सह्याद्रीचे वारे : अजितदादाही त्याच वाटेने..
मुखपृष्ठ >> सह्याद्रिचे वारे >> सह्याद्रीचे वारे : अजितदादाही त्याच वाटेने..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सह्याद्रीचे वारे : अजितदादाही त्याच वाटेने.. Bookmark and Share Print E-mail

संतोष प्रधान ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२  :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

महाराष्ट्रात दुसऱ्या फळीतील नेत्यांना बंडखोरी वा आक्रमक होणे अशी वाट शोधावी लागली. राणे, मुंडे, भुजबळ, राज ठाकरे आणि शरद पवारदेखील या वाटेने गेले. संघटना बांधणीचा थेट अनुभव नसलेले अजित पवार आता पक्षाला बळकटी देण्याचे काम करतील, तेव्हा त्यांची तोफ तीन-चार महिने धडधडत राहील, पण ज्यामुळे हे सारे घडले त्या सिंचनाचे काही होणार आहे का?
अजित पवार यांच्या राजीनाम्याचा पहिला अध्याय संपला. आता खरी लढाई सुरू झाली. राजीनाम्यानंतर आपली भूमिका काय असेल याची चुणूक अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात दाखविली. त्यांनी थेट काँग्रेसवर नेम साधला. कोळसा घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्याकरिता आपल्यावर आरोप करण्यात आल्याचे सांगत कळत-नकळत त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना वादात ओढले. पुढे तीन-चार महिने अजित पवार यांची तोफ अशीच धडधडत राहील, पण राजीनामा दिला त्या सिंचनाचे गौडबंगाल प्रकाशात येण्याची शक्यता कमीच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या ५० वर्षांचा वेध घेतल्यास जनतेत स्थान असलेल्या किंवा जनाधार असलेल्या नेत्याला बंडाचे पाऊल उचलावे लागले किंवा त्याला बाजूला टाकण्याची परंपराच दिसली. यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील यांच्यासारख्या जनतेच्या मनात स्थान असलेल्या नेत्यांबद्दल दिल्लीचा कायमच दुराग्रह राहिला. शरद पवार यांच्याबाबत तेच झाले. राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार या दोन नेत्यांची पकड आहे वा त्यांना तळागाळात स्थान आहे. जनतेची नाडी या दोन नेत्यांना बरोबर समजते. जनतेत स्थान असलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, अजित पवार व उद्धव ठाकरे ही मंडळी आहेत. प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले यांच्या मागे जनाधार असला तरी तो त्यांच्या समाजापुरताच सीमित आहे. जनाधार किंवा जनमानसात स्थान असलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतेक नेत्यांची अवस्था साधारणपणे सारखीच आहे. पक्षनेतृत्वाकडून होणारी कुचंबणा किंवा स्वत:ची महत्त्वाकांक्षा यापोटी या नेत्यांना बंडाचे निशाण फडकवावे लागते किंवा आक्रमक व्हावे लागते. राज ठाकरे यांनी बाहेर पडून स्वत:चा पक्ष काढून आपले नेतृत्व सिद्ध करून दाखविले. गोपीनाथ मुंडे यांची भाजपमध्ये कुचंबणा केली जाते, असा त्यांच्या समर्थकांचा आक्षेप असतो. परिणामी मध्यंतरी मुंडे यांनी बंडाचे निशाण रोवले होते, पण टोकाची भूमिका घेण्याचे टाळले किंवा बेत रहित केला. नारायण राणे यांची आधी शिवसेना आणि आता काँग्रेसमध्ये अवस्था फारशी काही वेगळी नाही. राणे यांची महत्त्वाकांक्षा त्यांच्या आड येते. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये मनाने कधीच नसतात. आपल्या आक्रमक शैलीने जनतेच्या मनात स्थान केलेल्या अजित पवार यांच्याबाबतही तेच झाले.
राज्याच्या राजकारणात एका पक्षापासून बाजूला होत स्वत:चा पक्ष काढून आपले नेतृत्व सिद्ध करण्यात आतापर्यंत शरद पवार किंवा राज ठाकरे हे दोघेच यशस्वी झाले. शंकरराव चव्हाण यांच्यापासून अनेकांनी वेगवेगळे पक्ष काढले, पण हे पक्ष कधीच बाळसे धरू शकले नाहीत. कालांतराने ते मुख्य प्रवाहात सामील झाले. राणे, मुंडे किंवा भुजबळ यांच्या मनात जरी वेगळे होण्याचे आले तरी त्यांना कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत हे नेतेच फार आशावादी नाहीत. उद्धव ठाकरे यांना जनमानसात स्थान नाही, अशी टीका केली जाते. पण शिवसेनेचे कार्याध्यक्ष या नात्याने पक्ष संघटना भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे. पक्षाची ताकद असल्यानेच त्यांच्या सभांना चांगली गर्दी होते. राज आणि उद्धव ठाकरे किंवा अजित पवार यांच्यावर घराणेशाहीची टीका होते. तरीही राज ठाकरे आणि अजित पवार या दोन नेत्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
राजीनाम्यानंतर अजित पवार हे काय करणार, याचीच चर्चा होते. राज ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवणार की राष्ट्रवादी वाढविणार हे दोन प्रश्न साहजिकच चर्चेत येतात. शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये अनेक बाबतींत भिन्नता आहे. आय.टी.पासून क्रिकेट, साहित्य सर्वच क्षेत्रांमध्ये शरद पवार यांची वेगळी बैठक आहे. याउलट अजित पवार हे शेती, पाणी किंवा ग्रामीण भागापुरतेच मर्यादित आहेत. शरद पवार यांचे राजकारण नेहमीच बेरजेचे राहिले. पुढील पाच ते दहा वर्षांचा विचार करून राजकीय पावले टाकण्यावर त्यांनी आतापर्यंत भर दिला आणि त्यात ते यशस्वी झाले. याउलट अजितदादांचे. तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे. राजकारणात नेहमी दीर्घकालीन विचार करून निर्णय घ्यावे लागतात. राजीनाम्याचा निर्णय हा त्यांचा अल्पकालीन विचारांचा दिसतो. यामुळेच बहुधा मोठय़ा पवारांना पुतण्याच्या राजीनाम्याचा निर्णय पटला नसावा. गेली १३ वर्षे सत्तेत असलेल्या अजितदादांनी स्वत:ची अशी प्रतिमा आणि ताकद निर्माण केली. राजकारणात आवश्यक असलेले साम, दाम यात अजितदादा कोठेच मागे नाहीत. २००४च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या निर्णयप्रक्रियेत अजितदादांचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. पक्षाकडे असलेली खाती त्या मंत्र्यांपेक्षा अजितदादांच्या इशाऱ्यावर चालू लागली. छगन भुजबळ, जयंत पाटील, आर. आर. पाटील यांच्यासारखे दोन-तीन मंत्र्यांचे अपवाद वगळता बाकीच्या खात्यांवर अजितदादांचा वचक आहे. कोणत्याही परिस्थितीत २०१४ मध्ये मुख्यमंत्री व्हायचे या एकाच ध्येयाने अजितदादांची गाडी सुसाट निघाली आणि तिला ब्रेक लावण्याचे काम सरकारमधूनच किंवा मित्रपक्षाने पद्धतशीरपणे केले.
 राजीनामा दिलेल्या अजित पवार यांच्यावर पक्ष वाढविण्याची जबाबदारी शरद पवार यांनी टाकली आहे. काकांप्रमाणे अजित पवार हे संघटन कौशल्यासाठी कधीच प्रसिद्ध नव्हते. अजितदादांच्या सभोवताली सध्या जो गोतावळा आहे त्यात सामान्य किंवा साध्या कार्यकर्त्यांपेक्षा मंत्री म्हणून अजितदादांनी उपकृत केलेल्यांचीच संख्या जास्त आहे. पक्षवाढीसाठी सत्तेचा वापर करून अजितदादांनी नेमकी माणसे हेरली व त्यांना ‘ताकद’ दिली. उद्या संधी आल्यास नेतृत्वाकडून डावलले जाणार नाही ना, अशी भीतीवजा रुखरुख अजितदादांच्या मनात कायम घर करून असते, असे नेहमीच बोलले जाते. पन्नाशीच्या घरात आल्यावर वरिष्ठांचा आशीर्वाद घ्यायचा असतो, परवानगीची गरज नाही किंवा सत्तेसाठी कोणीही अस्पृश्य नाही हे २००९च्या विधानसभा निकालांपूर्वी विधान करणाऱ्या अजितदादांना आपण म्हणू तोच पक्षात अंतिम शब्द हे मोठय़ा पवारांनी कृतीतून दाखवून दिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे केंद्रीय पातळीवरील संबंध पूर्वीसारखे फार सलोख्याचे राहिलेले नाहीत. त्यातच देशभर काँग्रेसच्या विरोधात वातावरण आहे. राष्ट्रवादीही वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करीत आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची मदत घेण्यापेक्षा शक्यतो स्वबळावर महाराष्ट्रात लढावे, हा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा कानमंत्र आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसची राज्यातील नेतेमंडळी कामाला लागली आहेत. अशा वेळी शरद पवार यांनी काँग्रेसच्या अंगावर अजित पवार यांना सोडले आहे. श्वेतपत्रिका निघेपर्यंत सरकारमध्ये परतणार नाही, असे अजितदादांनी जाहीर केले आहे. श्वेतपत्रिकेला जेवढा विलंब लागेल तेवढे काँँग्रेसला हवेच आहे. श्वेतपत्रिकेत नुसत्या जलसंपदा खात्याच्या आकडेवारीचा आधार घेऊ नका, तर कृषी आणि महसूल खात्यांच्या आकडेवारीचा समावेश करा, अशी काँग्रेसची भूमिका राहील. श्वेतपत्रिकेतून बाहेर काहीच येणार नाही, पण राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसची ही खेळी आहे. शरद पवार यांच्यावर यथेच्छ आरोप झाले वा अजूनही होतात, पण त्यांनी कधी राजीनाम्याचा विचार केला नाही. उलट आव्हानांना सामोरे गेले. काकांच्या नेमकी विरोधात भूमिका अजितदादांनी घेतली आहे. अजितदादांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणाला निश्चितच कलाटणी मिळाली असली तरी यातून राष्ट्रवादीचा व व्यक्तिश: अजितदादांचा कितपत फायदा होतो यावर पुढील खेळी अवलंबून आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो