आकलन : विसंवादामागच्या कहाण्या
मुखपृष्ठ >> आकलन >> आकलन : विसंवादामागच्या कहाण्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आकलन : विसंवादामागच्या कहाण्या Bookmark and Share Print E-mail

प्रशांत दीक्षित ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘शेटजी विरुद्ध जनता’ या राजकीय कहाणीच्या जागी भांडवलशाहीला प्रतिष्ठा देणारी नवी राजकीय कहाणी रुजविण्याचा प्रयत्न मनमोहन सिंग यांनी १९९१मध्ये केला. आज पुन्हा ते तशीच धडपड करीत असले तरी जुन्या कहाणीचा प्रभाव ओसरलेला नाही.
मनमोहन सिंग यांनी किराणा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला वाव देण्याचा निर्णय घेतला आणि भारतात पुन्हा एकदा दोन विचारधारा एकमेकांशी भिडल्या.

अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतात दोन दृष्टिकोनात संघर्ष होत आला आहे. भारताची अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था कोणत्या मार्गाने न्यावी याविषयीचा हा झगडा आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यावर एकमत झालेले नाही. समाजात काही राजकीय दृष्टिकोन पक्के रुजलेले असतात. ‘पॉलिटिकल नॅरेटिव्ह’ असा शब्द यासाठी वापरला जातो. कहाणी हा शब्द नॅरेटिव्हच्या जवळ जाणारा आहे. समाजात काही कहाण्या रुजलेल्या असतात. या कहाण्या मतदारांचे दृष्टिकोन बनवितात आणि त्यानुसार ते मतेही देतात. या कहाण्यांना नेहमीच वस्तुस्थितीचा पक्का आधार असतो असे नाही, तरीही त्यांचा प्रभाव जबरदस्त असतो. लोक तर्कशास्त्रावर जगत नाहीत. जगण्यासाठी लोकांना गोष्ट हवी असते. कहाणी हवी असते. आपला मेंदू हा तार्किक युक्तिवाद ऐकण्यापेक्षा गोष्टी ऐकणे अधिक पसंत करतो. तर्काला केलेले आवाहन बुद्धीला पटले तरी आचरणात येतेच असे नाही, कारण तर्काने भावनेला हात घातलेला नसतो. कहाण्यांचे तसे नसते. त्या भावनेला हात घालतात आणि त्यामुळे माणूस चटकन निर्णय घेऊ शकतो. त्याच्या आयुष्याला अर्थ येतो.
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या देशात एकच कहाणी लोकप्रिय होती, ती म्हणजे स्वातंत्र्यदेवतेची आराधना. या कहाणीने कित्येकांचे जीवन अर्थपूर्ण केले. प्रत्येकाला कार्यप्रवण करण्याची क्षमता त्यामध्ये होती. ब्रिटिशांच्या लुटीमुळे तसेच जातीव्यवस्थेसारख्या आपल्या सामाजिक दोषांमुळे देशाची दुर्दशा झाली आहे आणि ब्रिटिशांच्या जोखडापासून मुक्तता करणे हे प्रथम कर्तव्य आहे, असे या कहाणीचे सार होते. टिळक, गांधी आदी नेत्यांमुळे या कहाणीला सत्याचे सामथ्र्य मिळाले.
स्वातंत्र्यानंतर देशनिर्माणाची नवी कहाणी सुरू झाली. पंडित नेहरू हे त्याचे निर्माते होते. मार्क्‍सवाद, तंत्रकुशलता यांची साथ घेऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची ही कहाणी होती. नेहरू हे लेनिनवादी वा माओवादी नव्हते, पण त्यांचा कल डाव्या विचारांकडे होता. देश शेटजींच्या हाती जाणार नाही याची दक्षता घेणे त्यांना आवश्यक वाटत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींच्या कहाणीने तरुण वर्ग जितका भारावला होता तसाच नवतरुण नेहरूंच्या कहाणीने भारावला. सामाजिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, शेटजींकडील संपत्ती गरिबांकडे गेली पाहिजे आणि हे सर्व सरकारने केले पाहिजे, हे या कहाणीचे सार होते. भांडवलदार विरुद्ध जनता, असा स्पष्ट भेद मांडला गेला. यातून भांडवलदार, उद्योगपती व श्रीमंतांबद्दल या देशामध्ये एक कडवट भावना निर्माण झाली. भांडवलशाही म्हणजे गरिबांची पिळवणूक असे चित्र लोकांच्या मनात पक्के बसले. काँग्रेस ही शेटजींच्या नव्हे तर गरिबांच्या बाजूची आहे, असे लोकांच्या मनात ठसविण्यात आले. या उलट जनसंघ हा शेटजी-भटजींचा पक्ष ठरला.
या कहाणीत नेहरूंनी आणखी एक धागा मिसळला होता, पण देशाच्या दुर्दैवाने त्या धाग्याकडे नेहरूंच्या नंतर कुणीच फारसे लक्ष दिले नाही. तो धागा होता तंत्रकुशलतेचा. आयआयटी, भाभा अणू केंद्रसारख्या संस्था परदेशी मदतीने स्थापन करणे आणि भाक्रासारख्या धरणांना आधुनिक काळाची मंदिरे म्हणणे यामध्ये खूप अर्थ होता. तंत्रकुशलतेतून देशाने स्वबळावर उभे राहावे असे नेहरूंचे स्वप्न होते. परंतु, भारताला हे जमले नाही. तंत्रकुशलतेतून संपत्ती निर्माण झाली नाही, उलट सरकारचे नियंत्रण वाढत गेले. इंदिरा गांधींच्या काळात ते अतोनात वाढले. त्यांच्य काळात या कहाणीमध्ये आणखी एक बदल झाला. विचारधारेपेक्षा नेत्यावरील निष्ठेला अधिक महत्त्व आले. नेहरूंच्या काळात काँग्रेसमध्ये अनेक मतभेद होते, पण नेहरू ते लीलया सहन करीत व त्याला विसंवादाचे स्वरूप येऊ देत नसत. इंदिरा गांधींच्या काळात मतभेद हा गुन्हा मानला गेला. नेत्यावरील निष्ठा ही कहाणी काँग्रेसने मनापासून स्वीकारली. आजही पक्षात गांधी घराण्यावरील निष्ठा ही पहिली कसोटी असते.
या काळातही ‘शेटजी विरुद्ध जनता’ असेच कहाणीचे स्थूल स्वरूप राहिले. यामुळेच बँकांच्या राष्ट्रीयीकरणासारख्या निर्णयांचे स्वागत केले गेले. ‘गरिबी हटाव’सारख्या घोषणेला जनतेने दाद दिली. मात्र पाश्चात्त्य देशांनी तंत्रकुशलतेतून तसेच व्यक्तीमधील गुणवत्तेला महत्त्व देणाच्या सवयीतून गरिबी हटविली होती याकडे दुर्लक्ष केले गेले. देशातील संपत्ती कशी वाढेल याकडे लक्ष देण्यापेक्षा श्रीमंतांकडील पैशावर नियंत्रण कसे आणता येईल, याकडे अधिक लक्ष होते.
याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. हे बदलायला पाहिजे हे इंदिरा गांधींना त्यांच्या अखेरच्या दिवसांत लक्षात आले होते हे पत्रव्यवहारावरून दिसते. राजीव गांधींनी त्या दिशेने अडखळत सुरुवातही केली, पण तरीही अर्थव्यवस्था गोत्यात येतच राहिली. इतकी की सोने गहाण ठेवावे लागले.
आता नवे नॅरेटिव्ह लिहिण्याची गरज होती. १९९१साली नव्या कहाणीचा जन्म झाला. नरसिंह राव व मनमोहन सिंग हे त्याचे निर्माते होते. अर्थव्यवस्था मुक्त करणे, अधिकाधिक गुंतवणुकीला प्राधान्य देणे, भारतीय अर्थव्यवस्थेला जगाशी जोडून अधिक सशक्त करणे, परकीय गुंतवणुकीला वाव देऊन देशात संपत्ती निर्माण करणे हे या कहाणीचे सार होते. ‘शेटजी विरुद्ध जनता’ ही कहाणी मागे पडली. या नव्या कहाणीत उद्योगपती, भांडवलदार यांच्याबद्दल आदराची भावना होती. त्याचबरोबर देशापुढील आदर्श म्हणून रशियाची जागा अमेरिकेने घेतली. अमेरिकी भांडवलशाहीतून देशाचा विकास होईल हे सांगितले गेले. मध्यमवर्गाला ही कहाणी आपलीशी वाटली. तरुण वर्ग त्यावर फिदा झाला. देशात गुंतवणूक वाढली. जगातील संधीचा फायदा घेऊन संपत्ती निर्माण होऊ लागली. कोटय़वधी भारतीयांचे जीवनमान बदलले.
ही सक्सेस स्टोरी होती. यातून भारताच्या भविष्याचे गुलाबी चित्र उभे राहिले. ‘फील गुड’ ही भावना आली. ‘गरीब व शोषितांना न्याय’ ही जुनी कहाणी टाकून ‘फील गुड’ भावनेतून भारताला महासत्ता बनविण्याची नवी कहाणी जनतेसमोर मांडून त्यावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र संपत्तीबद्दल संशय घेणाऱ्या मूळच्या ‘शेटजी विरुद्ध जनता’ या कहाणीचा प्रभाव ओसरलेला नव्हता हे भाजपच्या लक्षात आले नाही. ‘फील गुड’ची कहाणी शेटजींकडे झुकणारी आहे हे त्यांना कळले नाही. शेटजींबद्दलचा समाजातील दुस्वास अद्याप संपलेला नव्हता. काँग्रेसला हे कळले व काँग्रेसने हुशारीने ‘आम आदमी’चे नाव देऊन नव्या स्वरूपात पुन्हा ‘शेटजी विरुद्ध जनता’ ही कहाणी पेश केली. ती बहुसंख्यांनी स्वीकारली, कारण संपत्ती अद्याप समाजात सर्वदूर पोहोचली नव्हती.
‘आम आदमी’च्या कहाणीवर सत्तेवर आलेल्या काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्याकडे नेतृत्व दिले. पण मनमोहन सिंग हे ‘आम आदमी’वाले नव्हते तर ‘फील गुड’मधले होते. इथे काँग्रेस कात्रीत सापडली. देशाची अर्थव्यवस्था पक्की करण्यासाठी ‘फील गुड’ कहाणीची गरज होती, पण मते मात्र ‘आम आदमी’कडून मिळत होती. या रस्सीखेचीमध्ये आर्थिक सुधारणा रखडल्या. मात्र यातून आर्थिक स्थिती अधिक बिकट झाल्यामुळे मनमोहन सिंग यांना आता पुन्हा आपल्या १९९१च्या ‘फील गुड’ कहाणीकडे वळावे लागत आहे. आपल्या नव्या निर्णयांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी केलेल्या भाषणात वारंवार १९९१चा उल्लेख केला होता. मात्र ही कहाणी पुन्हा ‘शेटजीं’कडे झुकणारी असल्याने काँग्रेसचे जुने नेते धास्तावले आहेत. काँग्रेसने भांडवलाची भाषा सुरू करताच ममता बॅनर्जी यांनी ‘आम आदमी’ची कहाणी उचलली. ती त्यांच्या एकूण वागण्या-बोलण्याशी जुळणारीही आहे.
‘फील गुड’ व ‘आम आदमी’ या कात्रीत फक्त काँग्रेसच नव्हे तर सर्वच राजकीय पक्ष अडकले आहेत. चित्रपटाच्या भाषेत बोलायचे तर मनमोहन सिंग यांच्याकडे उत्तम पटकथा आहे. त्यांना चांगला निर्माता व दिग्दर्शक हवा आहे. याउलट ममता बॅनर्जीकडील पटकथेमध्ये अनेक कच्चे दुवे आहेत, पण त्याला भावनेचे अस्तर जबरदस्त असल्यामुळे ती उडवून लावणेही राजकीय पक्षांना शक्य नाही. या कहाणीत त्यागाची झलक आहे. जनतेला ती भावते.
‘फील गुड’ची कहाणी ही तरुणांना आकर्षित करणारी आहे. त्यामध्ये नावीन्य आहे. साहस आहे. उद्योग-व्यवसाय वाढविण्यास संधी आहे. पण त्याचबरोबर लुबाडणूक होण्याचा धोकाही आहे. ‘आम आदमी’च्या कहाणीत सुरक्षा आहे, स्वस्ताई आहे, पण तिजोरी भरण्याची व्यवस्था नाही. या दोन टोकांमध्ये भारत हेलकावे खात आहे.
भारताला खरी गरज आहे नव्या ‘पॉलिटिकल नॅरेटिव्ह’ची. जिथे संपत्ती आणि त्याग या दोन्हीला योग्य स्थान असेल अशा नव्या राजकीय कहाणीची. भारताच्या समृद्ध परंपरेत अशा समतोलाचा विचार सातत्याने मांडला गेला आहे. पंडित नेहरूंना सुचलेला पण त्यांच्याकडून सुटलेला तंत्रकुशलतेचा धागा पकडला आणि त्याभोवती ‘फील गुड’ व ‘आम आदमी’ची गुंफण केली तर ही नवी राजकीय कहाणी लिहिता येईल. तरुणांना अशी नवी कहाणी हवी आहे. कारण श्रीमंत होण्यात काही गैर आहे ही भावना भारतातील तरुणांच्या मनातून हळूहळू हद्दपार होत आहे. त्याला भौतिक समृद्धी हवी आहे. तशीच भावनिक सुरक्षाही हवी आहे. या दोन्ही गरजा भागविणारी कहाणी अजून जन्माला आलेली नाही. अशी कहाणी निर्माण करणाऱ्या प्रतिभावान राष्ट्रीय नेत्याची आज गरज आहे.
जगातील प्रगत देशांचा इतिहास पाहिला तर अशाच एखाद्या कहाणीने जनता झपाटलेली आढळते. मग ते ‘अमेरिकन ड्रीम’ असो वा डेंगने दाखविलेले ‘समृद्ध चीन’चे स्वप्न असो, मात्र ही कहाणी म्हणजे स्वप्नरंजन नसते. युद्धाप्रमाणे सर्व बाजूंनी सज्ज होत ती कहाणी वास्तवात आणायची धडपड करायची असते. तरच ही कहाणी जनतेला पटते.  हे काम असते राजकीय नेतृत्वाचे. प्रादेशिक पातळीवर नरेंद्र मोदी व नितीशकुमार हे काम थोडय़ा प्रमाणात करीत आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर असा नेता नाही. मनमोहन सिंगांची पटकथा म्हणून पुढे सरकत नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो