रसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं
मुखपृष्ठ >> रसग्रहण >> रसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं Bookmark and Share Print E-mail
alt
रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

कुतूहल आणि जिज्ञासा ही मानवाला निसर्गाने दिलेली मोठ्ठी देणगी आहे; ज्यामुळे माणसाने स्वतच्या अस्तित्वाच्या कोडय़ापासून विश्वनिर्मितीच्या रहस्यापर्यंत अनेक रहस्ये उलगडण्याचे प्रयत्न केले. रहस्याचा उलगडा करण्याच्या या वृत्तीचाच एक भाग म्हणजे प्राण्यांचा जीवनपट अभ्यासणं. प्राण्यांचे आयुष्य कसे असते? त्यांची कुटुंबव्यवस्था कशी असते? आपल्या पिल्लांना स्वावलंबी करण्याची प्राण्यांची रीत काय असते? अशा अनेक प्रश्नांनी मानवी मन अस्वस्थ होते. डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक यांसारख्या वाहिन्यांवरून या प्रश्नांचा उलगडा करणारे उत्तमोत्तम माहितीपट आपल्याला नेहमीच आकर्षून करून घेतात. या धर्तीवर एका चित्त्याची व त्याच्या कुटुंबाची जीवनकहाणी ‘ऑंखो देखा हाल’ अनुभवायची असेल तर ‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’ या पुस्तकाला पर्याय नाही.
एका पाळीव चित्त्याचं पुनर्वसन करून त्याला पुन्हा जंगली बनवणं, नसíगक वातावरणापेक्षा बंदिवासात चित्त्याच्या प्रजोत्पादनात अडथळे येण्यामागील कारणे तसेच त्याचं संवर्धन करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे जाणून घेण्यासाठी जॉय अ‍ॅडम्सन झपाटल्या होत्या.

जॉय अ‍ॅडम्सन प्राणी-अभ्यासक आहेतच; परंतु प्राण्यांचा अभ्यास केवळ वैज्ञानिक तर्काधारे व संख्यात्मकदृष्टय़ा करण्यापेक्षा भावनिक पातळीवर प्राण्यांचे मानसशास्त्र जाणून घेऊन करावा, अशा मताच्या आहेत. जॉयनी आपल्या आयुष्यात तीन वन्यप्राणी वाढवले. सर्वप्रथम एल्सा सिंहीण, त्यानंतर पिप्पा चित्तीण आणि सर्वात शेवटी पेनी नावाची वाघीण. पिप्पाच्या आयुष्यावर त्यांनी दोन पुस्तके लिहिली- ‘द स्पॉटेड िस्फक्स’ व ‘पिप्पाज् चॅलेंज.’ पकी ‘पिप्पाज् चॅलेंज’चा अनुवाद ‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’ या नावाने प्रा. आनंद वैद्य यांनी केला आहे.
केनियात आलेले डंकी दाम्पत्य इंग्लंडला परत जाणार होते. तत्पूर्वी आपल्याकडील चित्त्याचे आठ महिन्यांचे पिल्लू त्याचा योग्य सांभाळ व्हावा या हेतूने त्यांनी जॉय यांच्याकडे सुपूर्द केले. ती एक मादी होती. जॉय यांच्याबरोबर डंकी दाम्पत्याचे बोलण्ं सुरू असतानाच ते पिल्लू जॉय यांच्याजवळ गेलं, प्रेमाने त्यांचा चेहरा चाटू लागलं आणि त्या क्षणापासून त्यांच्यातले बंध दृढ झाले. या पिप्पाचीच साडेचार वर्षांची कहाणी या पुस्तकात चितारली आहे. हे पुस्तक म्हटलं तर जॉय अ‍ॅडम्सन यांची दैनंदिनी आहे किंवा पिप्पाचं चरित्रही!
पिप्पाच्या चौथ्या बाळंतपणापासून सुरू झालेला प्रवास उत्कंठावर्धक आहेच, पण वन्यप्राण्यांविषयीचे आपले ज्ञान समृद्ध करणाराही आहे. शाकाहारी हत्तींच्या कळपाजवळ आपली पिल्ले ठेवून पिप्पा त्या पिल्लांचे माकडांपासून कसे संरक्षण करते, किंवा आपल्या एका पिल्लाचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर उर्वरित पिल्लांना वाचवण्यासाठी ती कोणत्या क्लृप्त्या वापरते, ही माहिती वाचताना माणूस आणि प्राण्यांतील साम्य जाणवल्यावाचून राहत नाही. चित्त्याचे कुटुंब ओळखण्यासाठी त्यांच्या शेपटीच्या मुळाशी असलेल्या ठिपक्यांची संरचना निकष म्हणून वापरली जाते, हे आपल्याला या पुस्तकातूनच कळतं. मांसाहारी प्राण्यांसाठी बेडूक कसे साहाय्यकारी ठरतात याचा रंजक किस्सा पिप्पामुळे कळतो. वन्यप्राणी आपले सीमावाद कसे सोडवतात, अन्नाची गरज कशी भागवतात, जननसंख्येचे प्रमाण कसे मर्यादित ठेवतात, पिल्लांना शिस्तीत कसे वाढवतात, एकमेकांशी कसा संवाद साधतात, आदी तपशील या पुस्तकात आहेत. त्याचबरोबर लिखाणाच्या ओघात वन्यप्राणी संवर्धन करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचेही उल्लेख येऊन जातात. प्राणीसृष्टीचे जतन-संवर्धन करायचे तर त्यासाठी किती प्रगल्भपणे प्रयत्न व्हायला हवेत, याचा विचार मनास स्पर्शून जातो.
जॉय एका अपघातामुळे पिप्पा आणि तिच्या पिल्लांपासून सुमारे महिनाभर दुरावतात. मात्र, त्या जंगलात परतताच पिप्पाच्या स्पर्शातून त्यांना चित्ता कुटुंबीय मनाने आपल्या किती नजीक आहेत, हे अनुभवास येते. प्राण्यांच्या कामभावना, त्यांची अभिव्यक्ती, आपल्या भावना सहचारिणीवर न लादण्याची प्राण्यांमधील ‘माणुसकी’ अशा गोष्टी या पुस्तकातून कळतात.
पुस्तकाच्या रसाळपणाचे श्रेय जितके जॉय यांचे आहे, तितकेच अनुवादक प्रा. आनंद वैद्य यांचेही आहे. साठच्या दशकात लिहिलेल्या या पुस्तकात जॉय यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. स्पेशलायझेशनच्या प्रभावाचा ग्रहणशक्तीवर होणारा दुष्परिणाम त्यांनी नोंदवला आहे. विद्यापीठीय शिक्षणाची चौकट निरीक्षणावर कशी मर्यादा आणते आणि प्राण्यांच्या कृतीमागील प्रेरणा समजून न घेता केवळ बाह्य़ निरीक्षणे नोंदवण्याने सखोल अंतर्दृष्टीपासून कसे रोखते, यावरील त्यांचे भाष्य अंतर्मुख करणारे आहे.
‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’, मूळ लेखक- जॉय अ‍ॅडम्सन, अनुवाद- प्रा. आनंद वैद्य, दिलीपराज प्रकाशन, पुणे,
पृष्ठे- १९१, मूल्य- रु. २००/-
स्वरूप पंडित
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो