अफजल गुरू व कसाबला तात्काळ फासावर लटकवा
|
|
|
|
|
शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी विशेष प्रतिनिधी, मुंबई संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु आणि मुंबईवर अतिरेकी हल्ला करून निरपराधांचे प्राण घेणारा पाकिस्तानी अजमल कसाब यांचा दयेचा अर्ज फेटाळून त्यांना लवकरात लवकर फासावर लटकविण्यासाठी सरकारला भाग पाडा, असे आवाहन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केले.
मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती मुखर्जी यांची शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत, विधिमंडळ शिवसेना नेते सुभाष देसाई व आमदार दिवाकर रावते यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन देशाच्या मूळावर आलेल्या या अतिरेक्यांच्या दयेचा अर्ज फेटळून लावा अशी मागणी करणारे एक निवेदन सादर केले. राष्ट्रपतीपदाच्या आजपर्यंतच्या इतिहासात अनेक राष्ट्रपती हे सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे असल्याची टीका होत असते. आजपर्यंतच्या इतिहासाला छेद देऊन राष्ट्रपती म्हणून आपण कणखर आहात हे दाखवून द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करून लकररात लवकर अफजल गुरु व कसाबला फाशी देण्यास सरकारला भाग पाडा अशी विनंती या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. |