स्त्री समर्थ : ‘माझं अंगण, माझं गाव’
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : ‘माझं अंगण, माझं गाव’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : ‘माझं अंगण, माझं गाव’ Bookmark and Share Print E-mail

alt

डॉ. प्रिया आमोद , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एखाद्या शहरात स्त्रीनं वेगळं काही करून दाखविणं आणि खेडय़ात करून दाखविणं यात मोठा फरक असतो. त्यातून ते खेडं शहरापासून दूर, दुर्गम भागात असेल तर काम करणाऱ्या बाईसमोर ते एक मोठं आव्हान ठरतं. कोल्हापूर जिल्ह्य़ातील गगनबावडा तालुक्यातील खडुळे गावातील उषाताईंनी प्रामाणिक इच्छाशक्तीच्या जोरावर स्वत:चा, स्वत:च्या गावाचा कायापालट करून दाखवला आहे.
उषाताई ज्ञानदेव पाटील. कुठल्याही खेडय़ात असते तशी साधीशी गृहिणी. तिचं माहेर आतकीरवाडी. तिथून तिला रोज पाच-सहा किलोमीटर चालत शाळेला जावं लागायचं.

दहावीपर्यंत शिक्षण होऊनही पुढे शिकता आलं नाही. सतराव्या वर्षी लग्न होऊन खडुळ्यात ती आली. शेतीची कामं, गुरा-ढोरांचं करणं, पावणे-रावळे यातच ती रमून गेली होती. पती ज्ञानदेव पाटील, गावातल्या वारणा डेअरीत सचिव होते. त्यांना वाटायचं उषाताईने काहीतरी करावं, पण उषाताईला संकोच वाटायचा. एकदा गावातल्या अंगणवाडी सेविकेने उषाताईला बचत गटाची माहिती दिली. उषाताईला वाटलं असं बचत गट आपणही सुरू करू या. शेजारीच राहणाऱ्या आपल्या शारदा पाटील या मैत्रिणीला उषाताईने बरोबर घेतलं. गावातल्या आणखीही काहीजणींना गोळा केलं आणि ‘सावित्रीबाई फुले बचत गटा’ची स्थापना केली. सुरुवातीला फक्त पैसे भरणं एवढंच काम व्हायचं. त्या वेळी ‘जनभारती न्यास’ या संस्थेकडून उषाताईला देशी गायी पालनाचं प्रशिक्षण गावातच मिळालं. उषाताईने गाय घेतली. गोमूत्र, गाईचे शेण त्या विकायला लागल्या. आपण घरचं काम करून वर चार पैसे मिळवू शकतो हा आत्मविश्वास तिच्यात आला. विक्री सुरू झाली. वारणाभगिनी मंडळातर्फे गगनबावडा तालुक्यातील महिलांना शेतीपूरक रोजगार प्रशिक्षण मिळणार होतं. वारणेने कोल्हापूरच्या डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनला प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण केलं होतं. फाऊंडेशनच्या कांचनताई परुळेकरांशी उषाताईचा परिचय झाला. कांचनताईंनी उषामधील ऊर्जा ओळखली. त्या बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कार्यशाळा घ्यायच्या. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्यावर, उषाताईला गांडुळाची ‘बॅग’ मिळाली. आपल्या घराजवळच असलेल्या गोठय़ात उषाताईने ही बॅग बसवली. शिकविल्याप्रमाणे गांडूळ खत तयार केल्यामुळे उषाताईचा उद्योग वाढला. २००७ साली तिने गोठय़ाजवळ शेड बांधली. गांडूळ खताचे चार बेड केले. चार टन खत वर्षांकाठी तयार व्हायला लागले. स्वत:च्या शेतीसाठी ती हे खत वापरू लागली. त्यामुळे तिची शेती स्वयंपूर्ण, सेंद्रिय पद्धतीची शेती झाली. एकचतुर्थाश खत ती विकते. चार रुपये किलो दराने गांडूळ खत विकून ती वर्षांकाठी एक लाख रुपये उत्पन्न मिळवते. सुरुवातीला गावातील महिला उषाताईला हसत. ‘दानवं कशी काय हातात धरतीस?’ म्हणत. पण उषाताईने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तिला मिळालेला आर्थिक फायदा पाहून गावातील इतर दोन बचत गटांनीही गांडूळ खत तयार करायला सुरुवात केली. आज उषाताई आसपासच्या गावात गांडूळ खत तयार करण्याचं प्रशिक्षण द्यायला जात असते. कृषी खात्याचे अधिकारीही उषाताईचा गांडूळ खताचा प्रकल्प पाहायला आवर्जुन येतात.
उषाताई कांचनताईंच्या विविध प्रशिक्षण कार्यशाळांना जायला लागली. बचत गट चालवायचा म्हणजे नेमकं काय काय करायचं, याचं तिला इथेच भान आलं. मग उषाताई आसपासच्या गावांतील बचत गटांना मार्गदर्शन करायला स्वत:च्या खर्चाने जायला लागली. त्याही महिला तिला बोलावू लागल्या. कधी काळी घराच्या बाहेर पडायलाही लाजणाऱ्या उषाताईचा आजचा आत्मविश्वास कुठल्याही उच्चशिक्षित स्त्री इतकाच बुलंद आहे. यामध्ये तिच्या पतीने तिला समजूतदार साथ दिली आहे. २००६ ला ‘जनभारती न्यास’कडून उषाताईला मधमाशा पालनाचे प्रशिक्षण मिळाले. तिला आधी एकच पेटी मिळाली होती. तिने त्याच्या दोन पेटय़ा केल्या. शेतात मधमाशांच्या पेटय़ा ठेवल्या की परागीभवन वाढते, हे उमजल्यामुळे उषाताईने आपल्या पेटय़ा सूर्यफुलाच्या शेतात ठेवल्या. यामुळे तिच्या शेतीचे उत्पादनही वाढले आहे. आज उषाताईकडे मधमाशांच्या चार पेटय़ा आहेत. उषाताईकडची मधमाशांची वसाहत बघायला खूप लोक येतात. उषाताई आणि तिचे पती कृषी खात्यातर्फे ‘मधुमक्षिका पालना’चे प्रशिक्षण द्यायला ‘रामेती’ या संस्थेतर्फे जात असतात. आज उषाताईचे घर प्रशिक्षण केंद्र बनले आहे. उषाताई आपल्या मधकेंद्राचे मध विकतात. दरवर्षी एका पेटीतून पाच किलो मध मिळतो. ‘अहिंसक मध’ या नावाने त्या मधविक्री करतात.
वारणा उद्योग समूहाकडून उषाताईच्या बचत गटाला शेळी पालनाचे प्रशिक्षण मिळाले, सहा उस्मानाबादी शेळ्या मिळाल्या. पुणे जनता बँकेकडून १८ हजारांचे कर्ज मिळाले.
उषाताईच्या बचत गटाने वर्षांच्या आत बँकेचे कर्ज फेडले. त्यानंतर म्हशी घेण्यासाठी एक लाख २५ हजारांचे कर्ज मिळाले. कर्ज मुदतीच्या आत फेडायचा शिरस्ता उषाताईने मोडला नाही. जे जे नवीन शिकायला मिळेल ते ती शिकत गेली आहे. डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनतर्फे उषाताई दापोली कृषी विद्यापीठाचा दौरा करून आली. करवंदाचे सरबत करायला शिकली. बचत गटाकडून करवंदे विकत घेऊन ती सरबत तयार करते. वर्षांकाठी चार हजार बाटल्या सरबताची विक्री होते.
मला सुरुवातीला फक्त सासू-सासऱ्यांचा नव्हे तर माझ्या आई-वडिलांकडूनही विरोध झाला. ‘शेतीची कामे टाकून कसली प्रशिक्षणे घेत फिरता,’ असे ते म्हणत. पण आज दोन्ही बाजूंचा विरोध मावळला आहे. उषाताईने केवळ आपलं काम बचत गटापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. दोन वर्षे तिने ग्रामपंचायत सदस्यपद भूषवले आहे. ‘आशा’चं कामही ती करते. वर्षांतून एकदा उषाताई ग्रामस्वच्छता करतात. पहिल्या वर्षी फक्त पाच महिला आल्या. त्यापुढच्या वर्षी ७०-८० महिला जमल्या. ‘स्वत:साठी आपण रोजच करतो, एक दिवस गावासाठी करू या.’ असा विचार करून गेली चार वर्षे उषाताई गावातील महिलांना ग्रामस्वच्छतेसाठी प्रोत्साहन देते आहे. गावातील मुलींना एकत्र करून लोकगीताच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ती पुढाकार घेते. प्रगती फक्त स्वत:चीच करायची नाही तर ‘माझं अंगण, माझं गाव’ हा विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे, हे उषाताईने आत्मसात केलं.
एक अतिसामान्य गृहिणी ते जाणिवेने समृद्ध असलेली कार्यकर्ता, हा उषाताईचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. तिने स्थापन केलेले ‘यशस्वी महिला मंडळ’ खडुळेतील महिलांचा मोठा मानसिक आधार बनले आहे. आसपासच्या कुठल्या गावात एखादा बचत गट कमजोर आहे, बंद पडतो आहे, असे लक्षात आल्यावर पतीसोबत त्या गावी जाते, त्यांना आवश्यक ती सगळी मदत करते. ‘बचत गट बंद पाडायचा नाही’ असं महिलांना सांगते. ही तिची कळकळ हेच उषाताईचे खरे सामथ्र्य आहे.
बचत गटाने नेहमी गावाचाही विचार केला पाहिजे हे कांचनताई आपल्या भाषणात सांगतं. ते सगळे उषाताईच्या डोक्यात होतं. आपलं गाव किती घाण झालंय हे ती रोज पाहत होती. गावातील महिला घर झाडून कचरा स्वत:च्याच दारात टाकत. त्याच सुमारास उषाताई ग्रामपंचायतीत सदस्य होती. त्यामुळे ग्रामस्वच्छतेचा विषय तिला स्वस्थ बसू देईना. उषाताईंने एक दिवस बचत गटाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा छेडलाच. सगळ्या मिळून वीसजणी होत्या, पण पाच-सहाजणींनाच हा मुद्दा पटला. बाकीच्या म्हणाल्या, ‘जाऊ दे, आपल्याला काय करायचंय?’ उषाताईने ठरविलं, पाच-सहाजणींना घेऊन गाव स्वच्छ करायचं. ‘कोन काय म्हणतं म्हणू दे’ असा निर्धार करून खराटे घेऊन या सगळ्या गाव स्वच्छ करायला लागल्या. ज्या बाईच्या घरासमोर स्वच्छता करायला जात, तिला उषाताईने बोलावलं. ‘अक्का मदत करायला या’ त्या बायका म्हणत, ‘आमी काय तुम्हाला घान काढायला सांगितली नव्हती’ मदतीला येण्याचं ‘राहू द्या, निदान घमेलं पाटी, खोरं तरी द्या!’ म्हटल्यावरही कुणी सहकार्य करेना. पुन्हा घरी जाऊन सगळ्याजणी घमेलं, खोरं घेऊन आल्या. इतका असहकार करूनही उषाताई आणि त्यांच्या मैत्रिणी आपलं काम करीत आहेत म्हटल्यावर गावात चर्चा सुरू झाली. ग्रामपंचायत पैसे देत असेल, त्यामुळेच या बायका गावची स्वच्छता करीत आहेत. काहींनी विचारलंही पैसे किती मिळतात? उषाताईने अशा लोकांना उत्तर दिलं, ‘तुम्हालाही पैसे मिळतील, तुम्हीपण या गाव स्वच्छ करायला’ मग कुणी काही बोलेना. चार-पाच तासांत गाव बऱ्यापैकी स्वच्छ झालं. दुसऱ्या वर्षी उषाताईने मागील अनुभव जमेस धरून युक्ती केली. गावात उगीचच सगळ्यांना खोटं सांगितलं. जे कुणी गाव झाडायला येणार नाही, त्याला ग्रामपंचायत ५० रुपये दंड करणार आहे. ही मात्रा लागू पडली. या खेपेस ५० टक्के महिलांचा सहभाग वाढला. शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना शाळेतून मदतीला पाठवलं. आपली मुलं गाव स्वच्छ करीत आहेत हे पाहून मोठय़ांना वरमल्यासारखं झालं. आणखी काही लोक मदतीला आले. गाव लखलखीत झालं. आज दरवर्षी गावातील १०० टक्के लोक स्वत:हून गाव साफ करायला येतात. ही जिद्द, चिकाटी उषाताईने दाखवली म्हणून आज खडुळे इतर गावांपेक्षा स्वच्छ आहे. त्यामुळे गावातल्या रोगराईचं प्रमाणही मर्यादित आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो