खाणे पिणे आणि खूप काही : आहारसाक्षर बनवणारी पुस्तके...
मुखपृष्ठ >> खाणे, पिणे नि खूप काही >> खाणे पिणे आणि खूप काही : आहारसाक्षर बनवणारी पुस्तके...
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाणे पिणे आणि खूप काही : आहारसाक्षर बनवणारी पुस्तके... Bookmark and Share Print E-mail

alt

अमिता बडे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आहार हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक. मात्र नेमकं काय, केव्हा आणि किती खावं याबद्दल मतभेद असतात. डॉ. मालती कारवारकर यांनी लिहिलेल्या ‘आहारसूत्र’ मालिकेतील तीन पुस्तकांतून आहाराबाबत आपल्याकडे असलेली निरक्षरता काही प्रमाणात दूर होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
आज प्रत्येकाचं जीवन कमालीचं धकाधकीचं झाले आहे. घडय़ाळाच्या काटय़ाशी बांधल्या गेलेल्या आयुष्यात आपली जीवनशैलीही कमालीची बदलली आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत.  स्वतला सिद्ध करण्याच्या नादात अनेकदा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले जाते. धावपळीच्या या आयुष्यामुळे ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’ हे आपण विसरत चाललो आहोत.


तारुण्यातल्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे निर्माण होणाऱ्या प्रकृतीच्या तक्रारी फारशा गांभीर्याने घेतल्याही जात नाही. मात्र वाढत्या वयोमानानुसार या तक्रारी उग्र रूप घेतात. मग आपण केलेल्या चुकांची आणि आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींची जाणीव होऊ लागते. पण तोपर्यत बराच उशीर झालेला असतो. वास्तविक पाहता आपला भारतीय आहार हा उत्तम प्रकारचा चौरस आहार म्हणून गणला जातो. मात्र असा चौरस आहार घेणे म्हणजे वेळेचा अपव्यय,अशी भावना वाढीस लागल्यामुळे अनेकदा जंक फूड खाल्ले जाते. जंक फूड आरोग्यासाठी योग्य नाही हे माहिती असूनही केवळ वेळ वाचवण्याच्या हेतूने ते खाल्ले जाते, अगदी वारंवार खाल्ले जाते. या जंक फूडच्या सेवनामुळे होणारे त्रास नंतर जाणवू लागतात.
 जंक फूड खाणाऱ्या वर्गासोबतच आरोग्याविषयी जागरुक असलेला वर्गही मोठय़ा प्रमाणावर आहे. हा वर्ग आपल्या प्रकृतीला अती सांभाळून असतो. त्यामुळे त्यांनाही नेमके काय खावे असा प्रश्न पडतो. जास्त खाल्ल्याने आपण जाड होऊ या भीतीने अनेकदा कमी खाल्ले जाते; परिणामी अशक्तपणाच्या तक्रारी जाणवू लागतात. धावपळीच्या काळात नेमके कसे खावे आणि किती खावे याचे मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत. 'बदलत्या काळानुसार माणसाची जीवनशैली बदलली गेली आहे. ही जीवनशैली बदलणे अवघड आहे; त्यानुसार आहार बदलणे आपल्या हातात आहे' आहाराचे हे सूत्र घेऊन आहारतज्ज्ञ आणि पाकतज्ज्ञ असलेल्या डॉ. मालती कारवारकर यांची मेनका प्रकाशनाने 'आहारसूत्र' या मालिकेअंर्तगत तीन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. आपला आहार आपल्या जीवनशैलीला सुसंगत असावा ही मूलभूत गोष्ट आहे. मात्र सध्याच्या दगदगीच्या काळात सुसंगत आहार याचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या सोयीने काढला आहे. आहार म्हणजे उभ्या उभ्या कुठेही खाता येईल, पटकन पोट भरल्याचे समाधान देईल आणि मुख्य म्हणजे झटपट तयार होईल असा काढला जाऊ लागला आहे, असे मत डॉ. कारवारकरांनी व्यक्त केले आहे. इतकेच नाही, तर आहाराच्या बाबतीत आपण सारेच जण निरक्षरांच्या जमातीत मोडतो हे असं त्याचं मत आहे. कारवारकर यांनी व्यक्त केलेले हे मतच सध्याची आपली खाण्याची शैली पाहता नेमके ठरते.
आहारसूत्रच्या पहिल्या भागात- ‘याला जीवन ऐसे नाव’ यात माणसाच्या बदलत गेलेल्या जीवनशैलीचा ऊहापोह करण्यात आला आहे. सर्वसामान्यपणे सर्व माणसे थोडय़ा फार फरकाने एकाच प्रकारचे अन्न खातात. एकाच घरात राहणारी माणसे एकाच वातावरणात राहतात. शिक्षण पूर्ण झाल्याने नोकरी व्यवसायात रुळेपर्यंत त्यांच्या जीवनात फारसा फरक पडत नाही. नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने माणसाच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल घडून येतात. तुम्ही कोणता व्यवसाय करता, तुम्ही कधी खाता, काय खाता, किती खाता, कसे वागता, किती झोपता, कधी झोपता, व्यायाम करता की नाही या सर्वावर तुमचा आहार ठरत असतो.
सध्याच्या आधुनिक काळात माणूस आपल्या शरीराला विसरत चालला आहे. भौतिक सुखामागे धावताना तो शरीराची नैसर्गिक धारणा विसरत चालला असल्याने त्याच्या आरोग्याच्या प्रश्नांचा गुंता वाढत चालला आहे. या विविध गुंत्यांची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच आपला आहार केवळ पोटभरू नसावा, तर तो पोषण करणाराही असावा तसेच आहाराच्या पोषणमूल्यांविषयी आहाराची काही सूत्रे लेखिकेने या पहिल्या पुस्तिकेतील १५ लेखांमधून सांगितली आहेत.
आहारसूत्रच्या दुसऱ्या भागात-‘आहारशास्त्राचे अनेक कंगोरे’ यामध्ये आहारशास्त्राचा विचार करत असताना 'स्त्री' शिवाय त्याला पूर्णत्व येऊच शकत नाही. कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य देण्यासाठी तिच्याच आरोग्याचे महत्त्व सर्वात महत्त्वाचे आहे. पण प्रत्यक्षात हे चित्र उलट दिसते. ती स्वतच्या शरीराबाबत निष्काळजी असतेच, पण घरातील इतर सदस्यही त्याबाबत दुर्लक्षच करतात. आर्थिक ऐपतीपेक्षा अज्ञान हेच त्यामागचे मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष हे पुस्तक वाचल्यानंतर येतो.
आपण जे अन्नग्रहण करतो, त्या अन्नपदार्थाची माहिती करून घेणे, त्यानंतर कोणते अन्नघटक कोणत्या अन्नपदार्थातून मिळतात याची नोंद कशी घ्यावी याचे मार्गदर्शन या पुस्तिकेतून लेखिकेने केले आहे. शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलाच्या/मुलीच्या डब्यात आवर्जून पोळी-भाजी देतो. ते देऊन आपण त्यांना पूर्णान्न देतो अशी आपली अपेक्षा असते. पण ही समजूत कशी चुकीचे आहे हे यातील alt

‘पोळी-भाजीची पिढी’ या लेखातून लक्षात येते. हा लेख वाचल्यानंतर आपल्या पाल्याला डब्यात फक्त पोळी-भाजीच देणाऱ्या पालकांच्या डोळ्यात निश्चित झणझणीत अंजन पडेल यात शंका नाही!
समाजामध्ये झालेल्या औद्योगिकीकरणामुळे आपल्या जीवनशैलीत कमालीचे बदल घडून आले आहेत. या औद्योगिकीकरणाच्या झपाटय़ात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. घराची आणि कार्यालयातील जबाबदारी त्या लीलया पेलत आहेत. पण ही जबाबदारी पेलत असताना त्यांना अनेक ताणतणावांच्या प्रसंगातून जावे लागते. अशावेळी त्यांच्या शरीरात काही रासायनिक बदल घडून येतात, पण त्यांना याची जाणीव नसते. या बदलांमुळे आणि घरातील इतर सदस्यांची बडदास्त ठेवण्याच्या नादात त्या आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करत असतात. यामुळे त्यांना अनेक शारिरीक व्याधींना सामोरे जावे लागत असते. पण त्याकडे दुर्लक्ष करूनही त्यांचा कामाचा आटापिटा सुरू असतो. अशा स्त्रियांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन मालती कारवारकर यांनी ‘होय, मी नोकरी करते!’ या लेखातून केले आहे. हा लेख वाचल्यानंतर नोकरी करणाऱ्या स्त्रियांना अतिशय उपयुक्त माहिती निश्चितपणे मिळते.   या पुस्तिकेत एकूण २३ लेख आहेत. यातील सर्वच लेख माहितीपर आहेत. पण त्यातही ‘सौंदर्यवर्धनासाठी आहार’, ‘साठीनंतर काय आणि कसं?’, ‘अँटिबायोटिक्स टाळण्यासाठी’, ‘एक आगळावेगळा धाडसी प्रयोग’, ‘आहारशास्त्र बदलत्या काळाची गरज’ हे लेख आपल्याला वाचक म्हणून समृद्ध करतातच; सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहाराच्या बाबतीत साक्षरही बनवतात. ज्योतिषशास्त्र आणि आहारशास्त्र हा या पुस्तकातील लेख तर आहारशास्त्राकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन देऊन जातो.
आहार सूत्राच्या तिसऱ्या भागात- ‘गाथा आहारशास्त्रातल्या शोधांची’ या पुस्तिकेत बदलत गेलेल्या जीवनशैलीमुळे बदललेल्या आहारपद्धतीवर नेमकेपणाने ऊहापोह करण्यात आला आहे. हल्लीच्या काळात कामाच्या पातळीवर आणि घरगुती पातळीवर निर्माण होणाऱ्या ताणतणावांना सामोरे जाताना अत्यंत चुकीच्या पद्धतीचा आहार आपण प्रत्येकजण घेत असतो. ज्या पद्धतीचा आहार आपण घेतो, करतो; त्यामुळे शरीरातील चरबी वाढली जाते, तसेच अनेक शारीरिक व्याधी लहान वयात भेडसावू लागतात. औद्योगिकीकरण, जागतिकीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे लहान वयातच कोला पद्धतीच्या पेय प्रकारांत आणि मोठय़ा प्रमाणात चॉकलेटचे सेवन केले जाऊ लागले आहे. यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे विकार लहान वयात होऊ लागले आहेत. या दुष्परिणामांबाबत विस्तृत परामर्श या पुस्तिकेतील ‘व्हॉट इज राँग वुइथ सॉफ्ट ड्रिंक्स’ या लेखात घेतला आहे. हा लेख वाचल्यानंतर जर तुम्ही सुजाण असाल तर पुन्हा आयुष्यात कधीही सॉफ्ट ड्रिंक्स घेणार नाही. आपल्या प्रकृतिनुरूप आहार कसा आणि किती घ्यावा याचे सूत्र महिलांबरोबरच पुरुषानांही कशा पद्धतीने लागू होते हे सांगणारा या पुस्तिकेतील खास पुरुषांसाठी (सुखाचा मूलमंत्र) आहे. मोठमोठी साम्राज्ये उभी करण्याची क्षमता पुरुषांमध्ये असते, पण स्वतच्या तब्येतीची काळजी घेणे, तब्येत राखणे हे त्यांना जमत नाही. त्यामुळे तमाम पुरुष मंडळींनी तर हा लेख जरूर वाचावा असाच आहे. त्याचप्रमाणे नोकरदार महिलांनी आपला आहार कसा ठेवावा हे सांगणारा 'नोकरदार स्त्रीचा आहार' आणि ‘हॉर्मोन्सच्या जगात’ हे लेख सर्व मैत्रिणींसाठी मौलिक मार्गदर्शनपर ठरावेत. आपण जो आहार घेतो, त्यावरून आपला स्वभाव ठरत असतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपला स्वभाव शांत, संयमी असावा असे वाटत असेल तर आपला आहार कसा असावा हे ‘आहार तामसी कसा होतो?’ या लेखातून नेमके मार्गदर्शन लेखिकेने केले आहे.
डॉ. मालती कारवारकर यांनी लिहिलेल्या आहारसूत्र मालिकेतील या तीन पुस्तकांतून आपल्या  बुद्धीला तर चांगले खाद्य उपलब्ध करून दिले आहेच; याशिवाय आहाराबाबत आपल्याकडे असलेली निरक्षरता काही प्रमाणात दूर होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो