पॅरामेडिकल क्षेत्र : वैद्यकशास्त्राचा कणा
मुखपृष्ठ >> लेख >> पॅरामेडिकल क्षेत्र : वैद्यकशास्त्राचा कणा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पॅरामेडिकल क्षेत्र : वैद्यकशास्त्राचा कणा Bookmark and Share Print E-mail

गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
अनुवाद : सुचित्रा प्रभुणे
alt

तंत्रज्ञानाचे भरभक्कम अधिष्ठान लाभलेल्या पॅरामेडिकल क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेतला तर त्यातील मुबलक संधींचीही पुरेशी कल्पना येते. पॅरामेडिकल क्षेत्रात समाविष्ट झालेल्या विद्याशाखा, कामाचे स्वरूप आणि संधी यांची ओळख करून घेऊयात.
मोठे झाल्यावर तुला काय व्हायचे आहे, असा प्रश्न लहानपणी कुणी विचारला की, बहुतांश मुलांचे उत्तर असते ते म्हणजे डॉक्टर. डॉक्टर या क्षेत्राभोवती आजही एक वलय आहे. परंतु, बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे डॉक्टर व्हायचे स्वप्न साकार होतेच, असे नाही. मात्र, निव्वळ डॉक्टरकी करण्यापुरतेच वैद्यकीय क्षेत्र मर्यादित नाही. वैद्यक क्षेत्राशी संबंधित अशी अलीकडच्या काळात जोमाने वाढलेली विद्याशाखा म्हणजे पॅरामेडिकल शाखा. वैद्यक ज्ञानाशी संबंधित अशा या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत. शिवाय या शाखेतील विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ हे डॉक्टर म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे स्वत:च्या नावामागे डॉक्टर ही उपाधी लावण्याची एक सुप्त इच्छा या निमित्ताने पूर्ण होऊ शकते. अर्थात हा झाला गमतीचा भाग. पॅरामेडिकल क्षेत्राचे महत्त्व आजही अबाधित आहे किंबहुना हे क्षेत्र म्हणजे वैद्यक क्षेत्राचा कणा ठरत आहे. कारण या क्षेत्रामुळे रुग्णाच्या आजाराचे नेमकेपणाने निदान करुन, त्यासाठी आवश्यक ती उपचारपद्धती ठरवणे हे वैद्यकतज्ज्ञांना सहजशक्य होते. शिवाय, अलीकडे विकसित होत असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राचा झपाटय़ाने विकास होऊ लागला आहे.  
पॅरामेडिकल क्षेत्राविषयी युवावर्गाचा कल वाढू लागण्याचे आणखी एक कारण म्हणजे, एमबीबीएस सारख्या वैद्यक शिक्षणाच्या प्रवेशासाठी वाढू लागलेली स्पर्धा. त्याचबरोबर वैद्यक पदवी शिक्षण पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. असे असले तरी पदवीपर्यंतचे शिक्षण हे करिअरच्या दृष्टीने पुरेसे ठरत नसल्यामुळे ‘स्पेशलायजेशन’साठी पुढे आणखी काही वष्रे शिकणे अपरिहार्य ठरते. मात्र, पॅरामेडिकल क्षेत्राचे तसे नसते. इथे शिक्षणाचा कालवधी मर्यादित स्वरूपाचा असतो आणि पदवी प्राप्त केल्यानंतर करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध असतात.
आज आपल्या देशामध्ये पॅरामेडिकल क्षेत्राविषयी पूरक ज्ञान देणारी अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत, जिथे पदवीबरोबरच वेगवेगळ्या स्वरूपांतील पदविका स्तरावरील अभ्यासक्रमही शिकवले जातात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांने विज्ञान शाखेतून बारावी केलेली असणे आवश्यक ठरते.
कामाचे स्वरूप
फिजिओथेरपी :
ही वैद्यकशास्त्राची एक महत्त्वाची विद्याशाखा आहे. ज्यात रुग्णांच्या उपचारपद्धतीचे योग्य मूल्यमापन, विश्लेषण करून पुढील उपचारांची नेमकी दिशा ठरवली जाते. प्रामुख्याने दीर्घ आजारातून बरे झाल्यानंतर अथवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर, बरेचदा रुग्ण पूर्ववत हालचाली करण्यास काहीसा असमर्थ ठरत असतो. अशा वेळी ़विशिष्ट स्वरूपाचे व्यायाम, मसाज आणि इलेक्ट्रोथेरपीच्या सहाय्याने रुग्णाला जे काही उपचार दिले जातात, त्यास फिजिओथेरपी असे म्हणतात. या फिजिओथेरपीद्वारे वेदनेवर मात करून स्नायूंना पूर्ववत बळकटी प्राप्त करण्याची क्षमता शरीरात निर्माण होते.
ऑक्युपेशनल थेरपी :
प्रामुख्याने शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या रुग्णांचा यात विचार केला जातो. बऱ्याच वेळा या रुग्णांना सर्वसामान्य स्वरूपातील शारीरिक हालचाली करणे कठीण होऊन जाते. अशा वेळी या थेरपीच्या सहाय्याने त्यांना या हालचाली करणे सहज सोपे जाईल, यावर लक्ष दिले जाते. ही थेरपी देत असताना तज्ज्ञ मंडळी विविध प्रकारच्या उपचारपद्धतींचा अवलंब करीत असतात. त्यातही मनोरंजनात्मक आणि निर्मितीक्षम अशा उपक्रमांवर त्यांचा अधिक भर असतो. जेणेकरून त्यांना त्यातून सहजपणे शिकताही येते आणि शिकता-शिकता आवश्यक त्या गोष्टी त्यांना सहज आत्मसात करता येतात.  
ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी :
श्रवणक्षमतेत निर्माण होणाऱ्या दोषांचा केला जाणारा अभ्यास म्हणजे ऑडिओलॉजी होय. बहिरेपणा म्हटले की, एखाद्याला पूर्णपणे ऐकू न येणे, असेच सर्वसामान्य गृहितक असते. खरे तर त्या रुग्णामध्ये कमी-अधिक प्रमाणात बहिरेपणाचा दोष निर्माण झालेला असण्याचीच शक्यता अधिक असते. अशा वेळी ती व्यक्ती योग्य रीतीने बोलण्यास वा स्पष्टपणे ऐकण्यास असमर्थ ठरते. अशा रुग्णांच्या व्यंगावर मात करण्यासाठी जी तज्ज्ञ मंडळी उपचार करतात, त्यांना ऑडिओलॉजीचे अभ्यासक म्हणतात. लिहिणे आणि बोलणे या क्रिया करताना, ज्या व्यक्तींना सामान्य व्यक्तींपेक्षा वेळ लागतो, अशांना स्पीच थेरेपिस्ट  खास तंत्रांद्वारे मार्गदर्शन करतात. उपचारांनंतर उणिवांवर मात करणे शक्य होते.  
फार्मसी :
ही औषधशास्त्राची व्यापक शाखा आहे. यात औषधांच्या विक्रीबरोबर ती तयार करण्याची प्रक्रियादेखील महत्त्वपूर्ण असते.
वैद्यकीय तंत्रज्ञान :
आजकाल वैद्यक क्षेत्र प्रगत होत असल्यामुळे आजाराच्या नेमक्या निदानासाठी विविध वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. यात शरीराच्या विविध भागांत असलेल्या फ्लुइड्सचे विश्लेषण करण्याबरोबरच ऊती, रक्त, विषाणू, पेशींची संख्या यांचे निरीक्षण, शरीरात घडून येणाऱ्या रासायनिक प्रक्रिया त्याचबरोबर संपूर्ण शरीराची अंतर्गत चाचणी आदी चाचण्या वैद्यक तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ करत असतात. कधी कधी अशा चाचण्या करूनही नेमक्या निदानासाठी पॅथॉलॉजिस्ट चाचण्यांची गरज भासते. अशा वेळी पॅथॉलॉजिस्ट निरीक्षणांचा अहवाल लक्षात घेऊन नेमके निदान केले जाते.       रेडिओग्राफी :
यात प्रामुख्याने एक्स-रे तंत्रज्ञानाचा समावेश होतो. शरीराच्या विविध भागांचे एक्स-रे काढून, त्यामधील स्थितीनुसार रुग्णाच्या आजाराचे निदान केले जाते. आणि मग त्यानुसार आवश्यक ती उपचारपद्धती डॉक्टर सुचवतात.  
ऑप्टोमेट्री :
डोळ्यांच्या दोषांशी निगडित असलेले हे क्षेत्र आहे. यात डोळ्यांची आवश्यक ती चाचणी करून, त्याद्वारे योग्य ती काळजी घेण्यास रुग्णाला सांगण्यात येते. अलीकडे चष्म्याऐवजी लेन्स वापरण्याचा प्रघात आहे. तेव्हा डोळ्यांची रचना लक्षात घेऊन त्यात योग्य बसतील अशा लेन्सचे डिझाइन करणे, त्या योग्य रीतीने डोळ्यांत बसवणे तसेच दृष्टीदोषांवर मात करण्यासाठी डोळ्यांचे विविध व्यायाम सुचविण्याचे कार्य ऑप्टोमेटरिस्ट करीत असतात .  
प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स :
कधी कधी गुणसूत्रांच्या सदोष रचनेमुळे अथवा एखाद्या अपघातात, एखाद्याने हात-पायसारखा अवयव गमावल्यास, योग्य त्या वैद्यकीय चाचण्या करून, त्यातील निष्कर्षांनुसार कृत्रिम अवयवरोपणाचा पर्याय रुग्णाला सुचवला जातो. हे अवयव तयार करण्यासाठी आणि ते बसवण्यासाठी ज्या व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेतली जाते, त्यांना प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स असे म्हणतात. अवयव तयार करून बसवून देणे, इतकेच त्यांचे काम नसते तर ते अवयव प्रत्यक्ष बसवल्यानंतर कशा पद्धतीने हालचाल करावी, कुठली काळजी घ्यावी तसेच कृत्रिम अवयवांचा टिकाऊपणा कसा टिकवावा किंवा तो कधी बदलावा, याबाबत रुग्णासह त्याच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करून देण्याचे काम या तज्ज्ञाचे असते.
पॅरामेडिकल हे असे क्षेत्र आहे जिथे वैद्यकीय अनुभवाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनदेखील महत्त्वाचा ठरत असतो. त्यामुळेच या क्षेत्रात प्रवेश करताना निरनिराळ्या वैद्यकीय स्वरूपातील
यंत्रे हाताळण्याची व त्यामागची त्यांची विशिष्ट रचना समजून घेण्याची क्षमता असावी. त्या यंत्राद्वारे रुग्णाची चाचणी करताना त्याला कोणत्याही स्वरूपाचा त्रास जाणवणार नाही, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी कामाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. एखाद्या रुग्णाच्या रोगनिदान पद्धतीसाठी डॉक्टरांना पॅरामेडिकल तज्ज्ञांचे सहाय्य लागत असते. उदा. रुग्णासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या करून, त्याचा योग्य अहवाल तयार करून देणे इ.
पॅरामेडिकल तज्ज्ञांचा रुग्णांशी अप्रत्यक्षपणे सबंध येत असतो. रुग्णाला कोणत्याही स्वरूपाची वैद्यकीय चाचणी करण्याची सूचना डॉक्टरांनी देताच, रुग्णांमध्ये नाना तऱ्हेच्या शंका जाग्या होतात. परिणामी, रुग्ण एका विशिष्ट तणावाच्या स्थितीत चाचणीसाठी येत असतो. अशा स्थितीत रुग्णाशी योग्य संवाद साधून त्यांच्या मनांवरील ताण हलका करता यायला हवा. सहनशीलता, रुग्णाशी उत्तम संवाद साधण्याची हातोटी याचबरोबर चाचण्यांचे योग्य रीतीने विश्लेषण करण्याची सवय, तर्कसंगत आणि वैज्ञानिक निष्कर्षांवरील अहवाल देणे, चांगली स्मरणशक्ती या गुणांची आवश्यकता या तज्ज्ञांकडे असावी लागते.  
पॅरामेडिकल तज्ज्ञ, मग तो चाचणी करून अहवाल देणारा असो वा रुग्णांवर थेरपी देणारा असो, रुग्णांच्या रोग निवारणासाठी डॉक्टरांना नेहमीच त्यांच्या सहकार्याची गरज भासत असते. दोघांच्या उत्तम सहकार्याने रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांइतकेच पॅरामेडिकल तज्ज्ञांना महत्त्व आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो