मिळते. या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारे अध्यापक म्हणून किंवा संशोधक म्हणूनदेखील काम करू शकतात. त्याचबरोबर वैद्यकीय तसेच पॅरामेडिकल महाविद्यालयातदेखील अध्यापक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होत असते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो