वाचनकौशल्य विकसित होण्यासाठी..
मुखपृष्ठ >> लेख >> वाचनकौशल्य विकसित होण्यासाठी..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वाचनकौशल्य विकसित होण्यासाठी.. Bookmark and Share Print E-mail

मिथिला दळवी ,सोमवार, १ ऑक्टोबर  २० १२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या वाचनाचा अत्यंत बारकाईने विचार करणे अत्यावश्यक ठरते. वाचनकौशल्यातील वेगवेगळ्या बाबींचे विश्लेषण-
लेखन आणि वाचन हे शाळेच्या अभ्यासातले दोन अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. पुढचा सगळा अभ्यास या दोन कौशल्यांच्या पायावर उभा आहे. गेली काही वर्षे आम्ही अभ्यास आणि तो करताना मुलांना येणाऱ्या अडचणींवर काम करतो आहोत. यात प्राथमिक शाळेच्या स्तरावर आम्हाला आढळलेला सर्वात मोठा अडथळा म्हणजे वाचन कौशल्य पुरेसं विकसित न होणं.
आज प्राथमिक शाळेत आपल्याकडे वाचन, हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जात नाही. भाषा शिकण्याचा एक पैलू म्हणून वाचनाचा विचार केलेला आहे, पाठय़पुस्तकात वाचनासाठी म्हणून काही स्वाध्याय जरूर सुचविले आहेत, पण वर्गात मुलांची संख्या जास्त असेल तर प्रत्येकाकडून स्वतंत्रपणे वाचून घेणं शिक्षकाला शक्य नाही. त्यामुळे अभ्यासक्रमात म्हणून योजलेल्या पुस्तकाव्यतिरिक्त शाळेत जास्तीचं काही वाचणं शक्य होत नाही. गृहपाठ म्हणून बऱ्याचदा धडा वाचायला सांगितलेला असतो, तेवढा वाचला जातो. त्यामुळे पुस्तकातला ठराविक मजकूर पुन्हा पुन्हा डोळ्याखालून गेल्यामुळे सवयीनं वाचणारी अनेक मुलं आढळतात. पण काही वेगळा मजकूर समोर आला की त्यांचा गोंधळ उडतो.
अनेकदा वाक्यातले शब्द मुलांना सुटे सुटे वाचता येतात, पण वाक्य म्हणून ते सलग विरामचिन्हांसह वाचायला जमत नाही. त्यामुळे वाचलेला मजकूर, हा मुलासाठी नुसती शब्दांची आगगाडी ठरते. त्यातून त्याला काही अर्थबोध होत नाही. वाचलेला मजकूर समजत नसेल, तर वाचणंही अर्थातच कंटाळवाणं होऊन जातं आणि अभ्यास करावासाच वाटत नाही. वाचता येणं ही आता रोजच्या जगण्यातली अपरिहार्य गोष्ट आहे. आपण मोठे होत जातो तसे अनेक वर्ष, काही ना काही मजकूर, वाचण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर येत असतो. त्यामुळे प्रौढ माणसं म्हणून सरावाने आपण वाचणं ही क्रिया खूप सहजपणे करून जातो. इतकं की वाचायला शिकणं म्हणजे काय, याचा स्वतंत्रपणे विचारच केला जात नाही. त्यामुळे आपण वाचायला शिकतो, म्हणजे नेमकं काय शिकतो, याचा आधी विचार करू या.
एखादी भाषा आपण वाचतो तेव्हा त्यातली अक्षरं पाहून आपण वाचायला शिकतो, म्हणजे नेमकं काय शिकतो, याचा आधी विचार करू या.
alt
एखादी भाषा आपण वाचतो तेव्हा त्यातली अक्षरं पाहून आपण त्याच्याशी संबंधित ध्वनीचा उच्चार करत असतो. उदा. दोन तिरक्या रेघा आणि एक छोटी आडवी रेघ यांनी बनलेल्या आकाराला इंग्लिशमध्ये आपण ‘ए’ म्हणतो. पण ध्वनीचा उच्चार माहीत असण्यासाठी मुळात तो ध्वनी ऐकलेला असणं आवश्यक असतं. मराठीत हात, भात, दात या तिन्ही शब्दांमध्ये असणारा (कॉमन) ध्वनी- ‘आत’ कळणं, किंवा इंग्लिशमध्ये कॅट, मॅट, फॅटमध्ये कॉमन असणारा ‘अ‍ॅट’ उमजणं हे पुढे सलग आणि वेगाने वाचण्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे आधीपासून कानावर पडून सवयीचे झालेले ध्वनि (आणि शब्द) वाचणं अर्थातच मुलांना पुढे सोपं जातं. मातृभाषेत शिकताना हा मोठा ‘प्लस पॉइन्ट’ असतो. म्हणजे ऐकणं, पाहणं आणि बोलणं या तिन्ही क्रियांचा योग्य समन्वय साधला जाणं हे वाचन जमण्यासाठी आवश्यक असतं. त्यामुळेच वाचन ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होते.
उर्दू, अरेबिक अशा काही भाषा वगळल्या तर बहुतेक सगळ्या भाषा डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. त्या वाचताना नजर डावीकडून उजवीकडे फिरवता येणं, आणि एक ओळ संपली, की पुन्हा त्या खालच्या पुढच्या ओळीवर डावीकडे नजर नेणं हे जमावं लागतं. बऱ्याच जणांना ते जमतंही. ज्यांना जमत नाही, ते कधीतरी एखादी ओळ पुन्हा वाचतात, किंवा एखादी पूर्णपणे वगळलीच जाते!
alt
प्रत्येक भाषेला स्वत:ची लिपी आहे. ही लिपी म्हणजे खरं तर चिन्हांचा एक संचच. वाचता येण्यासाठी हे चिन्हांचे आकार आणि त्यांच्यातले बारीक बारीक फरक पक्के डोक्यात बसणं खूप आवश्यक आहे. यासाठी मुलाचं पाहणं चांगलं हवं, नजर तयार हवी. या प्रकाराला ‘व्हिज्युअल डिसक्रिमिनेशन’ (नजरेने आकारातला फरक टिपता येणं) म्हणतात. वाचनासाठी हे फार आवश्यक कौशल्य आहे.
लर्निग स्टाईलच्या दृष्टीतून पाहिलं तर व्हिज्युअल मुलांना हा प्रकार फार चांगला जमतो. त्यामुळे त्यांना वाचन सहज जमून जातं. ऑडिटरी मुलांची भाषा, शब्दसंपत्ती खणखणीत असते, त्यामुळे वाचनातला ऐकण्याचा भाग चोख असतो. पण व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशनमध्ये थोडी अडचण येऊ शकते. केनेस्थेटिक मुलांना मात्र वाचन ही बऱ्यापैकी कष्टसाध्य कला होऊन बसते.
ज्यांना वाचन अवघड जातं, अशा मुलांचं व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशन वाढवणं, ही त्यासाठी अगदी साधी सोपी युक्ती आहे. हे कसं करायचं? दहापर्यंत अंक मोजता येणाऱ्या तीन-चार वर्षांच्या मुलांसमोर ८ ते १० छोटय़ा गोष्टी (बिया, गोटय़ा, बटण, किंवा खडू) विखुरलेल्या स्वरूपात टाकून त्या त्यांना मोजायला सांगायच्या. सुरुवातीला मुलं त्या वस्तू ओळीने मांडून घेऊन मोजतात. हळूहळू मग मांडून न घेता, केवळ नजर फिरवून, त्यांना ते जमू लागतं. या साध्या गोष्टीत अनेक कौशल्ये दडलेली आहेत. नजर योग्य प्रकारे फिरवता येणं, एकदा मोजलेली वस्तू, पुन्हा मोजली जाऊ नये म्हणून नजरेने वेगळी करून ठेवणं, हे त्यातून जमत जातं.
चित्रांच्या गर्दीत लपलेल्या छोटय़ा वस्तू शोधणं, दोन चित्रातला फरक ओळखणं, वाटांच्या चक्रव्यूहातून नेमक्या ठिकाणी पोहोचणं (मेझेस : उदा. उंदराला चीजपर्यंत जायचा रस्ता दाखवणं) अशा खेळ/ कोडय़ातून नजर तयार व्हायला खूप मदत होते. यातसुद्धा एक गंमत असते. ज्या मुलांचं व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशन मुळात चांगलं असतं, त्यांना हे खेळ/ स्वाध्याय सहज जमतात. आणि ज्यांना ते वाढवायची गरज असते, त्यांना ते जमत नाहीत आणि म्हणून करावेसे वाटत नाहीत. अशा वेळी अतिशय शांतपणे, टप्प्याटप्प्याने त्यांच्या गतीने ते त्यांच्यासोबत करावे लागतात.
काही मुलांचा अगदी दुसरी तिसरीपर्यंतही b आणि  d   किंवा p आणि q   अक्षरांचा गोंधळ होत असतो. (ही अक्षरं एकमेकांच्या आरशातल्या प्रतिमा- मिरर इमेजेस आहेत) सततच्या सरावाने काही वर्षांनी ते कमीही होतं. पण तोपर्यंत मुलं नाउमेद होत राहतात. अशा वेळी चिकाटीनं पुन्हा पुन्हा ती अक्षरे दाखवून, त्यांना नेमकेपणाने ती ओळखायला मदत करावी लागते.
पुढचा टप्पा अर्थातच चिन्हांना जोडून येणाऱ्या उच्चारणाचा. भारतीय भाषांच्या लिपींची मांडणी मूळाक्षरे आणि त्यांची अ ते अ: पर्यंतची बाराखडी अशी झाली आहे. त्यामुळे जसा शब्द बोलला जातो, तसा लिहिला जातो. किंवा जसा समोर असतो, तसा किमानपक्षी त्याचा उच्चार करता येतो. अगदी अर्थ कळला नाही तरी. इंग्लिशमध्ये असं होत नाही. पाच स्वरांचे उच्चारही सगळीकडे सारखे नाहीत. बॅट (bat) मध्ये ए चा उच्चार ‘अ‍ॅ’ आहे. व्हॉट (what) मध्ये ते ‘ऑ’ आहे. टेबल (table) मध्ये ‘ए’ आणि फादर (father) मध्ये ‘आ’ आहे. नवीन भाषा वाचणाऱ्यासाठी हा गोंधळवून टाकणारा प्रकार आहे. त्यामुळे ज्या मुलांची शिक्षण भाषा इंग्लिश असते, पण मातृभाषा इंग्लिश नसते, त्यांना जास्त अडचणींना तोंड द्यावं लागतं. म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात असे वेगवेगळे शब्द, मुलांच्या वारंवार दृष्टीला पडणं खूप आवश्यक असतं. अनेक शब्दांचे उच्चार सततच्या सरावातूनच जमतात. अशा वेळी मुलांना शिक्षक आणि पालकांकडून जास्त सराव मिळणं अतिशय आवश्यक असतं. पण बहुतेक वेळा या जास्त सरावाचं स्वरूप म्हणजे खेळाच्या वेळावर गदा आणि जाच, असं होतं. त्यातूनही मग वाचन आणि एकंदरच अभ्यास नकोसा होऊ शकतो.
त्यासाठी मग वेगवेगळी पुस्तकं एकत्र वाचणं, स्पेलिंग्जचे खेळ अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून शब्द दिसणं आणि बोलणं हे कायम करत राहावं लागतं. इथेही नुसतं मुलांकडून करून घेण्याऐवजी, त्यांच्या कलेनं, गतीनं ते करून घ्यावं लागतं.
सुरुवातीला एकेक अक्षर सुटं सुटं करून वाचणारी मुलं नंतर नंतर एका नजरेत पटापट अख्खा शब्द वाचू लागतात. खरं तर ती अख्खा अक्षरांचा क्रमबद्ध पॅटर्नच ओळखत असतात. यातूनच वाक्याचं वाचन जमायला लागतं. वेगाने आणि सलग वाचता येण्यासाठी माणसाच्या मेंदूचा या टप्प्यापर्यंतचा प्रवास व्हावा लागतो. वाचनावरच्या संशोधनातून ही गोष्ट खूप ठळकपणे समोर आली आहे.
शुद्धलेखन आणि स्पेलिंग्जमध्ये नेमकेपणा येण्यासाठीही हा टप्पा आवश्यक असतो. अगदी रोजच्या सरावातले शब्द लिहितानाही मुलं चुकतात, तेव्हा त्या शब्दातला अक्षरांचा पॅटर्न डोक्यात पक्का झालेला नसतो. अॅडिटरी आणि केनेस्थेटिक मुलांना ही अडचण जास्त जाणवते. त्यातही खासकरून केनेस्थेतिक मुलांना.
alt
वाचलेला मजकूर समजणं आणि त्याचं आकलन होणं, हा वाचनाचा एक फार दुर्लक्षित पैलू आहे. गेली काही वर्षे एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येत आहे. पहिली ते चौथीच्या गणिताच्या अभ्यासात बहुसंख्य मुलांना आकडेमोड जमते. संख्या आणि त्यावर कोणती गणितीय क्रिया करायची हे सांगितलं असेल, तर मुलांना पटदिशी उत्तर काढता येतं. पण तेच उदाहरण शाब्दिक गणित स्वरूपात असेल, तर अनेकांना त्यात काय करायचं, हेच कळत नाही. यात बऱ्याचदा मुलांना गणित नीट वाचता आलेलं नसतं आणि त्यामुळे अर्थ कळलेला नसतो. विरामचिन्हांचं भान ठेवून वाचन करून घेतलं जाणं हे दृश्य फार दुर्मीळ झालं आहे. सगळ्या विरामचिन्हांची चांगली ओळख होईपर्यंत मुलं तिसरी-चौथीत पोहोचलेली असतात. तोपर्यंत अभ्यासाचे विषय वाढलेले असतात आणि इतक्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसतो. त्याचे परिणाम कुठे दिसतात? प्रत्येक विषयाचे आकलनाचे पैलू वेगवेगळे असतात. शाब्दिक गणिताचा अर्थ कळला तरच त्यात कोणती क्रिया होते आहे, हे मुलाच्या डोळ्यासमोर उलगडत जाईल. एक उदाहरण पाहू- ‘एका खोक्यात १२ बाटल्या, अशा ९६ बाटल्या भरायला
किती खोकी लागतील?’ इथे १२ बाटल्यानंतरचा स्वल्पविरामापर्यंत एक वाक्यांश (क्लॉज्) आणि उरलेला दुसरा असे आहे. हे लक्षात घेतले नाही तर इथे नेमके काय घडते आहे, हे कळत नाही. किंवा Out of 8 pencils Rahul has, 3 are red and the ramaining are blue. Then how many blue pencils does Rahul have?' इथे पहिला वाक्यांश नीट वाचला गेला नाही तर उदाहरणात नेमकं काय करायचं आहे हेच कळत नाही.
विरामचिन्हांचं भान नसेल तर अगदी पदवीपर्यंतच्या अभ्यासातही मोठी शब्दबंबाळ वाक्यं, विज्ञानातल्या लांबलचक व्याख्या, भूमितीतील प्रमेय अशा अनेक गोष्टींचा अर्थ समजून घेणं अवघड जातं. म्हणूनच अक्षर, शब्द आणि वाक्य वाचनाच्या या प्रवासात आकलनाचं स्थानही फार महत्त्वाचं आहे.
म्हणूनच ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती फार सर्वसमावेशक आहे.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो