बिकट वाट
मुखपृष्ठ >> बातम्या >> बिकट वाट
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बिकट वाट Bookmark and Share Print E-mail

विनय उपासनी - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गणेशोत्सव संपला.. पितृपक्ष सुरू झाला.. पंधरवडय़ाने नवरात्राची धूम, त्यानंतर मग दसरा आणि अखेरीस दिवाळी. सणासुदीचा हंगाम आता खरा सुरू झाला आहे. आधी रुसलेल्या पावसाने नंतर मात्र दिल खोल के बरसात केली आहे. विविध कंपन्यांचे बोनसचे आकडे काही दिवसांनी जाहीर होतील. त्याआधीच अनेक कंपन्यांनी आपापली नवनवी उत्पादने बाजारात आणायला सुरुवातही केली आहे. कार हा त्यातला महत्त्वाचा घटक. मारुतीची नवीकोरी गाडीही याच हंगामात येणार आहे. एकूणच वातावरण फील गुडचे आहे. पण कार, एसयूव्ही, एमयूव्ही ज्या रस्त्यांवरून धावणार आहेत. त्या रस्त्यांचं काय?
काल-परवाच गेल्या वर्षांच्या तुलनेत कारविक्रीचे प्रमाण किती वाढले, कमी झाले याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याच बळावर विविध कार उत्पादक कंपन्यांनी आम्हीच कसे पुढे आणि आम्हालाच कशी ग्राहकांची पसंती याची जाहिरातबाजीही सुरू केली आहे. दसरा-दिवाळीचा हंगाम डोळ्यांसमोर ठेवून अनेकानेक कंपन्या नवनव्या कारचे लाँचिंग करून ग्राहकांना आकर्षति करीत आहेत. त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकवर्गही अहमहमिकेने सरसावत आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर ज्या रस्त्यांवरून या सर्व गाडय़ा धावणार आहेत, त्यांची काय अवस्था आहे याचा आढावा घ्यायला हरकत नाही.
जागतिक मंदीच्या वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था सहा टक्क्यांच्या आसपास वेग धरून आहे. अर्थव्यवस्थेची गती वाढण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयीसुविधांच्या सुधारणेसाठी केंद्र सरकारने अनेक फ्लॅगशिप योजना जाहीर केल्या. त्यातलीच एक म्हणजे रस्तेबांधणी. २००९ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने प्रतिदिन २० किमी रस्त्याची बांधणी करण्याचा संकल्प केला होता. मात्र, ही गती राखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. खुद्द संसदीय समितीनेच त्याची कबुली यंदाच्या मार्च महिन्यात दिली आहे. प्रतिदिन २० किमी रस्त्यांची बांधणी करण्याचे लक्ष्य दुरापास्त असल्याचे या समितीचे म्हणणे आहे. जेमतेम १० किमीचा रस्ता प्रतिदिन बांधता येत आहे. रस्ते उभारणीचे काम करीत असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) निधीची वानवाही नाही. तरीही हे लक्ष्य साध्य होत नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. असे असतानाही येत्या पाच वर्षांत रस्ते, विमानतळे आणि बंदरे यांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने एक पद्म डॉलरची तजवीज केली आहे. असो, मुद्दा आहे की वाहन खरेदी जसजशी वाढत आहे, तसतशी रस्त्यांची अवस्था वाईट होत चालली आहे.
नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या ऑटोमोटिव्ह परिषदेत एलएमसी ऑटोमोटिव्ह या जागतिक संशोधन संस्थेने नेमके याच मद्दय़ावर बोट ठेवले. भारतात दरवर्षी कार-दुचाकी विक्री वाढते आहे. विशेषत: ग्रामीण भागात ही विक्री लक्षणीय आहे. मात्र, त्या तुलनेत इथल्या रस्त्यांची अवस्था प्रशंसा करण्यासारखी नक्कीच नाही, असे निरीक्षण या संस्थेने नोंदवले आहे. २०२० पर्यंत ११ दशलक्ष कार, एसयूव्ही आणि हलक्या वजनाचे ट्रक भारतीय रस्त्यांवरून धावणार आहेत. एवढय़ा वाहनांचा बोजा वाहण्याची क्षमता मात्र येथील रस्त्यांची आहे की नाही हे तपासावे लागेल, असे मत या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पीट केली यांनी व्यक्त केले आहे. भारत ही आशियातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पाश्चिमात्य देशांपेक्षा इथली बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळेच जागतिक दर्जाच्या कार उत्पादक कंपन्या या ठिकाणी नवनवीन प्रकल्प घेऊन येत आहेत. असे असताना रस्त्यांची उभारणी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणतात.
सध्या कारखरेदीचे प्रमाण भारतामध्ये प्रतिहजारी केवळ ११ एवढेच असले तरी येत्या काही वर्षांत त्यात लक्षणीय वाढ होण्याचे संकेत आहेत. कार खरेदी करणे हे आता केवळ स्टेटस सिम्बॉल राहिलेले नसून ती तुमची गरज बनली आहे. परंतु रस्त्यांची अवस्था, कनेक्टिव्हिटी आणि महामार्गाचे जाळे उभारण्यात होत असलेली दिरंगाई व त्याच्या साथीला प्रदूषण यामुळे हा वेग थोडा मंदावण्याचा धोका असल्याचे निरीक्षण सोसायटी ऑफ ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स या संस्थेने याच परिषदेत नोंदवले. रस्त्यावर अत्याधुनिक कारना बलगाडय़ा, रिक्षा, सायकली यांबरोबरच रस्त्यांना जागोजागी पडलेले खड्डे यांच्याशी शर्यत करीत धावावे लागत असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
रस्त्यावर होणारे अपघात हेही एक मोठे आव्हान आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१० मध्ये एक लाख ३५ हजार ५०० जणांना रस्ते अपघातात प्राण गमवावा लागला तर पाच लाख २७ हजार ५०० जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले. याला कारणीभूत असलेल्या अनेक घटकांमध्ये खराब रस्ते हाही एक घटक आहेच. येत्या काही वर्षांत रस्त्यावर धावणार असलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता रस्त्यांची नीट उभारणी, महामार्गाचे जाळे वाढवणे, याबरोबरच रस्ता सुरक्षा यांवरील गुंतवणुकीत वाढ होणे गरजेचे असून त्यात सरकारी व खासगी क्षेत्राने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असा एकंदर सूर या परिषदेत जाणवला. दिवसेंदिवस गाडय़ांची विक्री वाढतच जाणार, त्यामुळे सुस्थितीतील रस्त्यांची उभारणी हे लक्ष्य असणे गरजेचे आहे. त्यातच देशाचे आणि आपलेही हित सामावले आहे.
प्रकल्पांची उभारणी हवी वेळेत
रस्ताबांधणी प्रकल्पही वेळेत होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचा खर्च वाढून अंतिमत: त्याचा फटका ग्राहकांनाच बसतो. अलीकडेच बांधून पूर्ण झालेला महत्त्वाचा रस्ता प्रकल्प म्हणजे नवी दिल्ली ते आग्रा महामार्ग. सहा पदरी असलेला हा महामार्ग रस्ता उभारणी क्षेत्रात मलाचा दगड ठरावा. मात्र, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल नऊ वष्रे लागली. हा कालापव्यय टाळून दररोज २० किमी रस्ता उभारणीचे उद्दिष्ट कठोरपणे राबवले तर कठीण काहीच नाही. कारण आपल्याकडे मनुष्यबळाची कमतरता नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो