‘नीट-पीजी’ प्रवेशाचे संकेतस्थळ कोलमडले
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘नीट-पीजी’ प्रवेशाचे संकेतस्थळ कोलमडले
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘नीट-पीजी’ प्रवेशाचे संकेतस्थळ कोलमडले Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या ‘नीट-पीजी’ या प्रवेश परीक्षेसाठी गुरुवारपासून जिथे नोंदणी करायची होती ते संकेतस्थळच तब्बल नऊ तास ‘हँग’ झाल्याने विद्यार्थ्यांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागले. सायंकाळी सातच्या सुमारास संकेतस्थळ पूर्ववत झाल्यावर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सुरूवात केली. परंतु, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राहून गेलेल्या त्रुटी, परीक्षा केंद्रांचे उपलब्ध असलेले मर्यादीत पर्याय यामुळे विद्यार्थ्यांच्या मनस्तापात आणखीच भर पडली आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या वर्षी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर ‘नॅशनल एजिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट-पीजी’ (नीट) ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

साधारणपणे वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात घेतली जाते. परंतु, या वर्षी नीट-पीजी २३नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. दोन महिने आधीच प्रवेश परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांवर संकट कोसळले आहे. त्यातच या परीक्षेसाठी ‘नॅशनल बोर्ड फॉर एक्झामिशन’ने ४ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
सकाळी दहाच्या सुमारास ttp://www.nbe.gov.in/neetpg/  या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. पण तासाभरातच ते हँग झाले. अर्ज भरण्याआधी विद्यार्थ्यांना अॅक्सिस बँकेत शुल्क भरून माहिती पुस्तक आणि परीक्षेचे व्हाऊचर मिळवायचे होते. या व्हाऊचरवर देण्यात आलेला सांकेतिक क्रमांक संकेतस्थळावर भरून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहाटेपासूनच बँकांबाहेर रांगा लावून ही व्हाऊचर्स मिळविली. पण अर्ज भरण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांच्या पदरी निराशा आली.
सायंकाळी सातच्या सुमारास संकेतस्थळ पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरूवात केली. मात्र, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. अर्ज भरताना थोडीजरी चूक झाली तर विद्यार्थ्यांना संपूर्ण अर्ज नव्याने भरावा लागतो आहे. त्यात विनाकारण विलंब होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
‘परीक्षा २३ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळातच होणार आहे. त्यासाठी प्रत्येक शहरात मर्यादित परीक्षा केंद्र आहेत. मुंबईत केवळ दोन परीक्षा केंद्रे आहेत. या केंद्रांवर दिवसभरात केवळ २४० विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असल्याने अर्ज भरण्यास उशीर झाल्यास मुंबईबाहेर जाऊन परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे, शक्य तितक्या लवकर अर्ज भरण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे डॉ. वैभव देशपांडे या विद्यार्थ्यांने सांगितले.     
मुंबईच्या विद्यार्थ्यांला जम्मू- काश्मीरमध्ये केंद्र
परीक्षा केंद्र वाटपाच्या प्रक्रियेतही अनेक त्रुटी असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. डॉ. शैलेंद्र नामक विद्यार्थ्यांला तर भलताच अनुभवाल आला. त्याच्या मित्राने सातच्या सुमारास अर्ज भरला असता त्याला कांदिवलीतील परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यानंतर अध्र्या तासाने म्हणजे साडेसातला अर्ज भरणाऱ्या डॉ. शैलेंद्रला मात्र पाटणा किंवा जम्मू-काश्मीर यापैकी एक परीक्षा केंद्र निवडण्यास सांगितले गेले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो