साहेब-दादांमधील अंतराने कार्यकर्ते सैरभैर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> साहेब-दादांमधील अंतराने कार्यकर्ते सैरभैर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साहेब-दादांमधील अंतराने कार्यकर्ते सैरभैर Bookmark and Share Print E-mail

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात गोंधळ
दयानंद लिपारे , कोल्हापूर  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले अजित पवार यांच्यातील अंतर वाढत चालल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्य़ातील स्थानिक नेतृत्वासह कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. काका-पुतण्यामध्ये कोणताही वाद नसल्याचे वरकरणी सांगितले जात असले तरी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांच्या देहबोली व वक्तव्यातून या स्थितीवर नेमके भाष्य होताना दिसत आहे. थोरल्या साहेबांविषयी भरभरून बोलायचे की दादांचे कौतुक करायचे याचा पेच या सर्वासमोर आहे. आगामी काळात उभयतांपैकी एकाची पाठराखण करावी लागेल, याची मनाची खूणगाठ बांधतांना ते दिसत आहे.

दोघा महत्त्वाच्या नेत्यांपैकी कोणाची अधिक जवळीक राखावी यावरून अनेकांची द्विधा अवस्था झाली आहे. सहकाराने समृध्द असलेल्या या जिल्ह्य़ात अनेक महत्त्वाच्या कामांसाठी दिल्ली दरबारी जाताना शरद पवार यांची मदत घेतल्यावाचून तिथले पानदेखील हालत नाही आणि राज्यातील सहकारातील समस्यांची उकल होण्यासाठी अजित पवार यांची मदत घेण्यावाचून पर्याय नाही. या स्थितीमुळे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्य़ामध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा गट सक्रिय आहे. काही वर्षांपूर्वी शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा गट सक्रिय असला तरी पवार गटाची ताकद प्रभावी राहिली. विशेषत जिल्ह्य़ाच्या सहकार क्षेत्रावर पवारांचा नेहमीच वरचष्मा राहिला. काँग्रेसमधून बाजूला जाऊन पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यांच्यामागे जिल्ह्य़ातील अनेक प्रभावी नेते उभे राहिले. बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर या दिवंगत नेत्यांसह खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, विद्यमान जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील अशा अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्याने पक्षाला कोल्हापुरातून चांगलेच पाठबळ मिळाले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर घडय़ाळाची टिकटिक प्रथमच ऐकू आली. पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पक्षाला धवल यश मिळाले. गेली १० वर्षे जिल्ह्य़ात शरद पवार यांचे वर्चस्व अबाधित राहिले.
पक्ष स्थापनेच्या सुरुवातीपासून थोरल्या साहेबांचा जिल्ह्य़ात शब्द प्रमाण मानला जात होता. आजही त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. मात्र गेल्या काही वर्षांत दादांनी आपल्या खास लोकांना ताकद देण्यास सुरुवात केली. त्यातून दादा गटाचा असा शिक्का काहींवर बसू लागला आहे. आगामी काळ हा दादांचाच राहणार असल्याने या गटातून बोलले जात आहे. या घटना काहींनी थोरल्या साहेबांच्या कानावर घातल्याचीही चर्चा आहे. याची कुणकुण लागल्यावर थोरल्या साहेबांनी जिल्ह्य़ामध्ये अन्य नेतृत्त्वाची चाचपणी करण्यासही सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
साहेब आणि दादांमधील या अंतरामुळे कार्यकर्त्यांच्या पातळीवर मात्र भलतीच गोची निर्माण झाल्याचे चित्र पक्षामध्ये दिसत आहे. कार्यकर्त्यांना एक पक्ष, एक नेता असे समीकरण हवेहवेसे वाटते. वास्तव मात्र दुसरेच काही दर्शवित आहे. थोरल्या साहेबांच्या मर्जीतील विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी अंत्यविधीसाठी तातडीने कोल्हापूर गाठले होते.
 याच दौऱ्यात साहेबांचे विश्वासू सहकारी दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अजित पवार यांनी सांत्वनही केले होते. या दोन्ही भेटींमागे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. साहेबांच्या मर्जीतील खास कार्यकर्त्यांना आधार देण्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी कोल्हापुरात संपर्क वाढविण्यास सुरुवात केल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. जिल्ह्य़ातील काही कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार हे आगामी काळात कोल्हापुरात येणार असून त्यावेळी ते बांधणीच्या दृष्टीने काही गोष्टी घडवून आणतील, असे सांगितले जात आहे. थोडक्यात कोल्हापूर जिल्ह्य़ात शरद पवार व अजित पवार यांना मानणारा कार्यकर्ता अशी नवी विभागणी उदयाला येताना दिसत असून त्यातून पक्ष कशाप्रकारे वाटचाल करणार हा खरा प्रश्न आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो