गोची आजी-आजोबांची!
मुखपृष्ठ >> लेख >> गोची आजी-आजोबांची!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गोची आजी-आजोबांची! Bookmark and Share Print E-mail

alt

शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
२५ ऑगस्टच्या अंकातील डॉ. अंजली पेंडसे यांच्या ‘गोची आजी-आजोबांची’ या लेखाला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यातील ही काही निवडक पत्रे. अर्थात बहुतांश पत्रे ही आजी आजोबांनीच लिहिली असून आपल्या मनातली खळबळ व्यक्त झाल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. मात्र आई-वडिलांच्या भूमिकेत असलेल्यांनी म्हणजे जे लोक या आजी-आजोबांची गोची करतात त्यांनी प्रतिसाद दिलेला नसल्याने त्यांच्या भावना किंवा त्यांची भूमिका फारशी व्यक्त झालेली नाही. मात्र हा विषय अनेक घरांघरात ज्वलंत विषय ठरल्याने काहींनी चांगले पर्यायही सुचवले आहेत. तर त्यावर समजुतीनेच मार्ग निघू शकेल, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मुळात लेखाचा उद्देशच समाजातलं वास्तव दाखवणं हा असून कुटुंबातल्या प्रत्येकांनी सामंजस्याने वागणं हा त्यावरचा उपाय आहे हे समजून घेणं आहे.

आता गोची आईची!!
पूर्वीचे आजी-आजोबा आणि आत्ताचे यात खूप फरक आहे. मी स्वत: आजी बरोबर राहूनच मोठी झाले. पण मला माझ्या मुलीला तसे ठेवता येत नाही. कारण मुलाची चाहुल लागताच खुद्द आजीनेच सांगितले, मी दिवसभर मुलाला सांभाळणार नाही. त्यांना मोकळेपणा हवा म्हणून घरी पूर्णवेळ बाई नको. ठीक आहे. पण बाळ झाल्यावरही त्यांच्या वेळापत्रकात त्यांना जराही बदल आवडत नाही. खाणे-पिणे, फोनवरच्या गप्पा, शेजारीपाजारी जाणे, फिरायला जाणे.. ‘मला नाही जमत एवढय़ा बाळाला मालीश करायला’, ‘मी तर माझ्या मुलांचादेखील कधी अभ्यास घेतला नाहीये.’ न संपणारी नकारघंटा. ठीक आहे. मग मी करते त्याप्रमाणे तरी करू द्या मला, पण नाही.. सतत सूचना व सल्ले..
मुलीला बिलकुल ओरडायचे नाही, काहीही बोलली तरी फक्त ‘समज’ द्यायची, हे मला न पटणारे आहे. मी नोकरी सोडून दिलेली आहे, घरून थोडे काम केले. नंतर तेही बंद करून पूर्ण वेळ मुलीला सांभाळते, तर त्याची लाज वाटते त्यांना. ‘आमची सून घरी असते’ असे सांगणार नाहीत. त्यांचे म्हणणे असे की, मी नोकरी करावी; परंतु मुलीला सांभाळून, घरचे सगळे करून.
सध्या सेवानिवृत्त असलेले जे आजी-आजोबा आहेत त्यांनी नोकऱ्या केल्या त्या सासू-सासऱ्यांच्या जिवावर आणि आता स्वत: मात्र जरादेखील बांधीलकी स्वीकारत नाहीत. त्यामुळे अनेक घरांत गोची आहे ती आईची.. नोकरी, करिअर, कुटुंब सांभाळून मुलांना सांभाळण्याची.
- अनामिका

एकवाक्यता हवी
उतारवयात नातवंडे सांभाळण्याची तारेवरची कसरत आज बऱ्याच कुटुंबांतून पाहायला मिळते. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे या ‘गोचीला’ही आणखी काही पदर आहेत. एकदा नातवंडं सांभाळण्याचे ठरल्यावर आई-बाबा व आजी-आजोबा यांना आपापल्या भूमिकेची नेमकी स्पष्ट कल्पना असणे फार गरजेचे आहे. त्यासाठी खुल्या मनाने परस्परांमध्ये मनमोकळे बोलणे होत राहाणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसभर नातवंडांशी वागताना, काय काय प्रश्न पडू शकतात, कोणत्या अडचणी येऊ शकतात, याबद्दल मनातल्या मनात कुढण्याने फक्त मनस्ताप वाटय़ाला येतो, जो आपल्या आनंदात अडसर बनू शकतो. त्यापेक्षा वेळोवेळी आपल्या शंका, प्रश्न, अडचणी, चौघांनी मिळून सोडवल्या तर नाहक गैरसमजाला जागा न राहाता, परस्परांमधील विश्वास, जिव्हाळा वाढता राहून वातावरण छान मोकळेढाकळे राहण्यास खूप मदत होते. यासाठी आई-बाबांनी एकत्रित वेळ काढणे अनिवार्य आहे. दुर्दैवाने हे अपवादानेच घडते. मग आजी-आजोबांची नाहक गोची होते.
या संगोपनात आणखीही एक मेख असू शकते. कित्येक वेळा नातवंडांना सांभाळण्याबाबत खुद्द आजी-आजोबांमध्येच एकवाक्यता नसते- एकमत नसते. यापुढे कशात न गुंतता आयुष्य निवांत, मनाजोगे घालवावे असे या जोडीपैकी एकाला वाटत असते. तर दुसऱ्याला ते पटत नसते- मान्य नसते; नाइलाजाने एकाला पर्याय उरत नाही! मग एक ‘काम’ म्हणून निभावलेल्या या भूमिकेमुळे बरेच वेळा उभयतांमध्ये धुसफूस, वादविवाद होत राहतात- अगदी क्षुल्लक-किरकोळ गोष्टींवरूनही! अशा वेळी त्यांचे वागणे-बोलणे लहान मुलांना बुचकळ्यात टाकणारे ठरते. मदतनीस म्हणून एखादी मुलगी हाताशी मिळाल्यास ज्येष्ठांना अधिक सोयीचे होईल.
मात्र ही समस्या काही फार गंभीर नाही- नातवंडे सांभाळण्याचा आनंद मिळवितानाच, कुटुंबातील नात्यांचे परस्परसंबंध या निमित्ताने अधिक जवळिकेचे होत असतील तर कुटुंब संस्थेचे भविष्यही नक्कीच उज्ज्वल ठरू शकेल.
प्रभा हर्डीकर, पुणे

समन्वय जरुरीचा
‘गोची आजी-आजोबाची’ या लेखातून एक महत्त्वाची समस्या वाचकांसमोर मांडली आहे. कौटुंबिक वादांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीत नातवंडांचा किंवा लहान मुलांचा सांभाळ हेही एक कारण ठरू लागलेले आहे. लहान नातवंडांचा सांभाळ ही गोष्ट आजी-आजोबांवर लादली जाते आणि त्यामुळे त्यांची पंचाईत होते, असे जे मत या लेखात प्रामुख्याने व्यक्त करण्यात आले आहे. त्यासाठी विवाह ठरवण्याच्या वेळीच पुढे होणाऱ्या नातवंडांच्या जबाबदारीची चर्चा आणि त्याबाबतची मते यांचा खुलासा होणे, प्रसंगी लेखी स्वरूपातदेखील असणे ही आता काळाची गरज बनणार आहे.        
कुटुंबातल्या दैनंदिन व्यवहारातील छोटय़ा-छोटय़ा गोष्टींबाबतसुद्धा पुढे बघू, पुढे बघू असे म्हणून चालढकल करणे हिताचे ठरत नाही. नातवंडांचा सांभाळ यासारख्या गोष्टींबाबतदेखील सासू-सासरे आणि मुलगा-सून यांनी एकमेकांना गृहीत न धरता किंवा उपकाराची भाषा न वापरता  कुटुंबातल्या सर्वानी एकत्र बसून, सुसंवाद साधून समन्वय काढण्याची आवश्यकता आहे. मोठय़ांच्या वादविवादात लहान मुलांची कुतरओढ होऊ नये ही अपेक्षा आहे.
- अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

पर्यायांचा विचार हवा
‘गोची आजी-आजोबांची’ हा लेख वास्तव आहे. माझ्याकडे माझी नात लहान असताना सुनेचे माहेर दोन मिनिटांच्या अंतरावर होते. त्यामुळे तिची आई व मी आपापले व्यवसाय सांभाळून नातीला वाढवू शकलो. माझी विहीण सकाळी व मी दुपारनंतर नातीला सांभाळले. आम्ही दोघींनी क्षुल्लक क्षुल्लक बाबतीत अहंकार न जपल्याने नात कधी मोठी झाली हे कळलेच नाही. अर्थात ही सुविधा सर्वानाच उपलब्ध नसते.
माझ्या माहितीतल्या एका तरुणीने घेतलेला निर्णय योग्य होता. तिचे सासू-सासरे नातवंडांना सांभाळत, पण दुपारी २ तास त्यांना पाळणाघरात ठेवत. तेव्हा आजी-आजोबांना विश्रांती मिळत असे, शिवाय ८/१५ दिवस गावाला जायची वेळ आली तरी पाळणाघराची सवय असल्याने प्रश्न येत नसे. हल्लीच्या तरुण-तरुणींनी या पर्यायाचा जरूर विचार करावा.
- वासंती सिधये, पुणे

जरा विचार करा!
‘गोची आजीआजोबांची!’ हा लेख अधाशासारखा वाचला. प्रत्येक आजी-आजोबांची मोहात, मायापाशात नि प्रेमात अडकल्याने ही गोची होते; गोची झाली तरी ती हवीहवीशी वाटते- पण कधी कधी शारीरिक क्षमता कमी पडल्याने तक्रार केली जाते. तेव्हा प्रत्येक मुला-सुनेने त्यांच्या या तक्रारीकडे, आजारपणाकडे, असहाय्यतेकडे डोळसपणे, आपलेपणाने लक्ष दिले पाहिजे; जेणेकरून तणाव कमी होईल व प्रेम तसेच राहील. गरज दोन्हीपक्षी असते, पण सर्वस्वी मुलांचा भार आजी-आजोबांवर टाकू नये, एवढेच ध्यानी घ्यावे. कारण दुधावरच्या सायीला कधीच कुणी अव्हेरीत नाही.
- सुनीती सराफ, डोंबिवली (प.)

सुनांनी जाणीव ठेवावी
‘गोची आजी-आजोबांची’ या लेखातून तमाम आजी-आजोबांच्या मनोगताला वाचा फोडल्याबद्दल खूप धन्यवाद.
लेखात लिहिलेला प्रत्येक मुद्दा अगदी खरा आहे. वस्तुस्थिती पटत असली तरी सुना मान्य करायला तयार नसतात. उलट सकाळी नोकरीवर जाताना ती जे काही थोडं-फार काम करून जाते त्यावर आपणच सगळं घर सांभाळतो. सासू-सासरे काय करतात? नातवंडांना फक्त भरवतात एवढेच, त्यासाठी त्यांना एवढं महत्त्व काय द्यायचं? आपण आपल्याला पाहिजे ते करायचं, मनाला येईल तसंच वागायचं. असे अनुभव घरांघरातून दिसत आहेत. तरी बरं, आजी-आजोबा आपल्या नातू/नातीला सांभाळून घरातले उरलेले स्वैपाकपाणी, मागची आवराआवर एवढंच नाही तर मुलाची सुनेची बाहेरची कामेही (कारण त्यांना वेळ नसतो.) करतच असतात, पण त्यात काय नवल? हे सगळेच करतात, अशीही सून-मुलांची भावना असते.
पण हे आजी-आजोबा आपल्या मुलांना सांभाळतात, त्यांच्यावर चांगले संस्कार करतात, त्यामुळे मुलांना आपल्याला पाळणाघरात ठेवायला लागत नाही. कामावर जाताना दार, खिडक्या, नळ, लाइट बंद करणे, कुलूप लावणे, कामवाल्या बाईची व्यवस्था करणे, संध्याकाळी उशिरा घरी आल्यावर परत स्वयंपाकपाणी करणे, मुलांचे अभ्यास घेणे वगैरे अनेक गोष्टी कराव्या लागत नाहीत, उलट आपण निश्चिंत मनाने नोकरी करू शकतो याचे भान आजच्या (बहुतांशी) तरुण पिढीला नाही. त्यामुळे आपण कसंही वागलं तरी चालतं असंच त्यांना वाटतं. आजी-आजोबा बिचारे भांडण नको म्हणून गप्प बसतात आणि याच त्यांच्या मानसिक कमजोरीमुळे ते आयुष्यातला आलेला दिवस ढकलत राहातात.
आजच्या तरुण पिढीला जेव्हा त्यांची नातवंडं सांभाळायची वेळ येईल तेव्हाच त्यांना आपल्या मुलांच्या आजी-आजोबांची काय गोची होत होती हे समजेल, पण तेव्हा काळ निघून गेलेला असेल.  अर्थात यालाही काही अपवाद आहेतच.  एकमेकांच्या मनाचा विचार करूनच योग्य तो मार्ग शोधायला पाहिजे, म्हणजे ही ‘गोची’ सुटायला मदत होईल.
- माधुरी बनसोडे, कुर्ला.

याची उत्तरे हवीत
अंजली पेंडसे यांचा लेख आजी-आजोबांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवणारा आहे. उतारवयात सहन होत नाही व सांगता येत नाही, अशा परिस्थितीत आयुष्य कंठणाऱ्यांच्या दु:खाला वाचा फोडल्याबद्दल प्रथम अंजली पेंडसे ताईंना धन्यवाद.
मुलाचे लग्न झाले व विवाहानंतर मुलगा, सून आईवडिलांबरोबर राहत असले तर नातवंडांच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी मुलाच्या आईला म्हणजेच सासूलाच गृहीत धरलेले असते. यामध्ये आजोबांचा सहभाग कमीच असतो.
प्रत्येकजण विवाह हा स्वत:च्या सुखासाठी करीत असतो. अपत्याला जन्म दिल्यावर त्याच्या संगोपनाचा आनंद अपत्याच्या आईवडिलांना घ्यायचा असतो. आपण संसार मांडल्यावर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या विवाहेच्छू तरुण-तरुणींनी घ्यायला नको का?
आज जे सुपात आहेत त्यांनी स्वत:च्या मुलाचा विवाह पक्का करण्याअगोदर आपण स्वत:, मुलगा, भावी सून व तिचे आईवडील सगळ्यांनी एकत्र बसून भावी नातवंडांचे संगोपन कसे करणार याबाबत खालील मुद्दय़ांवर चर्चा करावी :
१) सून दिवसातले १२ ते १४ तास नोकरीनिमित्त घराबाहेर राहणार. घरात बाळाच्या संगोपनासाठी कोणी मदतनीस ठेवले तर विश्वासू व्यक्ती कोण मिळविणार? २) २४ तास घरात राहणारी मदतनीस असेल तर घर तेवढे मोठे आहे का? ३) घर तिच्यावर सोपवण्याएवढी ती विश्वासू आहे का? ४) नोकरीनिमित्त होणारा खर्च, कपडालत्ता, नोकरचाकरांचा खर्च वजा करून सुनेच्या हातात किती पैसे शिल्लक राहणार ? ५) सुनेच्या अर्थार्जनामुळे कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्याची अपेक्षा असेल व तिचा पगार नोकरचाकरांच्या पगारापुरताच असेल तर सुनेने बाहेर १२ ते १४ तास घालविण्यापेक्षा स्वत:चा संसार, अपत्याचे संगोपन सांभाळून घरात राहून आपल्या शिक्षणाचा उपयोग त्याला सुसंस्कृत नागरिक बनविण्यासाठी करावा व घर सांभाळून करता येण्यासारख्या लहान उद्योगाची मुहूर्तमेढ रोवावी. ६) मुलाने नोकरी करणारी बायको हवी ही अपेक्षा ठेवताना लग्नानंतर स्वत:चा संसार मांडल्यावर भावी आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार विवाहापूर्वी करावा व त्याची चर्चा भावी पत्नीबरोबर करावी. विवाह सोहळा नेत्रदीपक होण्यासाठी दोन्हीकडचे नातेवाईक कित्येक तास खर्च करतात. भावी सहजीवन नेत्रदीपक होण्यासाठी दोघांच्या आईवडिलांसोबत चर्चेसाठी किमान काही तास तरी काढावेत.
मुलाच्या किंवा मुलीच्या आईने स्वत:च्या मनातून हा विचार प्रथम बाजूला काढावा की, नातवंडांचे संगोपन करायला नकार दिला तर आपल्या मदतीला कोणी येणार नाही किंवा लोक काय म्हणतील? नातवंडांना आपण आपल्या आनंदासाठी सांभाळतो. जबाबदारीतून कधी रिटायर्ड व्हायचे हा अधिकार स्वत: आजीचा आहे. ती उभी असेपर्यंत तिला कोणीच रिटायर्ड करणार नाही. आजीने स्वत:च निर्णय घेऊन स्वत:ची गोची करून घेऊ नये.
- मंदाकिनी परब, वांद्रे.

स्थिती खूप केविलवाणी होते
आजी-आजोबांची व्यथा सांगणारा हा लेख साधारणपणे नागरी भागातील नोकरी करणाऱ्या महिलांच्या अपत्य संगोपनाबाबतच्या जबाबदारीचा आहे. स्वत:च्या सांसारिक जबाबदारी व नोकरी-व्यवसायातून मुक्त झालेले बरेचसे वृद्ध पुन्हा त्याच चक्रात अडकलेले आहेत. त्यांना स्वत:च्या आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी वेळ नाही. त्यांना गृहीतच धरले जाते. त्यांच्या दृष्टिकोनातून विचारच केला जात नाही. वाढते वय, बरोबर घटती शारीरिक ताकद त्यामुळे मानसिक बल कमी होते आणि पुढील पिढीचे सळसळते रक्त. त्यात मुले व नातवंडे यांच्याकडून अनुक्रमे कृतज्ञता व प्रेम यांचा प्रतिसाद नसेल तर त्यांची स्थिती खूप केविलवाणी होते.
वीसएक वर्षांपूर्वी सर्वत्र फोन वा मोबाइलची उपलब्धता नव्हती. आज फोन वा मोबाइल ही सोय झाली असली तरी ती दुसऱ्या व्यक्तीची गैरसोयपण होते ना! केव्हाही संवाद रात्री वा दिवसा किंवा प्रश्नांचा भडिमार. शिवाय जनरेशन गॅपप्रमाणे तरुण पिढी व लहान मुले त्यांच्या सवयी व त्यांची वागणूक यामुळे वृद्धांना तोंड दाबून बुक्क्य़ाचा मार सहन करावा लागतो. आपलेच दात आपलेच ओठ सांगणार कुणाला? यात दोन्ही अंगी प्रेम, विश्वास व कृतज्ञता या भावना आवश्यक असतात. घरातील वृद्धांमुळे आपली नोकरी व आपले अपत्य संगोपन व गृहकार्य नीट चालले आहे, याची जाणीव असली पाहिजे. ते गुण केवळ मौखिकतेतून बोलून व्यक्त व्हावेत असे नाही. शिवाय त्याला कृतीची जोड अत्यावश्यकच आहे. वास्तविक वर सांगितलेल्या गोष्टी प्रेम, विश्वास व कृतज्ञता, आनंद निर्माण करतील, पण ते नसतील तर लेखिकेने तीन पर्याय सुचविलेले आहेत ते पुढीलप्रमाणे : १) मूल झाल्यावर स्त्रीने नोकरीत तीन-चार वर्षे गॅप घ्यावी व नंतर ती पुन्हा सुरू करावी, पण ते तितकेसे सोपे नसते. २) विवाहानंतर मुले थोडी मोठी झाल्यावर नोकरी-व्यवसाय सुरू करावा म्हटले तर हल्ली नोकरी करणारीच मुलगी हवी. तिला प्राधान्य. ३) पतिपत्नीने आपल्या कमाईतून अधिक खर्च करून घरातच एखादी कामवाली सकाळ ते संध्याकाळ १२ तास मुलांसाठी ठेवावी. वृद्धांनी तिच्यावर देखरेख ठेवावी. पुन्हा तिचे खाणेपिणे, विश्रांती वगैरे गोष्टी येतातच, शिवाय तिच्या सुट्टय़ा असतातच.
यापेक्षा माझ्या सुनेने आपल्या लहान बाळासाठी केलेली उपाययोजना हा पर्याय मला पटलेला आहे. तो स्वानुभावातील आहे. त्यामुळे कोणतीच अडचण आली नाही. माझ्या मुलाचे लग्न झाल्यावर पुढे त्यांना अपत्यप्राप्ती झाली. तिची आई व मी आम्ही दोघी नोकरी करत असल्याने ती सोडणे अशक्य होते. सुनेच्या बाळंतपणाची रजा संपत आली. हल्ली बहुतेक सर्व शहरी नागरिक को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत राहतात. त्यात खूप बिऱ्हाडे असतात. ती आपल्या मुलीला मोकळ्या जागी हिंडवत असताना इतर बायकांशी गप्पा व चौकशी चालायची. विचारणा झाली. काही प्रौढ स्त्रिया आपली मुले मोठी (१० ते १५ वर्षांची) झाल्यावर स्वत:च्या घरात एक/दोन मुले बेबी सीटिंग स्वरूपात सांभाळतात. त्यामुळे जवळपासच्या घरात तिच्या मुलीची सांभाळण्याची सोय झाली. नोकरीला जाताना शेजारच्याच इमारतीत मुलाला ठेवायचे व संध्याकाळी येताना आणायचे. याप्रमाणे खरोखरीच आमची नात एका घरात चार महिन्यांपासून दोन वर्षांची होईपर्यंत अगदी लाडात वाढली. घरातील दादा व ताईला छोटी छकुली बहीण मिळाली. त्यानंतर ती १२ वर्षांची होईपर्यंत ज्या घरात वाढली तेथील दोन भावांना बहीण मिळाली. ते प्रेम, तो आपलेपणा आजही टिकून आहे. शिवाय घरातील स्त्रीला घरबसल्या अर्थार्जन करता येते व मुलाला घरगुती वातावरण मिळते.
आज शहरी भागांत सर्वत्र को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत. मोठे कॉम्प्लेक्स आहेत, तेथे अनेक परिवार राहतात. कर्जाने घर घेऊन त्याचे हप्ते अनेक वर्षे भरावे लागतात. सर्वच परिवारांत स्त्री-पुरुष दोघे नोकरीत आहेत असे नाही व नोकऱ्याही इतक्या सोप्या वा सवंग नाहीत. अशा घरांत अनेक प्रकारच्या खऱ्या को-ऑपरेशनची गरज आहे तो वेगळा भाग. काही गृहिणी घरीच आहेत. आपल्या घराच्या जवळपास घरगुती वातावरणात एकदोन मुलांना ठेवणे, त्यांनी ठेवून घेणे दोन्ही अंगी सोयीचे होईल. आपले मूल जवळच्या भागातील घरात व परिसरात वाढेल, गृहिणीचे अर्थार्जन सुरू होईल.
- सुमित्रा गुर्जर, डोंबिवली.

...तर समस्या सुटेल
‘गोची आजी- आजोबांची’ हा लेख वाचला. त्यांना आलेल्या अनुभवविश्वातून त्यांनी हा शब्दरूपाने वाचकांपुढे मांडला. आजच्या एकविसाव्या शतकात सासू-सुना यांच्यातील नाती बदलत चालली आहेत. सासूबद्दलचे पारंपरिक ‘अर्थ’ बदलू लागले आहेत. खरंतर आई आणि मुलगी अशी नाती अनेक कुटुंबांतून दिसू लागली आहेत.
हे सारं जरी सत्य असलं तरी लेखिकेने ‘गोची आजोबा-आजीची’ म्हणताना इतकी वर्षे सुनेची होणारी ‘गोची’ आता बदलली की काय? असा प्रश्न मला पडतो. म्हणून आज सून-मुलगा-नातवंडांच्यात राहून सासू-सासरे-आई-वडील यांची जर खरोखरीच ‘गोची’ होत असेल तर मुलगा किंवा मुलगी यांचे लग्न ठरविताना सासरच्या माणसांना/ माणसांनी आपली स्पष्ट मते मांडावीत, ती पुढीलप्रमाणे-
१) मुलगी करिअरच्या मागे धावणारी किंवा नोकरी करणारी नको आणि करत असेल तर लग्नानंतर मुलं झाल्यावर नोकरी सोडावी. शक्य नसल्यास पाळणाघरात ठेवावीत किंवा दिवसभर त्यांना सांभाळावयास एखादी बाई, मुलगी ठेवावी. २) लग्नानंतर त्यांचं वेगळं बिऱ्हाड मांडून द्यावं आणि ज्या वेळी त्यांना गरज असेल त्या वेळी त्यांच्याकडे राहावयास येऊ आणि अडचण संपली की परत आमच्या घरी येऊ. ३) आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ‘सुने’कडच्यांना करून द्या व आमची आजारपणात तुम्हालाच काळजी घ्यावी लागेल हे स्पष्ट करा.
आई-वडील यांनी मुलगी सासरी गेल्यावर काही पथ्ये पाळावयास हवीत- १) तिच्या संसारात लुडबुड करू नये. २) सासरी मुलगी गेल्यानंतर ती सदोदित आपल्याच घरी यावी असा हट्ट करू नये. ३) सासरच्या माणसांविषयी गैरसमज होतील अशी वाक्ये तिच्यावर फेकू नयेत. ४) एकत्र कुटुंबात सासरी ती जर गुण्यागोविंदाने राहत असेल तर तिला विभक्त करून आपल्या घराच्या जवळ राहावयास प्रोत्साहन देऊ नये. मला वाटतं, अशा प्रकारे ६० वर्षांच्या अनुभवाचा उपयोग आमच्यासारख्या वयस्कर माणसांनी केला तर ‘गोची आजोबा-आजीची’ ही समस्या सुटेल.
डॉ. संध्या टिळक, ठाणे

नातवंडे ‘खेळणी’ नव्हेत
साधारण चाळीस वर्षांपूर्वी मुलींना किती शिक्षण द्यावं, नोकरी करण्याची मुभा द्यावी का, स्त्रियांनी नोकरी केल्याने पुरुषांच्या जागा अडवल्या जातात, वगरे चर्चा वर्तमानपत्रांतून झडत. ‘गोची आजी-आजोबांची’मधील चर्चाही त्याच धर्तीची आहे. आत्ताच्या जमान्यात, नातवंड हवं म्हणून एखाद्या मुलीला किंवा सुनेला करिअरवर पाणी सोडण्यास लावणं म्हणजे जुनेच दिवस परत बायकांच्या माथी मारल्यासारखं नाही काय?  
मुलांची जबाबदारी जशी आईची आहे तशीच बापाचीही आहे. मग स्वत:च्या मुलग्याला किंवा जावयाला नोकरी-करिअर सोडून मुलं संभाळायचा सल्ला का दिला जात नाही? शिवाय मुलं बापाचं आडनाव लावतात. त्यामुळे आजी-आजोबांनी सुनेची मुलं सांभाळत असल्याचा आव आणू नये. शिवाय ‘मला अपत्ये नकोत’ असे म्हणण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. त्यावर कोणीच टीका करण्याचं कारण नाही. आपल्याला ‘खेळण्या’सारखी म्हणून नातवंडे हवीत. ती सांभाळायची जबाबदारी नको. त्यासाठी सुना-मुलींना करिअरवर पाणी सोडण्यास लावणं जाचक आहे.
-स्मिता पटवर्धन, सांगली

वास्तववादी लेख  
‘गोची आजी-आजोबांची’ हा लेख फारच वास्तववादी आहे. मात्र लेख काहीसा एकांगी झाल्यासारखे वाटते. केवळ आजी-आजोबांची बाजू त्यात मांडली आहे. काळाबरोबर धावायचे तर आजच्या गृहिणीला घराबाहेर पडणे निकडीचे आहे. नोकरीतही आव्हाने आहेतच, त्यात जर तिला घरची मदत मिळाली तर दिलासा मिळतो.
 अशी अनेक घरे आहेत, जिथे नातवंडांची जबाबदारी स्पष्टपणे नाकारली जाते. वयस्कर मंडळींना आपले स्वतंत्र अबाधित ठेवायचे असते. त्यात काही वावगेही नाही; परंतु त्यांनी समजून घ्यावे, असे मात्र नक्की. लेखातील पर्याय सुयोग्य आहेत, पण ते परवडतात असेही नाही. पूर्वीच्या आजी-आजोबांना नातवंडे म्हणजे जबाबदारी असे कधीच वाटले नसावे. कारण तेव्हाचे जीवन नक्कीच वेगळे होते. कालाय तस्म नम: असेच म्हणावे लागेल. जुने उगाळून काय मिळणार, त्यापेक्षा लेकी-सुनांनी सुवर्णमध्य ठरेल,असा पर्याय शोधावा.
-स्वाती पाचपांडे, नाशिक

झाकली मूठ...
‘गोची आजी-आजोबांची’मधून एकविसाव्या शतकातील आजी-आजोबांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चतुरंगचे आभार. लेखातील विचारांशी मी सहमत आहे. मी ४२ वर्षांची गृहिणी असून लग्नाआधी व लग्नानंतर मूल होईपर्यंत नोकरी करत होते. मात्र मूल झाल्यावर त्याला मीच सांभाळले. या माझ्या निर्णयाचे मला आज खूप समाधान आहे. नोकरी करणाऱ्या माझ्या बहिणींची ओढाताण व अपराधीपणा पाहते तेव्हा तर माझा विश्वास दुणावतो. सासू-सासऱ्यांनी वा आई-वडिलांनी आपल्या मुलाबाळांना सांभाळले पाहिजे, हा आजच्या मुलांचा किंवा सूनांचा अट्टहास का असतो? मुलांना आपणच सांभाळल्याने पाळणाघराचे पसे वाचतात तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. माझ्या परिचयातील काही सूना-मुली सुट्टीच्या दिवशीसुद्धा मुलांना आजी-आजोबांकडे ठेवून मजा करायला जातात. हे बघते त्या वेळी तर त्यांची कीव करावीशी वाटते. आपल्या बाळासह हळुवार नातं जोपायचं सोडून.. आपसात वाद नकोत तसेच झाकली मूठ सव्वा लाखाची असे म्हणून आजी-आजोबा गप्प बसतात, नातवंडांना सांभाळतात. पण मनात कुढत असतात. त्यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडते. सगळ्यांना स्पष्ट बोलण्याची हिंमत नसते. त्यात आजोबा नसतील तर आजीला असे स्पष्ट बोलणे परवडणारे नसते. सून-मुलांनी झिडकारले तर म्हातारपणी नवा आधार त्या कुठून शोधणार?
-दीपाली कुलकर्णी, ई-मेलवरून

‘त्यांनी’च पुढाकार घ्यायला हवा
‘गोची आजी-आजोबांची’ हा डॉ. अंजली पेंडसेंचा (२५ ऑगस्ट) वाचला. समजूतदारपणाचा अभाव हेच याचे खरे कारण. यासह संसारातली अपारदर्शकता आणि त्यामागचा स्वार्थीपणा हेसुद्धा आहे. पारदर्शकता का नको? तर आपला स्वार्थ उघडा पडेल! ही ‘गोची’ नाहीशी करण्यासाठी मुख्यत: आजी-आजोबांनी पुढाकार घ्यायला हवा.
मुलाचे लग्न ठरल्यावर त्याचा संसार आज ना उद्या वाढणार हे ध्यानात घेऊन मुलाच्या लग्नाच्या आधीच त्याच्या लग्नानंतर घरातली व्यवस्था कशी असावी याबद्दलचे विचार त्याच्या आणि त्याच्या भावी वधूच्या समोर मांडणे हे आईबापांचे (उद्याच्या आजी-आजोबांचे) कर्तव्य आहे; परंतु पारदर्शकतेला भिणारे आईवडील अशा वेळी गप्प बसतात. मुलाच्या संसाराला आपण मदत करू शकू का? याची स्पष्ट कल्पना मुलाच्या लग्नाआधीच त्याला आणि त्याच्या भावी पत्नीला द्यायला हवी. जर मुलाला आपले म्हणणे मान्य नसेल तर त्याला वेगळे राहायला सांगायला हवे; परंतु आईवडील हा स्पष्टपणा दाखवायला कचरतात. याचे मुख्य कारण वृद्धापकाळासाठी मुलाचा आधार त्यांना हवा असतो! परंतु नातवंडांचे करण्याची शारीरिक क्षमता त्यांच्यापाशी नसते आणि तरी तसे मुलाला सांगायला ते धजावत नाहीत. थोडक्यात काय, तर संसारात प्रत्येकजण स्वार्थी असतो, मग सगळे सुख एकटय़ाच्याच वाटय़ाला कसे येईल?
- राजीव मुळ्ये, दादर.

नाण्याची दुसरी बाजू
‘गोची आजी-आजोबांची’ या लेखातील डॉ. अंजली पेंडसे यांना आलेले अनुभव सत्य असतीलही, पण ती नाण्याची एक बाजू झाली. मुळात आजचे आजी-आजोबा हे खरंच शारीरिकदृष्टय़ा अक्षम असतात का? योग्य आहार-विहार, व्यायाम आणि योग्य वेळेस मिळणारी वैद्यकीय मदत यामुळे ते ८०-८५ पर्यंत तंदुरुस्त असतात, हे घरगुती समारंभांना आणि सहलींना त्यांची जी उपस्थिती असते त्यावरून पाहू शकतो.
आजकाल लग्न करताना ‘मुलगी नोकरी करणारी पाहिजे’ ही अट सर्रास दिसते आणि तिचे उत्पन्न विचारात धरूनच घरातली गृहीतके ठरतात. मग तिला जर घरच्यांनी मदत केली तर बिघडले कुठे? आणि आई किंवा सासू आपल्या नातवंडांना सांभाळते तेव्हा तिच्या सोबतीला कामवाली असतेच. सुनेची माफक अपेक्षा इतकीच की, आपल्या बाळाची देखरेख घरच्या व्यक्तीच्या देखरेखीखाली व्हावी. आजकाल लहान मुलावरचे अत्याचार आपण वाचतो-पाहतो ते बघता ही अपेक्षा चुकीची नाही. त्यामुळे लेखिकेने जे उदाहरण दिले आहे की सासूला दोन दिवसही बाहेर जाता येत नाही हे अपवादात्मक असावे. किंबहुना आपली आई किंवा सासू आपल्या बाळाला सांभाळते ही जाणीव ठेवून मुली-सुना फक्त कपडेलत्ते, दागदागिनेच नाही तर स्वत: त्यांना सहलींना पाठवतात. उगाच नाही केसरीच्या ‘लेडीज स्पेशल’ फुल होत! माझ्या आईने माझ्या बहिणीची मुलगी सांभाळली ती जाणीव ठेवून माझ्या बहिणीने आणि तिच्या यजमानांनी माझ्या आईचं अंथरुणातलं आजारपण शेवटपर्यंत काढले.
कोणत्याही आईला आपल्या बाळाला सोडून नोकरी करणं जिवावरच येत असतं, पण वाढती महागाई आणि नवऱ्याच्या नोकरीची अनिश्चितता यापुढे नाईलाज असतो. नोकरी, घरच्या जबाबदाऱ्या, नोकरीतली स्पर्धा, राजकारण आणि प्रवास यात तिचा जीव मेटाकुटीस येतो. पण आजच्या पिढीला स्वत:च्या भविष्याची तरतूद करूनच ठेवावी लागते, कारण मागच्या पिढय़ा जशा बिनदिक्कत मुलगा-मुलगीकडे राहायचे तशी या पिढीला ती शाश्वती नाही. यात जर घरच्या स्त्रियांनी तिला मदत केली तर ती कायमची त्यांची ऋणी राहील.
लेखिकेने लहान मुलांसाठी ‘सुसज्ज’ पाळणाघर हा पर्याय दिला आहे. मग वयस्कर मंडळींसाठी ‘सुसज्ज’ वृद्धाश्रम हा पर्याय होईल का? जसं लहान मुलांचं करताना दमछाक होते तसं वयस्कर मंडळींचं पथ्यपाणी, आजारपण काढण्यातही दमछाक होते.
- सुनेत्रा जोशी, मीरारोड
अशाच आशयाची पत्रे यांनीही पाठवली आहेत-
शुभदा कुलकर्णी (कुर्ला), सरोजिनी वांद्रेकर (मुंबई), दीपा मुजुमदार (वाशी).
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो