‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक आरोग्यातील
मुखपृष्ठ >> लेख >> ‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक आरोग्यातील
 

अर्थवृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक आरोग्यातील Bookmark and Share Print E-mail

जयंत विद्वांस, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज भारतात मोठय़ा शहरातून चाळिशीच्या आतच हृदयविकारांनी ग्रस्त तरुण आढळतात. याला कारण आपण स्वीकारलेली नवीन जीवनशैली आहे. इंटरकॉममुळे शेजाऱ्यांशीसुद्धा फोनवर बोलणे व मोबाइल, इंटरनेट स्वस्त झाल्याने लांबच्या नातेवाईकांशी फोनवरच बोलणे होते. जाणे-येणे नाही. आर्थिक नियोजन करताना कुटुंबाच्या खर्चाचा तपशील नियोजनकार मागतात. बहुतेक सर्वजण एकत्रित महिना खर्च इतका असे लिहितात. फार थोडे जण खर्चाचा तपशील सांगतात. यात दूध, फळे, भाजीपाला, जीम, हॉटेलचा खर्च या तपशिलावरून राहणीमानाची पद्धत लक्षात येते. दूध, फळे, जीम यावर फुली आणि हॉटेल खर्चासमोर मोठा आकडा दिसला की, मोठय़ा रकमेचा आरोग्य विमा सांगितला जातो.
हल्ली सर्व संस्था आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा सोय करतात. कंपन्यांसाठी कर्मचाऱ्याची किंमत (Cost to company) मध्ये संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विम्याची हप्त्याची रक्कम मिळवलेली असते म्हणजेच तुम्हाला वर्षांकाठी कंपनी पंचवीस ते तीस हजार रुपये कमी देते. वर्षांच्या सुटय़ा मर्यादित असतात. आपले आरोग्य नीट नसेल तर कॉस्ट टू कंपनी वाढत जाते. मग पाच वर्षांनी कंपनी आपल्या खर्चाचा पुनर्विचार करते.
अमेरिकेत एका कंपनीचे चेअरमन वारंवार आजारी पडत होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत एक भागधारक उभा राहिला आणि त्या चेअरमनना उद्देशून म्हणाला, ‘‘सर, आपण आपली तब्येत नीट राखू शकत नाही. आमच्या कंपनीची कशी राखणार. आमच्या आणि कंपनीच्या भल्यासाठी आपण निवृत्ती स्वीकारल्यास बरे होईल.’’ भारतात कंपनीचे चेअरमन बहुतेक वेळा सर्वात मोठे भागधारक असतात म्हणून आपण त्यांना हे सांगू शकलो नाही तरी कंपनीचे संचालक, कर्मचाऱ्यांना हे सांगू शकतात.
परदेशात सरकारतर्फे नागरिकांच्या सुदृढतेसाठी काळजी घेतली जाते. काही देशांत चॉकलेटच्या पाकिटावर ‘जास्त खाणे आरोग्यास अपायकारक’ असे छापणे बंधनकारक आहे (सिगारेटच्या पाकिटावरील वैधानिक इशाऱ्याप्रमाणे). ऑफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी भरपूर फळे ठेवलेली असतात. ऑफिसमध्येच जीम किंवा ध्यानधारणा, योगारूम असते. भारतात इन्फोसिससारख्या फारच थोडय़ा संस्थांमध्ये या सोयी आढळतात; परंतु या सोयींचा उपयोग न करता आजच्या काळात सॉफ्टवेअरमधील मुले पाच दिवसांच्या आठवडय़ात रोज बारा तास काम केल्याचा शिणवटा घालविण्यासाठी शनिवार/रविवार पबमध्ये घालवतात.
आपल्या देशात आपले सरकार किंवा आपण नोकरी करीत असलेली संस्था कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी नसेल तरीही काळजी आपली आपणच घेणे ही जबाबदारी आपलीच आहे. यासाठी पैसा आणि मुख्यत्वे वेळेची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आपले सुदृढ शरीर ही आपली मोठी संपत्ती आहे. नंतर घरदार व इतर संपत्ती हा विचार लहानपणापासून रुजवला पाहिजे. आज लहान मुलेसुद्धा मैत्री करताना आपली गाडी, सदनिका यांची तुलना करून करतात. वैज्ञानिक सुधारणांमुळे आपले आयुर्मान वाढले आहे, परंतु नुसतेच आयुर्मान वाढून शरीर धडधाकट नसेल तर मिळवलेली संपत्ती उपभोगता येणार नाही. आज जास्तीत जास्त संपत्ती मिळवण्याच्या- गोळा करण्याच्या हव्यासापोटी आपण आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य गमावून उपयोग नाही.
पूर्वी आयुष्यातील सुरुवातीची २५ वर्षे ज्ञानार्जन, नंतरची २५ ते ३५ वर्षे अर्थार्जन (मग वानप्रस्थाश्रम व नंतर संन्यास) असे गृहीत धरलेले असायचे. बाह्य़ परिस्थितीत विशेष बदल घडत नसल्याने आधीच्या २५ वर्षांत शिकलेले आयुष्यभर उपयोगी पडत असे. आता दर दीड-दोन वर्षांत नवीन उपकरणे बाजारात येत असतात. नवीन ज्ञानात भर पडत असते. हे ज्ञान आपण शिकलो नाही तर आपण आपल्या क्षेत्राच्या बाहेर फेकले जातो. आज टेपरेकॉर्डर जाऊन सीडी प्लेअर आले. टेपरेकॉर्डर दुरुस्ती करण्याचे ज्ञान आज उपयोगी राहिले नाही. ऑल्विन टॉफलर यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘एकविसाव्या शतकात ‘अशिक्षित’ या शब्दाचा अर्थ ज्याला लिहिता-वाचता येत नाही असा नसून ज्याला शिकता येत नाही. आधी शिकलेले विसरून नवीन शिकता येत नाही असा आहे.’’
भारतीय प्रबंधन संस्था, अहमदाबाद (IIM) मधून पंचवीस वर्षांपूर्वी एम.बी.ए. झालेल्या व्यक्तीच्या व आज एम.बी.ए. होणाऱ्या व्यक्तीच्या अभ्यासक्रमात व पर्यायाने ज्ञानात किती फरक असेल? हा फरक भरून काढला नाही तर आपण कालबाह्य़ होऊ. हे होऊ नये म्हणून आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर नवीन शिकावे लागेल. हे शिकण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करावीच लागेल. दर चार-पाच वर्षांनी नवीन अभ्यासक्रम/कोर्स करावे लागतील. यासाठी कदाचित नोकरीत अल्पविराम घ्यावा लागेल. शिक्षणाचा खर्च व नोकरीतील अल्पविराम काळातील खर्चाची तरतूद आधीच्या तीन-चार वर्षांत करावी लागेल. आजच्या तरुण पिढीला याची हळूहळू जाणीव होऊ लागली आहे. तरुण जोडपी आर्थिक नियोजनकारांना आवर्जून दोघांच्या पुढील शिक्षणाची तरतूद करण्याचे नमूद करतात. पुष्कळ कंपन्या आपल्या प्रमुख कर्मचाऱ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. शिक्षण खर्च व रजा देतात. इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानवृद्धीसाठी लहान प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतात.
आज वाढत्या आयुर्मानानुसार साठाव्या वर्षी निवृत्त होता येईलच असे सांगता येत नाही. आपले राहणीमान टिकवून ठेवायचे असल्यास निवृत्तीनंतर काही काळ पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करावे लागेल. या काळात नवीन नोकरी/व्यवसाय करण्यासाठी नवीन काळानुरूप ज्ञान मिळवणे आवश्यक असेल. या स्वरूपातील गुंतवणुकीचा परतावा प्रचंड असतो. शेअर बाजारातील गुंतवणूक काही काळ उणे परतावा देऊ शकते. बाजारभाव खाली जाऊ शकतात. ज्ञानार्जनातील गुंतवणूक कायमच निश्चित परतावा पुढील काही वर्षी देते.
आर्थिक नियोजनकाराकडे येताना अशिलाचा उद्देश आपल्या आर्थिक बाबी सोप्या, सुरळीत व्हाव्यात, आपले राहणीमान सद्यस्थितीपेक्षा दोन पावले पुढे जावे हा असतो. फॅमिली डॉक्टरप्रमाणे आर्थिक नियोजनकार कुटुंबाचा एक सदस्य होतो. आर्थिक नियोजन करता करता गुंतवणूक व वैचारिक विसंगती आढळतात. या विसंगती R IC H या शब्दाच्या माध्यमातून गेल्या काही लेखात मांडल्या.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो