वाचावे नेट-के : ब्लॉगरांचा पितृपक्ष
मुखपृष्ठ >> वाचावे नेटके >> वाचावे नेट-के : ब्लॉगरांचा पितृपक्ष
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वाचावे नेट-के : ब्लॉगरांचा पितृपक्ष Bookmark and Share Print E-mail

अभिनवगुप्त, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
alt

उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता :
http://bhaupadhye.blogspot.in
आठ मुद्दय़ांबद्दलची किंवा ब्लॉगांबद्दलच्या अन्य विषयांची चर्चा पुढं नेण्यासाठी ई-मेल : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
त्या लेखकाची जयंती वा स्मृतिदिन वगैरे काहीही ऑक्टोबरात नाही, तरीही.. आणि त्या लेखकाचं ‘थडगं’ म्हणवणाऱ्या एका ब्लॉगवर गेल्या चार-पाच महिन्यांत काहीच नवी घडामोड नाही, तरीही ब्लॉगरांना हा लेखक पितृतुल्य का वाटला पाहिजे, याची चर्चा करण्यासाठी एक औचित्य आहे .. या देशातील बहुसंख्याक जो ‘पितृपक्ष’ पाळतात त्याचं.


आजच्या मराठी ब्लॉगरांचा बाप शोभणारा हा लेखक म्हणजे भाऊ पाध्ये. त्यांनी कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या, त्यांचा जन्म आणि मृत्यू कधी झाला, कुठे नोकरी वगैरे केली की नाही, हा सर्व तपशील ‘भाऊ पाध्ये डॉट ब्लॉगस्पॉट डॉट इन’ या पत्त्यावरल्या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतोच. ‘भाऊ पाध्यांविषयी एक छोटासा दस्तावेज’ असं या ब्लॉगचं स्वरूप असल्याचं सुरुवातीलाच नमूद आहे. ब्लॉगबद्दलच लिहिण्याच्या या सदरात भाऊ पाध्ये अवतरू शकतात, ते त्यांच्यावरल्या ब्लॉगमुळे. ‘वासूनाका’खेरीज भाऊंच्या अन्य कादंबऱ्या- विशेषत: ‘राडा’ किंवा ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’ वाचल्या असतील तर भाऊ हे ‘ब्लॉगरांचे बाप’ कसे, हे निराळं सांगावं लागणार नाही. भाऊ पाध्ये यांची ओळख होण्यासाठी या ब्लॉगवरच विसंबून राहणार असाल, तर मात्र ओळींच्या मधलं वाचून मगच ‘भाऊ पाध्ये आजच्या ब्लॉगरांचे बाप ठरतात’ या विधानाचा विचार करता येईल. पद्धत कोणतीही वापरली, तरी भाऊंबद्दलचे निष्कर्ष, काही मुद्दे हे आजच्या मराठी ब्लॉग लेखनाच्या दृष्टीनं महत्त्वाचे ठरतात, ते असे :
१) भाऊ पाध्ये हे स्वत:च्या परिसराबद्दल लिहिताना अगदी समपातळीवरून लिहीत. ‘लेखका’च्या खुर्चीवरून आपण बोलतो आहोत आणि त्या खुर्चीला काही अधिकार आहेत किंवा त्या खुर्चीमुळे काही जबाबदाऱ्या (हसता हसता करुणेचीही भावना उत्पन्न करणं, समाजदर्शन घडवणं वगैरे कुठल्याच) आहेत, अशी जाणीव त्यांच्या लिखाणात दिसत नाही- समाजाबद्दल जे सांगावंसं वाटलं, ते त्यांनी सांगितलं. लोकांना समाजदर्शन घडलं. हा समाज भाऊ पाध्ये यांचा- त्यांनी आपला मानलेला होता. हे समपातळीवरून लिहिणं त्या वेळी अनेकांना जमलं नाही किंवा काहींना टिकवता आलं नाही, पण भाऊंना सुरुवातीपासून अखेपर्यंत ते साधलं.
२) आपण लेखक आहोत म्हणून आपल्याला लेखकासारखं वागावं लागेल, प्रकाशक वा वाचकांशी जुळवून घ्यावं लागेल हे भाऊ पाध्ये यांनी नेहमीच अमान्य केलं. मराठी साहित्य क्षेत्र नावाची जी काही व्यवस्था आहे, त्यापासून भाऊ फटकून राहिले. ‘प्रकाशक आहेत की बनिये’ असा थेट आक्षेप घेण्यास त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही आणि स्वत:च्या लिखाणाची कदर करण्यासाठी त्यांनी ‘प्रकाशकांची ब्लॅक लिस्ट’ बनवली असाही प्रवाद होता.
३) लिखाणामधून आजचा काळ दिसावा, आजच्या काळातली माणसं कशामुळे आणि किती अस्वस्थ आहेत आणि त्यांची ही अस्वस्थता त्यांना काय काय करण्यासाठी प्रवृत्त करते याचा माग लिखाणानं काढावा, ही भाऊ पाध्ये यांच्या लिखाणाची गरज होती. त्या गरजेखेरीज त्यांनी कथात्म लिखाण (कादंबऱ्या आणि कथा यांचं लिखाण) कधी केलं नाही.
४) सिनेमाबद्दल भाऊ पाध्ये लिहीत तेव्हा त्या माध्यमाची आवड असणं या कारणाइतकीच ‘प्रेक्षक ही माझी भूमिका मला राखायची आहे. आजचा सिनेमा आजच्या प्रेक्षकाला काय देतोय हे मला बघायचं आहे’ अशी कारणं भाऊंसाठी महत्त्वाची होती, हे त्यांच्या लिखाणातून जाणवेल.
५) शब्द कोणते वापरावेत आणि कोणते वापरू नयेत, याचा बाहेरून येणारा कोणताही दबाव पाध्ये यांनी कधीही स्वीकारला नाही. त्यांच्या लिखाणात लिंगवाचक, व्यभिचारवाचक शब्द आले, ते लिखाणात अत्यावश्यक म्हणूनच आले आहेत यावरचा भाऊंचा विश्वास अढळ राहिला.
६) बाह्य दबावाला न जुमानता लेखन करण्याचा भाऊंचा स्वभाव ‘फॉर्म’मधूनही दिसतो. लेखन प्रकाराची- त्याच्या घाटाची वगैरे बंधनं पाळून मग लिहिणाऱ्यांपैकी भाऊ नव्हते. ‘वासूनाका’ ही कादंबरी ठरेल की नाही, हा प्रश्न आजही काहीजणांना पडेल; परंतु भाऊंनी अशा प्रश्नांचा मुलाहिजा बाळगला नाही.
७) मराठीचं सौष्ठव पाळण्याऐवजी मुंबैकर भाऊ पाध्यांनी ‘आजच्या भाषेचं सौष्ठव’ लिखाणातून दाखवून दिलं. ‘कादंबरीला निखार येतो’ अशी भाषा ते बोलतानाही सहज वापरत असत. समाज निरीक्षण आणि सिनेमाची आवड हे भाऊ पाध्ये यांच्या मराठीसौष्ठवाचे दोन ‘पहिये’ होते.
८) बोलल्यासारखं लिहिणं म्हणजे काय, हे जाणण्यासाठी भाऊ पाध्ये यांचं लिखाण वाचायला हवं.. किंवा असं की, लिखाणातलं लेखकाचं ‘बोलणं’ कुठल्या जागेवरून असतं, हे जाणण्यासाठी! ‘बोलल्यासारखं लिहिणारे’ अनेक साहित्यिक असतात, पण त्यांच्यापैकी अनेकजण नेहमी एकपात्री प्रयोगाच्या स्टेजवरनंच बोलत असतात, काहीजण कथाकथनाच्या कार्यक्रमातनं, काहीजण संस्कारक्षम व्याख्यानांतनं.. अशा बोलण्याच्या नाना जागा.. ज्याच्या त्याच्या ठरलेल्या. भाऊंनी मात्र वाचकाला कायमच गर्दीत कुठंतरी गाठलं- गर्दीतला एकजण, म्हणून भाऊ वाचकाशी बोलले.
याखेरीज भाऊ आहेत. ते या आठ मुद्दय़ांपेक्षा नक्की मोठे आहेत आणि हे मोठेपण वाचकांपर्यंत पोहोचवण्यात ‘भाऊ पाध्ये’ हा ब्लॉग (मे २०१२ पासून जवळपास ‘डेड’ असला तरी) यशस्वी होतोच आहे. पण इथं हे आठ मुद्दे दिले आहेत ते आजच्या अनेक ‘अ‍ॅक्टिव्ह’ ब्लॉग लेखक/ लेखिकांच्या मनोधारणेशी- ‘टेम्परामेंट’शी भाऊ पाध्ये नामक एका लेखकाची मनोधारणा कशी जुळणारी आहे, याचा अंदाज देण्यासाठी.
मराठीबद्दल, प्रकाशन व्यवहाराबद्दल, अगदी वाचकांबद्दलसुद्धा भाऊंना जे २५- ३० वर्षांपूर्वी वाटलं होतं, तेच आज वाटणारी पिढी ब्लॉग आणि फेसबुकसारख्या माध्यमांतून स्वत:ला वाचकांपर्यंत पोहोचवते आहे. अर्थात, भाऊ पाध्ये यांनी ज्या व्यवस्थेला ‘फाटय़ावर मारलं’, ती व्यवस्था मात्र त्यांना यश देण्यासाठी तयार होती. त्यासाठी लेखकराव होण्याच्या ‘अटी लागू’ असतात, तो भाग भाऊंनी धुडकावून लावला होता. या धुडकावण्याची गोष्ट ‘भाऊ पाध्ये’ ब्लॉगवरून विविधांगांनी कळते. हेही लक्षात येतं की, आजच्या पिढीमध्ये असलेली मराठी साहित्य-व्यवस्थेबद्दलची हताशा या पिढीला अन्य माध्यमांकडे नेते आहे. लेखकरावांबद्दल ‘मी काही लेखकबिखक नाही, पण लिहायला आवडतं’ असं म्हणायला प्रवृत्त करते आहे. अशा पिढीला तिचा बिछडा हुआ बाप- आदल्या पिढीत याच जाणिवांची रुजवण करणारा आणि मुख्य म्हणजे समपातळीवरून समाजाबद्दल ‘बोलण्या’ची पायाभरणी करणारा कर्तृत्ववान पुरुष, या अर्थानं बाप-  परत मिळवून देणं, हे कर्तव्य अवधूत डोंगरे यांनी घडवलेल्या ‘भाऊ पाध्ये’ या ब्लॉगमुळे काही अंशी पूर्ण झालं आहे. ‘काही अंशी’ अशासाठी की, याच अवधूत डोंगरे यांनी आजच्या पिढीचं ज्यांच्याशी नातं आहे अशी आणखीही काही साहित्यिक मंडळी हुडकून त्यांचे ब्लॉग बनवले आहेत! त्याविषयी नंतर बोलू.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो