अभियंता : इमारतीचा शिल्पकार
मुखपृष्ठ >> लेख >> अभियंता : इमारतीचा शिल्पकार
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अभियंता : इमारतीचा शिल्पकार Bookmark and Share Print E-mail

alt

सुधीर मुकणे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
आपल्या सुंदर व सशक्त कल्पनेतून ऑर्किटेक्ट कागदावर इमारतीचे नकाशे, आराखडे बनवत असतो; व माझीच इमारत लक्षवेधी ठरविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. त्या कल्पनेला सत्यात उतरविण्याचे काम अभियंता करीत असतो. तोच त्या इमारतीचा खरा दिग्दर्शक असतो.
इमारतीच्या निर्मितीच्या कामांमध्ये जर का कोणावर जास्त जबाबदारी असते तर तो म्हणजे ‘साइट इंजिनीअर्स’, ‘प्रकल्प अभियंते’ यांच्यावर. त्यांच्या बरोबरीने काम करणारे त्यांचे सुपरवायझर्स, शिकाऊ इंजिनीअर्स ते महत्त्वाच्या पदावर काम करणारे सर्वच अभियंते हे इमारतीचे भवितव्य घडवीत असतात.
इमारतीच्या प्रकल्प अभियंत्यांना आर्किटेक्ट, डिझायनर्स, पासिंग इंजिनीअर्स ते मूळ मालकापर्यंत सर्वाच्याच सल्ल्याने काम करावे लागते. या सर्वाशिवाय तो आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही. पण प्रत्येकाशी संवाद साधताना, सर्वाचाच ताळमेल बसविताना, सर्वाना एकत्र जमविण्याची व त्यांच्याकडून प्लॅन मिळविण्यासाठी व प्रत्येक कामासाठी ना-हरकत मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करून इमारतीचे काम व कामाची प्रगती करून दाखवावी लागते, नाहीतर इमारतीचा निर्माता असलेला ‘बिल्डर’ हा कोणत्याही सबबी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. कारण त्याने काढलेल्या कर्जाच्या व्याजाचे मीटर हे सतत घोडय़ासारखे धावत असते व त्याचीच त्याला जास्त भीती वाटत असते.
पण प्रत्यक्ष इमारतीचे काम करणे किंवा ठेकेदारांकडून काम करून घेणे हीसुद्धा खूप मोठी बाब असते. कारण इमारतीच्या प्रत्येक कामांचा तो एकमेव ज्वलंत व जिवंत साक्षीदार असतो. प्रत्येक कामाची नीट माहिती त्यांनाच असते. तसेच प्रत्येक काम नियमानुसार, आराखडय़ानुसार नकाशाप्रमाणे होत असल्याची काळजी घेणे व इमारतीसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांची मागणी व पुरवठा यांच्यातसुद्धा समन्वय साधावा लागतो. अशा अभियंत्यांच्या कामाचा व्याप व सततचा दबाव असल्याने त्यांच्या कुटुंबावरसुद्धा परिणाम होत असल्याने त्यांच्यासाठी वेळेची कमतरता ही नेहमीचीच बाब असते.
शारीरिक मेहनतीप्रमाणेच व कामगारांच्या परिश्रमांवर ऊन, पाऊस व हिवाळा यांचा प्रत्यक्ष परिणाम होतच असतो. दररोज इमारतीच्या कामांची पाहणी करण्यासाठी व चेकिंगची कामे करण्यासाठी सर्व जिने चढून जाण्याशिवाय दुसरा पर्याय तर नसतोच. फारच थोडय़ा ठिकाणी सव्‍‌र्हिस लिफ्टची सोय असते. इमारतीसाठी लागणाऱ्या इतर कामांची व अभियंत्यांची कामे यावर एक नजर टाकू या.
०    इमारतीच्या सर्वच प्लॅन, आराखडे, नकाशे स्पेसिफिकेशन्स व द्यावयाच्या अ‍ॅमिनिटीजचा नीट अभ्यास करणे. प्लॅनमध्ये काही चुका किंवा त्रुटी असल्यास त्याबाबत संबंधित आर्किटेक्ट व डिझायनर्स यांच्याकडून दुरुस्ती करून लगेचच कामाला सुरुवात करणे.
०    जमिनीची चाचणी (Soil Testing) करून व पाण्याचे नमुने तपासून त्यांचे अहवाल आरसीसी डिझायनरला पाठविणे की, जेणेकरून त्यांना Soil-Bearing Capacity चा उपयोग इमारतीच्या पाया (Foundation) चा प्रकार ठरविण्यास उपयोगी होईल.
०    पायाच्या कामाच्या वेळी संबंधित प्रत्येकांना बोलावून होत असलेल्या कामाची माहिती देणे व त्यांच्या भेटीच्या व मार्गदर्शनाच्या नोंदी नेहमी ठेवणे.
०    बांधकाम साहित्याच्या मालाचा दर्जा नेहमी तपासणे.
०    प्लॅनप्रमाणे प्रत्येक काम कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेणे व त्याबाबतच्या सूचना व कामाची गुणवत्ता यावर सतत लक्ष देणे.
०    काँक्रीटिंग (Concreting) चा दर्जा सतत सांभाळणे तसेच Water-Cement Ratio, मिक्स डिझाइन (Mix Design), सीमेंट प्रपॉर्शन (cement-proportion),casting and curing वर सतत लक्ष देणे.
०    कॉलम चेकिंग, स्लॅब बीम स्टील, स्लॅब शटरिंग (Shuttering), स्टील बांधणी व त्याची चेकिंग त्याबरोबर इमारतीचे इलिवेशन (Elevation), संबंधितांकडून पाहणी व तपासणी करून घेऊन स्लॅब भरणे.
०    दैनंदिन कामाचा अहवाल दररोज लिहिणे व मटेरिअल कन्झमशन रिपोर्ट तयार करणे.
०    इमारतीच्या संदर्भातील प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहून कामाच्या बाबतीतल्या अडचणी संबंधितांना सांगून त्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.
०    कॉन्ट्रॅक्टरचे बिल व मेजरमेंट (Measurement) ची कामे करून त्यांच्या पेमेंटची काळजी घेणे, जेणेकरून कामामध्ये अडथळा न येऊ देणे.
०    इमारतीत येणाऱ्या दुसऱ्या एजन्सी उदा. लिफ्ट, फायर फायटिंग, महानगर गॅस, टेलिफोन, इंटरकॉम, एसटीपी (मलनि:सारण प्रक्रिया केंद्र), फेब्रिकेशन व इतरांकडून कामे करून घेणे. त्यांच्या काही अडचणी असल्यास सोडविणे.
०    लिफ्ट (मटेरियलची), मिक्सर, व्हायब्रेटर्स, नीडल्स, क्रेन, डिझेल जनरेटर, रेडीमिक्स प्लान्ट (Ready-mix-Plant), बोरिंग पंप इ.ची देखभाल करणे, लक्ष देणे.
०    कॉन्ट्रॅक्टरकडे असलेल्या इंजिनीअरनी लेबर पेमेन्टकडेसुद्धा लक्ष द्यावे लागते.
०    Cube Testing, Mix Design, Steel Testing वेळच्या वेळी करून प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी पाठवून त्यांचा दर्जा व गुणवत्ता प्रमाणपत्रे व्यवस्थित सांभाळून ठेवणे, जेणेकरून त्यावरून इमारतीत वापरलेल्या साहित्यांचा दर्जा स्पष्ट होऊ शकतो.
०    सरतेशेवटी प्रत्येक फ्लॅटवर लक्ष केंद्रित करून त्यात असणाऱ्या त्रुटी दूर करून त्याचा ताबा देऊन ग्राहकाला संतुष्ट करणे, अशी जबाबदारीसुद्धा पार पाडावी लागते.
वरीलप्रमाणे आपली कामे करून आपल्या कंपनीसाठी चांगल्या प्रेझेन्टेशनची तयारी या अभियंत्यांना नेहमीच ठेवावी लागते. दुसऱ्यांच्या घराच्या स्वप्नांची पूर्तता करणारा, स्वप्न साकारणारा अभियंता हाच इमारतीचा खरा शिल्पकार आहे, यात मुळीच शंका नसावी!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो