खलिस्तानी दहशतवादाला ‘लष्कर’चा छुपा पाठिंबा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

खलिस्तानी दहशतवादाला ‘लष्कर’चा छुपा पाठिंबा Bookmark and Share Print E-mail
महत्त्वाच्या बातम्या

ब्रार यांच्यावरील हल्ल्यामुळे संशयाला पुष्टी
प्रतिनिधी , मुंबई

‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’नंतर पूर्णपणे थंडावलेला खलिस्तानी दहशतवाद पुन्हा डोके वर काढू लागल्याचे लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावर लंडन येथील हल्ल्यामुळे स्पष्ट होऊ लागल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानी दहशतवाद कमालीचा सक्रिय झाल्याचे आढळून येत आहे. या दहशतवादाला पाक पुरस्कृत आयएसआयमार्फत ‘लष्कर-ए-तय्यबा’ या दहशतवादी संघटनेचा छुपा पाठिंबा असल्याचे संकेत मिळत आहेत, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. खलिस्तानी दहशतवाद पसरत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १८ एप्रिल, ४ सप्टेंबर २०१० आणि २० ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध केले होते. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ या मोहिमेचे सूत्रधार असलेल्या ब्रार यांच्यावरील हल्ल्यामुळे ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. न्यूझीलंड, अमेरिका, कॅनडा, मलेशिया आदी देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद जोपासला जात असल्याचे पुरावे वेळोवेळी पुढे आले आहेत. आता तर पंजाबमध्येही उघडपणे खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याच्या काही घटना गेल्या काही महिन्यांत पुढे आल्या आहेत. याबाबत संसदेत वेळोवेळी सादर झालेल्या माहितीत पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद वाढत असल्याला दुजोरा देण्यात आला होता.
स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणी करणाऱ्या भिंद्रनवाले तसेच सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश देणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मारेकरी सतवंत सिंग, बियांत सिंग आणि केहार सिंग या खलिस्तानी दहशतवाद्यांना न्यूझीलंडमधील गुरुद्वारात ‘शहीदभाई’ असे मानाचे स्थान देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ‘खलिस्तान दी त्वारिख’ (खलिस्तानचा इतिहास) या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीवर केंद्र सरकारने बंदी आणली होती. तरीही याची प्रत न्यूझीलंड शीख सोसायटीच्या वाचनालयात उपलब्ध आहे. हरमिंदर सिंग, दलजित सिंग आणि हरप्रीत सिंग हे खलिस्तानी दहशतवादी सध्या मलेशियात आश्रयाला आहेत. दक्षिण आशियाई देशांत खलिस्तानी दहशतवाद फोफावत असून त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण मिळत असल्याचेही उघड झाले आहे. पाकिस्तानातून भारतात परतणे या खलिस्तानी दहशतवाद्यांना सहजसोपे असल्याची बाबही पुढे आल्याचे या सूत्रांनी सांगितले.
भारतीय गुप्तचर यंत्रणा आता अधिकच सक्रिय झाली असून तुरुंगातून पळून गेलेला जगतारसिंग हवारा याला १८ महिन्यांनंतर पुन्हा अटक झाली होती. त्यावेळी त्याच्याकडे तब्बल ३५ किलो आरडीएक्स आणि अनेक एके ४७ रायफली सापडल्या होत्या. यामुळेही गुप्तचर विभागाचे डोळे तेव्हा उघडले होते. तेव्हापासूनच खलिस्तानी दहशतवादाकडे लक्ष पुरविण्यात आल्याचेही या सूत्रांनी मान्य केले. हवाराला पंजाबमध्येच तब्बल शंभरहून अधिकांनी आश्रय दिला होता. खलिस्तानी दहशतवादाला छुपा पाठिंबा मिळत असल्याचेच हे द्योतक आहे, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले आहे. सुवर्ण मंदिर परिसरातील काही दुकानात आजही भिंद्रनवाले यांची स्टिकर्स, पोस्टर्स, टी-शर्टस, सीडी, पुस्तके आदींची उघडपणे विक्री होत आहे. चीनमध्ये या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. अनेक तरुण या वस्तू खरेदी करताना दिसतात. भिंद्रनवालेना बाबाजी म्हणून संबोधले जाते. ते आमचे संत आहेत. १९८४ च्या दंगलीच्या सीडीलाही खास मागणी आहे, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.   

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो