आनंदयोग : ओढ आवरता यायला हवी
मुखपृष्ठ >> लेख >> आनंदयोग : ओढ आवरता यायला हवी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आनंदयोग : ओढ आवरता यायला हवी Bookmark and Share Print E-mail

 

भीष्मराज बाम - बुधवार, ३ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भूतकाळातल्या चुकांचा शोक, वर्तमानात जे नाही त्याची अतृप्ती आणि ते भविष्यकाळात मिळवण्याची ओढ आणि अज्ञात भविष्याकडे वाटचाल करण्याची भीती हे सारे  आपल्याला दुर्बळ करून टाकते.. नेमबाज अर्जुन असो की राल्फ शूमान; त्याला हे कळणे महत्त्वाचे!
नातवंडाबरोबर खेळत असताना बेल वाजली. कोण आले आहे ते पाहायला मी पटकन दार उघडले. आलेली व्यक्ती नुसतेच एक पत्र देऊन निघूनसुद्धा गेली. पण नातवाने जे भोकाड पसरले ते थांबवायला बराच वेळ जावा लागला. दार उघडण्याचे काम हे त्याचे एकटय़ाचे होते. ते मी करून त्याचा फार मोठा अपमान केला होता.

मग एकाने बाहेर गुपचूप जाऊन बेल वाजवली. या वेळी नातवाला दार उघडायला मिळाले. तेव्हा त्याची कळी खुलली. जी कामे मोठी माणसे करतात ती आपण करायची ही हौस बालवयात फार असते. कारण त्या लहान मुलाला शक्य तितक्या लवकर मोठे व्हायचे असते. मोठी माणसे स्वत:चा निर्णय स्वत: घेतात याचेच त्याला फार आकर्षण असते. पण निर्णयाबरोबरच जबाबदारीसुद्धा येते आणि अपयशाचे दु:खही. अर्थात हे समजेपर्यंत बालपण आणि त्यातली रम्यतासुद्धा संपून गेलेली असते.
मी हे करीन ही ओढ माणसाला निसर्गतच असते आणि सर्वात महत्त्वाची ओढ आहे निर्णय घेणे. निर्णय घेऊन तो स्वत: पाळणे व इतरांनाही पाळायला लावणे हे जाणतेपणाचे आणि नेतृत्वगुणाचेही लक्षण आहे. दोन पिढय़ांमधला, जुन्यानव्यांचा, परंपरेचा आणि नव्याने स्फुरणाऱ्या ज्ञानाचा संघर्ष या ओढीमुळेच होतो. सासू व सून यांचे एकमेकांशी पटतच नाही त्याचे कारणही ही ओढच आहे. बापाला कैदेत टाकून किंवा ठार करून सत्ता काबीज करण्याची ईर्षां उत्पन्न होते ती याच ओढीमुळे. तिला योगामध्ये चिकीर्षां असे नाव आहे. आवड, नावड, जिज्ञासा, चिकीर्षां या चार मूलभूत प्रेरणा माणसाला कृती करायला लावतात, तशाच भय, शोक आणि अतृप्ती या प्रेरणासुद्धा माणसाच्या वर्तनाच्या मुळाशी असतात. अजाण माणसाला या प्रेरणा जोरात खेचून नेतात. सिद्ध योग्याचे अंत:करण समान पातळीवर पोहोचलेले असते. त्यामुळे या ओढी त्याच्यावर फारसा परिणाम करू शकत नाहीत. सामान्य माणसाच्या गरजा आणि ओढी या पहाडातून वाहणाऱ्या पाण्यासारख्या वेगाने वाहत असतात, तर योग्याची स्थिती जलाशयातल्या स्थिर पाण्यासारखी असते. आवड आणि नावड यांच्यातली तीव्रता उपासनेने आणि तपाने कमी झालेली असते. जे जाणायला हवे ते जाणून झालेले असते त्यामुळे जिज्ञासा शांत होते. जे म्हणून करायला हवे तेही करून झालेले असते त्यामुळे ती ओढसुद्धा शिल्लक राहात नाही. लहान मुलाची, अजाण माणसाची चिकीर्षां आणि योग्याची चिकीर्षां यात हाच फार मोठा फरक असतो.
आता भय, शोक आणि अतृप्ती या प्रेरणांचीसुद्धा तीच गत होऊन जाते. वर्तमानात जगण्याची कला साधलेली असल्याने भविष्य अजून यायचे आहे त्याचे भय बाळगण्याचे कारण नाही हे उमगलेले असते, त्यामुळे निर्भयता हा गुण स्थायीभाव झालेला असतो आणि आपण ज्याचा शोध करतो आहोत ती घटना भूतकाळातील आहे ती टाळणे आता आपल्याला शक्य नाही. मग तिचा शोक करीत राहणे व्यर्थ आहे हेही योग्याला प्रकर्षांने जाणवलेले असते. भूतकाळात जगणे आपोआप बंद होते. शोकाचे कारणच नाहीसे झाल्याने आनंदच शिल्लक उरतो. अतृप्ती ही वृत्ती मात्र वर्तमानकाळातलीच आहे. ती वर्तमानवर सत्ता गाजवत असते. भूक लागते, तहान लागते, वेदना होते या साऱ्याच जाणिवा वर्तमानातल्याच असतात. त्यातली अतृप्तीची ओढ पूर्ण झाल्याविना जीवन आणि विकास दोन्हीही शक्यच होत नाहीत. योगीसुद्धा इतरांसारखा जगत असतो, जेवत/खात/झोपत असतो. त्यामुळे अतृप्तीच्या ओढीला तो सामोरा जातच असतो. पण त्याला अतृप्तीची ओढ ही तृप्तीनेच शांत करण्याची युक्ती सापडलेली असते. या सातही प्रेरणांवर नियंत्रण आणणे म्हणजेच आपल्याच अंत:करणांवर, विचारांवर, भावनांवर नियंत्रण आणणे. ते आले की मन विस्तीर्ण जलाशयासारखे शांत होते. प्रेरणांची वादळे आली तरी त्याच्या पृष्ठभागावर तरंग तेवढे उठतात आणि ते लवकर शांत होते. म्हणून स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना गीतेत समुद्राचेच उदाहरण दिलेले आहे. नद्यांच्या पुरांचे लोंढे येऊन मिळत राहिले तरी ते समुद्रावर परिणाम करू शकत नाहीत, तो स्थिर आणि शांतच असतो. त्याचप्रमाणे वासनांचे महापूर आले तरी समुद्राप्रमाणे जो पचवून टाकू शकतो तोच शांतीचा अधिकारी होतो असे गीतेत सांगितले आहे.
एवढे मोठे युद्ध समोर येऊन उभे ठाकल्यावर कृष्ण आणि अर्जुन हे पांडवांकडले सर्वात मोठे योद्धे तत्त्वज्ञानाची चर्चा कसे काय करीत बसले असा अनेकांना प्रश्न पडतो. पण अर्जुनावर जी जबाबदारी येऊन पडली होती ती साधीसुधी नव्हती. त्याची तेव्हापर्यंत मिळवलेली सर्व शस्त्रे व अस्त्रविद्या आणि युद्धकौशल्य यांची अंतिम कसोटीच या महायुद्धात लागणार होती. त्यात पार पडणे तत्त्वज्ञानाचा पाया भक्कम असल्याशिवाय शक्यच होणार नव्हते. आणि अर्जुनाची समस्या ही तत्त्वावरची श्रद्धा डळमळीत झाल्यामुळेच उभी झालेली होती. स्वत:च्या सामर्थ्यांविषयी युद्धकौशल्याविषयी त्याला तिळमात्र शंका नव्हती. युद्ध हरण्याच्या कल्पनेने त्याचे हातपाय गळालेले नव्हते. त्याचा मूलभूत मुद्दा हा नीतिशास्त्राचा होता. पितामह, गुरू, आप्त, मित्र यांना मारून आम्ही रक्तलांच्छित भोग कसे भोगणार? असा त्याचा प्रश्न होता. अन्यायी, अनीतिमान राजांची सत्ता नाहीशी करणे आणि नंतर प्रजेला न्यायाने राज्य करून सुख देणे हे नीतिशास्त्रच सुचवू शकते. याउलट दुर्योधनाला हे प्रश्न पडलेच नाहीत, कारण तो भोगासाठीच लढायला उभा राहिला होता. म्हणूनच अजेय योद्धे आणि दीडपट सैन्य घेऊनही त्याला हारच पत्करावी लागली.
ज्या वेळी सर्वोच्च कसोटीला सामोरे जाण्याचे आव्हान असते त्या वेळी जलाशयाची शांती आवश्यक असते. राल्फ शूमान हा जर्मन नेमबाज रॅपिड फायर पिस्तूल या प्रकारांत आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोत्तम मानला जातो. भारताच्या विजयकुमार या नेमबाजाने लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून हा प्रकार आपल्याकडेही लोकप्रिय केला आहे. तर या स्पर्धेविषयी राल्फ शूमान म्हणतो, ‘रॅपिड फायर नेमबाजी ही अतिशय जलद होत असल्याने तिला हातघाईची लढाई मानले जाते. पण या प्रकारात अजिंक्य ठरायचे असेल तर तुमच्या अंत:करणाची सर्वोत्तम शांती साधावी लागते. म्हणजे मग तुम्हाला विजयी होता येण्याची शक्यता वाढते.’
नेमबाजीच का, कोणत्याही खेळामध्ये, एवढेच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करायला ही शांती साधता येणे अत्यंत आवश्यक आहे. आवड-नावड, सुख-दुख, यश-अपयश ही सारी द्वंद्वे मोठी वादळे उभी करतात. एकाग्रता साधेनाशी होते, भूतकाळातल्या चुकांचा शोक, वर्तमानात जे नाही त्याची अतृप्ती आणि ते भविष्यकाळात मिळवण्याची ओढ आणि अज्ञात भविष्याकडे वाटचाल करण्याची भीती हे सारे आपल्याला दुर्बळ करून टाकते. आपली स्वत:वरची श्रद्धा डळमळीत होते. आपण स्वीकारलेले असेल ते तत्त्वज्ञान आणि या सात मूलभूत प्रेरणांवर ताबा मिळवण्याची साधनाच ती श्रद्धा सतत जागी ठेवू शकतात. मग आपल्याला हवी असलेली शांती साधता येते, काय करायचे तेही बरोबर सुचत जाते आणि यश आवाक्यात येते.  हे साधले नाही तर जगण्यातला आनंद तर सोडाच साधे सुखही पारखे होते!
‘‘अशान्तस्य कुत: सुखम्?’’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो