आरोग्यम् : हिस्टरेक्टोमी
मुखपृष्ठ >> आरोग्यम् >> आरोग्यम् : हिस्टरेक्टोमी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आरोग्यम् : हिस्टरेक्टोमी Bookmark and Share Print E-mail

alt

डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हिस्टरेक्टोमी अर्थात गर्भाशय पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला काही वेळा डॉक्टर देतात. काय आहेत त्याची कारणे, उपचार आणि कशी घ्यावी त्यानंतरची काळजी.
गेल्या दोन-अडीच महिन्यांत गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेबाबत काही चिंताजनक बातम्या वाचनात आल्या. एका विशिष्ट राज्यात हजारो ‘अनावश्यक’, ‘हिस्टरेक्टोमीज’ (गर्भाशय काढायची शस्त्रक्रिया) केल्या गेल्या! राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत मिळणाऱ्या मोबदल्याच्या लालसेने हे होत होते.

तसेच या शस्त्रक्रियेविषयीच्या एका शोधप्रबंधात असे दिसून आले आहे की, ३५ वर्षांपेक्षाही लहान अनेक स्त्रिया; पाळीचा क्लेश नको; नवरा नसबंदी करून घेत नाही; परत परत गर्भधारणा होते या कारणांसाठी शस्त्रक्रिया करून घेतात! ही शस्त्रक्रिया एवढी सोपी आहे का? तांत्रिकदृष्टय़ा सोपी असली तरी हिस्टरेक्टोमीचे काही दुष्परिणाम आहेत का? ती कधी करावी लागते? त्या आधी काय तयारी करावी? हिस्टरेक्टोमीनंतर काय काळजी घ्यायची असते, आज या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊ.
हिस्टरेक्टोमीचा अर्थ काय? : गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेला हिस्टरेक्टोमी म्हणतात. याचे तीन प्रकार आहेत.
टोटल हिस्टरेक्टोमी : गर्भाशय व गर्भाशयाचे मुख्य काढण्याची शस्त्रक्रिया.
सबटोटल किंवा सुप्रासव्‍‌र्हायकल हिस्टरेक्टोमी : गर्भाशयाचे मुख न काढता फक्त वरचाच भाग काढणे. सहसा गर्भाशय अतिरक्तस्राव, फायब्रॉइडच्या गाठी यासाठी काढले जाते. जर खालचा, गर्भाशयाच्या मुखाचा भाग आधीच्या सीझेरियन वगैरेमुळे चिकटला असेल तर, लघवीच्या पिशवीला इजा होऊ नये म्हणून, तो भाग काढायचे टाळले जाते व फक्त गाठी असणारा आणि अतिरक्तस्रावासाठी कारणीभूत असणारा वरचा भाग काढला जातो.
गर्भाशय, बीजाशय व बीजनलिका काढणे : जर बीजाशयाचा विकार असेल, कर्करोग असेल अथवा रुग्ण महिलेचे वय पन्नाशीपुढे असेल तर गर्भाशयाबरोबर बीजाशयेही काढण्याचा सल्ला दिला जातो. पन्नाशीच्या महिलांची बीजाशये क्रियाशील नसतात व त्यात हॉर्मोन्स बनणे बंद झालेले असते, असा समज खूप प्रचलित आहे. पण काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, निरोगी असलेली बीजाशये काढू नयेत.
गर्भाशय कुठच्या विकारांसाठी काढतात, हे आपण पूर्वी त्या विकारांचा आढावा घेताना पाहिले आहेच.
साधारणत: फायब्राइडच्या गाठी, अनियमित व अतिरक्तस्राव, गर्भाशय खाली सरकणे, कर्करोग एण्डोमेट्रिओसिस, बीजाशयाची सिस्ट्स या विकारांसाठी शस्त्रक्रिया लागते. रुग्ण स्त्रीचे वय तिला अजून मुले हवी आहेत की कसे आणि विकार हे सर्व विचारात घेऊन कुठच्या प्रकारची व कुठच्या मार्गाने शस्त्रक्रिया करायची हे आपले डॉक्टर ठरवतात.
शस्त्रक्रियेचा मार्ग म्हणजे काय?
गर्भाशय ओटीपोटाच्या पोकळीत असते. गर्भधारणेनंतर ते थोडे तरी सैल पडतेच. यामुळे बऱ्याचदा विकारग्रस्त गर्भाशय योनीमार्गातूनच काढता येते. हा झाला पहिला मार्ग. सोपा; पण काही ठराविक कारणांसाठी वापरला जाणारा! या शस्त्रक्रियेनंतर पोटावर टाके नसल्याने महिला लवकर उठू बसू शकतात. वेदना कमी होतात.
दुसरा मार्ग पोटावर छेद करून करायचा! आजकाल सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढल्याने व त्यामुळे पोटात गर्भाशय लघवीच्या पिशवीला चिकटले असण्याची शक्यता वाढल्याने या मार्गाची गरज अधिक भासते. यात पोटावर उभा अथवा आडवा छेद करून गर्भाशय काढले जाते. टाके आल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर वेदना थोडय़ा अधिक होतात. तसेच टाके पिकणे वगैरे होऊ शकते, हर्निया होऊ शकतो. तिसरा मार्ग- लॅप्रोस्कोपी : आधुनिक काळात बहुधा सर्वच डॉक्टर या पद्धतीने शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देतात. या मार्गाने शस्त्रक्रिया करण्यासाठी कौशल्य अधिक लागते. तांत्रिकदृष्टय़ा ही शस्त्रक्रिया कठीण असते. आधुनिक साधने, कॅमेरे इ. आवश्यक असल्यामुळे खर्चही वाढतो. पण छोटेसे तीन-चार टाके आल्यामुळे महिला लवकर चालू फिरू शकतात, वेदना कमी होतात. ज्यांना व्रण कसा दिसेल, अशी काळजी असेल. अशा महिलांसाठी ही ‘की होल’ सर्जरी हे वरदानच आहे! आजकाल अनेक डॉक्टर कॅन्सरची ऑपरेशनेसुद्धा एण्डोस्कोपीद्वारा करतात.
हिस्टरेक्टोमीच्या आधी कुठची तयारी करावी लागते?
आपल्याला वयपरत्वे अनेक छोटेमोठे कायमचे मित्र मिळतात. माझा संकेत ब्लडप्रेशर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, दमा इ.कडे आहे. कधी कधी क्षयरोग, थायरॉइडचा विकार, स्थूलता इ. त्रासही संभवतात. शिवाय बहुतांशी भारतीय महिला अ‍ॅनिमिक (पण्डुरोगग्रस्त) असतात. आपली काही दुसऱ्या आजारांसाठी शस्त्रक्रिया झालेली असू शकते. काही महिलांना काही औषधांची अ‍ॅलर्जी असते.
या सर्व गोष्टींबाबत आपल्या डॉक्टरांना आणि भूल देणाऱ्या तज्ज्ञांना (अ‍ॅनेस्थेटिस्ट) संपूर्ण माहिती देणे हितावह असते. आपल्याला डॉक्टर रक्तचाचण्या, कार्डिओग्राम, छातीचा एक्स-रे करायला सांगतात. लघवीची तपासणीही सांगतात.
गर्भाशयाच्या विकाराला अनुसरून पॅपस्मिअर एण्डोमेट्रियल बायोप्सी, सोनोग्राफी, क्वचित प्रसंगी सी.टी. स्कॅनही करून घ्यावा लागतो. हिस्टरेक्टोमी कुठच्या अ‍ॅनेस्थेशियात करतात? बहुधा हिस्टरेक्टोमी रिजनल (स्पायनल, इपिडय़ुरल) म्हणजे शरीराचा पोटापासून खालचा भाग बधिर करून केली जाते. क्वचितच जनरल अ‍ॅनेस्थेशिया (पूर्ण बेशुद्ध करून) मध्ये हिस्टरेक्टोमी केली जाते. यातला कुठचा पर्याय योग्य ते आपले अ‍ॅनेस्थेटिस्टच ठरवतील.
शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज लागते का?
बहुतेक मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी रक्ताची सोय करणे आवश्यक असते. आपल्या परिचयाचे सुदृढ, निरोगी असे रक्त देणारे कोणी असले आणि रक्तगट जुळत असला तर ऑपरेशनआधी त्यांनी रक्तपेढीत रक्तदान करून ठेवल्यास ऐनवेळी धावाधाव करावी लागत नाही. शिवाय जरी रक्त चढवायची गरज भासली नाही तरी ते रक्त कोणा तरी गरजू व्यक्तीच्या उपयोगी निश्चितच पडेल!
जेव्हा डॉक्टर शस्त्रक्रियेआधी संमतिपत्रावर सही घेतात; तेव्हा शस्त्रक्रियेत उद्भवणाऱ्या गुंतागुंतीबद्दल त्यात उल्लेख असतो, तो भाग नीट वाचावा व शंकासमाधान करून घ्यावे.
ऑपरेशनआधी व नंतर काही तास रुग्णाला काही खायला-प्यायला दिले जात नाही. सलाइन द्वारा व ग्लुकोजद्वारा पोषण मिळते. लघवीलाही नळी (कॅथेटर) बसवलेली असते. सगळे सुरळीत पार पडले तर साधारण एक दिवसात तोंडी द्रवपदार्थ व नंतर खाणे चालू होते व लघवीची नळी शस्त्रक्रियेला अनुसरून योग्य वेळी काढली जाते. काढलेले गर्भाशय हिस्टोपॅथॉलॉजी तपासणीसाठी पाठविले जाते. या तपासणीच्या निकालांचा योग्य पाठपुरावा करणे व त्याला अनुसरून पुढचा इलाज करणे हे आवश्यक असते.
ऑपरेशननंतर काय आहार घ्यावा?
शस्त्रक्रियेनंतर पहिले दोन-तीन दिवस तर विशेष खाणे जमतही नाही. टाक्यांचे दुखणे, मर्यादित हालचाल, इकडेतिकडे असलेल्या अनेक नळ्या, औषधांचे वास व चव यामुळे होणारी मळमळ या अनेक कारणांमुळे नीट पोटभर खाता येत नाही. अ‍ॅसिडिटी (आम्लपित्त) सुद्धा होते. यासाठी जमेल तसा हलका, पचायला सोपा, कमी तेल-तिखट असलेला आहार घ्यावा. पाणी, फळांचे रस वगैरे घ्यावे. मधुमेह, उच्च रक्तदाब, लिव्हर, किडनीचे आजार वगैरे असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घ्यावा.
टाके कधी काढतात?
जर विरघळणारे आणि बाहेर न दिसणारे टाके असतील तर ते काढले जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी आजकाल त्वचेवरील टाक्यांच्या जागी स्टेपल्स लावले जातात. पोटाचे टाके बहुदा सात दिवसांनंतरच काढले जातात. शस्त्रक्रिया योनीमार्गातून केली असली तर टाके काढण्याचा प्रश्न नसतोच.
घरी गेल्यावर काय काळजी घ्यावी? घरचे काम करायला कधी सुरुवात करू शकते? परत कामावर कधी रुजू होऊ शकते? रुग्णालयातून रजा मिळाल्यावर घरच्या घरी बसल्या बसल्या साधे काम आपण जरूर करू शकतो. खूप वाकावे, उकिडवे बसावे लागेल, अशी कामे निदान महिनाभर टाळावीत. खोकला आल्यास किंवा बद्धकोष्ठामुळे शौचाला जोर करावा लागल्यास टाके दुखतात व त्यांच्यावर ताण येतो. म्हणून खोकल्यावर लागलीच उपचार करावेत. बद्धकोष्ठ टाळण्यासाठी पाणी भरपूर प्यावे. त्यामुळे लघवीही साफ होईल आणि कॅथेटरमुळे होणारी जळजळसुद्धा टळेल.
शस्त्रक्रियेमध्ये गुंतागुंत (कॉम्प्लिकेशन्स) काय होऊ शकतात, या प्रश्नाचे मर्यादित उत्तर नाही आणि त्यांची यादी येथे देऊन वाचकांना घाबरवण्याचा आमचा मानस नाही. पण धोक्याची लक्षणे कुठची, हे जाणणे आवश्यक आहे.
टाक्यांवर सतत ठणका लागणे, पट्टी ओली होणे, ताप येणे, योनीमार्गातून रक्त अथवा दरुगधीयुक्त स्राव येणे ही इन्फेक्शनची (जंतुसंसर्गाची) लक्षणे आहेत. पाठीत बरगडय़ांखाली दुखणे, योनीमार्गातून लघवीसारखे पाणी जाणे, पाय सुजणे ही किडनी- मूत्राशय, मूत्रनलिका यांच्याशी संबंधित इजा/ गुंतागुंत यांची लक्षणे आहेत.
श्वास लागणे, खूप खोकला येणे, फुफ्फुसांचे त्रास दर्शवतात. उलटय़ा होणे, पोट फुगणे, शौचाला न होणे- आतडय़ांचे त्रास दर्शवतात. यापैकी काहीही लक्षणे निदर्शनास आली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा.
एक प्रश्न महिला नेहमी विचारतात तो म्हणजे ‘या शस्त्रक्रियेनंतर वजन वाढेल का?’
वजन वाढते ते व्यायामाच्या अभावाने आणि चुकीच्या आहाराने. साधारण ज्या वयात ही शस्त्रक्रिया होते त्याच वयात सांधे, कंबर वगैरेही दुखत असल्याने आपण चालायला, व्यायाम करायला तयार नसतो. मग वजन वाढते आणि सांधे व कंबर अधिकच त्रास देतात.
अनेकदा एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे हार्मोन्सच्या गोळ्या घ्याव्या लागतील का? कधी कधी अगदी लहान वयात तिशी-पस्तिशीत गर्भाशय काढावे लागते. बीजाशये काढली नसली तरी हिस्टरेक्टोमीनंतर बीजाशयांचे काम हळूहळू मंदावते व रजोनिवृत्ती (मेनोपॉज)ची लक्षणे- योनीमार्गात जळजळ, हॉट फ्लशेस (एकदम गरम होणे), हाडे कमकुवत होणे इ. दिसू लागतात. यासाठी हार्मोन्सची भरपाई करणे (हार्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी) उपयोगी पडते. पण याच्या काही विपरीत परिणामांमुळे ही थेरपी खूप विचार करून, निवडक केसेसमध्येच दिली जाते आणि मग नियमितपणे मॅमोग्राफी वगैरे करून घ्यावी लागते.
शेवटी असा प्रश्न जो प्रत्येकीच्या मनात असतो, पण विचारायला भीड वाटते तो म्हणजे- हिस्टरेक्टोमीनंतर लैंगिक संबंध कधी सुरू करावेत? योनीमार्गातील टाके सुकून तो भाग पुन्हा पूर्ववत व्हायला दीड-दोन महिने जाऊ द्यावेत. हिस्टरेक्टोमी करून घेतली म्हणजे काही आपले स्त्रीत्व संपले, असे मानू नये. याबाबतीत अनेक महिलांचे सकारात्मक रिस्पॉन्सही ऐकायला मिळतात. ‘‘डॉक्टर, मी एकदाची त्या पाळीच्या वेदनांतून सुटले. आता मी दमत नाही, मोकळेपणाने वावरायला घाबरत नाही.’’
या सगळ्यांचा सारांश असाच की, योग्य कारणासाठी, योग्य मार्गाने केलेली हिस्टरेक्टोमीची शस्त्रक्रिया रुग्ण महिलांना लाभदायक ठरते. पण प्रत्येकीने ही शस्त्रक्रिया, सर्वतोपरी विचार करून, आपले शंकानिरसन करून घेऊन मगच करून घ्यावी. सरकारी स्कीम वगैरे सगळे ठीक, पण आपले आरोग्य आपल्याच हातात आहे!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो